बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकुने लिहायच्या आत मी लिहून टाकलं Proud

ऑफिसात ऑल्मोस्ट दर आठवड्याला कोणाचा ना कोणाचा तरी बड्डे असतो, तेव्हा मागवण्यासाठी ही लिस्ट अशी तयार करून ठेवली आहे Wink ऑफिसातला एक उत्साही प्राणी खाऊ रिपीट न होण्यासाठी कोणाच्या बड्डेला काय मागवलं हे एका एक्सेल फाईलमधे मेन्टेन करतो Biggrin

खरे मस्त लिस्ट आहे. ही हेडर मध्ये टाकावी.

तसेच पान एक पासून वाचत गेल्यास खूप कल्पना मिळतील मेन्यूच्या.

आभार सगळ्यांचे. मंजूडी यादी फारच छान आहे. एकदम सगळ टायपायचा कंटाळा आला होता त्यामुळे प्रश्न येतील तशी उत्तरे द्यायची ठरवले होते.
लेकीचा सातवा वाढदिवस आहे. १५—२० बच्चे कंपनीच आहे. केजी ते ८—१० वर्ष असा वयोगट.

मंजूडींनी या ठिकाणी सिक्सर हाणलेला आहे! बढिया! Happy
त्यात केकही अ‍ॅड कर
केक- अंड्याचा, बिनाअंड्याचा, घरचा, विकतचा, आयसिंगचा, फुलक्रीमचा, स्पंज, वाटी इ.

आईला तिच्या वाढदिवसानिमित्त रोजच्या कट्टा ग्रूपकरता ड्राय स्नॅक्सचं एक पाकिट तयार करुन वाटायचं आहे. साधारण पंचवीस ज्ये.ना. बायका असतील. काही आयडिया सुचवा प्लिज त्यातल्या पदार्थांकरता. मी पार्ल्याला तयार करुन ती पाकिटं/बॉक्सेस ठाण्याला नेणार आहे. दुकानदाराकडूनच पॅक करुन घेईन.

२ कचोर्‍या+ मफिन्/मावाकेक/केक स्लाईस/बर्फी/सुके गुलाबजाम + सळी वेफर्स असं एक कॉम्बो दुकानदाराने सुचवलं आहे.

मी पार्ल्याला तयार करुन ती पाकिटं/बॉक्सेस ठाण्याला नेणार आहे. दुकानदाराकडूनच पॅक करुन घेईन.

>> ठाण्यातच का नाही घेत? प्रशांत कॉर्नर नैतर टिप टॉप? तुमचा कॅरी करायचा त्रास वाचेल/ कमी होईल.

पांढरा ढोकळा, बर्फी, पात्रा, / समोसा/ एक चीज चे काहीतरी घातलेले हॉर्न सारखे येते ते. प्रशांत मध्ये अमेझिंग व्हरायटी आहे. ऑलमोस्ट लाइक चितळे ऑफ पुणे.

आमच्या हपिसात कायम इथलीच बॉक्से वाटतात. प्लस एक ज्युसचे कार्टन.

ते तयार करुन देतील का बॉक्सेस? पार्ल्यातले दुकानदार नेहमिचे आहेत त्यामुळे माहितेय.

ते तयार करुन देतील का बॉक्सेस?>>अहो का नाही रेग्युलर बिझनेसच आहे ना त्यांचा. फोन नंबर शोधून टाकते.

शर्मिला, कृष्णा स्वीट्स, टिप टॉप आणि प्रशांत कॉर्नर (याच क्रमाने) तिन्ही ठिकाणी असे स्नॅक्स बॉक्स तयार करून मिळतात.
वर्षा-वंदना सोसायटी जवळचा तो फेमस समोसेवाला (नेमकं नाव आत्ता आठवत नाहीये) तोही स्नॅक्स बॉक्स देतो, त्याच्याकडचा समोसा आणि बंगाली स्वीट घेतलंस तरी सगळ्या आज्यांचं मस्त पोट भरेल.

कृष्णाकडे (ओपन हाऊस) कोथिंबीर कली नावाचा एक नमकीन प्रकार खूप मस्त मिळतो, तो बॉक्समधे घेतला नाहीस तरी तू नक्कीच खाऊन बघ.

मंजुडी मस्त आहे तुमची पोस्ट...
मी पण सेव्ह करुन ठेवते....आमच्या ऑफिसात उपयोगी पडेल

कटलेट - व्हेज., कॉर्न, मटार, गोल, हृदयी>>
हे सगळ्यात बेस्ट होतं Wink Wink Wink

ढोकळा, जिलबी आणि केक ठेविन बहुतेक. घराजवळ एके ठिकाणी खूप छान जिलबी मिळते. मुलीला जाम आवडते.
वेफर्सना यावेळेस सुट्टी देणार आहे.
पण हे सगळे secondary वाटते आहे. ढोकळ्याबरोबर आणखी काय चांगल वाटेल? पाव भाजी, इडली सांबार सोडून. सामोसा लास्ट आॅपशन.

स्मिता, तूच गं तूच माझी सख्खी मैत्रिण Wink

पाव भाजी, इडली सांबार सोडून. >> अहो कोरडा खाऊ द्यायचा आहे ना तुम्हाला? ओला खाऊ चालणार असेल तर पुन्हा एक भली मोठी यादी लिहावी लागेल Wink

ओके. ठाण्यातूनच घेईन मग. टिपटॉप गोखले रोडवरच आहे ना? प्रशांत कॉर्नर माहित आहे. थॅन्क्स अमा, मंजुडी.

टिपटॉप गोखले रोडवरच, जीन्स जंक्शनच्या शेजारी. प्रशांत कॉर्नरला लास्ट प्रेफरन्स दे. ओव्हरहाईप्ड आहे. पक्के ठाणेकर ढुंकूनही पाहत नाहीत. सर्वांचा प्रेफरन्स हनुमान आणि कृष्णा स्वीट्सलाच.
रच्याकने, हनुमानवालाही स्नॅक्स बॉक्स देतो.

हनुमान राम मारुती रोडवर, मॅजेस्टिकच्या शेजारी आणि कृष्णा स्वीट्स ओपन हाऊसच्या शेजारी, पाचपाखाडीला. (तिथे आता ओपन हाऊस नाहीये, दुसरंच हॉटेल आहे. पण लोकेशन तुझ्या लक्षात येईल.)

100% कोरडाच खाऊ हवाय. म्हणूनच नेहमीचे पाभा, इ सां नको अस म्हणायच होत>> ताई मग सँडविच करा की? बटर व जामचे? दोन प्रकारचे? शिवाय पीनट बटर? नटेला? गोल त्रिकोणी आणि लांब करता येतील.( आयता कृती) सर्वात मंस्त फळे. मी एकदा एक फळांचा काउंटर ठेवला होता.
मस्त अ‍ॅपल्स केळी अन काय काय. बच्चे भी खुश, अम्मा बावा भी खुश.

ट डो पा आलं ठाण्यातल्या खाऊस्टॉपांची नावं वाचून. हनुमानकडेच बडिशेप पेरलेली गुळपापडी पण मिळते ना?

हा प्रश्न नक्की कुठे विचारावा हे न कळल्याने इथेच विचारते आहे.
तब्बेत बरी नसल्याने डाॅ. नी हलका आहार सुचवला आहे.
मुगाचे वरण- भात, मुगाची खिचड़ी, मुग- गाजर सुप, फळे, मुग- दुधी सुप, नाचणी सत्व हा आहार सद्ध्या चालु आहे.
अजुन काही पर्याय सुचवता येतील का?
तोंडाची अगदी चव गेलीये.

चिऊ टेक केअर.
मी रात्री अख्खे मूग भिजत टाकते. दुसर्‍या दिवशी त्यांना (थोडेसे जरी मोड आले तरी चालतील) तेलावर परतून वरून तिखट मिठ भुरभुरवून लिंबू पिळून खाते. बळचं याला चटपटे मूग असं नाव देऊन ठेवलंय मी Proud
पौष्टीक आणि टेस्टी Happy

मुगाचे डोसे पण पौष्टिक हलके आणि टेस्टी
मेतकुट भात, दडपे पोहे पण ह पौ टे

ते प्रशांत कॉर्नरचे snack बॉक्स छान असतात. इथे डोंबिवलीत भावाच्या मित्राच्या कॉम्पुटर institute ओपनिंगला आणले होते, छान वरायटी होती खूप. मिनी पिझ्झा, ढोकळा, बेंगाली मिठाई, कटलेट etc. आता आठवत नाहीये जास्त पण टेस्टी होतं.

रिया मीपण करते असं मुग-मटकीचं फक्त फोडणी करते, लिंबू न पिळता थोडा चाट मसाला भुरभुरते, तिखट आणि मिठाबरोबर. कधी कधी लसूण-आले-मिरची तुकडे फोडणीत घालते. कधी नाही.

वेगवेगली सुप, क्लिअर चिकन सुप, टॉमेटॉ सुप, मिक्स व्हेजि सुप, आरतीच भोपळ्याच सुप ट्राय करा
मुगाची खिचडी वरुन योकुचा दाल-तडका याने चव येइल
तान्दळाची,नाचणिची उकड

चिऊ नाचणीची आंबील चालत असेल तर तिच्यामुळे तोंडाला चव येईल आणि मुग नुसते उकडून मीठ, थोडा चाट मसाला घालून पण छान लागेल. टेक केअर.

Pages