मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो तेच ना.. स्वॅगर असावं म्हणूनच म्हणतेय.. पंजाबी नावात/गाण्यात ईंग्लिश घालायची खोड असतेच....

गुंडे सिनेमातील 'जिया..मै ना जिया' ह्या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीचे हे शब्द मला समजत नाहीत.

जिया..मै ना जिया
रे झा रे झा ?? मेरा जिया...

रे जा रे जा
किंवा
ले जा ले जा
किंवा
रे सा रे गा

ह्या पैकी काहीही गाते मी!

त्याच गाण्यात दुसरे कडवे आहे

नैना फिरोझी मे है
ख्वाबो के पाननेगर ???

हा काय शब्द आहे नक्की?

माझा नवरा पह्यलं नमन गाण्यातले ' तुम्ही ऐका हो गुणीजन ' च्या ऐवजी दुर्जन च ऐकतो.

धन्स अंजली_१२!

नैना फिरोझी मे है
ख्वाबो के पानी मे घर!

??

पण अर्थ काय झाला ह्या ओळीचा?

' तुम्ही ऐका हो गुणीजन '>>

मी ते सुजन असं ऐकत आलेय. Happy गुणीजन आहे का तो शब्द?

तुम्ही ऐका हो गुणीजन ' च्या ऐवजी दुर्जन च ऐकतो.
>>
मी ते सुजन असं ऐकत आलेय.
>>
मला ते नेहमी भजन च ऐकू यायचं आणि स्वतःवर कॉन्फिडन्स सुद्धा होता की ते भजन च असणार आहे म्हणून Proud

निंबुडा, ते रेझा रेझा आहे आणि कडव्यामधे
नैना फिरोझी नहर, (डोळयात निळ्या रत्नांचा झरा)
ख्वाबोंके पानीमे घर (स्वप्नांच्या पाण्यात घर)
असं आहे.. रच्याकने इतकं सुंदर गाणं गुंडे मध्ये? अरेरे..

'जिया' गाणं फार सुंदर जमलं आहे. अरजित सिंग चा आवाज मस्त लागलाय. शुटिंगही तितकंच देखणं. आमच्या ओमान मधलं. दिनेशदांच्या मस्कत-सलाला सहलीच्या धाग्यावर मी उल्लेख केला होता.
http://www.maayboli.com/node/52802

रेज़ा रेज़ा म्हणजे तुकडे तुकडे.. आत्ताच पाहिलं इर्शाद कामिल ने लिहिलंय ते.. कसलं भारी लिहीतो हां माणूस. रॉकस्टार पासून वेड लावलय याने Happy

त्या कजरारे मधले "तेरा आना भी गर्मियों की लू है" या ओळीचे अशक्य अर्थ काढून झाले होते. त्यात परत डान्स बसवत असल्याने स्टेप्स कहर सुचवल्या जात होत्याच. एक मित्रवर्य त्यामध्ये "अंखे भी कमाल करती है पर्सनलसे सवाल करती है" या ओळीमध्ये "पर्सनल" नसून "मुश्किल" आहे असं म्हनायचा. त्याला गाणं ऐकवून ऐकवून थकलो होतो.

माझा मुलगा, वय वर्ष ५, काल जोरजोरात गात होता
कुर्मा हुआऽऽऽ, कुर्मा हुआऽऽऽ
Happy

(original गाणं : कुर्बान/कुर्बाँ हुआ )

त्या कजरारे मधले "तेरा आना भी गर्मियों की लू है" या ओळीचे अशक्य अर्थ काढून झाले होते. त्यात परत डान्स बसवत असल्याने स्टेप्स कहर सुचवल्या जात होत्याच. एक मित्रवर्य त्यामध्ये "अंखे भी कमाल करती है पर्सनलसे सवाल करती है" या ओळीमध्ये "पर्सनल" नसून "मुश्किल" आहे असं म्हनायचा.>>>

ते पर्सनलसे मला 'परसोंसे' म्हणजे परवापासून प्रश्न विचारतायत पण अजून उत्तर मिळत नाही अशा अर्थाने आहे असं वाटलं होतं! इंग्रजी शब्द असा मधेच असेल असं वाटलं नव्हतं Happy

अफगान जलेबी,

बरोबर लिरिक्स आहेतः
ख्वाजाजी के पास तेरी चुगली करूंगा
अंगूठी मे कैद तेरी उंगली करूंगा हां तेरी चुगली करूंगा

आता गाणं ऐका!!!!

नंदिनी यांनी पूर्णं मजाच घालवली.
राजाजीके पास तेरी चुगली करूंगा असं ऐकत होते तिथपर्यंत ठीक होतं. पण ते उंगली करूंगा च्या आधी काय वाट्टेल ते घातलं जात होतं. प्रत्येक वेळी नवीन नवीन. आता गाणं प्रत्येकवेळी बरोबर ऐकू येतय. Sad सकाळपासून तिनदा लागलं होतं.
निषेध गाण्यातील मजा घालवून टाकल्याबद्दल. Wink

इंग्रजी शब्द असा मधेच असेल असं वाटलं नव्हतं >> गुलजार वापरतात असे मधेच इंग्रजी शब्द - "चॉक से चांद पे लिख दिया नाम हमने तेरा".
मागे "शौक है" गाणे ऐकले 'गुरू' मधले. फार सुंदर आहे पण त्यात मी अजून कंफ्यूज्ड आहे. लिरिक्स मध्ये सगळीकडे लिहीले आहे -
"सनसनी आवलोंका " पण मला नेहमी ते "सनसनी नॉवलोंका" ऐकू येते. Wink Happy नक्की काय ते गुलजारच जाणे.

आवलोंकाच आहे ते !

अर्थही तोच आहे आंबट तुरट आवळ्यांचा शौक आहे . इश्कात पडलेल्या बावळ्यांचा शौक आहे.

Pages