वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

This would be done by sensitizing younger generations .. हे भारत सरकारचे धोरण आहे, त्यासाठी काय प्रयत्न करताहेत ते कळत नाही.

मी स्वतःहून आश्रमात जाणार हे नक्की ( अर्थात जगलो तर ) माझ्या कल्पनेप्रमाणे तिथे किती का लहान असेना पण स्वतंत्र खोली असावी. ( इतर सभासदांशी सक्तीने जुळवून घेणे नसावे ) निसर्गरम्य ठिकाण असावे. इंटरनेट कनेक्शन असावे.

छंद जोपासायची सोय असावी ( अर्थात स्वखर्चाने ), पोटभर पण आरोग्यदायी जेवण असावे. ते रांधणारे आणि वाढणारे ( गरज असेल तरच ) हसतमुख असावेत. अनावश्यक शिस्त नसावी. रोजचे वर्तमानपत्र मिळावे, गरज पडल्यास डॉक्टरकडे जाण्याची सोय असावी... बस और क्या चाहिये ?

>> आपल्यावरही ती वेळ येईलच
वरचेच पुन्हा चिकटवते
मी शक्यतो निवृत्त होणार नाही आणि अगदीच काम होईनासे झाले तर लगेच मरेन असे ठरवून ठेवले आहे. Wink

- पगारी/ पैसे देणारे काम मिळेनासे झाल्यावरच्या वर्षांसाठी वेगळी बचत करायला सुरुवात केली आहे. (३५ पासून).
- मुलगा युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर त्याच्याबरोबर एकत्र असण्याचा काळ संपेल हे मनात नक्की आहे. (नवरा कधी कधी त्याचा काउंटडाउनही करतो गमतीने.)
- मृत्यूपत्र क्लियर करून ठेवले आहे. कष्टाने जगवायची वेळ आली तर काय करायचे हे मी आणि नवर्‍याने बोलून ठेवले आहे. मधून मधून उजळणीही करतो.
- म्हातारपणासाठी बिनपायर्‍यांचे घर (फ्लॅट) भारतात घेऊन ठेवले आहे.

आणखी काय करता येईल?

हे भारत सरकारचे धोरण आहे, त्यासाठी काय प्रयत्न करताहेत ते कळत नाही.

आकाशवाणीच्या चॅनेल्सवर जाहिराती वाजवतात.
"वृद्धांची काळजी घेणं हे त्याच्या वारसदारांचं (नेमका शब्द पुन्हा ऐकेन तेव्हा नोंदवेन) सामाजिकच नव्हे तर कायदेशीर कर्तव्य आहे.
आज तुम्ही तुमच्या आईअवडिलांशी जसं वागताय तसंच उद्या तुमची मुलं तुमच्याशी वागतील."

मी शक्यतो निवृत्त होणार नाही आणि अगदीच काम होईनासे झाले तर लगेच मरेन असे ठरवून ठेवले आहे.
<<

काम करीत रहाणे, हे जिवंत अन आनंदी राहण्यासाठी अत्यावश्यक आहे. स्त्रीयांना घरकाम हे एक कंटीन्यूड ऑक्युपेशन असते. पण टिपिकल रिटायर्ड पुरुषांना मी आता निरुपयोगी आहे, ही कन्सेप्ट भयंकर डिप्रेसिंग असते.

आता, अगदी इंपर्सनल विचार करून पुढचं वाचा.

अहो, लगेच मरेन असं ठरवून मरता येत नाही.

'आय विल किल मायसेल्फ' वगैरे कन्सेप्ट डोक्यात असतील, तर एक पाल किंवा उंदीर मारायचा प्रयत्न करून पहा. फार कठीण असतं हो जीव घेणं माणूस मरता मरत नाही. शिवाय त्या प्रयत्नात मोठं अपंगत्व आलं तर? किंवा काही पॅरालिसिस, अल्झायमर्स सारखा आजार आला तर?

हे भारत सरकारचे धोरण आहे, त्यासाठी काय प्रयत्न करताहेत ते कळत नाही.
<<

एकंदरीत पाहू जाता, सगळ्या जबाबदार्‍या झटकून मोकळ्या होणार्‍या उनाडटप्पू पोरासारखं सरकारचं धोरण आहे.

तुमच्या आईबापांना तुम्ही सांभाळा. (आम्ही भारतीय संस्कृती व कुटुंबसंस्था "रिइन्फोर्स" करू)
नोकर्‍या मागू नका, निर्माण करा. (आम्ही कामगार कायदा उडवून लावून पिळवणूकीच्या संधी उपलब्ध करून देऊ)
इ. इ. इ.

इथे हे सरकार कामाचे नाही. माझ्या म्हातारपणाची सोय मलाच लावली पाहिजे. अन हो, त्याआधी हे सरकारही मोडीत काढले पाहिजे Wink

छे हो, दी.मा. किल वगैरे कुठे करताय. इथे डास मारणे कठीण.
काहीच काम होत नाही म्हणजे ऑलरेडी मरायला टेकलेली असणार असे गृहीत आहे. आणि तोपर्यंत वेळ काढायला म्हणून पैसे आणि जागेची तजवीज करते आहे ना.

--
अवांतर म्हणजे मी (२०/२५ वर्षात) मरायला टेकेपर्यंत रोबोटिक हेल्पर बर्‍यापैकी नॉर्मल झाले असतील असे मला वाटते. म्हणजे संवाद साधणारी उपकरणे (सिरी, ओके गूगल), घरगुती कामांचे ऑटोमेशन, व्हीडियो कॉलमधून डॉक्टरांशी बोलणे वगैरे.

दीमांचे हे वरचे पोस्ट आवडले. (१०:०४ चे - मी पोस्ट लिहीपर्यन्त अजून बरीच पोस्टे आली!) बाकी आधीची अनेक पानेच्या पाने सुनेचा जाच, पालनपोषणाच्या खर्चाचे हिशेब इ. कसला वेस्ट ऑफ टाइम आहे!!
आपल्याकडे वृद्धाश्रम या गोष्टीला फार निगेटिव्ह वलय आहे. वृद्धाश्रमात "टाकलेले" हे शब्द्प्रयोग त्यामुळेच आहेत. सन्मानाने, आनंदाने राहता येऊ शकणार्‍या रिटायर्मेन्ट कम्युनिटीज रूढ झाल्या पाहिजेत. त्याने आपली महान संस्कृती बुडते असा विचार आला की मग ही वरच्यासारखी तर्कटे सुरु होतात !
अथश्रीसारखे पर्याय आता तरी उपलब्ध होतायत ही चांगली गोष्ट आहे.
पाश्चात्य देशात सगळ्याच पिढ्यांना त्यांचे स्वावलंबन आणि प्रायव्हसी प्यारी असते. तिथे "अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅडल्ट" कम्युनिटीज (अजून काम करणार्‍या अन स्वतःची काळजी स्वतः घेणार्‍या ५५+ वयाच्या प्रौढांसाठी) किंवा असिस्टेड लिव्हिंग (जास्त वयस्क आणि दैनंदिन आयुष्यातली कामे करण्यास मदत लागणारे) असे पर्याय असतात. जसे वय १८ झाल्यावर मुले शिक्षण आणि नंतर नोकरीसाठी बाहेर पडणे हे सर्वमान्य आहे तसेच मुले बाहेर पडली की घरे विकून (डाउनसाइझ करणे म्हणतात त्याला ) अ‍ॅडल्ट किंवा रिटायर्मेन्ट कम्युनिटीज मधे जाऊन रहाणे हेही. या घरांना टॅक्सेस मधे सूट मिळते (कारण शाळांना जाणारा टॅक्स चा पैसा ही घरे देत नाहीत . पब्लिक स्कूल्सना अर्थातच इथे सर्व्हिस द्यावी क्लागत नाही!) असिस्टेड लिव्हिंग मधे नर्सेस, व्हॉलन्टीयर्स, हेल्पर्स घरातली कामे, शॉपिंग पासून ते डॉक्टरी सेवा इ. साठी मिळू शकतात . सिनियर सिटिझन्स पण बहुधा स्वतः नोकरी करतात तोवर या नंतरच्या खर्चासाठी सोय करतात, शिवाय सोशल सिक्युरिटी , मेडिकल इन्शुरन्स इ. असतेच.

यात पाश्चात्त्यांचं ते सगळं चांगलं असे म्हणण्याचा हेतू नव्हे. पण वृद्धाश्रम (वानप्रस्थाश्रम ?) हे काही वाईट , ट्रॅजिक, दयनीय नाही. फक्त आयुष्याची एक फेज म्हणून काही देशात सहज स्वीकारली गेली आहे. तशी ती गेली पाहिजे हे सांगण्याचा हेतू होता.
बाकी मुले नातवंडे यांचा सहवास, प्रेम मिळणे न मिळणे, एकमेकापासून किती लांब/ जवळ रहाणे हे त्या त्या व्यक्ती अन त्यांनी जोपासलेल्या नातेसंबंधांवर अवलंबून असतं. मग ते भारतात असो वा परदेशात.

भरत , छान आहे जाहीरात ( कितपत प्रभाव टाकतेय ?? )

आजकाल खुपदा घराबाहेरील कारणांसाठीच सहनशीलता कमी झालेली आहे, त्यामूळे घरात किंचीतही विरोध वा मतभेद सहन करायचे त्राण नसतात. आणि मुख्य म्हणजे पर्याय उपलब्ध आहेत ( दोघांनाही )

ही गोष्ट फार जूनी नाही पण " माघारी आलेल्या आत्याबाई " , " किंवा लग्नच न केलेले मामा " घरोघरी दिसत. घरातली माणसंच नव्हे तर नव्याने येणार्‍या सुनबाईदेखील त्यांच्या विक्षिप्तपणाशी जुळवून घेत ( अर्थात पर्याय नव्हता. ) पण त्यांना सहसा घराबाहेर पडावे लागत नसे.

आता इंटरनेट कनेक्शन असेल तर संगीतापासून - बातम्यांपर्यंत सगळेच हाताशी असेल. मला नाही एकाकीपणा जाणवणार. प्रकृती मात्र राखायलाच हवी.

नोकर्‍या करणार्‍यांना हे रिटायर्ड आयुष्याचं काय करायचं वगैरे. फ्रिलान्सर्स, बिझनेसवाले वगैरेंना डोकं चालतंय तोवर काम करत राहता येतं.

माझ्या पाहण्यातील दोन उदाहरणे एक मुलाकडे राह्यला गेलेले जोडपे परत आले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्ळं काही चांगलं आहे तक्रार करायला जागा नाही पण 'स्वामित्व' नाही... दुसरं उदाहरण ऐंशी वर्षाच्या एकट्या राहणार्या आजी कुठेच पाच (मुल अन मुली) मुलांकडे जात नाही कारण त्याना त्यांच स्वातंत्र्य प्रिय आहे अश्यात पैशाचा प्रश्नच नाहीये ... मैत्रेयीची पोस्ट आवडली..

अरे खर्चाचे कॅल्क्यूलेशन करायला एक मस्त मॅथेमॅटिकल मॉडेल तयार करू. त्यात परिस्थितीजन्य बदलणारे घटक, इ. प्रमाणे वेगवेगळे फॅक्टर, दोन चार पीएचडया नक्कीच निघतील. मग ते मोजायला संगणकप्रणाली हवीच. देश विदेशाप्रमाणे आणखी व्हेरिएबलस, भरपूर मोठा कोड. माबोकरांना बराच रस आहे तर व्हीसी येतीलच. प्रोग्रॅम म्हणजे बग्स आलेच. भास्काराचार्यान्सारखे गणितज्ञ स्वस्थ थोडीच बसणारेत, ते मॉडेल मध्ये सुधारणा करणार, आणखी व्हर्जन. आणखी काम. इकॉनॉमीची चाकं फिरती.

भारी आयडिया आहे Wink

बीटा वर्जन देशीच काढू. विदेश इतक्यात नको. प्रोजेक्टची पुढची फेज म्हणजे अनेकांच्या पोटापाण्याची सोय Wink

मृदुला | 20 January, 2016 - 20:05

>> २ खर्च या मुद्द्यासाठी Like! खासकरुन
"गणित आवडता विषय असल्याने महिन्याचे बजेट करणे, दिवाळीला कोणती नवी वस्तू घ्यायची आहे त्यासाठी काय सेविंग असले काम साधारण सातवीपासून माझ्या खाती आले होते. त्यामुळे वरचे आकडे अगदी पक्के नसले तरी खर्याच्या जवळपासचे असावेत." यासाठी हाय फाइव!

पण आर यू शुअर की 'जेवण, नाश्ता, घरभाडे, सुट्टीत आजोळी जाणे इ काहीही न धरता तुझ्या जन्मापासून नोकरी लागण्याचा वरखर्च १५/१६ वर्षांपूर्वी साधारण १२ लाख होता?'

इंजिनीअरींग फी ६०००, हॉस्टेल + मेस १२००० आणि इतर शिक्षणविषयक खर्च ७००० पकडले तरी ४ वर्षाचे मिळून १ लाख होतात. मग बाकी ११ लाख कशासाठी लागले?

माझ्या गणितात अन्न वस्त्र निवारा शिक्षण औषधोपचार इतर सगळंसगळं पकडून माझा खर्च ३ लाखच्यावर काही केल्या जात नाहीय.

===
भरत, तुम्ही दिलेली आकडेवारी अजून जरा नीट वाचावी लागेल.

इथले खर्चाचे प्रतिसाद प्रुन करुन नविन धागा बनवतील का अॅडमीन?

लोकं फारच इरीटेट होतायत. थांबते म्हणलं तरी आपणच प्रश्न विचारतात. तरी मी शक्यतो एका पानावर एकच प्रतिसाद देतेय.

पण आर यू शुअर की 'जेवण, नाश्ता, घरभाडे, सुट्टीत आजोळी जाणे इ काहीही न धरता तुझ्या जन्मापासून नोकरी लागण्याचा वरखर्च १५/१६ वर्षांपूर्वी साधारण १२ लाख होता?'
<<

Lol

प्रतिसाद जास्त देऊ नका,
तुम्ही तुमचं गणित लिहा. किती पैसे परत देणे तुम्हाला अपेक्षित आहे.
सिंपल. सगळे प्रतिसाद एकाच प्रश्नोत्तरात संपतील. Happy

अन हो, त्यांनी डेली मील्स व बोर्डिंग हिशोबात धरलेलं नाहिये. व्हिच इज ऑल्मोस्ट ७०% ऑफ लिव्हिंग कॉस्ट. नैका?

तुम्ही लोक लय घाबरवता यार , आमच्यासारखे मस्तमौला अजिबात कसलही टेंशन न घेता जगत असतात पण असं काही वाचलं की आरसा म्हणायला लागतो , ' आपका क्या होगा जनाबे आलि ? '. खरच म्हातारपणाविषयी जरा सिरियसली विचार करायला पाहीजे.

१९८५ नंतरही काही मुलं जन्माला आली असू शकतात, आणि त्यांच्या पाकालांनी (समजा) त्यांना वाढवताना खर्चही केला असेल. तुमचं प्रिमाईस (कोणी कुणाला किती पैसे द्यावे इ.) फक्त भारतातील एका विशिष्ट काळात जन्माला आलेल्यांनाच का बरं लावायचं? नंतर जन्मलेल्या पोरांचं कंबरड मोडेल की. तुम्हाला मुलं असली (हे वैयक्तिक विचारात नाहीये, पण हायपोथेटीकली) तर त्यांच्या कडून तुम्ही ते पैसे त्या दरात मिळण्याची अपेक्षा करता का? मज्जाच की मग, मस्त म्हातारपणाची काठी तय्यार.

माझी पत्नी व मी सत्तरीच्या पुढले आहोत. सध्या खुप मोठ्या घरात राहत आहोत. आजुबाजुला जागा पण खुप्च आहे. पत्नीला बागकामाची आवड आहे त्यामुळे ती लहान जागेत राहायला तयार नाही. माझा मुलगा दुर तर तिची मुले परदेशी राहतात त्यामुळे कधी ना कधी व्रुद्धाश्रमात रहावे लागेल. मनाची तयारी आहे पण जोपर्यन्त शक्य आहे तोपर्यन्त घरीच राहु. येथे जर स्वयम्पाक करायला जमत नसेल तर meals on wheels ही सम्स्था मदत करते म्हणजे त्यानी केलेले जेवण घरपोच करते. शिवाय जवळची नगरपालिका घरकामात व बागकामात मदत करते. त्यामुळे ती काळजी नाही. काळजी आहे ती फक्त आरोग्याची. ते चान्गले राहिले तर सध्याच्या घरीच राहु व नियमितपणे मुलाना व नातवन्डाना भेटत जाउ. असे आमचे planning आहे.

विशिष्ट काळात जन्मलेल्यांनाच कारण तेव्हा खर्च फार नव्हता. शिक्षाण फुकात. रेशनवर स्वस्त धान्य. भाड्याची(हाउसिंग बोर्डाची) घरं? पोरांना सरकारी पैशावर आरामात वाढवता यायचं.
त्या काळातल्या आईबापांना आपल्या पोरांसाठी फार पैसा खर्च करावा लागत नसे.

हा त्यांचा लिहितानाचा मुद्दा होता. पण मग मी तो काळ धरून खरंच हिशोब मांडू लागलो तेव्हा लक्षात आलं की यात पालक प्रि-एल्पीजी काळातले आणि मुलं पोस्ट एल्पीजी काळात कमावणारी. म्हणजे एक मोठीच लीप.
अशा पालकांना आपली कमाई आणि राहणीमान आणि मुलांची कमाई आणि राहणीमान यातली तफावत प्रचंड जाणवत असणार. माझी एक सहकर्मिणी तिच्या आईवडिलांच्या चाळिशीच्या आसपास जन्माला आलेली. तिनेच सांगितलेले की तिचा नोकरीतला पहिला पगार हा तिच्या वडिलांच्या निवृत्तीच्या वेळच्या पगारापेक्षा जास्त होता. अर्थातच वडील पोस्टात. ती ऑटोनॉमस पब्लिस सेक्टरमध्ये जिथे पगार बँकांपेक्षा जरा जास्त होते.

यामुळेही दोन पिढ्यांच्या पैशाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणात किती फरक पडू शकतो नाही. आईवडिलांना सतत अंथरुण पाहून पाय पसरावे लागत असणार. तर मुलांना खर्च करताना मागेपुढे पाहायची गरज नाही. कुटुंबांत जीवनपद्धती आणि पैशावरून क्लॅशेस व्हायचे हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते.
एक फरक मुलांच्या संख्येतला आहे. अ‍ॅमी यांनी दिलेल्या उदाहरणात तीन मुले आहेत. आता बहुतेक वेळा एकच मूल असतं.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पिढीपर्यंततरी रिटायरमेंट प्लानिंग नावाचा कन्सेप्ट फारसा रुजला नव्हता. सरकारी नोकरांना पेन्शन मिळे. पण पालक बहुतेकवेळा आपली आयुष्यभराची सेव्हिंगग्ज मुलांवर खर्च करत. मुलांचं शिक्षण, घर घ्यायला (आईवडील भाड्याच्या घरात राहतील असतील तर नव्या घरात त्यांचा मालकी हक्कही नाही) लग्नावर. मग साहजिकच त्यांना म्हातारपणी मुलांच्या तोंडाकडे पाहावे लागे.

हा फरक एका पिढीने लक्षात घेऊन दोन्हीकडच्या कळा काढल्या तर स्थित्यंतर कमी त्रासाचं होईल. आईवडील तुमच्यावर अवलंबून असतील तर त्यांचं निभावून नेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. इथे मुलंही एकापेक्षा जास्त असतील. तेच पुढल्या पिढीला हवं ते सगळं सगळं , अगदी अख्ख आकाश देताना आपल्या पायाखालच्या जमिनीचाही विचार करायला हवा. स्वतःच्या पंखांतल्या बळावरही त्यांना आणखी उचं उडायची हिंमत मिळू द्या.

वृद्धाश्रमात जाण्याचं (मी टाकण्याचं हा शब्द वापरणार नाही, कारण ते पालकांच्या मनाविरुद्ध होतं : मला अगदी तुरुंगात टाकणे हेच शब्द आठवतात) कारण हे असू शकतं की वृद्धांची हवी तशी काळजी आपण घेऊ शकत नाही. लहान मुलांना जशी २४ तास देखभालीची गरज असते तशीच गरज एका टप्प्यानंतर वृद्धांनाही लागते. ती पुरवणं शक्य होत नाही. त्याला वृद्धाश्रम हा पर्याय होऊ शकतो.

घरातल्या कुरबुरी, मतभेद, ढवळाढवळ, अधिकारांचे हस्तांतरण न होणे या गोष्टींवर तोडगा निघायला हवा. आपण आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यात अशीच भूमिका वठवणार नाही याची खात्री देता येईल का? (उत्तर नोंदवून ठेवा. पुढे उपयोगी पडेल)

व्याजाचे दर काढणे फसवे आहे. त्या काळात दर चढे होते जे नंतर कमी कमी होत गेले. त्यामुळे हा ऑप्शन बाद.

वृद्धांना मेडीकल सर्व्हिसचीच गरज लागणार आहे. त्यामुळे मेडीकल सर्व्हीसच्या दरातली तफावत हा एक क्रायटेरिया जरी घेतला तरी हिशेब कै च्या कै होणार आहे. डाळींचे दर एक दोन रुपये किलो ते दोनशे रूपये किलो असे झाले आहेत. त्यामुळे सरळ सरळ वस्तूंचे आजच्या भावाने मूल्यमापन झाले तर ते बरे पडेल. कारण या वस्तू पालकांना आजच्या दराने घ्याव्या लागतील. त्या जुन्या दराने त्यांना कुठे मिळतील ?

आज या पालकांना एखाद्या मुलाला दत्तक घेऊन वाढवायचे असे वाटले तर त्या दराने शाळेची फी कुठे आहे ? त्या काळी स्वस्त होतं म्हणून कमाई देखील कमीच होती ना ? तेव्हां त्या स्वस्ताईच्या आड कशाला आपले गृहीतक मांडावे ?

व्रुद्धाश्रमाला पर्याय नाहि, असा एकुण सुर जाणवतोय. उद्या हे सगळे मध्य/उच्च वर्गिय बेबी बुमर्स व्रुद्धाश्रमात जायला तयार झाले तर या सगळ्यांना सामावुन घेतील इतके व्रुद्धाश्रम महाराष्ट्रात आहेत का?

चला आता केस स्टडी करू. अमूक समस्या असेल तर काय काय पर्याय आहेत असा विचार करून बघू.
केस १ :
जवळच्या नात्यातल्या एक आजी आहेत. वय एक्याऐंशी. गेल्या आठवड्यात हार्ट अटेक आला. तेव्हापासून हॉस्पिटलात आहेत. त्यांना मूल नाही, मिस्टर गेलेले. पेन्शन आहे, स्वत:चे घर आहे. इतकी वर्षं एकट्या स्वतंत्र राहून स्वत:चा स्वयंपाक करत होत्या. शेजारी पाजारी, नातेवाईक कुणाशीही चांगले संबंध ठेवले नाहीत. कुणावरही विश्वास नाही. सगळे जण यांचे पैसे हडप करायला बसलेत असा संशय. त्यामुळे एकाही बँक खात्याचे, घराचे नॉमिनेशन केलेले नाही. त्यांचे विश्वासू भाऊही तिघेही निवर्तले. बहीणी स्वत: सत्तरीत आणि हार्ट पेशंट. त्यांच्यावरही विश्वास नाही. दवाखान्याचा खर्च सगळे मिळून करतायत पण त्यांच्या खात्यातले पैसे या कारणासाठी वापरायचे नाहीत तर कधी? डॉ. नी कधीही कोलेप्स होतील असे सांगितले आहे आणि त्यांचे म्हणणे एकच, मी घरी आले की देईन तुमचे पैसे. Happy त्यांच्या खात्यातून पैसे मिळवणे हा मुद्दा नाहीये, पण एका सहीने जे काम सहज होऊ शकते त्यासाठी नंतर द्राविडी प्राणायाम कशाला. दिवसभर सोबत सत्तरीतली बहीण येऊन बसते तर तिच्याशीही भांडतात. परवा फोन दुरूस्तीला लाईनमन आला तेव्हा यांना चक्कर आली. त्याने पाणी वगैरे दिले. बरे वाटल्यावर तो गेला. मग कुणालाही न कळवता संध्याकाळी या स्वत: चालत दवाखान्यात गेल्या. तिथून आम्हाला फोन आला. मग डॉ म्हणाले यांना दुपारीच अटेक येऊन गेलाय. धावाधाव. आता आठवडा झाला.प्रकृतीत फार फरक पडणार नाही तर घरी सोडणार आहेत. आमच्या घरी बार चौदा तास कुणी नसते. केअर टेकर वर जबाबदारी टाकणे धोक्याचे वाटते. अशा परिस्थितीत त्यांना कुठे ठेवणार?

त्या किमान एकट्या आहेत. आमच्याकडे एक नव्वद वर्षांचे गृहस्थ यायचे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटसंबंधाने. सोबत त्यांच्या नोकराला घेऊन.
ते शेवटचे आजारी पडले तेव्हा त्यांचा साठीपलीकडचा मुलगा आलेला. तो म्हणाला मी माझ्या प्रपंचातून निवृत्त झालो. पण त्यांचा अजूनही आमच्यावर विश्वास नाही. त्यांनी आपल्या सी.ए.ला नॉमिनी केलं. आणि मृत्यूपत्रात सी.ए.ने मालमत्तेची वाटणी कशी करायची हे लिहून ठेवलं. म्हणजे दिलं मुलांनाच. पण अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने.
-------
आजींना शांतपणे सगळ्या परिस्थितीची जाणीव करून देऊन, जमल्यास त्रयस्थामार्फत (आधीच्या काळात फॅमिली डॉक्टर्स हेसुद्धा काम करत असावेत) त्यांनाच निर्णय घ्यायला सांगायला हवं. प्रोफेशनल रजिस्टर्ड केअर गिव्हर्स असतात ना? वृद्धांसाठी आणि त्यांच्या केअर गिव्हर्ससाठीसुद्धा कौन्सेलर्सची गरज आहे.

आमच्याइथे असे काही झाले तर सगळे नातेवाईक हात वरती करतात.
'म्हातारीकडे पैसा आहे तर बिल तिनंच भरायचं' सरळ आयसीयूच्या बेडवर ठणकावून साम्गतात.
आणि आमच्याकडून बाई हॉस्पिटलात बेडवर पडून अत्यवस्थ आहेत आणि बँकेत स्वतः येऊ शकत नाही असे लिहिलेल्या कागदावर आमचा सही शिक्का घेऊन जातात.
बॅण्कवाले हवंतर आम्हाला फोन करून कन्फर्म करतात.
मग हॉस्पिटलचं बील जातं आजीच्याच अकाऊंटमधून.

नंतर डिस्चार्ज घेताना आजीलाच विचारतात 'आजे, कुणाकडे र्‍हायला जातीस ते सांग आणि तशी व्यवस्था कर.
व्यवस्था म्हणजे कमीतकमी दागिन्याचा डबा तरी सांभाळणारीच्या हातात द्यायचा.
Happy

हे एक उदाहरण माझ्याच शेजारी राहणाऱ्या आजी तिन महिन्यापूर्वी वर गेल्या त्यांना मुलबाळ नव्हते पण पैसा होता .. तीन वर्ष अंथरुणावर होत्या ब्युरोच्या बायका सेवा करायच्या व जेवणाचा डबा होता.अधुनमधून नातेवाईक भेटून जायचे ..

बरं, मग काय ठरल? कोण कोण आपापल्या आईबाप, सासुसासर्‍यांना वृद्धाश्रमात ठेवणार आहे?
अन जोडीनेच, स्वतःच्या वृद्धाश्रमाचे "अ‍ॅडव्हान्स बुकिंग" करुन ठेवणारे? Proud

लिंबुड्या टिंबूड्या,
तुमच्या झोपडयांत (झोपडपट्टी नव्हे) सोबत कोण कोण ब्रिगेडी कम्युनिस्ट अन नक्शलवादी घेणार आहात गडे? 5.gif

भरत मयेकर | 21 January, 2016 - 07:12

>> पोस्ट आवडली.

घरातल्या कुरबुरी, मतभेद, ढवळाढवळ, अधिकारांचे हस्तांतरण न होणे या गोष्टींवर तोडगा निघायला हवा. आपण आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यात अशीच भूमिका वठवणार नाही याची खात्री देता येईल का? (उत्तर नोंदवून ठेवा. पुढे उपयोगी पडेल)

>> विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यातील प्रत्येक बाबीवर माझे उत्तर नोंदवुन ठेवावेसे वाटत आहे. म्हणजे मीसुद्धा साठीत गेल्यावर बुद्धी नाठी टाईप वागायला लागले तर माझीच उत्तरं वाचुन कदाचित डोक्यात प्रकाश पडेल. Happy

Pages