Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गट्टु काहिच रीअक्ट करत नाही
गट्टु काहिच रीअक्ट करत नाही का त्यांचे लग्न झाले आहे कळल्यावर >>> हम्म्म. कुठुनतरी शिरेल संपवायची म्हणुन कालचा भाग दाखवला अस वाटल. स्पेशली जुईवर खूप मोठा अन्याय केला अस वाटल. गेल्या आठवड्यात एकेकाला जय-आदितीबद्दल कळत जात आणि त्यावर त्यांच्या मनातली द्विधा दाखवता आली असती. रजनीच्या बाबत ती गोष्ट छान हाताळली गेली. जुईच पात्र जितक संवेदनशील दाखवल गेल होत त्यामानाने तिला ज्या प्रकारे शॉक बसलाय तो तिने अगदी इझीली हॅण्डल केलेला दाखवलाय. कारण तिला जयविषयी वाटत असणार्या भावना तिने आदितीजवळच व्यक्त केल्या होत्या... नंदिनीने अविनाशसाठी आदिती हिच योग्य जोडीदार असल्याच आउंना पटवुन दिल होत. जुई आणि साईला उगाचच एकत्र आणलेल दाखवल शेवटी जणु काही नव्या नियमानुसार ऑफिसमधल्या कलिग्जबरोबरच लग्न होण बंधनकारक असाव अस. दाभोळकरांचा सुद्धा मुड स्वींग झाल्यासारख सगळ अॅक्सेप्ट केल.
Thanks Mugdha for updates.
Thanks Mugdha for updates.
वेलकम मानिनि
वेलकम मानिनि
मी सहज टीपी म्हणूनच शेवट
मी सहज टीपी म्हणूनच शेवट प्रेडिक्ट केलेला. यांनी तसाच शेवट केला होय ?
मंजू यावरून मागे एकदा
मंजू
यावरून मागे एकदा वाचलेली स्वानंद किरकिरेची एक मुलाखत आठवली. त्यात त्याने अगदी कळकळीने म्हटलं होतं, की इंडस्ट्रीत कितीही ओळखी, मैत्री, चांगली नाती असोत, जिथे 'नाही' म्हणायला हवं तिथे म्हटलं गेलं नाही, तर पुढे त्याचा फार ताप होतो. (त्याने कुठल्याश्या अनाकलनीय सिनेमाची गाणी लिहिली होती त्यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना तो हे म्हणाला होता.)
सुभाचं पण या मालिकेच्या बाबतीत असंच काहीसं झालं असावं असं मानायला वाव आहे.
बाकी, काल जय-आदितीला
बाकी, काल जय-आदितीला ऑफिसमध्ये फुलांच्या माळा वगैरे सरप्राईझ होतं, तर आदिती ते आधीच माहिती असल्यासारखी इतकी नटून-थटून का आली होती?
तुला अजूनही या मालिकेच्या
तुला अजूनही या मालिकेच्या लॉजिकबद्दल प्रश्न पडतायेत याचंच मला कौतुक आणि आश्चर्य वाटतंय लले!
आता शेवटचा एपि आहे ना.. मग
आता शेवटचा एपि आहे ना.. मग टाका उरकुन अश्या थाटात झाल काल
तुला अजूनही या मालिकेच्या
तुला अजूनही या मालिकेच्या लॉजिकबद्दल प्रश्न पडतायेत याचंच मला कौतुक आणि आश्चर्य वाटतंय
लोल
काल जय-आदितीला ऑफिसमध्ये
काल जय-आदितीला ऑफिसमध्ये फुलांच्या माळा वगैरे सरप्राईझ होतं, तर ती ते आधीच माहिती असल्यासारखी इतकी नटून-थटून का आली होती? >> हो ना, आणि मंगळसुत्र दाखवायचच म्हणून चक्क आय कार्डच्या बेल्ट वर घातलं होतं.

तो जय इतका व्यापलाय की काल पण ते नेहमीचं निळं शर्ट घालून आला होता. दाढी पण कुठेकुठेच वाढलेली होती. एकतर क्लिन शेव्ह करायची नाहीतर व्यवस्थित वाढवायची.
हो ना, आणि मंगळसुत्र दाखवायचच
हो ना, आणि मंगळसुत्र दाखवायचच म्हणून चक्क आय कार्डच्या बेल्ट वर घातलं होतं >>>> नुसत ते नै तर नुकतच देवळात जाउन लग्न करुन आल्यासारख दोन दोन मंगळसुत्री घालुन आली होती.
पूनम
पूनम
मंगळसुत्री>> नुसत ते नै तर
मंगळसुत्री>>
नुसत ते नै तर नुकतच देवळात जाउन लग्न करुन आल्यासारख दोन दोन मंगळसुत्री घालुन आली होती.>> आणि त्या दोनपैकी एक पण तिचं नेहमीचं मंगळसूत्र नव्हतं.
हो, म्हणुनच म्हणाले ना नुकतच
हो, म्हणुनच म्हणाले ना नुकतच देवळात जाउन लग्न करुन आल्यासारखे....
मिळमिळीत सिरियलीचा मिळमिळीत
मिळमिळीत सिरियलीचा मिळमिळीत शेवट.
नंतर office च्या लोकांनी जे काही केलं त्याने माझा कडेलोट झाला आणि मी टिव्ही समोरून उठून बेडरूममधे आले.
जय आणि आदिती नोकरी सोडणार म्हणून कदम काका पण. म्हणे जिथे माझी मुलं नाहीत तिथे मी काय करू? अरे हि तुमची मानलेली मुलं आहेत, त्यांना सहज नोकरी मिळेल. तुमचं काय? नोकरी नाही मिळाली तर खर्या मुलांचं काय होणार? इथे जय आदितीलाच एका ठिकाणी नोकरी मिळेल याची शाश्वती नाही आणि तिघांना एका ठिकाणी नोकरी मिळेल ? काहीही
जेव्हा नंदीनी तोंड उघडते तेव्हा तीही असंच काहीसं म्हणते की काय असं वाटलं. पण नशीब ती जरा logical बोलली की मी आउंशी बोलते. जरा बरं वाटलं.
दुसऱ्या दिवशी साडीत नटून थटुन आलेलं पाहून डोकंच फिरलं. अरे आपण या लोकांचा विश्वासघात केला आहे तरीही या लोकांनी आपल्याला स्विकारलं आहे तर आशा लोकांसमोर कसं जावं? असा विचार मला पडला असता आणि हि बाई घरच्या लग्नाला आल्या सारखी नटून थटुन.
जाऊ दे गं! विसरुन जा! अशी
जाऊ दे गं! विसरुन जा! अशी कोणती शिरेल आपल्या आयुष्यात आली होती आणि आपण बघत होतो, हे पण विसरुन जायचे!
काल साई-जुई जोडी लावणं फार
काल साई-जुई जोडी लावणं फार ओढुन ताणून जबरदस्ती केलं असं वाटलं, काही गरज नव्हती. मी नेमका शेवट म्हणून मधे मधे बघितलं, मॅच बघता बघता
.
अशी कोणती शिरेल आपल्या
अशी कोणती शिरेल आपल्या आयुष्यात आली होती आणि आपण बघत होतो, हे पण विसरुन जायचे! >>>>> निधी काय क्लास विधान केलयंस
!!!!
हि बाई घरच्या लग्नाला आल्या
हि बाई घरच्या लग्नाला आल्या सारखी नटून थटुन. राग नंतर office च्या लोकांनी जे काही केलं त्याने माझा कडेलोट झाला >>>> माझ्या अगदी ह्याच भावना
काल साई-जुई जोडी लावणं फार
काल साई-जुई जोडी लावणं फार ओढुन ताणून जबरदस्ती केलं असं वाटलं, >> +१ जुईला इमोशनल आधार वैगेरे दाखवायचा अट्टाहास वाटला मला ती तो. जुई इतक्यात सावरलीच कशी हा एक मोठा प्रश्न पडलायं मला.
क्लि.. धन्यवाद गं!
अग ती गोंधळली होती, उगाच आपलं
अग ती गोंधळली होती, उगाच आपलं हा निर्णय घेणारी रजनी कोण? मला फारच राग आला. गरज नसताना काहीही दाखवलं त्याचा.
नुसती जुईच नाही निधी,
नुसती जुईच नाही निधी, दाभोळकर, नंदिनी या दोघांनी पण अगदी सहज स्विकारल्यासारख दाखवलय. माझ्या याच पानावरच्या पोश्टीत लिहिलय बघ मी सगळ.... शेवटचा एपि, उरका आता आणि सगळ गोडच झालच पाहिजे टाईप्स...
हो.. तसं नसतं दाखवलं तर
हो.. तसं नसतं दाखवलं तर जास्त बरं झालं असतं.
मुग्धा आत्ता वाचली ती पोस्ट.
मुग्धा आत्ता वाचली ती पोस्ट. अगदी पर्फेक्ट लिहिलयंस.
दाभोळकर इतकं दात ओठ चावत
दाभोळकर इतकं दात ओठ चावत होते, मी नवऱ्याला म्हटलंच की आता हे एकदम बदलेले, मवाळ झालेले दाखवतील जे पटणारच नाही मला.
हो ना, म्हणजे अजुन तरी जयला
हो ना, म्हणजे अजुन तरी जयला जावई म्हणुन अॅक्सेप्ट करण्याचा माझा मूड नाही आणि गट्टु बरोबर बाहेर आल्यावर लग्गेच जयला शाबासकी?
>>> आल्यासारख दोन दोन
>>> आल्यासारख दोन दोन मंगळसुत्री घालुन आली होती. <<<
काय बारीक लक्ष अस्तय तुम्हा लोकांच.....
काल मॅच होती, सबब काल सेरियलींना सुट्टी होती.... शनिवारचे आठवत नाही
संपली का ती सेरीयल? केव्हा?
दोन दोन मंगळसूत्रं >> त्यातलं
दोन दोन मंगळसूत्रं >> त्यातलं एकही आदितीचं नेहमीचं नाही >> आयकार्डच्या बेल्टवर मंसू >>> नट्टापट्टा >>>
अबबबबबब, अरे सीरीयल बघताना कुठे कुठे लक्ष देता ब्वॉ तुम्ही लोक ! नि:शब्द !!!
मालिकेत जे काही दाखवतात तेच झेपत नसताना या प्रकारच्या निरीक्षणशक्तीसाठी शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार ठेवायला हवा. मनापासून !!
ह्या मालिकेचा शेवटचा भाग
ह्या मालिकेचा शेवटचा भाग वेबसाईटवर अर्धवटच दाखवत आहेत आणि यु-ट्युबवर शेवटच्या दिवसाचा वेब एपिसोड ( पाच मिनिटांचा ) अजूनच वेगळा आहे
कुणाला योग्य भागाची लिंक मिळाल्यास द्या.
मालिका बघणे केव्हाच सोडून दिले होते. अधूनमधून नेटवर झलक बघितली तर वेगळे काहीच घडत नसायचे. सगळे तिथल्यातिथेच ! शेवटच्या भागात काय उजेड पाडलाय बघायचेय.
झी मराठीवरच्या बहुतेक मालिका फक्त दळण दळतात. गोष्ट अजिबात पुढे न नेता शेकडो भाग पटकथा-संवाद कसे लिहायचे ह्याचे स्पेशल ट्रेनिंग दिले पाहिजे ह्यांनी इतरांना !! त्यापेक्षा एकता कपूरच्या मालिका बर्या, अनेक भागांनंतर बघितल्या तर मुख्य पात्र ओळखूही येणार नाही
मालिकेत जे काही दाखवतात तेच
मालिकेत जे काही दाखवतात तेच झेपत नसताना या प्रकारच्या निरीक्षणशक्तीसाठी शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार ठेवायला हवा. मनापासून !! >>>> कापोचे काका, मालिकेत दाखवतात ते झेपण्यासारख नसत म्हणुन आपसुक लक्ष अश्या गोष्टींकडे जात.. एकदा मी आणि माझ्या साबांनी एका मालिकेतल्या किचनमधल्या बरणी आपल्याकडे आहे तशीच आहे अस म्हणुन नवर्याला घेरी आणली होती...
Pages