मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवरात्रीमुळे पुन्हा हे गाण आठवल
"हे नाम रे!!!" सुहाग
मी लहानपणी म्हणत असे
" ओ शेरोंवाली !! उंचे ढेरोवाली "

मला आश्चर्य वाटायच हे अस देवीबद्द्ल एकदम ढेरी वगैरे का लिहल असेल.

बर्याच वर्षानी कळल की डेरा म्हणजे स्थान

गुलामी चित्रपटातले ते सदा बहार गाणे 'जीहाले मुस्कीन' गाण्याच्या चालीवर घालीन लोटा.न्गण फीट्ट बसते अगदी

घालीन लोटान्गण वन्दीन चरण डोळ्याने पाहीन रुप तुझे
प्रेमे आल.न्गीन आन.न्दे पुजीन भावे ओवाळीन म्हणे नमः

हंप्टी शर्मा मधलं, 'कुडी सॅटरडे सॅटरडे करदी रहंदीए' हे नेहमी 'कुडी सॅटरडे सॅटरडे करदी एमबीए' असंच ऐकू यायचं.. म्हटलं असेल बुवा कुठला पार्ट टाईम एमबीए कोर्स :p

<<<<एक अतिशय सुंदर मराठी गाणे आहे "राजा ललकारी अशी घे हाक दिली साद मला दे"

त्यात पुढे गायिकेच्या तोंडी एक ओळ आहे...
"कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया भरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंया"

लहानपणी ही ओळ मला अशी ऐकायला येत असे:
"तुमचा भाचा माझा धनी, फळबागेत आला या"

म्हणजे नवऱ्याच्या मामाला "आपला नवरा आता फळबागेत आला आहे" असे ती सांगत आहे वगैरे असे चित्रपटातील दृश्य असावे असे वाटत असे. खो खो खो खो (क्याय च्या क्याय)>>>>

हि ओळ अशी नाही आहे का? आज हि हे गाण असाच म्हणते.
"तुमचा भाचा माझा धनी, फळबागेत आला या"
Proud Proud Proud :फिदी

मुळात हा बाफ ऑफिस मध्ये वाचण्याच्या लायकीचा नाही आहे . (पण तरीही तोंडावर दुपट्टा घेऊन मी वाचते आणि हसते आहे. << तुझा कप्पा ढिला ढिला>> :हहगलो:)

इथे वाचल्यापासुन "कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया भरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंया" ही ओळ "तुमचा भाचा माझा धनी, फळबागेत आला या" अशीच ऐकतेय Lol आधी नीट ऐकत होते.

एकदा चिरंजीवाना अचानक आठवलं
" मम्मा , आर्या च्या( त्याची क्लास्मेट) सोसायटी मध्ये तिचा डान्स आहे. ती सारखं गाणं म्हणत असते ..-- चिकन कनैया रे मेरे चिकन कनैया रे "
आर्या ला गाणं बरोबर येत असणार , ह्यानेच पहिल्यान्दा ऐकल असणार Wink

मुळात हा बाफ ऑफिस मध्ये वाचण्याच्या लायकीचा नाही आहे . (पण तरीही तोंडावर दुपट्टा घेऊन मी वाचते आणि हसते आहे स्वरा@१ ++++१००००००००००० , आपण हसतो आणी आजुबाजुचे दचकतात.

मला चुकीच ऐकू आलेलं गाण "मानसीचा चित्रकार तो … तुझे मी नंतर चित्र काढतो…"
नंतर समज आल्यावर खरे शब्द कळले. Proud Proud :फिदी

ए, हसवू नका रे बास...

ते जिहाले मुस्कीन आणि घालीन लोटांगण चा शोध ज्याने लावलाय त्याला लोटांगण रे बाबा Lol

आमच्या बाजूच्या काकी 'घालीन लोटांगण' हि आरती काही वर्ष 'खालून टांगण, वरून टांगण' अशीच म्हणायच्या. (त्या मुस्लिम आहेत आणि लग्न हिंदू बरोबर केलय, त्या मुद्दाम तस नाही म्हणायच्या, आरतीची आवड होती त्यांना आणि आवर्जून यायच्या त्या आरतीला, काही वर्ष निघून गेली त्यांना खरे शब्द समजायला पण तोपर्यंत आम्ही मात्र पुरेपूर आनंद घेतला त्यांच्या ह्या स्पेशल आरतीचा) Rofl

Biggrin Biggrin Biggrin

ते जिहाले मुस्कीन आणि घालीन लोटांगण चा शोध ज्याने लावलाय त्याला लोटांगण रे बाबा++१

साष्टांग लोटांगण..:हहगलो:

ते जिहाले मुस्कीन आणि घालीन लोटांगण चा शोध ज्याने लावलाय त्याला लोटांगण रे बाबा++१

साष्टांग लोटांगण Rofl

Pages