बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनी बाकरवडी किमान ३ कि. लागेल.
५० तिळाच्या लाडुला ३ वाट्या तिळकूट + १ वाटी दाण्याचा कुट + २ ते २.५ वाटी गूळ हे प्रमाण पुरेल.
जिलबी १.५ कि. पुरेल. जास्त नको!
डिस्पो. ग्लास मिडि. साईझ म्हणजे ४ लिटर दूध पुरेल. अगदी आटवणार असशील तर ५ लि. पुरेल.

बाकरवडी चाट (म्हणजे मिनि बाकरवड्या भरडून त्यात फरसाण, शेव, बारीक चिरून कां-टो-को आणि भेळेच्या चटण्या.).>>> बाकरवडी चाटमधे फरसाण नक्को Sad कांदाही नको आणि को म्हणजे कोबी का? तो तर अजिबात नक्को.
बाकरवडी चाटसाठी मोड आलेले मूग छान लागतात, त्यात टोमॅटो घाल फक्त. भरीला खारी बुंदी घालू शकतेस. बाकरवड्यांबरोबर कांद्याचा स्वाद अजिबात छान लागत नाही. आणि त्या बिचार्‍या बाकरवड्यांना भरडू नकोस. आणि भेळेसारखं आयत्यावेळी कालवू नकोस. आधी मूग, टोमॅटो, चटण्या, बाकरवड्या कालवून ठेव. खायला देतेवेळी बुंदी आणि शेव घालून दे. बाकरवड्या चटण्यांत मुरल्यावरच छान लागतात.
२ किलो बाकरवड्या आणि अर्धा किलो मूग (भिजवून मोड काढून जरा किंचीत शिजवून घ्यायचे)
टोमॅटो पाव किलोपेक्षा थोडे जास्त घे. बुंदी/ डाळं/ शेव आवडीप्रमाणे अंदाजाने.

बाकी जिलब्या, मसाला दुधाचा परफेक्ट अंदाज पूनमने दिला आहे.

मेनू मस्त आहे. तोंपासु!
रच्याकने मला यंदा कुठल्याही बोरन्हाणाचं/ ह.कु.चं बोलावणं नव्हतं Sad आणि आत्तापर्यंतच्या बोलावण्यांना कुठेही असे तोंपासु मेनू नव्हते.

दूध गरम करणे आटवणे व सर्व्ह करणे ह्याला एक जबाब दार व्यक्ती नियुक्त करा ताई. पातेले जाड
बुडाचे घ्यावे लागेल.

मुलांच्या साठी गोळ्या बिस्किटे वगैरे आणनार ना?? पार्ले जी चे छोटे पॅक्स आहेत. मेलडी. एक्लेअर्स, ऑरेंज लेमन पॉपिन्स. श्रिखंड गोळी? खाली स्वच्छ बेडशीट पसरून मुलांना त्यावर बसवा म्हणजे खाली सांडलेला माल बेडशीटाची चार टोके उचलून गो़ळा होईल. ही माझ्या साबांची टिप्प.

मुलांच्या साठी गोळ्या बिस्किटे वगैरे आणनार ना?? पार्ले जी चे छोटे पॅक्स आहेत. >> पिकविक , लिटिल हार्ट्स

पण त्यात तुम्ही आटवायचं एक-दीड लिटर पकडलं नाही आहात... तुम्हाला तीन - चार ग्लास मदू कमी पडणार. घरच्यांना नैवेद्याच्या वाटीतून द्यावं लागेल दूध Proud

मंजूडी__/\__ आधीच्या पूर्वतयारीच्या प्रतिसादाबद्दल आणि वरच्या बाव चाट च्या प्रतिसादाबद्दल!
प्र९, मस्त बेत आहे!

मंजूडी__/\__ आधीच्या पूर्वतयारीच्या प्रतिसादाबद्दल आणि वरच्या बाव चाट च्या प्रतिसादाबद्दल!
प्र९, मस्त बेत आहे!

मंजूडी, चाटसूचना नोटेड. को म्हणजे कोथिंबीर. कांदा क्यान्सल करते. मूग भिजत टाकते लग्गेच.
तिळलाडू किंवा वडी जे घडेल ते!

दूध आज आणून उकळून ठेवणार. उद्या आटवणार. बा व नो भरड. ओके. चिराचिरी दुपारी करणार.
अजून घर आवरायचंय जरा. Wink उत्साह उरला तर मेंदी. :आता आवरा!:

धन्यवाद! Happy

उद्या ह कु झालं की इथे बयजवार ल्हिते.

आणि हो! मुलांसाठी मज्जेचा खाऊपण आहेच की कळशीभर! Happy बिस्किट्स, गोळ्या, चुरमुरे, बोरं, गाजराचे तुकडे...

खाली स्वच्छ बेडशीट पसरून मुलांना त्यावर बसवा म्हणजे खाली सांडलेला माल बेडशीटाची चार टोके उचलून गो़ळा होईल.<>>> आम्ही तर सरळ बाथटबमध्येच बसवलं होतं. त्यासाठी बाथटब स्वच्छ धुवून रिबीनी वगैरी लावून डेकोरेट केलेला. Happy

बाकरवडी चाट हा प्रकार इंटरेस्टिंग वाटत आहे. कृपया बिगारीतल्या लोकांसाठी सविस्तर नीट पाककृती देणेचे करावे.

प्रज्ञा, मस्त होईल कार्यकम.
तुझा उत्साह बघून मलाही आला बघ उत्साह.

एका गेट्टुगेदर साठी व्हेज फ्रन्की करायच्या विचारत आहे.....
साधारण १० मोठे आणि ५-६ वर्ष वयाची १० लहान मुले आहेत.....
मेनु साधारण असा ठरवला आहे :

शेव बटाटा पुरी ( कडक चपट्या पुर्यांची करतात ती )
व्हेज-पनीर फ्रँकी ( पोळ्या कीती लागतील ? अंदाज सांगा ...कणीक + मैदा मिक्स करुन करणार )
मटारभात
बुन्दी रायता
गोड ( अजुन ठरले नाही..सुचवा प्लीज )

शेवपुरी मुले कितपत खातील शंका आहे...पुर्यांची किती पाकीटे आणु ?
फ्रॅन्की च्या भाजी साठी पनीर+ सिमला मिर्ची + कांदा + गाजर + बटाटा घालेन..
मटार्भात साठी तांदुळ आणि मटार किती घेउ ?.
मुलांना फ्रॅन्की आवडेल का ?
आयत्या वेळेस फ्रॅन्की असेंबल करायला गडबड नाही ना होणार ?
शेवपुरी आधीच रेडी करुन ठेवणार ताटात म्हणजे पुर्या मांडुन त्यावर बटाटा, कांदा, टोमॅटो ई सगळं घालुन ठेवीन....चट्ण्या, दही , शेव आयत्या वेळी घालेन...
येणारे सगळे पाहुणे मदत करतीलच

लिहिला मी प्रश्ण तिकडे... Happy
धन्यवाद आशुडी...

गोड बेत काय करु वरच्या मेनु ला साजेसा ते पण सांगा बरका प्लीज

अय्यो, या पाकीबायकांनी जाम घोळ करू ठेवलाय.
आता काही समारंभ असल्यास

१.' बेत काय करावा 'वर प्रश्न विचारायचा.
२. मग तिथली एकेक पाकृ घेऊन 'पाकृ हवी आहे, माहिती आहे का? ' वर प्रश्न विचारायचा.
३. मग 'अंदाज किती घ्यावा' वर जाऊन अंदाजानं सगळं सामान आणावं.
४. मध्येच काय बिघडलं की 'अमकं पीठ घट्टं कसं करू, तमकं सारण पातळ कसं करू?' असले प्रश्न 'युक्ती सुचवा, युक्ती सांगा' वर विचारायचे.
५. मग शेवटी एकदाचा घोळ घालून तो -
अ) चुकला - तर 'माझं काय चुकलं' वर प्रश्न विचारायचा.
ब) छान झाला- तर नविन पाककृतीत एक पाकृ पाडून सगळ्या गावाला (वाचा- पाकी बायकांना) श्रेय द्यायचे.

Happy

स्मिता, या मेनुला साखरी गुजा चालतील. शिरा ही चालेल. शिरा आधी करून ठेवता येईल. रव्याचा केक करू शकशील आधीच!

मंजुडी निपुण आहे असं जाणवतं. Happy स्वयंपाकाचं नियोजन आणि स्वयंपाकही उत्तम असणार. सगळं निगुतीने करत असणार. Happy
मी सहसा ओळखी वाढवत नाही. पण मंजुडीकडे आमंत्रण असेल तर जायला आवडेल Light 1 Lol

मंजूडी, मी बाव चाट कधी बघितला नाही, खाल्ला नाही तसच मटार पॅटीस आणि मटार करंजी कधी खाल्ली नाहि फक्त फोटो बघितले आहेत. पुढच्या वेळी आली की मला आमंत्रण कर स्नॅक्स पार्टीच. Wink Happy

Pages