बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पनीरच्या २०० ग्रॅम ब्लॉकचे साधारण दीड इंच बाय दीड इंचाचे अंदाजे १०-१२ तुकडे होतात. त्यावरून पनीरचा अंदाज घ्या. माणशी चार-चार पनीरचे तुकडे धरले तर माझ्या मते दोन किलो तरी पनीर लागेदोन्सिमला मिरची अर्धा किलो पुष्कळ होईल.

पाव किलो पनीरच्या पनीर चिलीमध्ये तीन लोक जेवतात. सो, दोन-सव्वादोन किलो पनीर तरी लागेलच. ढब्बू मिरची पाऊण किलो. जवळपास मंजूडीने सांगितलेलेच प्रमाण! Happy

माझा आवडता बेतः
१) शाकाः ताकाची कढी+कांदा भजी, दुधीचे पराठे, डाळभाताची खिचडी...
२) मांसाः चिकन बिर्याणी... मी स्वतः घरीच अतिशय उत्तम बनवतो... बाहेरुन मागवण्याची गरज नाही पडत...
३) मांसा: सुके मटण, तांबडा अधिक पांढरा रस्सा, ज्वारीची भाकरी, जिरा राईस....

डाळभाताची खिचडी : कुकरमध्ये फोडणी करा... त्यात कढीपत्ता + १०-१२ मेथीदाणे + तमालपत्रे १ किंवा २ + दालचिनी-लवंग थोडे तुकडे + डाळ-तांदुळ (एकास एक) असे परता. कुकर लावा. जबरा टेस्ट येते....

संक्रांतीचा हळदी कुंकवाला साधारण ३० बायका येणारेत. सध्या इथे थंडी आहे. तर मला एकटीला, पोटभरीचा त्या दिवशी आधी करून ठेवता येईल असा मेनू सुचवा प्लीज.>>>+१

हळदी कुंकू मागच्या आठवड्यात पार पडल. मी रगडा-पॅटिस, तवा पुलाव आणि रसमलाई असा बेत केला होता .
रगडा क्रोक पॉट मध्ये ठेवून सतत गरम ठेवता आला . पॅटिस मी ऐनवेळी ओवन मध्ये पटापट गरम केले ( मी hash brown patties वापरल्या )
रसमलाई करता मला एक नवीन झटपट रेसिपी मैत्रिणीने सुचवली होती , half & half दूधाला छान पैकी पातेल्यात केशर घालून उकळून गार करायचं , गार झाल्यावर त्यात वेलची पूड , काजू पूड आणि साखर घालायची . नंतर त्यात टिन मधील रसगुल्ले त्यातील पाक काढून घालायचे . आता हे सगळ फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. साधारण दोन तासात रसमलाई तयार !
इथे सल्ला देणारा सगळ्यांचेच धन्यवाद !!

>> half & half दूधाला

बाप्रे खतरनाक आहे हे....पुढच्या वेळेस कुणाकडे हा आयटम केला असल्यास विचारावं लागेल Wink

तेच लिहायला आलेलो Happy आता माबो वर ओट्स आणि किन्वा रसमलाईचं पेव फुटणार बहुतेक.
आमच्या ओळखीत एक इकडे आल्यावर पहिले काही दिवस हाफ एन हाफ 'दूध' म्हणून प्यायचा, आणि कसलं भन्नाट लागतं दूध म्हणायचा. ते आठवलं Lol

धनि, गुड क्वेश्चन Wink पण माझी मजल आंब्याच्या शिरा वगैरेसाठी ठीक आहे. मी मुदलात रसमलाई वगैरे पदार्थ करून पाहातच नाही. नुसतेच खाते Wink तशी अशा नुसतेच खाते पदार्थांची यादी मोठी आहे पण तो विषय इकडे नको. (होतकरू लोकं ही कमेंट वाचत असतील तर तिकडे नवे धागे विणायला सुरु करतील..पळा...)

अमितव Lol

गरम हाफ -एन-हाफ आणि ब्रिटीश हॉर्लिक्स कसलं भन्नाट लागतं.
(देशी दुकानात दोन हॉर्लिक्सं मिळतात - एक मेड एन युके आणि एक मेड इन इंडिया. मेड इन इंडिया जरा गव्हाळ असते - रंगाने पण. ते नको.)

संक्रांतीच्या हळदीकुंकवाला बायका, मुले,घरचे सगळे मिळून ३०-४० जण आहेत. बेसिक ओली भेळ करायचा विचार आहे. प्रमाण हवे होते. एकेकदाच limited serving द्यायचे आहे. अंदाजे वाटीभर.
चुरमुरे, फरसाण, कांदे, बटाटे, दोन्ही चटण्या याशिवाय काही राहिले असेल तर सांगा please.

@दिविज@,
छान मेन्यू होता तुमचा....साधारन किति जणी होत्या, किती रगडा लागला ? प्र त्ये की ला डीश बनवुन दिली का की बूफे सारखे केले ?

आणि वाण म्हनुन काय दिले सन्क्रन्तीचे? मी ग्लास बोल्स (झाकण वाले, मायक्रोवेव मध्ये वापरता येतिल असे) विचा र करते आहे

धन्यवाद सिंडरेला. वाटीभर म्हणजे एक प्लेट असे म्हणायचे होते. मी देशात, विद्येच्या माहेरघरी असते आणि इकडे एखादी टोकन डिश किंवा मसाला दूध वगैरे अशीच पद्धत आहे.
बरोबर दुसरा कोणताही पदार्थ नाहीये.

शिवाली, पुण्यात अशीच पध्दत आहे असं नाही. आपल्या घरी येणारे पाहुणे किती लांबून आणि किती वेळ काढून येणारेत यावर बेत ठरवतात. Happy

आशू +१ Happy
शिवाय घरचे लोक एक प्लेट भेळेवर भागवणार नाहीत. भेळ करणारं माणूस प्रत्येक घाण्याच्या भेळेची चव बघणार, काही कमी जास्त झालं तर बाकी कमी जास्त करून चव सुधारली आहे का हे तपासून पाहणार. त्यामुळे काटेकोर अंदाज ठरवणं अवघड आहे.
तरीही ४० जणांच्या भेळेसाठी चुरमुरेवाल्याकडे जाऊन ४० मुठी चुरमुरे, ३०-३५ मुठी फरसाण असं मोजून मिळत असेल तर तसे आणावे. प्रत्येकी एक कांदा-बटाटा-टोमॅटो तीन प्लेट भेळेला लागतो. कैरीचा काहीच अंदाज लावता येत नाही. ती भेळेत न घालताही संपते, किंवा आयत्यावेळी 'ही लोकांच्या भेळेत घालू नकोस, फक्त घरच्या भेळेतच घाल, जास्त घाल' अश्या प्रकारची प्रेमळ दरडावणी येऊ शकते.

चुरमुरे, फरसाण, कांदे, बटाटे, दोन्ही चटण्या याशिवाय काही राहिले असेल तर सांगा please.>> शेव राहिली, पुर्‍या राहिल्या. लिंबं राहिली. सजावटीसाठी तिखट डाळं राहिलं. कैरी राहिली. विद्येच्या माहेरघरी एव्हाना कैर्‍या यायला लागल्या असतीलच.

भेळ आणि एकदोन आलू टिक्की(टिक्की घाऊक प्रमाणात बनवून परतून ठेवता येतील, ऐनवेळी मावे मध्ये टाकून गरम करुन देता येतील.) हा पण ओके बेत होऊ शकेल.
किंवा मग हिरवा/पिवळा वाटाणा पातळ उसळ वर कांदा शेव चटण्या घालून (मी लहान पणी बरीच वर्षे यालाच मिसळ म्हणायचे आताचे मिसळ नावाचे झणझणीत कट वाले द्रव्य खाईपर्यंत), बरोबर पाव दिल्यास पोटभरीचा प्रोटीन कार्ब कंटेंट कमी श्रमात होईल.(पाव परतून देऊ नका, परतण्याची गरज लागणार नाही असे पाव द्या, परतणे ऐन घाईच्या वेळी पाहुण्यांना एंटर्टेन करायच्या वेळेतच बराच वेळ खेळ होतो.)
अर्थात हे नुसते सुचलेले प्रकार, तुमच्या सोईनुसार ठरवा.

हिरवा/पिवळा वाटाणा पातळ उसळ वर कांदा शेव चटण्या घालून : याला रगडा म्हणतात ना? (एभाप्र)
बरोबर आलू टिक्की = रगडा पॅटिस झालं की.

एकच वाटी/प्लेट भेळ द्यायची म्हणजे ... Sad ... टॉर्चर अत्यावश्यकच असेल तर म्हणजे वाटल्यास "प्रेम रतन धन" लावून ठेव टी.व्हीवर पण पोटभर भेळ द्या प्लीज. Wink Happy

हो:) रगडाच, फक्त रगडा बर्‍याचदा टेस्ट्लेस असतो, त्यात मसाला कंटेंट वरुन अ‍ॅडेड असतात चटण्या वगैरेनी.
घरी आपण करतो ती नीट मसाले तिखट घालून उकळलेली उसळ असते.

टिक्क्यांना भरपूऊऊऊऊर बटाटे लागतात आणि त्या कितीही बनवल्या तरी मोहमयी आयटम असल्याने शेवटच्या बॅच वाल्यांना उसळ शेव खावी लागते, त्यामुळे सगळ्यांना एकाच तराजूत टाकून उसळ फरसाण कांदा चटण्या पाव.
रगडा पॅटीस बरोबर पाव मायनस.

अरे पण त्यांना भेळच करायची आहे फक्त. त्यांच्या 'किती करू'च्या प्रश्नाला तुम्ही 'काय करू'चं उत्तर काय डकवताय...

सीमंतिनी, तुला संदिप चित्रेंचा मायबोली दिवाळी अंकातला 'भेळ, भेळ' भेळ' हा लेख वाचण्याची गरज आहे. पण विशेष नोडवर काहीतरी प्रॉब्लेम आहेसं दिसतंय, कारण दिवाळी अंकांचं मुपृ, संपादकीय आणि श्रेयनामावलीच फक्त दिसते आहे Sad

सीमंतिनी तुम्ही अगदी भेळ प्रेमी आहात वाटत. पण सांगु का माझा पहिला सण वगैरे नाहिये हो.
तूर्तास समस्त पुण्यास राहु दिले तरी आसपासच्या सोसायट्यांमध्ये, मैत्रिणींमध्ये हाच ट्रेंड आहे. फक्त सामोसा, दाबेली, दोन दोन मिनी बटाटे वडे चटणी असाच मेनू सगळीकडे होता.
घरच्यांसाठी वेगळा स्वयंपाक आहे.

Pages