वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>कारण मला सापडत नाहीये. मी २-३ वेळा शोधला.<<<

Lol

१. एक तर मी असे लिहिले असल्याचे मला आठवत नाही.
२. काही संदर्भाने लिहिले असले तर तो संदर्भ विचारात न घेता पोस्टचा हवा तेवढा भाग विचारात घेऊन तुम्ही हवे ते लिहिताय.
३. संदर्भ मागितला तर मलाच म्हणताय की तुम्ही जेथील संदर्भ देत आहात तो तुम्हालाच सापडत नसल्याने मी तो शोधून तुम्हाला द्यावा.

व्वा!

सस्मितची पोस्ट इन्सेन्सिटिव्ह नसून धक्कादायक वास्तव आहे. ते पर्टिक्युलरली बी ह्यांच्या नात्यातील मुलींना उद्देशून नसावे. पण असे नियोजन करून चिक्कार मुली (आणि मुलेसुद्धा) लग्न वगैरे गोष्टी करत असतात.

किती insensitive पोस्ट..>>>>>>>>> वाटलंच होतं मला. असो.

पण असे नियोजन करून चिक्कार मुली (आणि मुलेसुद्धा) लग्न वगैरे गोष्टी करत असतात.>>

दरवेळी मुली आधी आणि मुले आलीच तर कंसात हे काही कळले नाही. अशानीच दुजाभाव वाढतो.

>>>दरवेळी मुली आधी आणि मुले आलीच तर कंसात हे काही कळले नाही. अशानीच दुजाभाव वाढतो.<<<

घ्या! आता काय बोलावे? आत्ता आत्तापर्यंत तुम्हीच मुलींना नवर्‍याला बदलण्यास जबाबदार म्हणत होतात आणि इतर काही आय डी ह्या वृत्तीचा विरोध करत होते. विषय (सस्मितने काढलेला) मुलींबद्दल होता म्हणून मीही मुलींबद्दल लिहायला गेलो आणि आठवले की 'असे मुले करत नाहीत का' असे ते काही आय डी लगेच विचारतील. म्हणून मी 'मुलेही' असे कंसात टाकले. आता तुम्ही त्याच गोष्टीचा जाब विचारताय.

अरे इथे कोण कोणाशी काय बोलतंय कोणाला काही कळतंय का? Lol

'असाध्य रोग आहे, एवीतेवी जास्त वर्षं इंटर अ‍ॅक्शन येणार नाहीये, असलेली वर्षं स्वतः थोडे कष्ट सहन करुन व्यवस्थित गोडी गुलाबीने घालवू' हे नियोजन स्वार्थी वाटणार नाही. असे नियोजन करुन कोणी नीट जाणार्‍याची सेवा केली तर 'असा विचार आहे' म्हणून केलेली सेवा शून्यात जात नाही.
अवांतर :
* "आईची आता कितीशी वर्षं राहिली आहेत? ती आहे तोवर जरा दुर्लक्ष कर ना तिच्या वागण्याकडे..नंतर सगळं तुझ्याच मनासारखं आहे ना" अशी समजूत घालणारे नवरे 'प्लॅनर' वाटत नाहीत का?
* "आम्ही आहोत तोवर हे चालणार नाही, आमच्या पश्चात खुशाल वाटेल ते करा" म्हणणारे वृद्ध 'आम्ही मेल्याशिवाय तुमची सुटका नाही' असे इंप्लाय करत नाहीत का?
* उमेदीच्या काळात आई वडील गावाकडे, स्वतः नोकरी च्या जागी न्युक्लियर फॅमिली, प्रवास खर्च त्याकाळी परवडत नसल्याने लिमिटेड पाहुणे असे ३०-३५ वर्षं राहिलेले वृद्ध अचानक उतार वयात 'एकत्र कुटुंब, प्रत्येक आठवड्यात सदैव पाहुण्यांनी भरलेलं हसतं खेळतं घर, म्हातारपण चा आधार, मुलांवर संस्कार, पाहुणे येतील तेव्हा सर्व सदस्य घरात, सर्व कुटुंबाचे प्रदर्शन,कुटुंबप्रमुख मीच' इ. गोष्टींची भलामण करु लागतात तेव्हा ते 'आम्ही आहोत तोपर्यंत पाहुणे राबता चालू राहणार, आम्ही तरुण पणी आमच्या पालकांसाठी जे करु शकलो नाही ते तुम्ही आमच्यासाठी नक्की करा' असे म्हणतात तेव्हा विनोदी वाटते.

एक तर मी असे लिहिले असल्याचे मला आठवत नाही.

>> मला आत्तातरी सापडत नाहीये. सापडल्यास नक्की लींक देईन. तुर्तास क्षमस्व.

सध्या ६०+ वय असलेल्यांपैकी किती जणांनी दिवसाला १०० रु मंजे महिन्याला ३००० रु एका मुलगा/गीवर खर्च केलेत? ie १९७० ते २००० मधे वाढलेली मुलं. त्यांच्यावर एवढा खर्च झालाय?
<<
त्या काळी झालेला खर्च आजच्या रुपयांत परत देणार? त्या काळी सोनं ३-४ हजार रुपये तोळा होतं. त्या हिशोबाने अवमूल्यनाचा हिशोब पकडा.
प्लस, रोजेवण्दोन वेळचे जेवण, नाश्ता, मधलं खाणं, अंगावरचे कपडे, वह्यापुस्तके, कटिंग, आंघोळीचा साबण असले खर्च काय फुकट असतात का? राहण्याचं भाडं, वीजबिल, घरपट्टी, पाणीपट्टी इ. धरायला नको हिशोबात? केअरटेकिंगचा हिशोब?
किमान रोज १०० रुपये खर्च असतो प्रत्येक माणसाचा.

मी कोणत्याही इमोशन मधे न आणता हिशोब सांगतो आहे, की असा खर्च फेडणे तुम्हाला परवडणार नाही. Happy

(अपना ठेसन छोडूंगा नही जी. पकडके रखूंगा)

हा धागा म्हणजे नागपूर जंक्शन झाले आहे. केव्हाही कोणतीही गाडी येते, कोणीही उतरते, कुठेही जाते, कोणीही चढते, कुठेही बसते आणि सगळे एकमेकांवर चिडचिड करत असतात.

मी निघालो कामाला. संध्याकाळी ह्या धाग्यावरील प्रतिसाद वाचून काही समजले तर एखाद्या गाडीत घुसेन नाहीतर बघू.

जे लोक वृद्धापकाळाची बालपणाशी तुलना करुन खर्च इ.चा हिशोब करत आहेत त्याविषयी..

पालकांनी त्यांच्या मुलांना सांभाळले हे जरी खरे असले तरी कोणत्या पाल्याला पालकाने दिलेल्या वस्तुविषयी कुरबुर करण्याचा अधिकार होता? कोणते पाल्य आईला "तू या बाबामुळे अशी झालीस. अशी नव्हतीस तू.. चांगले पांग फेडलेस इ.इ." बोलत असतील?

याऊलट वरच्या टाईपची वाक्य बहुतेक ज्येना सतत ऐकवत असतात (अगदी रोजसुद्धा). जर पालकांनी पाल्याला आपल्या कुवतीप्रमाणे सांभाळले तर मुलगा/ सुन/ मुलगी/ जावई/ वारस यांनासुद्धा स्वतःला डिसाईड करु देत ना किती आणि काय परवडतेय ते.. यात चुकुनही हयगय झाली कि हे मुलाला इमोशनल ब्लॅकमेल करायला आणि सुनेच्या माथी शिक्का मारायला मोकळे.

मुलांना इमोशनली ब्लॅकमेल करणे हे हत्यार किती वर्ष सुनेविरुद्ध वापरले जाणार आहे कोणास ठाऊक.

घ्या! आता काय बोलावे? आत्ता आत्तापर्यंत तुम्हीच मुलींना नवर्‍याला बदलण्यास जबाबदार म्हणत होतात आणि इतर काही आय डी ह्या वृत्तीचा विरोध करत होते.

>> असे मी कधी म्हंटले इथे? असे लिहिलेले दिसले की ती ओळ प्लीज कट पेस्ट करा आणि मला कोण विरोध करत आहे तेही शोधून द्या ऑफीसचे काम झाल्यानंतर.

हे घ्या बी साहेबः

>>> बी | 19 January, 2016 - 13:57

पियू, तुला हे ऐकावाचायला नकोसे वाटत असेल तर पण हे १०० टक्के खरे आहे की बायका आल्यात की मुलगे बदलतात! बहुतेक मुले बदलतात.<<<

आणि ह्याचा विरोध जे आय डी करत आहेत ते त्या आधीच्या पानावर आहेत. तेवढे तुमचे तुम्ही शोधा. मी नांवे सांगू शकतो पण तिसरेच वाद नकोत व्हायला.

बेफिकिर, पुर्ण पॅरा वाचून फक्त त्यातल अर्धवट घ्यायच आणि वाक्यांचा विपर्यास करायचा!!!

पियू, तुला हे ऐकावाचायला नकोसे वाटत असेल तर पण हे १०० टक्के खरे आहे की बायका आल्यात की मुलगे बदलतात! बहुतेक मुले बदलतात. ह्याला कारण सुना कदाचित असतील पण तितकेच कारण मुलगे सुद्धा आहेत. लग्न झाल्यानंतर आईवडील आणि बायको ह्यांच्यामदे समन्वय साधायला त्याला जमायला पाहिजे. >>

ही अशी आहेत ती वाक्यं! हायलाईट केलेले शब्द पण बघा.

आमचे मुलगे असे नव्हते / नाहीत हो. पण ह्या बायकांमुळे त्यांना टेन्शन येते. वैतागलेत माझे मुलगे त्यांच्या त्यांच्या बायकांना.

हुं हीचं घर म्हणे. घर आम्च्या मुलाचं आहे. माझा मुलगा आहे तो. मी जन्म दिलाय त्याला. हीने काय आकाशातुन झेलला की काय त्याला?

ए प्लीज. आता झाली की १५ वर्ष. आता मला माझा माझा संसार हवाय असं म्हणाले तर काय चुकलं? अजुन किती वर्ष ८ माणसाम्च्या एकत्र कुटुंबात काढायचे मी? गावी भलं मोठं घर बांधलंय ते कुलुप लावायला का? ह्या एवढ्याश्या जागेतच सगळ्यांना रहयचंय ते?

हे बघ, माझी आइ म्हातारी आहे. वय झालंय. अजुन किती दिवस काढणार ती. सांभाळुन घे तुच जरा.

तुझ्या आई-बाबांना चांगलं बोलायचं माहीतच नाहीये कधी. सगळ्या गोष्टीत नाव ठेवायची, लुडबुड करायची, शेजारच्या सुनांची उदाहरणे द्यायची. मी म्हणुन सहन करतेय.

आमचा मुलगा कधी एका शब्दानेही दुखवत नाही आम्हाला. सुन कधी बोलायला लागली ना तर तिलाच बरोबर गप्प करतो. सरळ चालु पड म्हणतो माहेरी. नैतर काय? उध्दट आहे नुसती.

अज्जुन खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प आहे.

वैतागलेत माझे मुलगे त्यांच्या त्यांच्या बायकांना. >>>> प्रकाशचं माझ्याच तेल लाव त्यांना. त्याने केस गळायचे थांबतात शिवाय झोपही छान लागते.

हल्ली इतके मुले असतात कुठे आणि असले तरी हल्ली एकाच घरात दोन सुना, दोन मुले, एक सासू.. कुठल्या काळात आहोत आपण ८० च्या?

तू नक्की कुठली तरी सासबहुची मालिका बघून बाहेर आलेली दिसतेस.

>> सॉरीच.. यातली बरीचशी वाक्य रोज आसपास ऐकली आहेत.

हल्ली इतके मुले असतात कुठे आणि असले तरी हल्ली एकाच घरात दोन सुना, दोन मुले, एक सासू.. कुठल्या काळात आहोत आपण ८० च्या?

>> बी तुम्हाला पुण्यात यायचे खास आमंत्रण माझ्यातर्फे.

भरत मयेकर | 19 January, 2016 - 12:13 नवीन
टाइम व्हँल्यू ऑफ मनी. १९७० च्या खर्चाची भरपाई तेव्हाच्याच किंमतीत करणार का?

दीड मायबोलीकर | 19 January, 2016 - 14:44 नवीन
त्या काळी झालेला खर्च आजच्या रुपयांत परत देणार? त्या काळी सोनं ३-४ हजार रुपये तोळा होतं. त्या हिशोबाने अवमूल्यनाचा हिशोब पकडा.
प्लस, रोजेवण्दोन वेळचे जेवण, नाश्ता, मधलं खाणं, अंगावरचे कपडे, वह्यापुस्तके, कटिंग, आंघोळीचा साबण असले खर्च काय फुकट असतात का? राहण्याचं भाडं, वीजबिल, घरपट्टी, पाणीपट्टी इ. धरायला नको हिशोबात? केअरटेकिंगचा
हिशोब?
किमान रोज १०० रुपये खर्च असतो प्रत्येक माणसाचा.
मी कोणत्याही इमोशन मधे न आणता हिशोब सांगतो आहे, की असा खर्च फेडणे तुम्हाला परवडणार नाही.
(अपना ठेसन छोडूंगा नही जी. पकडके रखूंगा)
>> सव्याज लिहलंय की ओ भरतमामा आणि दीडकाका.
==
कुटुंबाला 'फायनान्शिअल इंस्टीट्युट' समजणे एवढे अवघड आहे? 'दिनुचे बील'सारखे भोंदु अम्मागिरी गुटीम्हणून पाजल्यावर अजून काय होणार म्हणा.
==
माझ्यामते इथे ३५ ते ४५ वयाचे वेगवेगळ्या गावातून, आर्थिक वर्गातून आलेले बरेचजण असतील. त्यांनी जरा शांतपणे बसून आपला जन्मापासूनचा अन्न+वस्त्र+निवारा+शिक्षण+औषधोपचार+इतर खर्च काढायचा प्रयत्न करा. १वर्षचा खर्च २४ वर्ष, २चा २३, ३चा २२ सोऑन बँकेत गुंतवले असते तर किती रिटर्न मिळाला असता बघा. इंटरेस्ट रेट गुगलून मिळेल. टोटल काढा.

अगदी एक दिड लाख इतके कमी येत नाही. पण तरी ६० ते ८० वयाच्या वृद्धांचे हॉस्पिटलायजेशन, बेडरिडन असतील तर नर्स+डायपर+औषधोपचारचा खर्च किंवा इव्हन वृद्धाश्रमाचा खर्च यापेक्षा नक्कीच कमी येतात...

हे निम्न/मध्यम वर्गात लहानाचे मोठे झालेल्या आणि २००० नंतर आयटीमुळे उच्चमध्यम वर्गात गेलेल्यांसाठी बरं का! पोराबाळांसाठी घरं घेऊन ठेवणारा १९९१(ज्याचे फायदे/चटके २००० नंतर मिळाले)च्या आधीच 'विशिष्ठ' असलेला वर्ग यात येत नाही.

....

१वर्षचा खर्च २४ वर्ष, २चा २३, ३चा २२ सोऑन बँकेत गुंतवले असते तर किती रिटर्न मिळाला असता बघा. >>> १९९१ साली पुण्यात ज्या भागात ( धानोरी, टिंगरेनगर) १००० रु. गुंठा या भावाने जमीन होती, तिथे आता ३० - ४० लाख रूपये गुंठा हा भाव चालू आहे. त्या पालकांनी आपली ही गुंतवणूक करायची सोडून आपल्या अशा हिशेबी सुपुत्रांवर खर्च केली. आता त्यांना तिथेच प्लॉट घ्यायचा आहे असे समजूयात.

दीड लाखातल्या काही टक्के रकमेला १००० स २५ लाख असा रेट लावा ( त्या काळात खर्च झालेल्या )
पुढे २००० रु स २५ लाख
असे करीत करीत २००५ साली एक लाखास २५ लाख असा दर लावा.

आता त्या दीड लाखातल्या खर्चाच्या सनावळ्या काढा. त्या त्या वर्षाच्या फॅक्टरने गुणाकार करा.
काढा खर्च.
हाकानाका

दुसरा उपाय म्हणजे
उपचारांच्या दरातील तफावतीचा फॅक्टर काढा. बाकी सारे सेम !!

काही ज्येना गोंदवल्यात पण राहतात ... खखोदेजा .>>> खर आहे. तिथे दवाखाना पण आहे आणि मुंबई,पुणे,सातारा, कोल्हापूर इ. अनेक शहरांतून विविध डॉक्टर सेवा म्हणून महिन्याचे एक दिवस जातात. आसपासच्या खेड्यातले लोक खूप रांग लावतात. चांगले उपचार होतात. माझी बहिण जाते ना महिन्याच्या तिस-या शनिवारी - विनामूल्य म्हणून माहिताय मला.

अँमी, तुम्ही पिढी बदलते तोवर बदललेले पगाराचे स्तर आणि महागाई लक्षात घेतली का?तसंच १९७० ते १९९५ पर्यंतचे व्याज दर माहीत आहेत का? याच लॉजिकने आपल्या म्हातारपणी मेडिकल खर्च किती वाढेल याची कल्पना आहे का? बाकी काही असो, कायद्याने सगळ्यांनाच आपल्या आधीची आपल्यावर अवलंबून असेल तर त्यांच्यावर, 'आपल्या ऐपतीप्रमाणे' खर्च करणे अपेक्षित आहे. हा अन्याय आहे असे वाटत असेल त्यांनी संघटित होऊन कायद्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

Pages