बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज काही मैत्रिणी आल्या होत्या. त्यांच्यासाठी मंजुडीच्या रेसेपीप्रमाणे बाकरवडी चाट, मिनीच्या रेसेपीप्रमाणे अडई, चटणी व मिल्कशेक असा बेत केला. करायला सोपा , पोटभरीचा आणि चवदार बेत झाला. दोघींनाही ठांकु हं रेसेपी बद्दल!

उद्या फॅमिलीतले ५ जण जेवायला येणार आहे.
जीरा राइस
कणकेत कसुरी मेथी+तीळ+मीठ्+ओवा घालुन त्रिकोणी पराठे
पनीर मसाला
दाल फ्राय
बुंदी रायता डाळीम्बाचे दाणे घालुन
पापड, बॉबी इ फ्राय करुन
आम्रखंड

हे ठरवलंय. पण अजुन एक सुकी भाजी काय करु? आणि इतर काही करु का?

बटाटा-मटार, बाकी काही करायची गरज नाही .आम्र्खन्ड आहेत तर बुन्दी रायत्यापेक्षा खमन्ग काकडि किन्वा काकडी-टोमॅटो कोथिबिर जास्त छान लागेल..(दोन दह्याचे पदार्थ होतायत)

दोन दह्याचे पदार्थ?
ओके आम्रखंड आणि रायता का?
आम्रखंड विकतच आणणार आहे.
काकडी-टोमॅटो कोशिंबिर करते.
दुसरी भाजी नकोच का?
मलाही असंच वाटत होतं. Happy
तरी बघते

पाचच लोक्स आहेत ना, मग एक ग्रेव्हीची भाजी, दाल, रायता/कोशिंबीर एवढं पुरेल. गोडात श्रीखंड्/आम्रखंड असल्यानी त्याला लावूनही पोळी, पराठा, पुरी खाता येतेच की.
अगदीच लाडात असाल तर नेहेमीचे यशस्वी कलाकार आहेतच मग, उकडलेल्या बटाट्याची भाजी, मटकीची कोरडी उसळ, कुठलीही परतून केलेली भाजी इ. वरच्या मेन्यूला सुट होईल अशी त्यातल्यात्यात सोपी, सुकी भाजी म्हणजे, भरली भेंडी/ मसाला भेंडी, मिक्स मसाला व्हेज इ

दुसरी भाजी नकोच का?>> बटाटा-मटार म्हटल होत मी, शिवाय आता योकुने पाचाचे पंधरा केलेत.smiley16.gif

च्च! पाचच होते, तुझ्यामुळे पंधरा झाले >>> Lol
मटन बिर्यानी नंतर थंड पेय कुठल सर्व्ह करता येइन (कराव का ? ) ??? तसेच सुरुवातीला हलकफुलक स्टार्टर कुठल ठेवता येइन ?? लोक अंदाजे १८ आहेत.

योकु, सिंडरेला Lol

यशस्वी कलाकारच हातशी आले. उ बटाट्याची पिवळी भाजी केली. Happy
बाकी मटार पनीर, दाल फ्राय, मुगडाळ भजी, तळलेले बॉबी, बुण्दी रायता, जीरा राइस, चपाती, आम्रखण्ड होतं.

मटन बिर्यानी नंतर थंड पेय कुठल सर्व्ह करता येइन (कराव का ? ) ??? तसेच सुरुवातीला हलकफुलक स्टार्टर कुठल ठेवता येइन ?? लोक अंदाजे १८ आहेत.
>> चिकन ६५?
मसाला पापड,
मोनॅको बिस्किटवर चीज पसरोन व एक ठिपका केचप
उकडलेली अंडी अर्धी करून वर मीठ मिरेपूड.
थंड पेय सध्याच्या दिवसात बीअर च पळेल. पण कोक/ पेप्सी? लिंम्का जलजीरा पळेल.

मोनॅको बिस्किटवर चीज पसरोन व एक ठिपका केचप>>>> अरे हा.. ये तो जमेगा.
थंड पेय सध्याच्या दिवसात बीअर च पळेल. पण कोक/ पेप्सी? लिंम्का जलजीरा पळेल.>>>>>> फॅमिली आहे हो.
बीअर नाही पळणार.कोक पेप्सी >> ह्म्म्म पाहते हे.

५ तारखेला अथर्व चा २रा वाढदिवस आहे, ३० मोठे आणि १२ लहान एवढी माणसे आहेत. केक, चॉकोलेट आणि वर सरबत हे आहेच.
सध्या मला सुचलेले आणि करायला सोपे:-
१) इडली-चट्णी, याबरोबर अजुन काय ठेवता येईल
२) दाबेली आणि गोड्/आंब्याचा शिरा.

घरी करता येण्यासारखा मेनु सुचवा, त्याबरोबर अंदाज पण द्या, पुर्ण नवीन मेनू सुचवा किंवा वरती पदार्थ आहेत त्यात काही बदल सांगा.
केक किती किलोचा लागेल घरी करायचा विचार आहे.

मुग्धा, माझ्या मुलीच्या बोरन्हाणाला मी बाकरवडीचाट (मंजूडीची रेस्पी), जिलबी, आटीव दूध, असं ठेवलं होतं. बोरन्हाण + हळदीकुंकू असल्यामुळे बाळखाऊ म्हणून चॉकलेट्स, बिस्किट्स आणि तीळगूळ होता.

मागच्या ३-४ पानांत अंदाजही आहे. पण मला आठवतंय त्याप्रमाणात २ ते अडीच किलो मिनि बाकरवडी लागेल. त्यात घालायला अर्धा किलो अख्खे हिरवे मूग आधी भिजवून मोड काढून किंचित वाफवून (किंवा पाणी न घालता कुकरला एक शिटी), लागेल तसा बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो-कोथिंबीर, खारी बुंदी बहुतेक पाव किलो, आवडत असेल तर फरसाण पाव किलो. भेळेच्या तिखत-गोड चटण्या.

केक, चॉकलेट आणि सरबत असल्यामुळे मला हे सुचलं. चटण्या वगैरे घालून चाट आधी करून मग लागेल तसं पुन्हा चटण्या घालता येतील. आधी केल्यावर चाट मुरून चव छान येते.

मुग्धा, अथर्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सध्या भारतात खूप ऊन आणि गरमी आहे. तेव्हा गरमागरम वाढावा न लागणारा, फार स्पायसी, तेलकट नसलेला हा मेनू सुटसुटीत आणि पोटभरीचा वाटतोय का?

दही-भाताऐवजी दही शेवया. ह्या रूम टेंपरेचरला किंवा जरा गार खूप छान लागतात. पोटाला शांत वाटतं. फार खटाटोप न करता पोटभरीचा पदार्थ होतो.

दाबेलीची मेहेनत करायला तयार आहात, तर त्या ऐवजी चीज-बटाट्याची भाजी भरलेली सँडविचेस. आलू-मसाला ग्रिल्ड सँडविचेस किंवा बाँबे मसाला टोस्ट. मिरच्या वगळून, फार तिखट केली नाहीत तर मुलांनासुध्दा खाण्याजोगी होतील. टोमॅटो केचअपबरोबर खाता येतील. मोठ्यांना तिखट सॉस्/चटणीबरोबर.

गोडाला केक आहे. तेव्हा पुन्हा शिरा करण्याऐवजी मँगो आइस्क्रीमचा किंवा व्हॅनिला आइस्क्रीमचा गोळा घालून गार मँगो लस्सी. (मग सरबत वगळलं तरी चालेल.)

६ फॅमेलीजना (अमराठी) जेवणासाठी हा बेत कसा आहे?
पुरणपोळी,कटाची आमटी, मसालेभात, साधा भात, उकडलेल्या बटाट्याची भाजी, पुदीना चटणी, कोथिंबीर वडी(मुगडाळ + थोडी चना डाळ), खमंग काकडी.काही बदल करायला हवा का? किंवा काही अजुन हवे?

बार्बेक्यु बड्डे पार्टी साठी काही नविन पदार्थ सुचवा प्लीज. साधारण ३० मुले आहेत. वय १४/१५. (टिनएजर्स) व्हेज नॉनव्हेज, मेन कोर्स व ड्रिंक्स.... डिझर्ट ला केक आहेच. पनीर टिक्का, चिकन तंदुरी, बेबी कॉर्न, रताळे, चिकन सॉसेजेस, टॉर्टीया चिप्स, हेश(!) ब्राउन्स हे (नेहमीचच्) सुचलयं आत्तापर्यंत. मेन कोर्स ऑर्डर करता येईल.

गेट-टुगेदर च्या मेनुत मिसळ-पाव्,ओनियन-पालक पकोडे, रवा-इडली, दहिभात अ‍ॅड करायला काही (गोड नको )सुचवा, मी मुन्गोडे नेणार होते पण होस्ट पकोडे बेक करणार आहे अ‍ॅपेटायझर म्हणुन

चाट आयटेम नेता येईल. दही बटाटा शेव पुरी / पाणी पुरी किंवा आवडीचा कोणताही चाट प्रकार.

Pages