मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'खालून टांगण, वरून टांगण' >> हे भगवान!!!
" हाथी का अंडा ला" क ह र आहे >> +१ Biggrin

माझा ३ वर्षांचा भाचा घालीन लोटांगण म्हणताना मध्येच "नारायणयेति समर्पयामि" च्या ऐवजी
"नारायण राणे टमरक टमटम" म्हणायचा. Lol

त्याची आरती ऐकून आम्ही हसून हसून खरंच लोटांगण घालायचो. Biggrin

कभी खुशी कभी गम मधल गाण " बोले चुडीया "

अपनी मान्ग उजागर हो
साथ हमेशा साजन हो

मी आस ऐकायचो
अपनी मान्ग गुहागर हो
साथ हमेशा साजन हो
(बहुदा काजोल आणिक करीना यु के मधून आम्हाला गुहागर ला घेउन जा अस हट्ट करत असाव्यात)

सखी काळ नागिणी, सखे ग वैरीण झाली नवी-
हे मला लहान असताना - सखी काळ नागिणी, सखे ग वहिनी तुला मी अशी असं ऐकु यायचं. 'जावा जावा हेवा दावा' किंवा नणंद भावजय पटत नसेल अशी समजूत करुन घेतली होती. Uhoh

'हरी भजनाविण काळ घालवू नको रे'
हे मी खुप दिवस 'हरी भजनात वेळ काळ घालवू नको रे' असं समजत होतो,
म्हणजे बाबा आता कर्म करा नुसते भजनं म्हणू नका असा अर्थ लावून घेतला होता. Uhoh

:P:-P:

बण्डू, ते गाणे 'कशी काळ नागिणी सखे ग वैरीण झाली नदी' असे आहे.
नवी वैरीण बैरीण काही तयार होत नाहीये. आहे त्या नदीलाच वैरीण म्हटले आहे Happy

सोल्जर मधल " सोल्जर सोल्जर" गाण

यु मिलाके नजर
करके वासु गिरी
लेके दर्दे जीगर
आगे पिछे बोलकर

सोलकर सोलकर मिठी बाते बोलकर
दिलको चुरा ले गया

सरफरोश मधील " जो हाल दिल का "

ये तुझको खबर है
ये मुझको पता है
जो छाया दिलपे चाहत का असर है
दिवाना तेरा बेसबर (डेस्परेट) हो रहा है

बाजी चित्रपटातल " धीरे धीरे आप मेरे दिलके मेहेमान हो गये"

पेहेले जान
फिर हाने जानेजा
फिर जानेजाना
हो गये

ह्यातील "जान" शब्द सन्स्कृत मध्ये चालवल्या सारखा वाटतायचा

जान जानेजा जानेजाना (प्रथमा)

इ.न्ग्लीस बाबू देसी मेम मधल

दिवाना दिल हुवा दिवाना गाण

आखोने मेरी आखोसे तेरी जाने क्या कहा जाने क्या कहा
अपनेही र.न्ग मे रन्गले तू मुझको यही तो कहा यही तो कहा
र.न्गा ये दोगे मुझको क्या सनम
तू लुटले (रखले) मेरी लाज और शरम

Lol

RHTDM मधलं गाणं -

ओ मामा मामा मामा हम सारे है मुंबईया
हम बेटा बेटी मिलके तालमें नाचे ताथैय्या

तो शब्द 'बेतालेभी' असा आहे हे कळायला बरंच नीट ऐकावं लागलं होतं Proud

(लहानपणी "डफलीवाले...")
डफलीवाले डफली बजा, मेरे घुंगरू कुणाला हवे, आ Lol

Pages