वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांवर कुठल्याही प्रकारचे बंधन नाही आइ-वडलांना सांभाळायची.
जन्माला घालताना विचार करायला हवा होता. स्वार्थ मनात ठेवुन मुल जन्माला घालायची ही कसली वृत्ती?

खरे तर मुलांच्या आयुष्याची बेसिक तरी बेगमी करुन ठेवायला पाहिजे जन्माला घालायच्या आधी.

माझ्या मुलीनी मला अजिबात विचारले नाही तरी मी तिला दोष देणार नाही ( वाईट वाटेल पण तिचा दोष नसेल )

वयाने व मनाने ५० गाठलेल्या सर्वांसाठी ............
50 नंतरचाकाळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.
हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.
धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.
2) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.
3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवडाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नासताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इकारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.
5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील
6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.
7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.
8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.
9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.
10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.
11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.
12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..
लिहीणार्याला मनापासून धन्यवाद! .

साभार-whatsapp

आपल्या जन्मावेळी आपल्याला हातात घेऊन त्यांनी आपले स्वागत केले, त्यांचे फक्त प्रेम लक्षात ठेऊन व चुका माफ करून टाकून, त्यांच्या अंतकाली आपण त्यांचा हात हातात घेऊन मायेनी व कृतज्ञतेने त्यांना निरोप द्यायचा. ह्यात त्यांचे आयुष्य शांतपणे व समाधानाने संपून त्याला एक प्रकारची कृतार्थता प्राप्त होते, तसेच एक प्रकारचे पूर्णत्व व कृतार्थता मागे रहाणार्‍या मुलाबाळांच्याही आयुष्याला मिळते. हा परिपूर्णतेने जगण्याचा व समाधानाचा एक भाग असू शकतो असे वाटते.

आज नटसम्राट पाहिला. सिनेमा खूप छान आहे. अगदी सुन्न झालं. पण दोन प्रसंग थोडे खटकलेच.
१. बाबा नातीला शिव्या शिकवतात. मग ते सूनेला खटकलं तर त्यात गैर काय?
२.मद्यधुंद होऊन लेकीच्या इथे पार्टीत बडबड करतात. लेकीलाही ते नाही आवडत.
वरील दोन प्रसंग इथे लिहिण्यास कारण की दोन दिवस हा धागा वाचल्याने,मनात सारखं हाच विचार होता की नेहमी तरूण पिढी चीच चूक नसते .वडिलधारी मंडळी ही असे काही वागतात जे मुलांना नाही आवडत किंवा मुलांच्या दृष्टीने ते चूक असते. मग त्यावर सहज मुलांच्या प्रतिक्रिया आल्या तरी ते वडिलधाऱ्या मंडळींना ते अपमानास्पद वाटतं.
नटसम्राट हा खूपच छान सिनेमा आहे.त्याबद्दल काही दुमत नाही. कृपया गैरसमज नसावा..फक्त ह्या धाग्याच्या निमित्ताने हे दोन प्रसंग इथे सांगावेसे वाटले इतकेच.

ते नटसम्राट माठ असतात. असल्या प्रकारच्या बटबटीत व्यक्तीरेखा असलेली नाटके त्या काळी फेमस होती.

रच्याकने : आता मी 'संगीत शारदा' व 'एकच प्याला'चा पिच्चर यायची वाट पाहतो आहे.

>> सव्याज लिहलंय की ओ भरतमामा आणि दीडकाका.
<<

अमीपुतणे, तेच सांगतो आहे मी.

खाली कापोचे यांनी बरोबर लिहिलं आहे.

२५ वर्षांपूर्वी तुमच्यावर खर्च करण्याऐवजी जर आई-बापांनी नुसतं सोनं घेऊन ठेवलं असतं, किंवा इतर ठिकाणी उदा. जमीनीत इन्व्हेस्ट केलं असतं, तर किती पैसे जमले असते? जितके जमतील त्याला 'सव्याज' म्हणतात.

तुम्हाला नुसता १०० रुपये रोजाचाही हिशोब जड जाईल Happy

(ठेसन छोडूंगा नही जी. पकडके रखूंगा.)

@दीमा..मला एवढच म्हणायचय की चुक वृध्दांची पण असते फक्त मुलंच दोषी नसतात. सिनेमात ही मग सून त्यांना गावी जाऊन रहायला सुचवते आणि लेक त्यांची सोय आऊटहाऊस मध्ये करते,ते त्यांच्या वागण्याला वैतागूनच.

वरची पूर्ण चर्चा वाचली नाही.
पण जर आई बाबा / सासूसासरे दररोज उठून तुमच्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या नी तितक्या खाल्ल्या म्हणतील तर मी पण अज्जिबात ऐकून घेणार नाही.
हेच मुलांना तुमच्यासाठी हे करत्येय नी ते करत्येय हे सांगत्/सांगणारही नाही.

Happy

@दीमा..मला एवढच म्हणायचय की चुक वृध्दांची पण असते फक्त मुलंच दोषी नसतात.
<<
डिंपल,
नटसम्राट ही व्यक्तीरेखा मला कधीच आवडली नव्हती इतकेच म्हणत होतो. चूक कुणाची तो वेगळा विषय आहे, त्याबद्दल नंतर.

साती साती साती वरच्या पोस्टला हजार अनुमोदन!!!
The only expectation i hv from my kid is- be a good person, be happy. That's all. मी आतापासूनच बोलताना कधीच असं म्हणत नाही की बघ आम्ही कित्ती करतोय तुझ्यासाठी वगैरे. मूल आमची म्हातार पणची सोय म्हणून नाही जन्माला घातलंय!

डिंपल.. असे नाही म्हणू बाई..
वडीलधार्या माणसांनी काहीही केलं तरी बरोबर..
आज तुम्ही जे काही आहात ते त्यांच्यामुळे..
आज त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून तुम्ही इथे लिहीत आहात ना.. तुम्ही कोण होता त्यांना चुक म्हणणारे?
ते शिव्याच काय.. व्यसनं सुद्धा शिकवतील..
पण ते कधी चुकणार नाहीत..

पण ते कधी चुकणार नाहीत..
<<
ओ पियूतै,
व्रांग बर्का.
केस पांढरे झाले, म्हणजे अक्कल आलीच हे खरे नव्हे, असे माझे फार पूर्वीपासूनचे (म्हणजे माझे केस पांढरे व्हायला लागल्यापासूनचे) म्हणणे आहे.
उलट वाढत्या वयाचा आदर म्हणून आपल्याकडे जो मान दिला जातो, त्याचा गैरफायदाच घेणारे लोक जास्त, हे माझे नॉर्मल ऑब्जर्वेशन आहे.
तर, त्या नाटकात, त्या नाटकातल्या हीरो ला हीरो बनवून जे काय केलंय ते मला आवडलेलं नाही, असं म्हणतो आहे.

आता पुढे बोला Lol

कापोचे, भन्नाट प्रतिसाद.
मेधावि, मस्तच.
बी,त्तुमच्या भाचे सुनेबद्द्ल कौतुक (खरं तर आदर) वाटलं.

इथे हा सगळा उहापोह जन्मदात्यांवरून चालला अाहे. पण ज्यांना स्वत:चे मूल नाही, मिळकतही आजच्या घडीला तोंड देता येण्याजोगी नाही आणि ज्यांना उचलून वृध्दाश्रमात 'टाकायलाही' कुणी नाही त्यांची अवस्था काय असेल?
मी वर उल्लेखलेल्या काही समस्या अनुभवल्या आहेत. मान्य आहे की जेव्हा आपण त्या क्षणी तो अनुभव झेलत असतो तेव्हा घुसमट वाटते, नकोसे होऊन जाते. पण तीच वेळ परीक्षेची असते. कारण एकदा ते माणूस गेलं की हा कोणताच शीण, मानसिक त्रास आठवत नाही. आपण कसे निभावले सगळे याचेच आश्चर्य वाटते. पण ते 'आपलं' माणूस होतं आणि शेवटपर्यंत आपण त्याच्यासोबत होतो ही जाणीव त्या परीक्षेच्या काळात चुकीच्या वागण्याने जे शल्य मनात राहते त्यापेक्षा कितीतरी दिलासा देणारी असते. ही जाणीव तुमच्यासाठी बेंचमार्क तयार करत असते की इतक्या कठीण काळात तुम्ही तग धरून राहिलात तर येणारी संकटं तुमचं काहीही बिघडवू शकत नाहीत. हे मनोबल तुमच्या स्वत:च्या आजारपणांमध्येही खूप महत्त्वाचं काम करतं. माणसांचे स्वभाव कधीच बदलत नाहीत हे गृहीतक पक्कं असेल तर कोण काय वागतं, बोलतं याने काही फरक पडत नाही. तुम्ही जे असता, तसेच तुम्ही वागता.

आपल्यासाठी कोणी काय केलं याचे हिशेब नेहमीच फार छोटे असतात आणि आपण कुणासाठी काय केलं याची समीकरणं मोठी. यात हातचा राखून न ठेवता बाकी शून्य आली तरी तुमचं गणित बरोबरच असतं. Happy

भान | 19 January, 2016 - 20:38
And Amy I really pitty your parents.
>> And I really pity yours Happy

===

दीड मायबोलीकर | 19 January, 2016 - 20:46
<<
अमीपुतणे, तेच सांगतो आहे मी.
खाली कापोचे यांनी बरोबर लिहिलं आहे.
२५ वर्षांपूर्वी तुमच्यावर खर्च करण्याऐवजी जर आई-बापांनी नुसतं सोनं घेऊन ठेवलं असतं, किंवा इतर ठिकाणी उदा. जमीनीत इन्व्हेस्ट केलं असतं, तर किती पैसे जमले असते? जितके जमतील त्याला 'सव्याज' म्हणतात.
तुम्हाला नुसता १०० रुपये रोजाचाही हिशोब जड जाईल (ठेसन छोडूंगा नही जी. पकडके रखूंगा.)
>> सध्या ३५ ते ४५ वय असलेल्यांचे २५ वय १९९५ ते २००५ या काळात होते. ते जन्मलेत १९७० ते १९८० या काळात. तेव्हा १०० रु रोज एका माणसावर खर्च करणारे कुटुंबप्रमुख असतील तर ४ सदस्यांच्या कुटुंबाचा मासिक खर्चच १२००० रु येईल. एवढा पगार कितीजणांचा होता ७०s आणि ८०s मधे?

सोने जमीन शेअर्स या रिस्की गुंतवणूका आहेत. फायदा होऊ शकतो किंवा जबरी नुकसान होऊ शकते. आणि तसेही कोणतीही लाँग टर्म गुंतवणूक १० ते १२% चक्रवाढपेक्षा जास्त रिटर्न देत नाही.

एनीवे परतपरत तेचते बोलण्यात अर्थ नाही. तुम्ही तुमचे ठेसन सोडणार नाही आणि मी माझे. समांतरच चालत राहू. त्यामुळे मी थांबतेय Happy

वर आशुडीने लिहिलेला चेक अनेकवेळा वापरतो.
एखादी गोष्ट करायची किंवा नाही यात द्विधा असेल तर आपण हे हे केलं नाही, आणि वर्स्ट केस रिझल्ट आले तर 'हे केलं असतं तर?' असा विचार आपल्या मनात येणार आहे का? हा प्रश्न विचारतो. जर येणार आहे उत्तर आलं आणि ती गोष्ट करणं शक्य असलं तर ते ताबडतोब करून टाकतो. जर ती गोष्ट करणं शक्य नसेल तर अर्थातच करत नाही, पण मग पश्यातबुद्धी २०/२० विचारही मनात आणायचा नाही हे मनाला आपोआपच शिक्षण मिळतं.
एकदा काथ्याकुट करून मनाने निर्णय घेतलेला असला की बाजूचे लोक काय म्हणतील याची फारशी तमा बाळगत नाही. चूक झाली तर होऊ शकतेच, पण त्यावेळी त्या परिस्थितीत योग्य तो विचार केलेला होता याचं पाठबळ मनाला असते. (हे जनरल लिहिलं आहे, वृद्धाश्रमाशी संबंध नाही. )

डिंपल,
नटसम्राट ही व्यक्तीरेखा मला कधीच आवडली नव्हती इतकेच म्हणत होतो. चूक कुणाची तो वेगळा विषय आहे, त्याबद्दल नंतर.
ओके. दी मा.

@ पियू, तुम्ही उपरोधाने लिहिले का ते माहित नाही. पण त्यांनी आपल्या साठी खस्ता खाल्ल्या म्हणून आपण इथे आहोत आणि लिहितोय हे मान्यच आहे .मी फक्त ते पण चुकतात इवढच म्हणत आहे. चुकी ला चुक ही म्हणू नये का?
आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही दोघं हे चांगलच जाणून आहोत की ,वृध्दावस्था म्हणजे दुसरे बालपणच. त्यामुळे जरी ते चुकले तरी लगेच वृध्दाक्श्रमात पाठवणार नाही हे नक्की.

आपल्या जन्मावेळी आपल्याला हातात घेऊन त्यांनी आपले स्वागत केले, त्यांचे फक्त प्रेम लक्षात ठेऊन व चुका माफ करून टाकून, त्यांच्या अंतकाली आपण त्यांचा हात हातात घेऊन मायेनी व कृतज्ञतेने त्यांना निरोप द्यायचा. हे वर मेधा ह्यांनी लिहिलयं त्यास अगदी मनापासून सहमत.

आणि आमची स्वतः ची जेव्हा वेळ येईल तेव्हा दीमा नी पहिल्या प्रतिसादात म्हटलयं, अशा जागी रहायला आवडेल..

पण जर आई बाबा / सासूसासरे दररोज उठून तुमच्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या नी तितक्या खाल्ल्या म्हणतील तर मी पण अज्जिबात ऐकून घेणार नाही.
हेच मुलांना तुमच्यासाठी हे करत्येय नी ते करत्येय हे सांगत्/सांगणारही नाही.>>>>>>>+१

दिमा, रोल युवर स्लीव्हस, चार्ज युवर कॅम, ब्युटिफाय युवर किचन आणि ग्लोव्ज!! Happy
अ‍ॅन्ड गिव्ह अस आलू खस्ता चाट (माफी माफी विषयांतराबद्दल)

सध्या ३५ ते ४५ वय असलेल्यांचे २५ वय १९९५ ते २००५ या काळात होते. ते जन्मलेत १९७० ते १९८० या काळात. तेव्हा १०० रु रोज एका माणसावर खर्च करणारे कुटुंबप्रमुख असतील तर ४ सदस्यांच्या कुटुंबाचा मासिक खर्चच १२००० रु येईल. एवढा पगार कितीजणांचा होता ७०s आणि ८०s मधे?>>> इतके लिहिण्यापेक्षा तुम्ही हा हिशोब करून का दाखवत् नाही.

मुलाचा जन्म : १९८०. मुलीचा जन्मः १९८३. आईवडलांचा एकत्रित पगारः रू पाच हजार.

आता दरवर्षी प्रमोशनने वाढणारा पगार आणि इतर सर्व एकत्रिक खर्च- गुंतवणूक वगैरे यांचे एक टेबल बनवा आणि २०१६ पर्यंत झालेला खर्च (सगलाच एकंदर) आणि मुलं कमावती झाल्यानंतर आलेला पैसा या सस्र्वांना विचारात घेऊन मुलांनी आईवडलांना किती पैसे देणं अपेक्षित आहे ते सांगा बघू.

आमच्या आई-वडीलांच एकत्रित पगारः रू पाच हजार सुध्धा नव्हता ओ. आणी आम्ही तीन भावंडं.
असा हिशेब करायचा ठरलं तर आम्ही तिघेही भीकेला लागु आणि आई-पप्पा करोडोपती होतील.

नंदिनी,
तो हिशोब केला तर यांनाच काय भल्याभल्यांना परवडणार नाही, हे मी सांगतोय, अन तेच यांना पटत नाहिये.
*
डिंपलताई,
अहो नो उपरोध. अगदी क्लियर म्हणतोय मी. मला न आवडलेल्या नाटकांपैकी ते एक आहे.

मुलांसाठी म्हणून काही आया नोकरी सोडून घरी बसतात, कधी वडील प्रमोशन नाकारतात. तर असे केले असल्यास यामुळे झालेले आर्थिक नुकसान जे आहे ते पण मोजायचे बरंका..
नोकरी सोडायच्या वेळेसचा पगार बेस धरून आणि रिटायरमेंटपर्यंत शक्य असलेली प्रमोशन्स व पगारवाढ मिळून होऊ शकेल असा पगार आणि मग रिटायर झाल्यानंतरचे पेन्शन.. हे पण..

मोडलं कंबरडं पोरांचं... Happy

हे बघा, हिशेब करू नका.. जमेल तसे संभाळा, नाहीच जमल तर चांगल्या जागी ठेवा, भेटत रहा, काळजी घ्या. अजुन काय. Happy आता जे पन्नाशीचे आहेत ते हे नक्की समजून चाला की आपली रहाण्याची सोय मुलांकडे होणार नाही, तेव्हा स्वतः हात चालू असताना सोय करा. दोघातले एकजण राहिले की मात्र मुला/मुलीने त्या माणसाला आपल्या घरी न्यायचे असे ठरवून ठेवा. ह्यात थेवणे शक्य नसेल तर वृध्दाश्रम आहेच. इतकी माथाकुट वर केलीये, तर कुणीतरी हुसार माबोकर सार लिहा पाहू. अन मुले असोत का नसोत आपली सोय आपण केलीच पाहिजे. ऐटीत नाही येत जा कायमचे तुझ्याकडे असे सांगू शकले पाहिजे ... पाहुणे म्हणून २-४ महिने / हात पाय चालतात तोवर जावे मुलांकडे असे माझे प्रामाणिक मत आहे. आमची आई मोठ्या मुश्किलीने आमच्याकडे आजी गेल्यावर आली रहायला. आता ती आम्हा दोघींकडे - तिचे मन करेल तेशी रहाते. Happy

वरची सगळी मते माझी वैयक्तिक आहेत.

Pages