मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बाहों के दरमियाँ..." सुरवातीला कित्येक दिवस "बाहों की गर्मियाँ..." असे ऐकत होतो Lol

"बाहों के दरमियाँ..." सुरवातीला कित्येक दिवस "बाहों की गर्मियाँ..." असे ऐकत होतो >>> सनी देओल साठी असेल तर बरोबर आहे Proud

मेरे माहिया सनम जानम... नी मे करदा ना मी दानम अस मी काहीही यमक जुळवुन बोलत आहे. Lol
अजुन ही त्याचे लिरीक्स कळले नाही.कॅट ला तरी गाण कळल असेन का ???

अजून काही गाणी रिलीज झाली तेंव्हा सुरवातीला काही दिवस अशी ऐकू आली होती:

मोजा हि मोजा => मोर्चा हि मोर्चा
लुंगी डान्स, लुंगी डान्स => मुंगी डान्स मुंगी डान्स

Proud Proud

आणि हे एक जुने गाणे मनोजकुमारच्या "क्रांती" मधले लहानपणी असे ऐकले होते...
लुई शमाशा उई => कुई तमाशा कुई

Lol

क्रेझी किया रे
हे
ब्रेझिंग किया रे! अस ऐकु यायचं

तसेच, मेड इन इंडिया हे
मेरी निंदिया .... मेरी निंदिया
दिल चाहे रस्तेमे दे दिया.
असं ऐकु यायचं

तनु वेड्स मनु -२ मधील मूव्ह ऑन गाण्यातील शब्द मला आतापर्यंत असे वाटले होते
ओ रे पिया रे, किसके सारे दर्द भरे नगमे

ते

ओ रे पिया रे, घीस गये सारे दर्द भरे नगमे
असे आहे हे आताच आशूडी चा लेख वाचून समजले. Uhoh

++++

गुरु मधले 'तेरे बीना बेसुवादी बेसुवादी रतिया...' या गाण्यात मध्ये एक ओळ मी नेहमी अशी ऐकते
तेरे संग सोना पितल
तेरे संग पितल पितल...

??

तू सोबत असलास (तर तुझ्या अगम्य परीसस्पर्शाने Wink ) सोने ही पितळ होऊन जाईल आणि पितळ मात्र पितळच राहील!!!! ??? :फिदीफिदी:

तेरे बीना सोना पितल
तेरे संग कीकर पिपल

असं आहे ते.
म्हणजे तू नसलास तर सोनं ही पितळेप्रमाणे आणि तू असलास तर बाभळीचं (की विलायती बाभळीचं) झाडही पिंपळासारखा गारवा देतं.

साताठ वर्षांपूर्वी परीक्षेच्या काळात या शब्दांनी लई हैराण केलं होतं म्हणून खास अर्थ शोधून काढला होता आणि कीकरचं चित्रही.
Happy

गुरु मधले 'तेरे बीना बेसुवादी बेसुवादी रतिया...' या गाण्यात मध्ये एक ओळ मी नेहमी अशी ऐकते
तेरे संग सोना पितल
तेरे संग पितल पितल... >>>> म पण शेवटची ओळ तशीच ऐकत होते, फक्त अर्थ लावायच्या फंदात पडले नाही...

याबू सोचे, याहू मलमल, एक बार मे इस जीवनमे कर दे वेस्ट ऑफ टाईम, करना है वेस्ट ऑफ टाईम

काल माझी लेक गातं होती. (वय वर्षे ७) मी म्हटल, अगं, हे काय गातेस? तर म्हणे ते नाही का एलियनच्या सिनेमातल गाणं...... मी शब्द सांगायचा प्रयत्न केला तर..............., तुला नाही माहित गं, मी सांगतेय ना Lol

परवा आमच्या घरी गाणं ऐकणारे एक शौकीन एक ठुमरी गात होते. आधी खूप वेळ हरिहरनच्या आवाजात , मग आरती अंकलीकर टीकेकर, नंतर कौशिकी चक्रवर्तीच्या आवाजात 'याद पिया की आये' (प्रहार मध्ये शोभा गुर्टूंनी गायलेली) ऐकून ऐकून मग कानसेनांनाही लहर आली. मी तर हे गाणं कधीच ऐकलं नव्हतं. पण कानाला अर्थ खटकत होता. म्हटलं तू चुकीचं गातोयस. हा शब्द असा नसणारे. तर मलाच वेड्यात काढलं की आता तू सांग मला कोणतं गाणं कसं आहे ते! म्हटलं, अरे गाण्यातलं कळत नसलं तरी अर्थ तर कळतो ना? तो चुकतोय इथे. झालं. लागली पैज. मग पुन्हा पुन्हा ऐकीव रियाज झाले आणि शेवटी मी म्हणजेच अर्थ जिंकला.
ती ओळ होती - बैरी कोयलीया कूक लगाए
त्यातल्य् हरकती आणि तानांमुळे कानसेनाला वाटत होतं ती ओळ आहे - बेहरी कोयलीया कूक लगाए..
म्हटलं आजतागायत कोणत्याही गीतकाराने कोकीळेला बहिरी म्हणायची हिंमत केली नसेल! Proud तर म्हणे, ती स्वत: बहिरी असल्याने तिच्या कूक ने इतरांना जो त्रास होतोय तो तिला जाणवत नाही असे म्हणायचे असेल कवीला. जे न देखे रवी ते देखे कवी! Lol

कलोनियल कजिन्स अर्थात हरिहरन आणि लेसले लुईस चं 'क्रिश्ना नी बेगने बारो' हे भजन (फ्यूजन) अतिशय आवडतं गाणं आहे. अधून मधून आवर्जून ऐकलं जातं. परवा असंच ऑफिसातून घरी जाताना ऐकत असं गुणगुणलं:-

क्रिश्ना नी बेगने बॉरो (borrow).... कामाचं प्रेशर आणि काय ! Happy

नाही नाही... ते वेगळं गाणं 'हो हो काय झालं' असं
ते फूल टू ढिंगच्यांग आहे. हे एकदम शांत soothing आणि आजच्या काळाला पण सूट होणारे आहे

क्रिश्ना नी बेगने बारो' >>> हे कानडी गीत आहे. ते गाणं इंग्लिश आणी कानडीमधून आहे.

हो हो काय झालं वेगळं आहे, त्यामध्ये मराठी लिरिक्स आहेत.

atuldpatil लुई शमाशा उई, हे शब्द आहेत? (क्रांती) मी आत्तापर्यंत उई तमाशा उईच समजत होते. आज कळले मला नीट.

कीकर पिपल >>
साती, धन्यवाद. नीट ऐकूनही मला हे उमगले नसते. कारण कीकर ह शब्द च माहीत नव्हता मला.

क्रिश्ना नी बेगनी बारो.
म्हणजे थोड्या ग्राम्य कानडीत 'कृष्णा, तू लवकर ये'
यात 'येई बा विठ्ठला' चा गोडवा आहे.

https://youtu.be/CJvK0dox0_M

क्रिश्ना नी बेगने बारो चा vdo पहा आणि सगळी confusions दूर करुन घ्या Happy
धाग्याच्या विषयाला अवांतर- या गाण्यात हरिहरनचे इंग्रजी उच्चार खटकतात

चुकीची ऐकू आलेली गाणी बरीच... पण चुकीचे समजही भरपूर. `पाऊन थकले माथ्यावरती...` पाऊल माथ्यावर कसं काय थकलं, हे आधी कळायचंच नाही. मग कळलं, `पाऊल थकले... माथ्यावरती जड झाले ओझे`! `येऊ कशी कशी मी नांदायला` या रोशन सातारकरांच्या गाण्यात `...बाबा गेले हो परगावा, निरोप त्यांचा घ्यायाला हवा` या ऐवजी `बाबा गेले कोपरगावा...` असंच ऐकत आलो.

देव माझा विठू सावळा
मान त्याची माझी आवळा

माझा भाऊ लहान असताना त्याने एकदा मल्हारवारी गाण्यावर नृत्य केले होते.
त्याचे उच्चार

गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा फडका लावून

Pages