वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅमी,

तुमचे प्रतिसाद फारच वेगळे आहेत. चांगले, वाईट असे सध्याच म्हणू शकत नाही कारण ते तुटक तुटकपणे येत आहेत. पण मला तरी पूर्ण पटत नाही आहेत. तुमच्या सर्व प्रतिसादांच्या मुळाशी असलेला विचार हा बहुधा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तसेच त्यात सरसकटीकरण असल्यासारखे (मला) वाटत आहे. प्रत्येक घरातील केस वेगळी असते. संस्कार, मुले मोठी होईपर्यंत पूर्णतः बदलणारी (बहुधा सुधारणारी) आर्थिक स्थिती व त्यामुळे बदललेल्या अपेक्षा, आजूबाजूच्या जगातील बदलांमुळे बदललेल्या अपेक्षा ह्या व अश्या कित्येक व्हेरिएबल्सचे परिणाम अश्या एखाद्या प्रतिसादात कधीच सामावता येणार नाहीत.

आता तुमचा तो चाळीत वाढवणे, दारू पिऊन मारहाण वगैरे प्रतिसाद वाचल्यावर एक प्रश्नः

फक्त गर्भश्रीमंत घरात जन्मलेल्या मुलांनी पालकांची यथोचित काळजी घ्यायची का? नंतर त्या मुलांनी दिवे लावून संपत्तीची विल्हेवाट लावली तर त्यांच्या पालकांना मूळ राहणीमान सरकार देऊ करणार का?

कुटुंबव्यवस्था आणि लग्नसंस्था ह्या दोहोंच्या मुळावर घाव घालणारे प्रश्न तुम्ही उपस्थित करत आहात असे वाटते. चाळीत वाढणार्‍या मुलांसमोर 'चाळ की बंगला' असे चॉईस कुठे असतात? पुढे पालकांची सांपत्तिक स्थिती सुधारल्यानंतर मुलांचेही राहणीमान सुधारतेच ना? की पालक मुलांना चाळीत ठेवून स्वतः फ्लॅटमध्ये जातात?

अहो कापोचेआजोबा, माझा दुसर्या पानावरचा प्रतिसाद आणि भरत मयेकरांचा मला उद्देशून लिहिलेला तिसर्या पानावरचा प्रतिसाद वाचा. ते एका 'विशिष्ठ' वर्गाबद्दल बोलतायत म्हणून मी दुसर्या एका 'विशिष्ठ' वर्गाबद्दल बोलले.

तुम्ही कशाला एवढे चिडलायत? तुमच्या मुलानातवंडांनी तुम्हाला वृद्धाश्रमात 'टाकलंय' का? सिरीअसली विचारतेय...

गरीबांची life expectancy कमी असते त्यामुळे त्याणा म्हातरपणचा प्रश्न कमी भेदसावतो.श्रीमंताकडे पैसा सतो त्यामुळे प्प्रश्न सोपा होतो. अदचण होते ती मध्यमवर्गाची.मध्यमवर्ग नात्यांअधे प्रेम जपणारा असतो पन पैसा कुठुण आनायचा. वैद्यकिय सेवांचे nationalisation झाक्ले तर हा प्रश्न पुर्ण सुटला नाही तरी तीव्रता कमी होउ शकते.आरोग्य पम्चायत तर्फे सरकारला अनेक वेला निवेदने देउन झालेली आहेत. असे model ,UK सारख्या देशांनी यशस्वी केले आहे. ह्यात कुणाचाच तोटा नाही . उलत मध्य्म व्र्गाचे विम्याचे पैसे वाचतील.दुसरा फायदा अर्थव्य्वस्थेला होइल .बर्‍याचदा लोक वैद्यकिय खर्च खुप होइल ह्या भीतीने इतर खर्च ताळतात ,त्यामुळे इतर व्यव्साय ज्या प्रमानात चालले पाहिजेत त्या प्रमाणात चालत नाहीत
ब्यांकाचे nationalisation झाले तेव्हा इंदिरा गांधींना खुप विरोध झाला होता, पन आज तीच गोश्त आपल्या देशाच्या पथ्यावर पदली आहे.कदाचित वैद्यसेवांह्चंच्या बाब्तीत असाच विरोध होइल पण नंतर त्याचा फायदा सगळ्यांआ मिलतोय हे बघता विरोध मावळेल.
आता प्रश येतो की ह्यासाठी पैसा सरकारने कसा उग्भा करायचा? अश्यक्य काहीच नाही. कर स्वरुपात पैसा सरकार उभा करु शकते.

इच्छामरण कुठल्या देशात कायदेशीर आहे? तिथे इतर देशातल्या नागरीकांना मरण पत्करता येउ शकते का?

तुमच्या पहिल्या पोस्टच्या आधी मयेकरांचा प्रतिसाद दिसला नाही. मयेकरांचा उद्देशून आहे म्हणून विचारायचे नाही का? विपूल लिहा की.

त्या दुसर्या गटाशी मी संबंधित आहे. तुम्ही आहात का हे त्यासाठीच विचारले आहे. मयेकरांचा त्याच्याशी काय संबंध? तुमच्या लेटेस्ट प्रश्नाचंही प्रयोजन काय ते कळाले नाही.

आईवडलांनी मुलगा/गी वर जेवढे पैसे जन्मापासून खर्च केले असतील (अगदी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचार, इतर सगळं सगळं पकडा) तेवढे आणि फक्त तेवढेच पैसे व्याजासहीत मुलांनी पालकांना परत करावेत किंवा त्यांच्यावर खर्च करावेत. त्यापेक्षा जास्त खर्च करायचा की नाही हे त्या त्या मुलांनी ठरवावे. पालक मुलांशी चांगले वागले/वागत असतील तर मुलं खर्च करतीलही. किंवा करणार नाहीत. त्यांची निवड.
<<

(किमान) २५ वर्षांचा व्याजासहितचा हिशोब परवडेल का?

हे आईबापाचं कर्ज पैशाने फेडताना स्वतःच (पैशाने) भिकारी व्हाल. त्यापुढे स्वतःच्या मुलाबाळांवर खर्च करायचा आहे, अन स्वतःचा संसारही. Happy

अहो सुनेवर विषय आला होता तेव्हाही 'कुठून कुठे चाललाय धागा' असेच काहींना वाटत होते.

हा विषय असा आहे की प्रत्येकजण येथे येऊन स्वतःची खासगी आयुष्यातील कटकट आणि त्याबाबत स्वतःची भूमिका मांडू शकतो आणि सरसकटीकरण करू शकतो. म्हणून धागाकर्तीला मी हेडरमध्ये मुद्यांची यादी करण्याबाबत सुचवले होते पण ते त्यांना पटलेले दिसत नाही. तसे केले तर एकेका मुद्यावर चर्चा करता येईल.

kapoche | 19 January, 2016 - 09:40
तुमच्या पहिल्या पोस्टच्या आधी मयेकरांचा प्रतिसाद दिसला नाही. मयेकरांचा उद्देशून आहे म्हणून विचारायचे नाही का? विपूल लिहा की. त्या दुसर्या गटाशी मी संबंधित आहे. तुम्ही आहात का हे त्यासाठीच विचारले आहे. मयेकरांचा त्याच्याशी काय संबंध? तुमच्या लेटेस्ट प्रश्नाचंही प्रयोजन काय ते कळाले नाही. >> कापोचे, माझ्या सगळ्यात पहिल्या प्रतिसादात मी 'फक्त' पैशांचा मुद्दा मांडला. कारण तोपर्यंत पैसा हा मुद्दा कोणीच आणलेला दिसला नाही. त्याला भमंनी उत्तर दिलंय; जे सार्केस्टीक असलं तरी त्याला मी सहमती दर्शवलीय. नंतर तिसर्या पानावर भम 'एका विशिष्ठ' वर्गाबद्दल बोलतायत त्याला उत्तर द्यायचं राहिलं होतं. त्याला आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाला एकत्र उत्तर दिल्याने तुम्हाला कोलांटउड्या वगैरे वाटल्या. आता एडीट केलंय बघा.

===

दीड मायबोलीकर | 19 January, 2016 - 09:54
(किमान) २५ वर्षांचा व्याजासहितचा हिशोब परवडेल का? हे आईबापाचं कर्ज पैशाने फेडताना स्वतःच (पैशाने) भिकारी व्हाल. त्यापुढे स्वतःच्या मुलाबाळांवर खर्च करायचा आहे, अन स्वतःचा संसारही. >> ओह येस! अगदी परवडतं. करुन बघा हिशोब. लहान गावातील चाळीत राहणारे, फी नसलेल्या शाळेत आणि २००० सालच्या आधीच्या फ्रि सीट कंसेप्टमधे कॉलेज झालेले...

करुन बघा हिशोब.
<<
Rofl

कुणीतरी या महोदयांना रुपये पैशांत हिशोब समजवा रे बाबानो!
जेवण-खाण-रहाणं-लेणं-आजारपणांचा सगळाच खर्च म्हणताहेत.

तसंच शी-शू काढणं सुद्धा. या कामासाठी लोक ठेवले तर त्याचे किती पैसे लावतील ते.
बरं. पै पै चा हिशेब बाजूला ठेवू.

मुलांना पदवीपर्यंतचं शिक्षण दिलं असेल तर वीस वर्षे पोसलं असं धरूया.
आईवडील अठ्ठावन्नाव्या वर्षी निवृत्त झाले तर त्यात पुढची वीस वर्षे धरून त्यांना अठ्ठ्याहत्ताराव्या वर्षापर्यंत पोसायलाच लागेल. .
व्याज धरायचं तर वीस वर्षांवर किती वर्षे वाढतील?

अ‍ॅमी तै ने कुठल्या हिशोबाने पैसे परत केले?
आमच्या समोर नोकरी करणारे एक दांपत्य राहते त्यांणी मुल सांभाळायला एक बाई ठेवली आहे ती तासावर पैसे घेत असते
मी पण हिशोब करायच्या विचारात आहे.कसा बर हिशोब करायचा.भावनेंचे वैगरे चार्जेस कसे लावायचे?

गरोदरपणात ९ महिने पोटात वाढवायचे चार्जेस वेगळे असतिल ना?

नाही,
"लहान गावात" "चाळीत" "सरकारी शाळेत" "सरकारी दवाखान्यात" "अन्नछत्रात" असा हिशोब आहे तो.
बापाच्या तोंडावर एक दीड लाख मारले की मोकळे होतील असं वाटतंय त्यांना.

सिंपल हिशोब करा.

पोस्टाच्या डेली कलेक्शनमधे १०० रुपये रोज, असे २५ वर्षं भरा, अन किती पैसे होतात ते पहा.

पोस्टाच्या डेली कलेक्शनमधे १०० रुपये रोज, असे २५ वर्षं भरा, अन किती पैसे होतात ते पहा.
>> सध्या ६०+ वय असलेल्यांपैकी किती जणांनी दिवसाला १०० रु मंजे महिन्याला ३००० रु एका मुलगा/गीवर खर्च केलेत? ie १९७० ते २००० मधे वाढलेली मुलं. त्यांच्यावर एवढा खर्च झालाय?

सकुरातै आणि भरतमामा, सरोगसीची, मिल्कमदरची आणि शी शू काढण्याची किंमत हायर करणार्यांकडून मागायची असते. त्या समोरच्या तासावर मुल सांभाळणार्या बाईने पगार कोणाकडून घेतलाय? दुसरा काही पोटापाण्याचा पर्याय उपलब्ध नसला की अशा गोष्टी कराव्या लागतात. आणि मग नंतर दुध का कर्ज वसुली करत बसायची.

धागा कुठल्या कुठे गेला नेहमीप्रमाणे, असो!
इथे' टीप टॉप आजी' मुलाखत लिहली होती, त्या आजी स्वेच्छेने खराडीच्या वृध्दाश्रमात राह्यला गेल्या. त्यांना भेटायला खराडीला गेले होते त्या खूप छान तिथे राहताहेत. त्यांनी त्यांची खोलीपण खूप सुंदर सजवली आहे. लेखन व सामाजिक कार्यात बिझी असतात. मी त्यांच्याबरोबर तिथेच जेवले मला जेवण आवडले पण बाकी म्हातार्यांच म्हणण की त्या दिवशी मालक आले होते ना .... मग बनवणारच चांगल ... तरी एकंदरीत कीरकीरे/तक्रारखोरच वाटले... गंमत म्हणजे तो समोरचा म्हातारा टक लावून पाहत असतो टाईप पण ....
दुसर उदाहरण म्हणजे माझी मुलगी माऊलीमध्ये आजी आजोबांशी बोलायला जायची ... सगळे समवयस्क, समदु:खी एकत्र असुनही बोलायला कुणी नाही ही तक्रार होतीच ... दिमा व लिंबुने सुचवलेले वृध्दाश्रमच तर अाहेत तिथेही हीच गत होण्याची शक्यता आहेच ना ...
तिसरं एक उदाहरण माझ्याच शेजारी राहणाऱ्या आजी तिन महिन्यापूर्वी वर गेल्या त्यांना मुलबाळ नव्हते पण पैसा होता .. तीन वर्ष अंथरुणावर होत्या ब्युरोच्या बायका सेवा करायच्या व अधुनमधून नातेवाईक भेटून जायचे ..
चौथ उदाहरण म्हणजे मध्यंतरी सज्जनगडावर तीनचार दिवस राहिले होते तिथेही एक बाई (हातात माळ पण अतिशय नकारात्मक वृत्तीच्या) सेवेखातर म्हणून राहतात पण मलातरी वृध्दाश्रमला पर्याय म्हणून राहतात असे वाटले ... तिथेच असे कळले की काही ज्येना गोंदवल्यात पण राहतात ... खखोदेजा ... आपल्या घरा शिवाय कुठेही स्वर्ग नाही...

वॄद्धाश्रमात राहण वाईट अस धरून का मंडळी लिहित आहेत. एकट्या माणसाची व त्याच्या आजूबाजूच्या समाजाची ती गरज असू शकते.

माझ्या पिढीमधे पाच सहा भावंड असायची. कुणीतरी घ्यायचे जबाबदारी आई वडिलांची. सोयीनुसार किंवा वाटून सुद्धा. आई वडिलच काय, काका, मामा, विधवा झालेल्या आत्या, यांचा संभाळ करताना मी अनेक कुटुंबांना पाहिलय.
आजकाल जवळपास सर्व सामाजिक स्तरांवर एक किंवा दोन मुल असतात. शिवाय पूर्वीपेक्षा मुलाम्चे स्थलांतरही वाढलेले आहे. आयुष्यमानही वाढलेले आहे. त्यामुळे वृद्धांच्या संगोपनाचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येत जाणार हे नक्की.

सोय म्हणून (वेळ, जागा, हवा, सुरक्षा या संदर्भात) वृद्धांना आश्रमात ठेवणे यास माझा स्वतःचा मुळीच आक्षेप नाही. मुलांच्या गळ्यात लोढणे बनून रहाण्यापेक्षा उलट मी स्वतः माझ्यावर वेळ आल्यास वृद्धाश्रमात रहाण्यास प्राधान्य देइन.

पण सूड म्हणून वा आम्हाला असे वागवले म्हणून किंवा ते असे वागतात म्हणून आपण त्यांना सुद्धा तसेच वागवण्याच्या वृत्तीस माझा विरोध आहे. याबाबत माझे स्पष्ट मत असे आहे की तुम्ही कस वागायच हे तुम्ही ठरवा. तुम्ही जेंव्हा चांगले वागता तेंव्हा तुम्ही चांगले असता. तुम्ही जेंव्हा वाईट वागता तेंव्हा तुम्ही वाईट असता. पिरीयेड. त्यात दुसरा कसा वागला त्याने फरक पडत नाही.

आमच्या इकडच्यांनी माझ्या आईवडिलांचे सर्व काही केले, अगदी मुलगी काय करील असे. तसेच त्यांच्या आईचेही केले. प्रश्न तो नाही. माझे आई वडिल किंवा त्यांची स्वतःची आई तिच्याशी कसेही वागले असते तरी त्यांनी तेच केले असते. हा मुद्दा आहे.

भरत मयेकर | 18 January, 2016 - 20:11
'अशाही' केसेस बद्दल नको. सामान्य परिस्थितीबद्दल बोला.

>> अरेच्च्या.. फक्त मुली असणारे हि खुप अपवादात्मक सिच्युएशन आहे का? Uhoh

बेफ़िकीर | 19 January, 2016 - 10:24
अहो सुनेवर विषय आला होता तेव्हाही 'कुठून कुठे चाललाय धागा' असेच काहींना वाटत होते.

हा विषय असा आहे की प्रत्येकजण येथे येऊन स्वतःची खासगी आयुष्यातील कटकट आणि त्याबाबत स्वतःची भूमिका मांडू शकतो आणि सरसकटीकरण करू शकतो.

>> तुम्हीच त्या दुसर्‍या धाग्यावर "सुन आली कि मुलगा बदलतो" अश्या आशयाचे एक वाक्य लिहिले आहे. "वृद्धांची काहीही तक्रार आली कि सून नालायक" या टाईपच्या सरसकटीकरणाचा आम्हालाही आता कंटाळा आणि संताप आलेला आहे.

पियू, तुला हे ऐकावाचायला नकोसे वाटत असेल तर पण हे १०० टक्के खरे आहे की बायका आल्यात की मुलगे बदलतात! बहुतेक मुले बदलतात. ह्याला कारण सुना कदाचित असतील पण तितकेच कारण मुलगे सुद्धा आहेत. लग्न झाल्यानंतर आईवडील आणि बायको ह्यांच्यामदे समन्वय साधायला त्याला जमायला पाहिजे. खरे तर सुन घरात आल्यानंतर सुनेसकट सर्वांनीच नवीन निर्माण झालेली नाती जपायला पाहिजे. नाहीतर एक आठ्वडा उलटत नाहीतर कानावर गप्पा ऐकायला येतात.

माहेरच्या लोकांनीही आपल्या मुलीला समजावून सांगायला ह्वे.

माझी बहिणीला कर्करोग होता. ती मागच्याच महिन्यात गेली. तिच्या मुलाचे लग्न करताना आम्ही एक गोष्ट निक्षून सांगत होतो की बघा होण्यार्‍या सासूला कर्करोग आहे. तिचे करायची वेळ येईल. हे जर कबुल असेल तर हे आपण मुलामुलीचे लग्न करु. हे सांगितल्यानंतर अनेकांनी आपली मुलगी दिली नाही. आम्ही आमची प्रोबॅबिलीटी वाढवली. २० स्थळ पाहिले. शेवटी एक मुलगी तयार झाली. तिने न चुकता माझ्या बहिणीचे सगळे केले. तिच्या आईवडीलांनीही तिला समजवून सांगितले होते की आधी सासूचे करायचे मग इतरांचे. ताई गेल्यानंतर तिचे अनेकांनी कौतुक केले की एक सुन म्हणून गिताने खूप काही केले. आता बहिण गेल्यानंतर ते घर आणि त्यावरचा हक्क तिचाच आहे.

>>>तुम्हीच त्या दुसर्‍या धाग्यावर "सुन आली कि मुलगा बदलतो" अश्या आशयाचे एक वाक्य लिहिले आहे. "वृद्धांची काहीही तक्रार आली कि सून नालायक" या टाईपच्या सरसकटीकरणाचा आम्हालाही आता कंटाळा आणि संताप आलेला आहे.<<<

हे मी कोणत्या धाग्यावर लिहिले आहे?

>>>पियू | 19 January, 2016 - 13:32<<<

पियू, तुम्हाला विचारत आहे की ते मी कोणत्या धाग्यावर लिहिले होते?

बी, पोस्ट आवडली.
त्या सुनेला पण आपण सासुचे केले याचे समाधान नक्किच असेल.
कुणासाठी आपण काहितरी चांगले करत असतो तेंव्हा त्याचा लाभ दोघांना ही मिळत असतो.

पियू, तुम्हाला विचारत आहे की ते मी कोणत्या धाग्यावर लिहिले होते?

>> ह्या धाग्याचा विषय ज्या धाग्यावरुन आला त्याची लींक देणार का कृपया बेफी?

>>>ह्या धाग्याचा विषय ज्या धाग्यावरुन आला त्याची लींक देणार का कृपया बेफी?<<<

आँ? म्हणजे लिंक मीच द्यायची? का बरे?

सकुरा, खूप समाधान आहे तिला त्याचे. मी तिच्याशी बोलताना ती म्हणाली की आईंनी एकाही शब्दानी कधी सुनेचा हक्क गाजवला नाही. एकाही शब्दाने कधी कमी लेखले नाही. कधी उपदेशपर बोलाली नाही. माझ्या बहिणीला आपण जाणार हे माहिती होते म्हणून ती खरे तर मागिल कित्येक वर्षांपासून कधी कुणाशी भांडली नाही, वाईट बोलली नाही, मीपणा दाखवला नाही. तिची एकच ईच्छा होती जाता जाता एक मुलगी आणि दोन मुलांचे नीट करुन जायचे. त्यांना निराधार ठेवून जायचे नाही. तसेच झाले. बहिणीला नातवंड बघायची ईच्छा होती तीही पुर्ण झाली.

Pages