मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिर मुंडवा के ओले पडे असा प्रसिद्ध हिंदी वाक्प्रचार आहे. (आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशा अर्थाचा आहे.)

यातला ओले चा अर्थ खूप गहन आहे. "दिल बोले ओले ओले" म्हणजे "ओ ले, ओ ले" यातला "ओ" दिल आपले लक्ष वेधण्यासाठी वापरतो आणि "ले" म्हणजे घे. म्हणजे गाणाऱ्याला त्याचे ह्रदय म्हणते,
"(आता उगीच रडू नकोस) हि मुलगी आहे पहा हि घे (आणि शांत बस)"
(हा अर्थ प्राचीन उत्खननात एका बखरी मध्ये मला आढळला Biggrin Biggrin )

माझी एक मजेशीर आठवण आहे. मी लहान असताना सकाळी रेडिओ मोठ्या आवाजात लावण्याची सर्वत्रच वहिवाट होती. तेव्हां संत नामदेवांचे एक भजन लागायचे कधीमधी रेडीओवर... "अमृताहुनी गोड नाम तुझे देवा." मला ते आवडायचे देखील खूप.

पण त्यातील "हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति" ही ओळ
"हरिदास गर्जती हरिनाम चाखिती" अशी ऐकू येऊन मला बुचकळ्यात पाडायची.

पुढे कधी तरी इंटरनेटवर संपूर्ण लिरिक पहायला मिळालं.

लहानपणी रेडियोवर ऐकलेले....
'अवचित परिमळू *ळकला वनमाळी, श्री हरि गोपाळू आला गे माये...' असं काहीतरी,
मला ते अक्षर 'बु' असे ऐकू येत होते आणि असं काय विचित्र गाणे आहे असे शेवटी वडिलांनाच विचारले. Sad

श्यामची आई चित्रपटातल वनमाला बाईन्च्या तोन्डी असलेल गाण

द्रौपदीचा बन्धू शोभे नारायण मी अस म्हणायचो

गणपतीचा बन्धू शोभे नारायण Happy

रणवीरचे मल्हारी गाणे (बाम) सतत कानावर पडले वेगवेगळ्या अ‍ॅवॉर्ड फंक्शन मधे. ते सुरुवातीचे काय म्हण्तात दरवेळी काहीही ऐकू येते. 'ह्हाहाय' 'हाहाकार' 'तक्तधाम' इ. इ. काही शब्द नसतीलही बहुधा. पन उत्सुकता नक्की काय आहे ते Happy

उफ माँ>>> मला पण उपमाच वाटत होतं ! Happy
रच्याकने, अनेक दिवस हे गाणं, अनेक टॉप टेन शो मधे पहिल्या नंबरवर होतं. या गाण्यामुळेच सैफ अली खान आणि गायक अभिजीत दोनोंकी 'निकल पडी' म्हणायला हरकत नाही.

तक्तधाम' मला ते 'फक्त हाण' 'फक्त हाण' असं ऐकू येतं>> हे काय आहे ते मला कळलेलंच नाही.. पण इथे वाचल्यावर थोड्या वेळापूर्वी गाणं ऐकलं तर मलाही 'फक्त हाण' असंच ऐकू आलं. Lol

काय शब्द आहेत ते नक्की? Happy

मगच्या आठवड्यात कोल्हापूरला जाताना सीडीमध्ये अचानक मराठी गाणी लागली. त्यामधलं कुठलंसं गाणं चालू होतं त्यात बाईआवाज बरंच काही म्हणून शेवटी "विचारू कुणाला" त्यावर सुरेश वाडकर आवाज "मनाला गं मनाला गं मनाला" असं बराच वेळ गात राहतो.

कन्या रत्न म्हणे "हा अंकल विचारूचे आन्सर देत नाही नुस्तं म्हनला म्हनला. काय म्हनला ते सांग की:"

>> "हा अंकल विचारूचे आन्सर देत नाही नुस्तं म्हनला म्हनला. काय म्हनला ते सांग की:"
हा हा हा हा Lol Lol Lol

बिगी बिगी बिगी चाल ग... अशी सुरवात असलेले ते अतिशय नितांत सुंदर गाणे आहे "अशी कशी ओढ बाई असं कसं वेड, विचारू कुणाला?" खूपच गोड युगुलगीत. आणि हो हि गाणी ऐकणारे रसिक जास्तीकरून कोल्हापुरातच Happy

हे गाण नाही आहे, जाहिरात आहे कुठलीतरी नवीन बाईक ची जाहिरात (hero durex कि काहीतरी ) त्यात तो म्हणतो इंडिया कि नई उम्मीद, पण मला ते नेहमीच (अजूनही ) इंडिया कि नानी हु मै … असाच ऐकू येत… आणि अगदी मोठ्या आवाजात मी ते म्हणते हि…. (म्हणल ह्याला वेड बीड लागलाय कि काय हि कोण इंडिया ची नानी ) Happy

उपमा साला आईगं पोरे आले आले हे सुद्धा त्या ओले ओले गाण्यातच आहे ना?>>>>> म्ला वाटत ह्या उपमा वरुन मागे कितीतरी पान लोक Rofl झालीयेत.

हो , त्या movie मध्ये ती हिरवीण पण घराला 'Durex' चा रंग मारायला सांगते ना त्या agent ला…

मला पण आत्ता कळल मी नक्की काय टाइपलय ते …. Proud Proud

Lila Lila Lilla (English song) => निल्या निल्या नील्ल्या Lol Lol
( कोणतरी एखाद्या निलेश ला म्हणत असावे तसे Proud )

Pages