बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हेज . नॉन व्हेज मिक्स लोक असतील तर
मिसळ पाव / खिमा पाव .
प्रॉन्स पुलाव / अंजलीच्या रेसिपीने व्हेज पुलाव किंवा सशलचा मेथी राइस , सोलकढी, पापड,
बटाट्याची भाजी किंवा मटर खिमा सारण भरुन व्हेज / नॉन व्हेज मसाला डोसा - ( वेगवेगळे तवे हवेत मात्र ) '

व्हेज केसाडिया, चोरिझो केसाडिया , किंवा व्हेज / नॉन व्हेज टाको बार , ब्लॅक बीन्स, बनाना चिप्स, सोबत फ्लान ,

हे आमच्याकडचे ट्राईड , टेस्टेड मेनू आहेत

गावरान फास्ट फूड

बाजरीची भाकरी + शेंगदाणा मिर्चीचा खर्डा
ज्वारीची भाकरी , झुणका / भरीत
मुगाच्या डाळीची उसळ, कांदा घालून
गव्हाची लाप्शी ( ओट्स)
तांदळाचं घावन

मेथी/पालक पराठे - सॉस - चटणी - दही पॅक.
दहीबुत्ती, गोडाचा शिरा. (शिरा आदल्या रात्री करून गार करून फ्रीजात टाकला तरी दुसरे दिवशी बाहेरच्या हवेत चांगला राहातो.)

Can I make palak ahead of time for palak paneer. Realized I have paneer from ingro. Also how does palak paneer and puri sounds? I've help for puri and DJ cha mango sheera? All new suggestions thanks

पालक पनीर बरोबर पुरीपेक्षा पराठा जास्त चांगला. आधी करूनही ठेवता येतील. दही वगैरे घालून केला तर नरमही राहातील. सोबत व्हेज पुलाव + टोसा. हे दोन्हीही आधी करून ठेवता येण्याजोगे आहेत. त्यातही गरम ताजा पुलाव शक्य आहे. मोकळा भात करून ठेवायचा + भाज्या सॉते करून ठेवायच्या. आयत्या वेळेस पॅनमध्ये गरम पुलाव बॅचेस मध्ये करता येईल.

योकु इज म्हणिंग राईट. पालक ब्लांच करून त्यात थोडी हिरवी मिरची घालून प्युरे करून ठेवणं हे म्हणायचं होतं. मोबाइलवरून घाईत टाइप करताना ते तसं लिहीणं सोपं वाटलं. प्लस पनीरपण तळून ठेवावं म्हणजे आयत्या वेळी करताना कां,टॉ इ. ग्रेव्ही ताजी केली की हे पटापट मिक्स करता येईल. पराठा हे मला स्वतःलाच थोडं काम वाटतं म्हंजे आयत्यावेळी त्यातलं स्टफिंग वगैरे बाहेर येणे इ. प्रकार झाले की वैताग येतो तो त्यावेळी दाखवता येत नाही. प्ल्स कधी काय करणार हे अजून पक्कं नाही आहे कारण पब्लिकला बाहेर पण जायचं आहे सो कुठली जेवणं घरात (पहिल्या रात्रीचं सोडून) कुठली बाहेर ओव्हरऑल प्लान फिक्स नसल्यामुळे असे सेमाय्होमेड प्रकार आज रात्री आणि उद्या फर्स्ट हाल्फला केले तर मेंटल पीस असेल मला असं वाटतं. (आता ते का प्लान नाही हे प्लीजच विचारू नका..बेभवरशाच्या विंटर वेदर झोन्मध्ये राहिलं आणि मंडळी जवळची असली की असे प्लान केलेले चालतात)

ठ्या़ंक्स फॉर हँगिग ऑन Happy

ओके. मला ट्राइड अँड ट्रस्टेड रेस्पी लागेल त्यासाठी. आता अजिबात आठवत नाही तसं काही मी कधी केलंय का.पण त्या पालक मेक करणेबाब्त काय?

वेका तशी प्युरी आधी बनवून ठेवता येईल. पण खूप दिवस ठेवू नका. काळी पडते आणि वासही बदलतो.
खरे तर ग्रेव्हीसुद्धा आधी बनवून फ्रीजरमध्ये ठेवता येईल. तेल सुटेतोवर चांगली परतली असेल तर आरामात टिकते.

वेका, खरं सांगू? पालक पनीरला एवढे मसाले आणि एवढे जिन्नस अजिबातच लागत नाही. मी पालक ब्लांच करून प्युरे करते. तेलावर जिरं आणि ठेचलेला लसूण परतून त्यावर पालक प्युरे घालते. त्यात थोडी हळद, लाल तिखट, मीठ घालून मग पनीर (न तळता) आणि थोडं फ्रेश क्रिम घालते. बास. मला कधीही ह्यापेक्षा जास्त मालमसाला घालायची गरज वाटलेलीच नाही.

वेका, पालक प्युरी करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. निवडलेली पालकाची पाने असली की जेमतेम दहा मिनिटांत पालक प्युरी तयार होते. पालकाची पाने ब्लांच करून / उकडून गार होण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात बाकीचा मालमसाला पॅनमध्ये शिजवून घेता येतो. (मी निशामधुलिकाची रेसिपी थोडीफार फॉलो करते. जिरे, हिंगाच्या फोडणीवर बेसन खमंग परतून घ्यायचे, त्यात हळद, कसूरी मेथी घालायचे. आले, हिरवी मिरची व टोमॅटो यांची पेस्ट घालायची, टोमॅटो पेस्ट शिजली की क्रीम / साय घालून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा. त्यात पालकाची प्युरी, आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, गरम मसाला घालायचा. पालकाला उकळी आल्यावर पनीरचे तुकडे घालायचे. नीट ढवळायचे. गरज वाटल्यास लिंबाचा रस घालायचा. मी घालत नाही.)
पनीरचे तुकडे तळत बसायचे नाहीत. फारतर कोमट पाण्यातून एकदा काढून घ्यायचे म्हणजे नरम होतात. बेसनाची खमंग चव या भाजीत फार अफलातून लागते व पोटभरीची भाजी होते.

निशामधुलिकाची ही पालक पनीर रेसिपी : http://nishamadhulika.com/sabzi/taridar/palak_panir_recipe.html

वेका, मी सरळ फ्रोजन पालक वापरते क्रोगरचा. तेलात जीरे तडतडले की ब्लेंडर मधून काढलेले दोन टोमॅटो आणि किसलेले आले टाकून परतते. तेल सुटू लागले की एकीकडे थोडे गरम पाणी आणि फ्रीज केलेली पालकची पाने असे ब्लेंडरमधे घालून फिरवून घेते. टोमॅटो मिश्रणात पालक प्युरी, धणे पावडर, हळद, तिखट घालून शिजवायचे ७-८ मिनिटे. असेल तर क्रिम नाहीतर एक चमचा कणिक पाव कप दुधात नीट मिसळून भाजीत घालायची. ३-४ मिनिटे शिजवून मग पनीर घालायचे. चवी प्रमाणे मीठ.

आमच्या मेन्युतले कोणते पदार्थ तुम्हाला करायचेत ते निवडा. आम्ही त्यासाठी लागणारे जिन्नस आणि सोबत डिटेल्ड पाककृती तुम्हाला पाठवू.
अशा प्रकारचे उद्योग भारतातही सुरू झालेत त्यासंबंधीची बातमी.

https://www.blueapron.com/
http://hautechef.in/
http://ichef.in/
http://letschef.in/

पुढच्या वेळी मी आधी वरच्या सजेशन्समधल्या पालक- पनीर रेस्पिज ट्राय करेन. यावेळी मी नेहमी करते तशीच केली. ती प्युरे रात्री करून ठेवली आणि दुसर्^या दिवशी दुपारी उरलेली कृती. वाईट झाली नव्हती. यावेळी घरात अचानक आजारपणं आल्यामुळे एकंदरित दुसर्^या दिवसानंतर बरीच समीकरणं बदलली.

आभार्स Happy

अमेरिकेतल्या माझ्या १० वर्षाच्या भाच्याला सरप्राईज खाऊचे पार्सल पाठवायचंय मला. तो गोडघाश्या आहे अगदी. तरी पुण्यातून कुरिअर करता येतील असे व अमेरिकेत सहजासहजी न मिळणारे किंवा सहजासहजी न करता येणारे व मराठी चवीला अफलातून आवडू शकणारे कोणते पदार्थ आहेत ? तो बोस्टनच्या जवळच्या गावात रहातो व भारतीय दुकान आहे त्यांच्या जवळपास. माझे ३ किलो पार्सलचे बजेट आहे सध्या.

सध्या मनात घोळणारे पदार्थ- घरी केलेले खवा पोळी/ डिंक लाडू/ आळीव लाडू / खरवस (टिकेल का हा ३ दिवस?)

चितळेंचे मोतीचूर लाडू / आंबाबर्फी,/ घारगे, ओल्या नार्ळाच्या करंज्या

चितळेची पिस्ता बर्फी जरूर पाठवा. व ती फ्रिज मध्ये न ठेवता संपवा. फ्रिज मध्ये ह्या बर्फ्या कडक होतात. ( मग मावेत गरम कराव्या लागतील.)
घरी बनवायला: करंज्या, बेसन , रवा लाडू, चिरोटे. खोबरे बर्फी, गाजर हलवा. सेमिया हलवा. मूग डाळ हलवा.

भाचे रावांची मजा आहे. पण त्यांच्या काही अ‍ॅलर्जीज असतील तर त्या आधी विचारून मग काय तो घाट घाला.

खरवस नाही टिकणार पण त्याच्या वड्या कदाचित टिकतील.

अवनी गं राणी.... उकडीचे मोदक कुरीयर पार्सलात टिकतील का?

मेधा, खरवस आणि अळीवाचे लाडू, ओल्या नारळाच्या करंज्या टिकणार नाहीत. ओलं खोबरं नाशिवंत आणि सुकं खोबरं अत्यंत बेभरवशी, तू कौतुकाने खाऊ पाठवशील पण तिकडे पोचल्यावर तो खराब झाला तर काय? खव्याचे पदार्थही रिस्की आहेत माझ्या मते.
डिंकाचे लाडू, बेसनाचे लाडू, मोतीचूर लाडू याबरोबर तिळगूळ देता येईल. तसंच चिक्कीही बघ छान कुठे मिळत असेल तर.... गुळाच्या पोळ्या टिकतील.

सगळ्यांचे आभार. गिट्ट-गोड आवडणारे व खाऊ शकणारे लोक कमी अस्तात हल्ली. आणि किलोला ४७५ रु खर्च करायचेत त्यामुळे विचारपूर्वक ठरवते आहे झालं.
ठरलं - घरचे पदार्थ - आंबा-नारळ वड्या, श्रिखंड-वड्या, दूध व आल्याचा रस घालून केलेल्या आल्याच्या वड्या. जमले तर तिखट मिठाच्या पुर्‍या...एवढे गोड गोड लिहूनही मला कसेतरी होतेय म्हणून. Happy हो आणि अमा तुम्ही सुचवलेली पिस्ता बर्फी सुद्धा...

तिखट मिठाची पुरी? त्या ऐवजी त्याच्याच शंकरपाळी करून देता येतील. पण ऑनेस्ट्ली अहो हे अमेरिकेत बनवू शकतात. इतके अप्राप्य नाही आहे. बाकरव्डी म्हटले असते पण ते खाउनही आता अमेरिकेतले लोक्स कंटाळले असतील बहुतेक.

रात्री अजून सजेशन नक्की येतील.

Pages