Submitted by वेल on 15 January, 2016 - 08:34
अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात. किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात.
मुलांची, वृद्ध पालकांची विचारसरणी, दोघांचे प्रॉब्लेम्स, बिहेवोरियल प्रॉब्लेम्स.
कुठे कुठे वृद्धाश्रम आहेत, ते कसे आहेत. त्यांचे चार्जेस काय आहेत.
वृद्धाश्रमात वृद्धांना कशी वागणूक मिळते. वृद्धांना घरी कशी वागणूक मिळते, ती का मिळते. वृद्ध जसे वागतात तए का वागतात.
अशा अनेक प्रश्नांवर इथे चर्चा करुया.
आज आपण सुपात असलो तरी कधी न कधी जात्यात जाणार आहोतच, म्हणजे वृद्ध होणारच आहोत. सो त्याआधी जरा मानसिक तयारी करु
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनघा.. हिशेब कोण करतंय
अनघा.. हिशेब कोण करतंय नक्की?
अग, वरची तीन चार पाने आपल्या
अग, वरची तीन चार पाने आपल्या आईवडिलांना संगोपनाचे पैसे द्यावेत अश्या ब-याच लोकांच्या पोस्टी आहेत ना, अन मग ते देणे किती अवघड आहे अश्याही पोस्टी ते वाचून कसेसेच झाले मला.
दीमा, म्हणून तर सांगतेय ना,
दीमा, म्हणून तर सांगतेय ना, मोजा आकडे. करा गणितं. दाखवा हिशोब. बघू या तर काय उत्तर येईल.
अनघा, प्लीज नीट वाचत जा. एकाच
अनघा, प्लीज नीट वाचत जा.
एकाच आयडीने संगोपनाचे पैसे द्यावेत असं लिहिलंय आणि इथे सगळे लोक ते कसे चूक आहे हेच सांगायचा प्रयत्न करतायत.
अनघा, अगदी हेच माझ्याही मनात
अनघा, अगदी हेच माझ्याही मनात आलं . नि, हा हिशोब मांडून काय साधणार आहे ?
डिंपल खूप सुंदर लिहिले आहेस.
डिंपल खूप सुंदर लिहिले आहेस. खास करुन हे खालचे वाक्यः
आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही दोघं हे चांगलच जाणून आहोत की ,वृध्दावस्था म्हणजे दुसरे बालपणच. त्यामुळे जरी ते चुकले तरी लगेच वृध्दाक्श्रमात पाठवणार नाही हे नक्की.
दीमा, म्हणून तर सांगतेय ना,
दीमा, म्हणून तर सांगतेय ना, मोजा आकडे. करा गणितं. दाखवा हिशोब. बघू या तर काय उत्तर येईल.
<<
कैपण तुमचं!
अहो, गणित येत असतं तर इंजिनेर होऊन आम्रविकेत नस्तो गेलो? डाक्टर कशाला झालो असतो?
अपार्टमेंट शेअर करुन राहता
अपार्टमेंट शेअर करुन राहता तेव्हा कसे खर्च शेअर किंवा TTMM करता तसं करायचं.
आई वडिल आणि तीन मुलं राहात असतील असे घर समजा.
घरभाडे ३०० रु महिना
ie दरडोइ ६० रु
पुर्वीच्या काळी वाणसामान एकत्रच भरायचे त्याचं बील लक्षात असेल बर्याचजणांच्या. तेवढाच खर्च भाजीपाला दुध साबण इ चा पकडा.
३००० किराणा + ३००० इतर.
मंजे ६००० वर्षाचे. ५०० महिन्याचे.
ie दरडोइ १०० रु
आजारपण इतर अजून छूटपुट खर्च दरडोइ ५० रु प्रतिमहिना पकडा.
१ली ते १०वी शिक्षणाचा खर्च १०० रु प्रतिमहिना पकडा.
आता ० ते १ वर्ष वयात एका व्यक्तीचा मासिक खर्च झाला २१० रु.
वार्षिक खर्च २५००.
हे पैसे ११% चक्रव्याढने २५ वर्ष गुंतवले तर A मिळतील.
पुढच्या वर्षीचा खर्च २४ वर्ष गुंतवला.
त्याच्यापुढच्या वर्षीचा २३ वर्ष.
अँड सो ऑन शाळेत जाईपर्यंत.
मग ६ ते १५ वर्ष मासिक खर्च ३१० रु.
वार्षिक खर्च ३७५०
हे पैसे ११% चक्रव्याढने १९ वर्ष गुंतवले तर G मिळतील.
पुढच्या वर्षीचा खर्च १८ वर्ष गुंतवला.
त्याच्यापुढच्या वर्षीचा १७ वर्ष.
अँड सो ऑन कॉलेजात जाईपर्यंत.
आतामधेच ते कुटुंब ३०० रु भाड्याच्या घरातून १००० रु भाड्याच्या घरात गेले तर तो कांपोनंट बदलेल.
वाणसामानाच खर्च १०० ऐवजी २०० होइल ४०० होइल.
शाळेतून कॉलेजात गेले की फी ट्युशन गाड्या पेट्रोल कँटीन कपडे खर्च वाढेल.
नोकरी मिळाल्यावर आपापला खर्च उचलायला चालू केला की हे TTMM थांबलं.
पाठ्यपुस्तकातली "दिनुचे बिल"
पाठ्यपुस्तकातली "दिनुचे बिल" आठवली हे वाचुन ..
१ली ते १०वी शिक्षणाचा खर्च
१ली ते १०वी शिक्षणाचा खर्च १०० रु प्रतिमहिना पकडा.>>> कुठल्या जमान्यामधला हा खर्च आहे??? प्रत्येक वर्षाचा खर्च बाराशे रूपये??
युनिफॉर्म, बूट मोजे, दप्तरं, वह्या पुस्तकं स्टेशनरी, क्राफ्ट, डान्स गाणी गणित स्पोकन इंग्लिशचे क्लासेस, लायब्ररी, शाळेत न्यायच्या आणायच्या रिक्षेचा खर्च, मधल्या वेळेत आई दोन दोन डबे गरम घेऊन यायची तो (डबा+येण्याजाण्याचा खर्च), शैक्षणिक सहलींचा खर्च, आणलेली पुस्तकं (अभ्यासाव्यतिरीक्त) या सर्वांचा प्रत्येक वर्षाचा खर्च बाराशेच रूपये??
मा.सौ.विद्याताई बालन
मा.सौ.विद्याताई बालन ह्यांच्या स्टाईल ने म्हणा बघू सगळे...
" काथ्याकूट, काथ्याकूट, काथ्याकूट !"
नंदिनी, तुम्ही अॅमी यांच्या
नंदिनी, तुम्ही अॅमी यांच्या पोस्ट्स सुरुवातीपासून वाचल्या नाहीत किंवा वाचलेल्या विसरलात.
१९७० ते १९९० या काळात (प्रि-एल्पीजी Lberalisation, Privatisation, Globalisation) जन्मलेल्या मुलांवर त्यांच्या पालकांनी केलेला खर्च मांडताहेत त्या केव्हापासून.
हिशेब पुर्ण झाला की- तितके
हिशेब पुर्ण झाला की- तितके पैसे- आई-बाबा नां द्या आणि तितकेच सव्याज - मुलांन कडे मागा. केंव्हा द्यायचे ते टप्पे ठरवुन द्या. ते काटेकोर पणे पाळा. नाही दिले तर सावकारी व्याज लावा.
फ़िट्टमफ़ाट
१९७१ ते ३१ मार्च २०१० या
१९७१ ते ३१ मार्च २०१० या काळातले एका वर्षाच्या एफ्डीजचे रेट्स उपलब्ध आहेत. ते वापरून काढलेली आकडेवारी.
३१ मार्च ७० रोजी १००० रुपये गुंतवले असते तर ३१ मार्च ९० रोजी ६,१८९.०७ परत मिळाले असते.
३१ मार्च ८० : १००० चे ७,७०९.३५ झाले असते.
३१ मार्च ९० : १००० चे ५,६५६.७२ झाले असते. (स्पष्टीकरण पुढे आहे)
हे झालं दरवर्षी फोडायच्या एकेका एफ्डीसारखं
तेच एकरकमी किती परतफेड करायची ते पाहू.
आता हेच ३१ मार्च १९७० पासून महागाई आणि वाढत्या वयानुसार वाढता खर्च धरून दर वर्षी फक्त ५ टक्के अधिक रक्कम गुंतवली म्हणजे ३१.०३.१९७० : १००० ; ३१.०३.१९७१ : १०५० .....३१.०३.१९९० : २५२६.९५ एकूण ३३,०६५.९५
तर त्या त्या वेळच्या व्याजाने २० वर्षांनी ते ९०,२६६.८३ होतात.ज्यावर त्या वर्षीच्या दराने ९०२६.६८ व्याज मिळालं असतं. (म्हणजे सुरुवात केली त्याच्या नऊ पट रक्कम फक्त व्याजाच्या रूपात )
३१.०३.१९८० पासून सुरुवात करून २० वर्षांनी ९८,१९१.३२ होतात.
३१.०३.१९९० पासून सूरुवात करून २० वर्षांनी ७४,१९२.६० होतात. (२००२ पासून २००६ पर्यंत व्याज दर ७% पेक्षा कमी होते.)
प्रि एल्पीजी काळातले पालक मुलांच्या लग्नावरही खर्च करायचे तो धरलेला नाही.
हेच पैसे एका वर्षापेक्षा दीर्घ मुदतीच्या एफ्डीजमध्ये गुंतवले असते तर व्याज दर अधिक मिळाला असता.
युनिट ट्रस्टची १९८९-९० मध्ये एक योजना होती, ज्यात साडेपाच वर्षांत पैसे दुप्पटीचे आश्वासन होते. प्रत्यक्षात मॅच्युरिटीला ४० टक्के बोनससुद्धा मिळालेला. अनेक मंथली इन्कम स्कीम्समध्ये १२ टक्के व्याजदर असे. तोही अॅश्युअर्ड (तोवर व्याज दर मुक्त झाले नव्हते).
कुठे नेताय धागा? अॅमी
कुठे नेताय धागा?
अॅमी ताईंनाच मांडुदेत की हिशोब.
नंदिनी, तुम्ही अॅमी यांच्या
नंदिनी, तुम्ही अॅमी यांच्या पोस्ट्स सुरुवातीपासून वाचल्या नाहीत किंवा वाचलेल्या विसरलात.
१९७० ते १९९० या काळात (प्रि-एल्पीजी Lberalisation, Privatisation, Globalisation) जन्मलेल्या मुलांवर त्यांच्या पालकांनी केलेला खर्च मांडताहेत त्या केव्हापासून.>> तेच लिहितेय ना. मी आहे की त्या काळामधली मुलगी आणि माझ्या शिक्षणाला कित्ती खर्च आलाय ते मला माहित आहे. (हो. मी नगरपालिकेच्या शाळेमध्येच शिकले)
असा हिशोब करणारे पालक खरेच
असा हिशोब करणारे पालक खरेच असतात का ?
म्हातारपणी आपल्याला एकटे पडू देऊ नये ( याचा अर्थ वृद्धाश्रमात ठेवू नये असे नाही, तर संपर्क तोडू नये असा आहे ), आर्थिक वा शारिरीक अपंगत्व आले तर मदतीचा हात द्यावा, मत विचारावे इतक्या माफकच अपेक्षा असतात कि ( परत हे एक सर्वसाधारण वाक्य आहे, अपवाद असतातच ) या वयात पैसे घेऊन काय करायचेत ? ते मूलांनाच मिळणार आहेत कि नंतर.
थोडेफार मतभेद होणारच आणि असणारच. आपण घराबाहेर इतक्या तडजोडी करत असतो, मग घरातल्यांसाठी केल्या तर त्याचे काय एवढे ?
अनघा, प्लीज नीट वाचत जा. >>>
अनघा, प्लीज नीट वाचत जा. >>> व्हय जी अधून्मधून अन उड्या मारत वाचल्या पोस्ट.. आल आता नीट लक्षात. परत हिसेब चालूच..
३१.०३.१९८० पासून सुरुवात करून
३१.०३.१९८० पासून सुरुवात करून २० वर्षांनी ९८,१९१.३२ होतात.
<<
या हिशोबाने, आईबापांनी मुलावर पहिल्या १० वर्षांत मिळून फक्त १ लाख टोटल खर्च केला (१२० महिन्यांत १०० हजार रुपये, दरमहा सुमारे ८३० रुपये, किंवा २७रु.४०पैसे रोज.), तर आज यांना किमान ९८ लाख फेडायचे आहेत.
पुढल्या १५ वर्षांच्या खर्चाचा हिशोब यात धरलेला नाही. तसेच, पहिल्या दहा वर्षांचे फद्याचे व्याजही लावलेले नाही.
आता या हिशोबानंतर अॅमीताईंची ही पोस्ट पुन्हा वाचा बरे :
>>>
अॅमी | 18 January, 2016 - 08:23
इथे पैशाच्या दृष्टीकोनातून कोणीच विचार मांडलेला दिसत नाहीय.
आईवडलांनी मुलगा/गी वर जेवढे पैसे जन्मापासून खर्च केले असतील (अगदी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचार, इतर सगळं सगळं पकडा) तेवढे आणि फक्त तेवढेच पैसे व्याजासहीत मुलांनी पालकांना परत करावेत किंवा त्यांच्यावर खर्च करावेत. त्यापेक्षा जास्त खर्च करायचा की नाही हे त्या त्या मुलांनी ठरवावे. पालक मुलांशी चांगले वागले/वागत असतील तर मुलं खर्च करतीलही. किंवा करणार नाहीत. त्यांची निवड.
नाहीतर मग मुलांनी वृद्धांना जमतील अशी कामं त्यांच्याकडून करुन घ्यावीत आणि त्याचा मोबदला द्यावा किंवा त्यांचा जेऊनराहुन वगैरे खर्च उचलावा.
जर हे करायला पालक तयार नसतील तर मुलांनी सरळसरळ हात वर करावेत. मुलं म्हणजे इंफ्लेशनला बीट करणारी इंवेस्टमेंट नव्हे!
<<
अगं बै अॅमी तै तुम्ही बास
अगं बै अॅमी तै
तुम्ही बास केलेलं ना ?
मी पण आलो हा सोंगट्या घेऊन. आता तुमच्यावर राज्य
दिनेशदा, जाओ इस आयडीकी पोस्ट
दिनेशदा,
जाओ इस आयडीकी पोस्ट पढके आओ, जिसने पहले ये लिखा था..
इथे कुणीही आपल्या मुलांना हिशेब मागत नाही, मागायला जाणार नाही. पण आपला दिवटा आपल्याला माझ्यावर झालेला खर्च सांगा , तुमच्या तोंडावर पैसे फेकतो म्हणू लागला (संस्काराप्रमाणे) तर त्याला काय उत्तर द्यायचे याची रंगीत तालीम इथे चालू आहे. पहिल्यापासून वाचा.
मी हा धागा माझ्या कंपनीच्या
मी हा धागा माझ्या कंपनीच्या "चार्टर्ड अकाउंटं" ला पाठवतो. म्हणतो मेल्या हे गणित सोडीव मग तुला टॅक्स वाचवल्याची फी देईन
बेफिजी - म्हणून धागाकर्तीला
बेफिजी - म्हणून धागाकर्तीला मी हेडरमध्ये मुद्यांची यादी करण्याबाबत सुचवले होते पण ते त्यांना पटलेले दिसत नाही. तसे केले तर एकेका मुद्यावर चर्चा करता येईल.>>> हे मी वाचलच नाही. आत्ता वाचतेय.
असो
आणि मी आता जाम कन्फ्युज झालेय. मला तुम्ही लिस्ट करुन द्या, हेडर मध्ये काय टाकायचं मी टाकते.
अकाऊंटन्सीचा तास सोडून मूळ
अकाऊंटन्सीचा तास सोडून मूळ मुद्द्यावर येउया का सगळे?
चर्चानिर्माती, धाग्यात आलेले महत्वाचे मुद्दे मेन धाग्यात टाकणार का?
मला वाटतं ते द्या पैसे आणि
मला वाटतं ते द्या पैसे आणि व्हा मो़कळे हे सारकॅस्टिकली लिहिले असेल. पण बरे झाले हा विषय आला. कमीतकमी आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती केलय ह्याचा आर्थिक आणि इतर हिशोब तरी डोळ्यासमोर आला. ज्यांना असं वाटतं हॅ, काय केलं माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी, मला हे नाही दिलं आणि ते नाही दिलं ... त्यांच्यासाठी हे कॅल्क्युलेशन खुप चांगलं आहे.
पण एक खरेच की मुले म्हणजे इन्फ्लेशनला बीट करणारी इन्वेस्टमेण्ट म्हणून जर कोणी मुलांना जन्माला घालत असेल तर मुलेही तशीच स्वार्थीपणे वागली तर दोष कोणाला आणि कसा देणार. (दोष पालकांच्या पेरेंटींग स्टाईलला जावा असे माझे मत.)
ह्या सगळ्या डिस्कशन वरुन मला दिनुचे बिल ही गोष्ट आठवली. पण मुलं जर अशी कॅल्क्युलेटिव्ह बनत असतील तर ती का?
मी_अनु - कोणते मुद्दे टाकू
मी_अनु - कोणते मुद्दे टाकू प्लीज लिस्ट करणार का. मी कन्फ्युज झाले आहे.
निनाद१
निनाद१
पण मुलं जर अशी
पण मुलं जर अशी कॅल्क्युलेटिव्ह बनत असतील तर ती का? >>>>>
माझ्या पाहण्यात नाहीत.
जाणून घ्यायचंय
तेच वाचत होते खूप मुद्दे
तेच वाचत होते
खूप मुद्दे आहेत.
जमले तर यादी करते
डिंपल आणि दिमा..
डिंपल आणि दिमा.. सर्कास्टिकलीच लिहिले आहे मी ते.
केवळ वयाने मोठ्या असलेल्या माणसाने केले म्हणजे ते सगळे बरोबरच्च असणार असं साधारण आपली थोर संस्कृती शिकवते. जी/जो हे मानत नाही ती/तो कुसंस्कारी (असं पुन्हा आपली थ्थोर संस्कृतीच सांगते).
Pages