वृद्धाश्रम, वृद्धाश्रमात पाठवलेले गेलेले वॄद्ध, अतिवृद्ध, त्यामागची कारणे इत्यादी

Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34

अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.

अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.

आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियु ग्ग पियु तू लिहिलस ते आजही जवळ जवळ सत्यच आहे. अजूनही किती तरी वर्ष झाली तरी सुनेला ऐकावं लागतं तु बाहेरुन आलीस, किंवा सून आणि मुलाने एकत्र विकत घेतलेल्या घरात सुनेच्या आईवडिलांना चोरासारखं वावरावं लागतं आणि मुलाचे आईवडिल मात्र आमच्या मुलाचं घर आहे हा रोब सुनेवरही झाडत असतात. आणि ज्या सूनेला असं वागवलं जातं त्याच सूनेकडून अपेक्षा केली जाते की तिने सासू सासर्‍यांची जेवायला वाढण्यापासून सर्व कामे करुन सेवा करावी. आणि अनेक सूना करतातही.

इथे आज अनेक जण त्या सुनांबद्दल बोलताय की त्यांनी सासू सासर्‍यांचा छळ मांडलाय, त्यांच्या बाबतीत असे असू शकते ना की त्यांनी त्यांच्या आईला, मोठ्या बहिणीला किंवा अशाच कोणाला तरी सहन करताना पाहिले आहे आणि म्हणून त्या आज अशा वागत आहेत. एकाच्या चुकीची शिक्षा दुसर्‍याला होते खरी, पण ......

बरे असे करुया का एक स्टॅटिस्टिकल रेशो काढूया किती सुनांनी सासू सासर्‍यांचा छळ मांडलाय ह्याचा किती सासूसासर्‍यांनी सुनेचा छळ मांडलाय ह्याच्याशी. मग बघू उत्तर पूर्णांकात येतय की अपूर्णा़ंकात आणि जर अपूर्णांकात आलं तर तो अपूर्णांक पूर्णांकाच्या किती जवळ जातोय?

डेटा ह्यातून निवडून - आज ९० वर्षाची असलेली सासू ते नुकतीच लग्न झालेली सून ह्यात बसणारे पूर्ण पॉप्युलेशन

ह्यात अजून एक रेशो मांडूया - नवर्‍याने केलेला बायकोचा छळ आणि बायकोने केलेला नवर्‍याचा छळ. असो, हा या बाफचा विषय नाही.

पण ह्यातूनच होतात लहान मुलांवर संस्कार .

एखाद्या मुलाने आपल्या वडिलांना आईचा छळ करताना पाहिलय. आई लवकर गेली आणि त्यानंतर मुलाने वडिलांना सांभाळायला नकार दिला. खरच चुकलं का मुलाचं १०० टक्के?

एखाद्या सासूने सुनेचा खूप छळ केला असेल आणि मग तिची सून येते आणि म्हणते तुझी आजी आता बेडरिडन आहे ना मी तिला सांभाळणार नाही तिला वॄद्धाश्रमात टाक, खरेच चुकले का त्या सूनेचे, १०० टक्के?

एखादी आई कडक शिस्तीच्या पलिकडची. तिने मुलीला सतत टॉर्चर केलेलं आहे काही ना काही कारणाने. आणि मुलीच्या लग्नानंतर ती मुलीची बदनामीच करते आहे. अशा वेळी जर मुलीने आईला तू माझ्या घरात राहू नको म्हटलं तर चुकलं का त्या मुलीचं?

एखादे आई वडिल येता जाता आम्ही तुझ्याहून मोठे आहोत, तुला आम्ही जन्म दिलाय तुझ्यावर पैसा खर्च केलाय तुला आमच्याच म्हणण्याप्रमाणे वागावे लागेल, तुझ्या बायकोला आमची सेवा करावीच लागेल, आम्ही जे काही बोलु ते खाल मानेने ऐकावेच लागेल असा अ‍ॅटीट्युड ठेवुन असतात अशा वेळीजर मुलाने आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले तर खरच चुकले का त्याचे?

लहान घर आहे. मुलांचा अभ्यास होत नाही कारण वॄद्ध आई वडिलांनी बोलावलेल्या पाहुण्यांना सीमा नाही, त्यांच्या बोलण्याला टोमण्यांना धरबंध नाही, अशा वेळी जर आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले तर काय चुकले मुलांचे.

आई मुलाला कोंडून ठेवायची म्हणून मुलगा आईला कोंडून ठेवू लागला हे उदाहरण वर आलेच. ह्याच्या मागे कदाचित अजूनही कारणे असतील त्या दोघांमदली की जी आपल्याला माहित नाहीत.

टोमणे मारणारे आई वडिल कुजकेपणे वागणारे आई वडिल काय काय बोलतात कसे कसे वागतात ह्याची एक लिस्टच करुया आपण म्हणजे कमीतकमी सूना सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमात टाकायला जबाबदार असतात ह्या एका विधानाचा सामाजिक स्प्रेड समजेल.

असो

पण हे नक्की की आईवडिल कसेही वागले तरी मुलांनी हे लक्षात ठेवावे की त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे मोठे केले आहे. त्यांना मानसिक आणि आर्थिक रित्या जेवढे जमले तेवढे शिक्षण दिले आहे. तेव्हा मुलांनी एक वेळ आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवा पण त्यांची आर्थिक जबाबदारी टाळू नका.

कमीतकमी हे पाहा की तुमची मुले तुमचे वागणे पाहात आहेत आणि उद्या तुमच्या ह्याच वागण्याला त्यांनी आदर्श मानून हेच वागणे तुमच्या सोबत केले तर ह्या भीतीने तरी आईवडिलांना बेवारस मरायला सोडू नका.

पण समजा एखाद्या मुलाला (अथवा मुलीला) बायकोला टाकून एखादा माणूस दुसरीबरोबर निघून गेला आणि मग मरणासन्न दारिद्याच्या अवस्थेत तो मुलाकडे परत आला तर त्या मुलाने काय करावे त्याला माफ करुन त्याची काळजी घ्यावी की त्याच्याकडे पाठ फिरवावी. मुलाकडे स्वतःकडेच पुरेसा पैसा नसेल तर त्याने त्या बापाचा वृद्धावस्थेतला खर्च उचलावा का... (मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मुलगा आपल्या संस्कारांनी देईल आणि बापाला आपल्या कर्माने मिळेल. आणि समजा मुलाने त्या बापाला न सांभाळण्याचा निर्णय घेतला तर त्याला मी तरी संस्कारशून्य म्हणणार नाही)

मुलाकडे स्वतःकडेच पुरेसा पैसा नसेल तर त्याने त्या बापाचा वृद्धावस्थेतला खर्च उचलावा का...
<<
कायद्याने बांधील आहे.

फक्त मुलगाच नाही तर वारसदार. ..वेल , तुमच्या आताच्या प्रतिसादातून व्रुद्धाश्रमात 'टाकणे' ( ठेवणे नव्हे) म्हणजे तुरुंगात टाकणे वाटू लागलेय.

दीमा - मान्यय. पण तरी कायदा नको आणूया हो मध्ये. तसं तर बाप सुद्धा कायद्याने बांधील होता ना मुलाचा सांभाळ करायला. ...

हा धागा सून ह्या विषयावर वळून तिथेच स्थिरावलेला दिसतोय. Proud

खालीलपैकी अनुभवही काही काहीजणांना येतात असे ऐकले आहे. (माझ्या ऐकिवात तरी आहेत.)

१. वृद्ध खूप ढवळाढवळ करतात, करवादत असतात, मुद्दाम त्रासदायक वागतात.
२. आई वडिलांशी मुलगा फटकून वागतो पण सून मनापासून करते.
३. नवरा आपल्या आई वडिलांबरोबरच आपल्या सासू सासर्‍यांचेही खूप काही करतो. (ह्यात एक मीही आहे Proud )
४. वृद्धाश्रमांची अवस्था बहुतेकदा निराशाजनक असते.

वगैरे!

एक जपानी सिनेमा होता. जपानमधल्या एका प्रथेवर. वृद्ध आईवडीलांचा कडेलोट करायचा. कारण वृद्धांना सांभाळणे राजाच्या पॉलिसीत बसत नव्हतं. काही प्रतिसाद वाचून त्या सिनेम्याची आठवण झाली.

सून, जावई, सासू , नको, स्त्रीवाद, स्त्री - पुरूष भेदभाव या वादात वृद्धांच्या नशिबी हेळसांड नको. अर्थात काही प्रथा तरूणपणी मोडल्या नाहीत त्यांचा त्रास भोगावा लागतो हा ही न्याय म्हणून मान्य केला पाहीजे. त्यातही मुलीच्या आईवडीलांबाबत डिसक्रीमिनेशन आहे हे आणखी सौंदर्य आपल्या समाजाचे...!

खर्च उचलण्याइतकाच प्रश्न असेल, तर कायद्याने बांधील आहे, असे म्हटले.

बाप बांधील होता, तर त्याने शिक्षण पूर्ण होईपर्यंततरी खाऊ-राहू-लेऊ घातलंय ना? की तेव्हा पळून गेला होता, अन आता मुलाची पाळी आहे म्हणून वाटा मागतोय?

मनोमनी जवळीक आहे की नाही, या सोशल प्रॉब्लेमला मजकडे उत्तर नाही. ते व्यक्तींपरत्वे बदलत राहते.

मनोमनी जवळीक आहे की नाही, या सोशल प्रॉब्लेमला मजकडे उत्तर नाही >> अगदी दीडमा.

आपल्या अनुभवांना जनरलाईज्ड नको करायला.

मुलाची काळजी घेतली असेल, त्याचे पालन पोषण केले असेल तर ठीक, नसेल तर? मी फक्त एक मुद्दा मांडला की अशाही केसेस असू शकतात. तेव्हा काय. मनोमनी जवळीक हा वेगळाच मुद्दा आहे हे मला मान्य आहे.

मला एवढेच म्हणायचे आहे की आई वडिलांचे मुलांशी, सुनेशी, नातवंडांशी वागणे हेही खुप महत्त्वाचे आहे आणि त्यावरच अनेक इक्वेशन्स ठरतात. प्रत्येक नात्याचे एकमेकांबरोबरचे वागणे समाजात वेगवेगळे प्रतिबिंबे पाडून जात असते.

अजून एक पिढीला हा त्रास सहन करावाच लागेल. त्या नंतर अपोआप म्हातारे एकटे राहू लागतील. त्याचकडे वाटचाल चालू आहे आणि त्यात चूक आहे असे मला वाटत नाही. मुळातच आताशा लागणे उशिरा होतात मग मुले उशिरा होणार आणि मग मुलांकडे बघायचे का वृधांकडे बघायचे असा प्रश्न तयार होतो. त्यापेक्षा म्हटले तसे पूर्वी लवकर माणसे जात होती तेच बरे होते. औषधांनी माणूस जगतो पण त्याचा काय उपयोग असा प्रश्न पडतो.

सतत प्रत्येक वेळेला मुलगा सून बघत नाही. सुना आल्या की मुलगा बदलतो असेच दोषारोप होत राहतात तेव्हा विचार करावा अशी समस्या फक्त मुलांना जन्म देऊन कृतकृत्य झालेल्या आईबापांची आहे. मुली असलेल्या किंवा मुलेच नसलेल्या आईबापांच्यासंदर्भाने नाहीच कारण त्यांनी वार्‍यावरच जायचे हे महान संस्कृतीने सांगूनच ठेवलेय हे दिसायला लागते.

मग हा कळवळा खोटा होतो.

'अशाही' केसेस बद्दल नको. सामान्य परिस्थितीबद्दल बोला. लहानपणी बाबा मला , "अमुक केलंस, तमुक केलं नाहीस, तर बोर्डिंगात ठेवेन "अशी भीती दाखवायचे ते आठवलं.

बोर्डिंगची भीती विरुद्ध वृद्धाश्रमाची भीती, ह्याबाबतः

लहान मुलांना समजच नसते. चांगले वाईट शिकवावे लागते. ती हट्ट करताना प्रचंड गोंधळ घालू शकतात. त्यांच्यापुढे आयुष्य असते आणि त्यांचे करिअर चांगले व्हावे ह्यासाठी पालकांनाही खूप परिश्रम घ्यावे लागतात.

वृद्धांना चांगले वाईट समजते. एखादी गोष्ट हवीच असेल तर ती कशी मागायची ह्याची समज असते. पुढील आयुष्यात विशेष काही सिद्ध करायचे नसते आणि शक्य तितके सुसह्य जीवन जगायचे असते. ह्या सुसह्य जगण्यात 'रुग्णसेवा' हा भाग आणि काही तत्सम भाग सोडले तर त्यांच्या पुढच्या पिढीला खूप काही (त्यांच्या मुलांवर घ्यावे लागतात इतके) परिश्रम घ्यावे लागत नसतात.

त्यामुळे बोर्डिंग विरुद्ध वृद्धाश्रम ह्या धमक्या एकाच पातळीवर मापल्या जाऊ नयेत असे वाटते.

ह्म्म, मयेकरजी.

बेफी - वृद्धांना समजते हे वाक्य मला अज्जिब्बात पटत नाही. त्यांना समजत असते तर हे प्रश्न आलेच नसते.

मयेकरजी म्हणतात तशीच भीती आपण आपल्या आधीच्या किंवा त्याच्या आधीच्या पिढीला घालायला काहीच हरकत नाही. जास्त हट्ट देऊ नका नाही तर वृद्धाश्रमात ठेवू.

आणि हो मी स्वतः बोलते हे असं. माझ्या ज्या मैत्रिणी इथे वाचत आहेत त्यांना माहित आहे मी असं का बोलते आणि त्यांना ते पटतं देखील. पण हो सुनेने सासूला किंवा आजेसासूला असं सांगणं हे सूनेच्या नवर्‍याला पटलं पाहिजे.

पण मी हे असं माझ्या प्रचंड हट्टी आजीलाही सांगायचे. तिचे हात वृद्धापकाळाने थरथरायचे. तिला सांगितलं गॅसकडे जाऊ नकोस तरी प्यायला पाणी गरम हवं, आत्ताच चहा हवा, स्वतःच्याच हातचा हवा, माझं मीच करुन घेणार अशा हट्टाने वागायची. तरी बरं घरात तिला हे काम करुन देणारी तीन माणसं असायची. आधी प्रेमाने सांगून पाहिलं नाही ऐकलं तेव्हा धमकी द्यायला सुरुवात केली. आणि इट वर्क्ड.

..

वृद्धांना चांगले वाईट समजते. एखादी गोष्ट हवीच असेल तर ती कशी मागायची ह्याची समज असते.
<<
म्हातारपण हे दुसरे बालपण असते.

कापोचे, नारायमा असा काहितरी नावाचा चित्रपट होता का ? त्या वृद्धांना त्यांची मुलेच एका डोंगरावर सोडून येतात असे काहिसे होते.

मानुषींनी जी परवा मुलाखत दिली होती त्यात पण आपल्याकडे देवाच्या दारी सोडलेल्या माणसाची उदाहरणे होती.

दीड मायबोलीकर | 18 January, 2016 - 19:43
मुलाकडे स्वतःकडेच पुरेसा पैसा नसेल तर त्याने त्या बापाचा वृद्धावस्थेतला खर्च उचलावा का...
<<
कायद्याने बांधील आहे.

भरत मयेकर | 18 January, 2016 - 19:49
फक्त मुलगाच नाही तर वारसदार...

>> वारसदाराला जर प्रॉपर्टी मिळणार असेल तर तो खर्च उचलण्यास बांधील आहे. आणि (मला वाटतं चुभुद्याघ्या) मुलगा/गी प्रॉपर्टी मिळणार नसेल किंवा प्रॉपर्टीच नसेल तरीही खर्च उचलण्यास बांधील आहेत.
म्हणूनच मी लिहलं की "जेवढा खर्च आपल्यावर केलाय तेवढा सव्याज पालकांना परत करा अन् नंतर सरळसरळ हात वर करा." मुलं ही इंफ्लेशनला बीट करणारी इंवेस्टमेंट मानणारा हा दुसरा कायदा गाढव आहे...

जेवढा खर्च आपल्यावर केलाय तेवढा सव्याज पालकांना परत करा अन् नंतर सरळसरळ हात वर करा. >>> ग्रेट ! आय होप की मुद्दाम उकसवण्यासाठी हे प्रतिसाद दिले जात नाहीयेत.

नाती पैशांत तोलायची झाल्यास एकाच पार्टीने व्यवहारी आणि एकाने भावनिक होऊन चालणार नाही. पैशाचाच प्रश्न असेल तर पालकांनीही आधीच बाळाची पाळण्यातली पावलं ओळखून अशा मुलांच्या आजारपणात आपला वेळ इन्व्हेस्ट करायला नकोय. कारण या वेळेची परतफेड होणार नाहीये.

दोन्ही पार्ट्यांनी चोख राहीलं म्हणजे ती भावनिक गुंतवणूक वगैरे लफडी राहणार नाहीत.

आय होप की मुद्दाम उकसवण्यासाठी हे प्रतिसाद दिले जात नाहीयेत. >> कोणाला उकसवायच? तुम्हाला? का बरं? तुम्हाला उकसवून मला काय मिळणारय?

नाती पैशांत तोलायची झाल्यास एकाच पार्टीने व्यवहारी आणि एकाने भावनिक होऊन चालणार नाही. पैशाचाच प्रश्न असेल तर पालकांनीही आधीच बाळाची पाळण्यातली पावलं ओळखून अशा मुलांच्या आजारपणात आपला वेळ इन्व्हेस्ट करायला नकोय. कारण या वेळेची परतफेड होणार नाहीये. दोन्ही पार्ट्यांनी चोख राहीलं म्हणजे ती भावनिक गुंतवणूक वगैरे लफडी राहणार नाहीत.
>> पैशांची किंमत पैशांनीच, वेळेची किंमत वेळेनी आणि भावनांची किंमत भावनांनीच चुकती करावी. पालकांनी मुलांच्या सर्दीपडशांच्या आजारावर पैसे, वेळ खर्च केला, काळजी घेतली म्हणून मुलांनी पालकांच्या हार्ट सर्जरीवर खर्च करावा, बेडरिडन झाल्यावर सेवा करत रहावी असे नाही.
===
कापोचेआजोबांना कोलांटउड्याचा भास होऊ लागल्याने एडिट

भरत मयेकर | 18 January, 2016 - 10:51
आज निवृत्त झालेली विशिष्ट वर्गातली मंडळीतरी आर्थिकदृष्ट्या बहुतांशी पुढच्या पिढीवर अवलंबून नसते. उलट पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र घर घेऊन ठेवल्याची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत.
त्यामुळे हा मुद्दा फक्त आर्थिकच आहे असं नाही.
फक्त आर्थिक मुद्दा घेतला, तर कायदा काय म्हणतो ते पहा.
>>बादवे पुण्यामुंबईतले आधीपासूनच वेलटूडू पालक मुलांचं उच्च शिक्षण, परदेशात शिक्षण, घर घेण्यास मदत, लग्न करुन देणे इ इ करतात. म्हणून चाळीत दोन खोल्यात वाढलेले, स्कॉलरशिप/आरक्षणातून शिकलेले, दारु पिऊन मारहाण करणारा बाप आणि नवर्याचा राग मुलांवर काढणारी आई अशा वातावरणात वाढलेल्या मुलांनीदेखील आईवडिलांची काळजी घ्यावी असे म्हणणे आहे का?

म्हणून चाळीत दोन खोल्यात वाढलेले, स्कॉलरशिप/आरक्षणातून शिकलेले, दारु पिऊन मारहाण करणारा बाप आणि नवर्याचा राग मुलांवर काढणारी आई अशा वातावरणात वाढलेल्या मुलांनीदेखील आईवडिलांची काळजी घ्यावी असे म्हणणे आहे का? >>> अशा अनुभवांना जनरलाईज्ड केलं जाऊ नये असं आधीच्या एका प्रतिसादात म्हटलेलं आहे. तिस-या पानावरच्या चौथ्या प्रतिसादात तुम्ही आता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतेय का पहा बरं..

तरी देखील.......तुम्हाला या अनुभवातून जावे लागलेले आहे का ? सिरीयसली विचारतो.

पैशांची किंमत पैशांनीच, वेळेची किंमत वेळेनी आणि भावनांची किंमत भावनांनीच चुकती करावी. >>> तुमच्या आधीच्या प्रतिसादात हे रिफ्लेक्ट होतंय का कुठे ? असेल तर माझी काही तरी चूक होत असावी.

अॅमी | 17 January, 2016 - 21:53
इथे पैशाच्या दृष्टीकोनातून कोणीच विचार मांडलेला दिसत नाहीय.

आईवडलांनी मुलगा/गी वर जेवढे पैसे जन्मापासून खर्च केले असतील (अगदी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचार, इतर सगळं सगळं पकडा) तेवढे आणि फक्त तेवढेच पैसे व्याजासहीत मुलांनी पालकांना परत करावेत किंवा त्यांच्यावर खर्च करावेत. त्यापेक्षा जास्त खर्च करायचा की नाही हे त्या त्या मुलांनी ठरवावे. पालक मुलांशी चांगले वागले/वागत असतील तर मुलं खर्च करतीलही. किंवा करणार नाहीत. त्यांची निवड.

नाहीतर मग मुलांनी वृद्धांना जमतील अशी कामं त्यांच्याकडून करुन घ्यावीत आणि त्याचा मोबदला द्यावा किंवा त्यांचा जेऊनराहुन वगैरे खर्च उचलावा.

जर हे करायला पालक तयार नसतील तर मुलांनी सरळसरळ हात वर करावेत. मुलं म्हणजे इंफ्लेशनला बीट करणारी इंवेस्टमेंट नव्हे

स्कॉलरशिप/आरक्षणातून शिकलेले >>> याचा देखील इथे काय संबंध आहे ? हा वेगळा इश्यू आहे ना ? जर त्या पालकांना सामाजिक परिस्थितीला तोंड द्यावे लागल्याने , एक्स्पोजर न मिळाल्याने असे जीवन जगायला भाग पडले असेल तर त्यांनीही तुम्ही सुचवताय त्या न्यायाने संघटीत होऊन इतरांना त्यांना जगावं लागलेलं जिणं जगायला भाग पाडल पाहीजे का ? हरकत नसावी तुमची त्याला.

माझे काका वृद्धाश्रमात राहतात. अविवाहित. नाईलाजाने. मी भारतात गेले तर नेहमी ते भेटायला येतात पण पहिल्यांदाच यावेळेला डिसेंबरमध्ये मी पालशेतच्या वृद्धाश्रमात जाऊन त्यांना भेटले. मी पाहिलेला पहिलाच वृद्धाश्रम. खूप आवडला. निसर्गाच्या सानिध्यात आहे. कर्मचारी वर्गही हसतमुख वाटला. तिथल्या वृद्धांशीही बोलले. काही स्वखुषीने तिथे आलेले तर बरीचशी अविवाहित असल्याने तिथे राहतात. असं वाटलं, की प्रत्येकाला खूप बोलायचं होतं. काही आनंदी वाटल्या. प्रत्येकीला मी त्यांचे खूप फोटो काढावे अशी इच्छा होती. (काढले खूप फोटो). काहींच्या खूप तक्रारी होत्या. खाणं नीट नाही, पैसे खूप जास्त लावतात इत्यादी तर काही ना सुनेच्या राज्यात राहायची इच्छा नसल्याने स्वखुषीने इथे येऊन राहिल्या आहेत पण इथल्या तक्रारीचा पाढा वाचत होत्या. वृद्ध पुरुष फारसे नव्हते. होते ते कामात व्यग्र होते. बायकाही. पण त्यांना कामं करता करता बोलायला जमत होतं :-).

हा वृद्धाश्रम कितीही आवडला तरी माझ्यावर वेळ आली तर खोली भाड्याने घेऊन स्वतंत्र राहणं पसंत करेन असं वाटतंय आत्तातरी. प्रत्यक्षात तशी वेळ खरंच आली तर काय करेन हा वेगळा भाग Happy

kapoche त्या जापनीज सिनेमाचं नाव ठाऊक आहे का? दुष्काळामुळे राजा वृद्धांना मारुन टाकण्याचा आदेश देतो असा काहीतरी आहे. मला पाहायचा आहे पण नाव आठवत नाही. सापडलं नाव - Ballad of Narayama.

अ‍ॅमी

तुम्ही काय प्रतिसाद देत आहात या धाग्यावर हे समजून घेण्यासाठी विचारतोय. तुमच्या वर कॉपी पेस्ट केलेल्या प्रतिसादात आताचा अजेण्डा कुठे आहे ? पुन्हा एकदा कॉपी पेस्ट करतो.

बादवे पुण्यामुंबईतले आधीपासूनच वेलटूडू पालक मुलांचं उच्च शिक्षण, परदेशात शिक्षण, घर घेण्यास मदत, लग्न करुन देणे इ इ करतात. म्हणून चाळीत दोन खोल्यात वाढलेले, स्कॉलरशिप/आरक्षणातून शिकलेले, दारु पिऊन मारहाण करणारा बाप आणि नवर्याचा राग मुलांवर काढणारी आई अशा वातावरणात वाढलेल्या मुलांनीदेखील आईवडिलांची काळजी घ्यावी असे म्हणणे आहे का? >>>

म्हणून च्या आधीचा भाग तुम्हाला मान्य असेल तर पैशाबद्दल जी पोस्ट लिहीलेली आहे ती कशासाठी लिहीलीय.
म्हणून च्या नंतरचा जो भाग आहे त्याची पहिल्या भागाशी तुलना कशासाठी ? तुम्हाला या परिस्थितीतून जावे लागलेले आहे का ?

वृद्धाश्रमातून सर्व्हे घ्या, या परिस्थितीतून गेलेल्या किती मुलांनी आपल्या पालकांनी वृद्धाश्रमात ठेवलेले आहे ? टक्केवारी मांडा. तुम्ही म्हणता तशीच परिस्थिती १०० टक्के घरातून असते का ? असेल तर मग यांचे पालक वृद्धाश्रमातून दिसण्याचे प्रमाण दुर्मिळ का याचे उत्तर तुमच्याकडे आहे का ?

रिक्षावाले, हातावर पोट असणारे, गवंडी, रंगारी इ. इ. किती लोक आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवतात ?

चूक की बरोबर हा प्रश्न निराळा. ज्या प्रश्नांची माहीती नाही त्यावर आपले बोट बेछूट चालवावे का ? माहीती असेल तर मग सरमिसळ न करता एकेक मुद्दा हाती घ्यावा. कोलांट उड्या थांबवा आता.

मोहना Happy

लहान असताना टीव्हीवर पाहिला होता. जागतिक सिनेमा साठी रात्रीची वेळ राखून ठेवण्यात आलेली होती तेव्हां दूरदर्शनवर.

Pages