वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मी वाचलच नाही. आत्ता वाचतेय.
असो

आणि मी आता जाम कन्फ्युज झालेय. मला तुम्ही लिस्ट करुन द्या, हेडर मध्ये काय टाकायचं मी टाकते.<<<

वेल, माझा पुढचा प्रतिसाद वाचा. त्यात यादी आहे. चर्चा शून्यापासून सुरू करता येईल तुम्हाला, ती यादी केलीत की.

कन्फ्यूझ होऊ नका. अ‍ॅमींच्या मुद्याचा प्रतिवाद केला जात आहे त्यातील हिशोब क्लिष्ट वाटल्यामुळे काहीतरी भयंकर गोंधळ सुरू आहे असे वाटून घेऊ नका. बेसिकली सगळे त्या अ‍ॅमींना इतकेच सांगत आहेत की पैसेवापसी स्वरुपाचे नाते असणे अयोग्य आहे. तो केवळ एक मुद्दा आहे ज्यावर दोन अडीच पाने धारातीर्थी पडली आहेत. इतर मुद्दे अजून चर्चेत यायचेच आहेत.

आपली संस्कृती परफेक्ट आहे हे आता "ते" पण म्हणू लागलेत..

>> "ते" कोण? फॉरेनकर का? म्हणून लगेच ती पर्फेक्ट होते का? इथे (धाग्यावर) वृद्धांचे पण चुकतेच असं म्हणणारे सगळे "तिकडच्यां"ना प्रमाण मानतात का? पण संस्कारहीन असल्याचा आरोप त्यांच्यावर पण होतोच हे त्यांनाही मान्यच असेल.

वेल,

हा तो माझा प्रतिसादः
===============

>>>बेफ़िकीर | 18 January, 2016 - 19:54

हा धागा सून ह्या विषयावर वळून तिथेच स्थिरावलेला दिसतोय. फिदीफिदी

खालीलपैकी अनुभवही काही काहीजणांना येतात असे ऐकले आहे. (माझ्या ऐकिवात तरी आहेत.)

१. वृद्ध खूप ढवळाढवळ करतात, करवादत असतात, मुद्दाम त्रासदायक वागतात.
२. आई वडिलांशी मुलगा फटकून वागतो पण सून मनापासून करते.
३. नवरा आपल्या आई वडिलांबरोबरच आपल्या सासू सासर्‍यांचेही खूप काही करतो. (ह्यात एक मीही आहे फिदीफिदी )
४. वृद्धाश्रमांची अवस्था बहुतेकदा निराशाजनक असते.

वगैरे!<<<

अगेन्स्ट मुद्दे
१. वृद्धाश्रम कशाला? आम्ही तुम्हाला तुमचे सर्व टँट्रम्स सहन करुन जन्मल्याक्षणी बोर्डिंग ला न टाकता मोठं केलं आणि तुम्ही डायरेक्ट वृद्धाश्रमात टाकणार?
२. वेगळी व्यवस्था हवी, पण वृद्धाश्रम नको, समान छंदी लोकांचे एकत्र राहणे इतके चालेल.
३. नको, खूप शिस्त आणि कोरडेपणा असतो तिथे, हतबल व्हायला होते.
४. बोलायला कोणी मिळत नाही.
५. घरीच जरा नोकर बिकर ठेवू,वृद्धाश्रमात जाणार नाही.
६. त्यापेक्षा इच्छामरण द्या.
७. वृद्धाश्रमाचा खर्च सगळ्यांना थोडाच झेपतो?

फॉर मुद्दे
१. कटकटे, इंटरफियरिंग, डॉमिनेटिंग वृद्ध
२. ज्यांना आपले कोणीच नाही जगात असे वृद्ध
३. आजारी आहेत, आणि ज्यांच्याकडे नोकर्‍यांमुळे नीट लक्ष दिले जात नाहीत असे वृद्ध
४. सुना मुलेच ५५-६० ची आहेत, त्यांना आता काळजी घेणे झेपत नाही असे ८५-९० चे वृद्ध
५. मुले सुना मुली जावई परदेशी असलेले वृद्ध
६. स्पाउस गेली/गेला म्हणून स्वखुशीने वृद्धाश्रमात गेलेले वृद्ध
७. आयुष्यभर कष्ट काढल्यावर म्हातारपणी परत संस्कारांच्या नावाखाली बेबीसिटिंग आणि हाऊस किपींगची ड्यूटी नको म्हणून वेगळे राहण्याची इच्छा असलेले वृद्ध
८. सारखे पालन पोषण केल्याचे काढू नका, वाटल्यास आमच्यावर झालेला खर्च व्याजासहित परत देतो. आम्हाला आमचे आयुष्य जगू द्या.

(किती नीट कव्हर केले माहित नाही.)

वेल , तुम्हाला मुद्दे काढून देते.

१. आपल्या आई वडिल आणि सासू सासरे यांच्या म्हातारपणाविषयी काय व्यवस्था करावी/ व्हावी असे आपले म्हणणे आहे.
अ. मुलांसोबत/ मुलांच्या घरात
आ. स्वतंत्र पण स्वतःच्या भाड्याच्या / मालकीच्या घरात
इ. वृद्धाश्रमात/ वृद्धांच्या कम्यूनमध्ये.

२. यापैकी प्रत्येकाचे कारण म्हणजे का?
३. यापैकी प्रत्येकाला लागणार्‍या खर्चाची तजवीज तुमच्यामते कुणी करावी

४. हेच अ ते इ प्रश्न तुमच्या स्वतःबद्दल
५ त्याचेही का?
६. त्याच्या खर्चाची तरतूद कशी करणार
७. तुमच्या नंतर तुमच्या संपत्तीचं काय व्हावं असं तुम्हाला वाटतं?
८. तुमच्या आईवडिलांची वैयक्तिक संपत्ती कशी वाटली जावी असं तुम्हाला वाटतं?
९. तुम्हाला किती वृद्ध अवस्था/जर्जर अवस्था होईपर्यंत जगायचंय?
१०. कायद्याने शक्य असल्यास तुम्ही 'डू नॉट रिससिटेट' विल करून ठेवणार का?

>>>सुना मुलेच ५५-६० ची आहेत, त्यांना आता काळजी घेणे झेपत नाही असे ८५-९० चे वृद्ध<<<

हा एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आयुर्मर्यादा वाढल्यानंतर हा प्रश्न उग्र झालेला आहे.

साती,

क्वालिटी ऑफ लाईफ न देता, नुसती जिवंत ठेवणारी औषधे आणि उपचार खरोखरीच असावेत का ? याबाबत तूमच्या क्षेत्रात चर्चा होते का ? ( अगदी ऑफ द रेकॉर्ड तरी ?)

डॉक्टराचे परमकर्तव्य म्हणजे उपचार करत राहणे, असे अजूनही डॉक्टर मानतात का ? मला खरोखरीच उत्सुकता आहे. थोडे विषयांतर आहे तरीही.

आणि हे विषयाला धरुन...

दुसरे म्हणजे, आपल्याकडे पेंशन आणि सोशयल सिक्यूरिटी अजूनही सक्तीचे नाही. पाश्चात्य देशात नोकरी करणारे बहुतेक आपला वाटा, नोकरी करताना उचलतात आणि मग त्या पैश्यातून बेकारांना आणि वृद्धांना आधार दिला जातो.
आपल्याकडचे नोकरदार किंवा करदाते हा भार उचलतील का ? एक समाज म्हणून जर आपण हे करु शकलो तर..

जे कुटुंब वृद्धाना संभाळत आहे त्यांना करात सूट, किंवा त्यांना अतिरिक्त भत्ता वगैरे... आर्थिक विचार करतोच आहोत तर यावरही विचार करु.

दिनेश,

मागे हिमाचल प्रदेश सरकारने कायदा केला होता की ज्येष्ठांना व्यवस्थित सांभाळायला हवे.

मागे हिमाचल प्रदेश सरकारने कायदा केला होता की ज्येष्ठांना व्यवस्थित सांभाळायला हवे.

>> "व्यवस्थित" म्हणजे कायकाय?

अय्या, आईबाबांना मुलांनी सांभाळायला हवं असा कायदा पूर्ण भारतात नाही आहे का?
महाराष्ट्रात नाही आहे का?

Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007

देशाच्या धोरणात सामाजिक न्यायांतर्गत असहाय्य वृद्धांचा सांभाळ करणे हे देखील येतं
http://socialjustice.nic.in/pdf/dnpsc.pdf

जगात सुद्धा अनेक वेडे लोक आहेत ज्यांना पालकांचा सांभाळ करणे अनिवार्य करावेसे वाटते. युनायटेड नेशन्स नेही असा कायदा करून ठेवलेला आहे. कधी सुधारणार हे जग ?
http://social.un.org/ageing-working-group/documents/fourth/Rightsofolder...

या हिशोबाने, आईबापांनी मुलावर पहिल्या १० वर्षांत मिळून फक्त १ लाख टोटल खर्च केला (१२० महिन्यांत १०० हजार रुपये, दरमहा सुमारे ८३० रुपये, किंवा २७रु.४०पैसे रोज.), तर आज यांना किमान ९८ लाख फेडायचे आहेत. पुढल्या १५ वर्षांच्या खर्चाचा हिशोब यात धरलेला नाही. तसेच, पहिल्या दहा वर्षांचे फद्याचे व्याजही लावलेले नाही.
>> अरेरेरेरे दीडमाकाका, अहो बरं झालं तुम्ही डागदर झालात इंजिनीअर नाही _/\_.
९८लाख नाही ओ ९.८ लाख!
एकदाच १ लाख गुंतवले आणि त्याचे २० वर्षात ९८ लाख झाले?? =)) धन्य आहात. अहो १०% चक्रवाढ दरानेपण दामदुप्पट व्हायलापण ८-९ वर्ष लागतात.

नंदिनीमावशी, १९८० साली तुम्ही ५* चाळीत ३००० रु भाडे देऊन रहात असाल.
दीडमाकाकातर काय एकेका सदस्यावर ३००० हजार खर्च करत होते १९७० साली.
पण ३० रु भाड्याने एक/दोन खोल्यात राहणारी ५-६ सदस्यांची कुटुंबंदेखील असायची हो तेव्हा...
तर सांगायचा मुद्दा हा की दरडोई खर्च कसा काढायचा याचा फक्त मार्ग सांगण्यासाठी तो प्रतिसाद आहे. आकडे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतील.

अ‍ॅमी तै, तुम्हाला किती खर्च आला? म्हणजे किती खर्च द्यायला लागला?

आणि तुमच्या मुलांवर किती खर्च होतोय ते आता पासुन लिहुन ठेवताय का?

मार्गदर्शन मिळावे म्हणुन हे प्रश्न

अ‍ॅमी इज सो डिटर्माईन्ड!

Wink

फाईट अ‍ॅमी फाईट!

पैशांत कुणी मुलांसाठी केलेल्याचं मोल करायचं ठरवलं तर मुलंही फाडकन काही अमाऊंट तोंडावत मारू शकतात असा एक अर्थ मी काढलाय.

अहो १०% रेटने दामदुप्पट व्हायलापण ८-९ वर्ष लागतात. >>> तुम्हाला इंदिरा विकास पत्रे, किसान विकास पत्रे यामधे पाच वर्षात पैसे दुप्पट व्हायचे याबद्दल आधीच्या पिढीकडून (बोलणं चालणं होत असेल तर) काही ऐकून तरी माहीत आहे का ?

३० रु खोलीच्या भाड्याचा विषय काढला ते बरंच झालं. आज त्या रूमला काय भाडे चालू आहे यावरून चलनवाढीचा फॅक्टर काढा. तुम्हाला वैद्यकीय सेवांच्या दरातील तफावत काढायला सांगितली तिकडे काणाडोळा केलेला दिसतोय.
तुम्ही स्वतःच आग्रह धरताय ना पैशात सर्व पाहीजे म्हणून ?

घरात भांडीवाली ठेवली कामाला की ती थोडेच पैसे घेते . पण केअरटेकर, मेड अशा सर्विसेस हायर केल्या की त्याचे पैसे वेगळे असतात शिक्षण, राहणीमान याप्रमाणे.

सेवा, सुविधांचे पैसे आजच्याच काळातल्या दराने हे पैसे चार्ज करणे जास्त व्यावहारीक राहील.

जमिनीचे दर भारतात वाढतेच राहीले आहेत सर्वत्र. रिक्षेवाले सुद्धा एखादा गुंठा दोघात का होईना घ्यायला बघत असतातच. त्यामुळे तो ऑप्शन बाद करणे आम्हाला चालणार नाही. आवडणारही नाही. तरच तुम्हाला हवे त्या दराने हिशेब आम्ही करू देऊ.

मी काय म्हणते, या हिशोबाचा एक वेगळा धागा काढावा का?
पैसा/गुंतवणूक यापेक्षा नॉन मटेरियल इश्यूजही आहेत वृद्धांचे आणि तरुण्/मध्यमांचे.
२५-३० प्रतीसाद गणित चालू आहे.

भारतात तो कायदा आहेच आणि न संभाळल्यास पोलिस तक्रारही करता येते. पण मूळात वृद्धांची अशी तक्रार करायची मानसिक तयारी असेल का ? समजा करसवलत दिली तर काही फरक पडेल असे वाटतेय का ?

किंवा वृद्धाश्रमाला दिलेल्या रकमेची वजावट तरी...

अर्थात मग नियम करावेच लागतील. कुठले वृद्धाश्रम, त्यांची व्यवस्था कशी असावी ? मग अशी देणगी स्वतःचे पालक नसलेल्या व्यक्तींसाठी दिली तर चालेल का ?

दीमा च्या योजनेनुसार असे आश्रम असले मग त्यांच्याही स्वतःच्या स्कीम्स असू शकतात. आईबाबांना ठेवलेत, तर तूम्हाला सवलतीत राहता येईल ( अर्थात गरज असेल तेव्हा ) वगैरे.

मला कधिचा एक भाप्र पडलेला आहे.
या अमीताई त्यांच्या आईच्या पोटात असताना आई कडुन जे जे घेत होत्या त्याची किंमत कशी करताहेत?
शिवाय रात्री जागुन यांचे शि शु काढ्ले असतील (स्वतःची झोप घालवुन) ते कसे काय मोजणार?

मला स्वतःला माझ्या पालकांची किम्मत स्वतः आई झाल्यावर खुप जास्त चांगल्या प्रकारे कळलेली आहे. मी तरी त्यानी जे काही माझ्या साठी केल अन साबांनी माझ्या नवर्या साठी केल ते पैश्यात मोजण्याचा कर्मदरीद्रीपणा करणार नाही.

शिल्पा , तुमचे आगमन नुकतेच झाले आहे का या धाग्यावर सगळ्या पोस्टी वाचा
अ‍ॅमी तै च्या तर जरुर वाचा.

दिनेशदा
पैशाने सर्व मिळतं का ? ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना पैसे कमव आणि सुखी हो एव्हढंच शिकवलं असेल त्यांना असं काही ऐकायला मिळालं तर मग गोष्ट निराळी.

तसंच एक्स्पोजर. त्या काळातल्या पालकांना स्वतःलाच ब-याच गोष्टींचं ज्ञान नव्हतं म्हणून त्यांच्या चुका शोधनार का ? मुलगा जेव्हां बाप होतो तस तसे त्याला वडील कळत जातात आणि मुलीला आई. अनेक गोष्टी ज्या खटकल्या होत्या त्यांची उत्तरं मिळत जातात. त्या त्या परिस्थितीत वडील कसे वागले हे मला कळाले. आजीचाही राग यायचा, पण तिच्याबद्दल ती गेल्यानंतर जे कळाले त्यामुळे पश्चात्ताप झालेला. संस्कार कसे मोजणार ?

अर्थात कल्चरल डिफरन्स मुळे काही गोष्टी कळणारही नाहीत तरी बेसिक मानव प्राणी म्हणून अनेक गोष्टी सर्वत्र सारख्याच राहणार आहेत. म्हणूनच जर्मनीला नेलेली अनाथ मुलगी बेचाळीस वर्षे भारता येऊन आपल्या आईला शोधून काढते आणि तिची खरी हकीगत कळाल्यावर गळ्यात पडून रडते.

अ‍ॅमी यांचे विचार कसेही असोत, रिस्पेक्ट आहे. तसे ते का झाले हे जाणून घ्यायला आवडेल.

कापोचे, कितीही मानायचे नाही ठरवले तरी आपल्या कुटुंब संस्थेला हादरे बसतातच आहेत. नैतिक जबाबदारी वगैरे शब्द आता नसले तरी काही काळाने अर्थहीन ठरणारच आहेत. लांब कशाला, आपल्यापैकी कितीजण छातीठोकपणे म्हणू शकतात, कि माझी मुले मला खात्रीने संभाळतील ?

ज्यांना गरज नाही, त्यांच्यासाठी ठिकच आहे. त्या व्यक्ती अशी कर सवलत घेणारही नाहीत. पण ज्यांना गरज आहे त्यांचे काय ?

शिक्षणाच्या निमित्ताने आयकराचा अभ्यास बरीच वर्षे केला. पुर्वी अश्या वजावटी प्रामुख्याने सरकारी योजनांना पैसा मिळावा या हेतूने होत्या. देणग्यांसाठी पण होत्या पण त्या देणग्या बहुदा परमार्थासाठी होत्या.

स्त्रियांना जास्त करसवलत देऊन आपण एक नवी सुरवात केली तशीच वृद्धांसाठी असावे असे मला वाटते.

सध्याही जे.ना. ना तिकिटात सवलती आहेत, जास्त व्याजदर मिळतो पण हे कुणासाठी, ज्यांना हिंडण्याफिरण्याची ताकद आहे आणि बँकेत ठेवण्याएवढा पैसा आहे. बाकिच्यांचे काय ? म्हणून म्हणतो कि आपल्याच पालकांसाठी केलेल्या खर्चाची वजावट मिळाली तर...

Pages