आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
च्या मारी! भलतीच गुंतागुंत
च्या मारी!
भलतीच गुंतागुंत आहे ही. काय होणारे सिरियाचं खरंच
हल्ली टीवी वर बातम्या पाहतच
हल्ली टीवी वर बातम्या पाहतच नाही. म्हणून माहिती नाही, पण एवढा गंभीर विषय आपल्याकडच्या चॅनल्स वर हातळला जातोय का? की पूर्ण दिवसभर एकच बातमी 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून दाखवत आहेत?
>>सिरियाच्या आकाशात अशी
>>सिरियाच्या आकाशात अशी सगळ्याच देशांची विमानं घोंघावायला लागली आणि चुकून एखाद्या देशाचं विमान गैरसमजातून पाडलं गेलं तर आयएस राहिल बाजूला आणि तिसरं महायुद्द भडकेल. उरल्या सुरल्याची आयएस वाट लावत बसेल.>> अगदी अगदी.
परवाच बातमी होती कि दोन वर्षापुर्वी युक्रेन जवळ मलेशिया एअरलाईन्स चे जे विमान पडले होते ते पाडायला रशियन क्षेपणास्त्र कारणीभूत होते. तेव्हा युक्रेनच्या सीमे जवळ रशियन सैन्याची जमवाजमव चालु होती, तेथून ते आले असण्याची शक्यता आहे कारण युक्रेन मधील बंडखोर ते क्षेपणास्त्र डागू शकले नसते. तेव्हा रशियन सैन्याने ह्या प्रकरणात माती खाल्ली हे जवळजवळ स्पष्ट आहे.
त्या दुर्घटनेत (?) २९८ प्रवासी मेले त्यांच काय? हेच अमेरिकेतील एखाद्या एअरलईन्स चे विमान असते तर? मलेशिया सारखा देश आहे म्हणून चालून जातय का सगळं?
ह्म्म्म.... माणसाने गेल्या
ह्म्म्म.... माणसाने गेल्या एका शतकात ............... मनात भिती निर्माण करायचा आहे??
उत्तम विचार. माझ्याहि मनात हेच येते. थोडक्यात ऐहिक गोष्टींच्या मागे लागून शरीरसुखांसाठी जी प्रगति केली तेव्हढी मनाचा चांगल्या दिशेने विकास व्हावा याबद्दल फार थोडी.
परत भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करा! आ़जकाल ज्याला हिंदू धर्म म्हणतात त्याचा नव्हे.
आयसिस आणि आखाती देशांतल्या
आयसिस आणि आखाती देशांतल्या परिस्थितीवर मटा मधला एक माहितीपूर्ण लेखः-
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/delhidarwaza/entry/who-will...
मित, थोडक्यात चांगला आढावा
मित, थोडक्यात चांगला आढावा घेतला आहे त्या लेखात.
अमेरिकेला 'शटडाऊन'चा फटका
अमेरिकेला 'शटडाऊन'चा फटका बसणार का? अमेरिकेचे अर्थमंत्री जेकब ल्यू ह्यांनी इशारा दिला आहे की जर दोन आठवड्यात अमेरिकी संसदेने अर्थव्यवस्थेची कर्जमर्यादा वाढवली नाही तर पुन्हा एकदा शटडाऊनला तोंड द्यावे लागेल. अमेरिकी संसदेकडून १८.१ ट्रिलियन डॉलर्सची कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि ती ३ नोव्हेंबरला संपेल. मग राखीव निधीही संपेल. ३ नोव्हेंबर नंतर अमेरिकेच्या ट्रेझरीमध्ये फक्त ३० अब्ज डॉलर्सचा राखीव निधी खर्चासाठी उपलब्ध असेल आणि तो अपुरा असेल. कर्जमर्यादा वाढवून दिल्याशिवाय अमेरिकी प्रशासनाचे व्यवहार पूर्ण करणे शक्य होणार नाही.
अमेरिकेची पत हा देशाच्या सामर्थ्याचा महत्वाचा भाग आहे आणि ती टिकवणे ही संसदेची जबाबदारी आहे. दोन वर्षांपुर्वी अमेरिकी संसदेतील राजकिय संघर्षामुळे देशाला १७ दिवस शटडाऊनला तोंड द्यावे लागले होते आणि अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते. आताही पुढल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असेल आणि त्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पुन्हा एकदा संसदेत राजकीय संघर्ष होण्याची लक्षणं आहेत.
अमेरिकन काँग्रेसने मंजुरी
अमेरिकन काँग्रेसने मंजुरी देताच राष्ट्राध्यक्ष ओबामांनी स्वाक्षरी करुन इराण अणुकराराच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आणि अमेरिका/युरोपीय देशांनी इराणवर गेले दहा वर्षं लादलेले निर्बंध मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली.
अणुकराराप्रमाणे इराणला पाश्चिमात्य देशांकडून आर्थिक मदत मिळण्यापुर्वी वादग्रस्त अणुप्रकल्पांमध्ये महत्वाचे बदल करणे अनिवार्य ठरेल. त्यात भूअंतर्गत अणुप्रकल्प अकार्यक्षम करणे, हेवी वॉटर रिअॅक्टर बंद करणे आणि युरेनियमचे संवर्धन एका मर्यादेपर्यंतच ठेवणे ह्या शर्तींचे पालन करावे लागेल.
इराण निर्बंधमुक्त झाल्यास इराणमध्ये परदेशी गुंतवणूक वाढेल आणि अर्थव्यवस्था सुधारेल असे म्हटले जाते. परदेशी पर्यटकांचा ओघही वाढेल.
पण इस्रायलला भिती आहे की ह्या अणुकरारामुळे इराण जास्त जोमात अण्वस्त्रं तयार करील आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून मिळणार्या आर्थिक लाभाचा विनियोग गुप्तपणे अणुकार्यक्रमासाठी करील.
कथा 'इसिस'च्या जन्माची!
कथा 'इसिस'च्या जन्माची! (पैलतीर)
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5003190176066590142
पंत.. लिंकबद्दल धन्यवाद. एकदम
पंत.. लिंकबद्दल धन्यवाद. एकदम अभ्यासपूर्ण लेख आहे.
ते काळे साहेब माबो वर पण लिहायचे ना पूर्वी ...
हो ते लिहायचे इथे फार पूर्वी.
हो ते लिहायचे इथे फार पूर्वी. त्यांचे इथेच लेख वाचल्याचे आठवते.
रशिया आणि इस्रायलच्या
रशिया आणि इस्रायलच्या हवाईदलात गैरसमज टाळण्यासाठी हॉटलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे आणि तरीही रशिया आणि इस्रायलची विमाने आमनेसामने येत आहेत. सिरियाच्या हवाई हद्दीत शिरण्याच्या तयारीत असलेल्या इस्रायली वायुसेनेचे विमान रशियाने रोखले आणि विनापरवानगी इस्रायली विमानं सिरियाच्या हद्दीत दाखल झाली तर त्यांच्यावर हल्ला होईल असा इशारा दिला. (च्यामारी! आकाश/पाताळ/भूमी सिरियाची....दमदाटी/घुसखोरी/परवानगी देणारे तिसरेच! सिरिया नावालाच उरलाय बहुतेक).
लेबेनॉनच्या उत्तरेकडील अक्कर भागात इस्रायली वायुसेनेची लढाऊ विमाने वेगात लेबेनॉनच्या उत्तरेकडील सीमाभागातून सिरियात शिरण्याच्या प्रयत्नात असताना सिरियातील हैमिम हवाईतळावर असलेल्या रशियाच्या रडारने त्यांना शोधले आणि रोखले.
लेबेनॉनमधील हिजबुल्लाह स्मर्थक दैनिकाच्या म्हणण्यानुसार इस्रायली विमानं लेबेनॉनमधील हिजबुल्लाहसाठी शस्त्रास्त्रे घेवून जाणार्या वाहनांना लक्ष्य करतात आणि इतरही वेळी लेबेनॉन व सिरियाच्या हद्दीत घुसखोरी करतात.
रशियाच्या हवाईदलाच्या तर अंगातच आलंय. आयएस, जबात अल-नुस्र आणि बंडखोरांच्या ठिकाणांवर आधी रोज ६०-७० हवाई हल्ले करत होते ते वाढवून आता किमान ३०० ठिकाणांवर हल्ले करतील म्हणे.
सिरियाच्या नागरिकांचे काय होत असेल कुणास ठाऊक! घराबाहेर तरी पडत असतील की नाही कुणास ठाऊक! शाळा, ऑफिस चालू असेल का? सगळी युद्धभूमीच झाली आहे. ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांच्या आरोपाप्रमाणे रशियाच्या हवाई हल्ल्यांमध्ये हजारो सिरियन नागरिक मारले गेले आहेत. सिरियातील संघर्षावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी लवकरच रशिया, सौदी व तुर्कीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. सिरियाचा पूर्ण विनाश अमेरिकेला अपेक्षित नाही असे त्यांनी म्हटले आहे. अजून काय वेगळा विनाश व्हायचा बाकी आहे? कितीतरी मारले गेले, कितीतरी देशोधडीला लागलेत, पुढची पिढीतर करपून गेली असेल
जे उरले असतील त्यांच्यावर जगापुढे हात जोडून म्हणायची वेळ आली असेल "मुझे तुमसे कुछ भी न चाहिये, मुझे मेरे हाल पे छोड दो". तो अस्साद मस्त खात पीत बसला असेल आणि त्याच्यासाठी इकडून तिकडून फौजा येवून लढतायत. इकडे तिकडे हात पाय पसरायचा प्रयास करणार्या आयएसलाही काही दिवसांनी "मै कहाँ हू" असं म्हणावंसं वाटेल.
बाळाजीपंत, लिंक इथे
बाळाजीपंत, लिंक इथे दिल्याबद्दल धन्यवाद. अस्सादने नक्की काय केलंय आणि इसिसचा जन्म कसा झाला ह्याची नीट कल्पना आली.
श्री. सुधीर काळेंचे लेख मलाही इथे वाचल्यासारखे वाटत आहेत.
रशियाने सिरियात सुरू केलेल्या
रशियाने सिरियात सुरू केलेल्या हवाई हल्ल्यांकरता रशियाचे आभार मानण्यासाठी सिरियाचे राष्ट्रपती बाशर अल - अस्साद थेट रशियामध्ये...
http://www.reuters.com/article/2015/10/21/us-mideast-crisis-assad-putin-...
आयएस विरोधी संघर्षात इराकने
आयएस विरोधी संघर्षात इराकने रशियाला खूप मदत केली. हवाई हल्ल्यांसाठी आवश्यक त्या गोपनिय माहितीचे आदानप्रदान झाले असे इराकने स्वतःच जाहीर केले होते. रशियन लढाऊ विमानांनी सिरियाप्रमाणे इराकमधील आयएसच्या ठिकाणांवर हल्ले चढवावेत अशी मागणीही इराकचे पंतप्रधान अबादी ह्यांनी केली होती. रशियाने कॅस्पियन समुद्रात तैनात केलेल्या विनाशिकांवरुन प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्रांसाठी इराकची हवाईसीमा मोकळी करण्याची परवानगीही इराकने दिली होती. यशस्वी हवाई हल्ल्यांमुळे रशियाचे आखातातील वर्चस्व वाढतंय. त्यामुळे आता अमेरिकेचा पापड मोडला आहे. अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुख जनरल डनफोर्ड ह्यांनी इराकला खडसावलंय की आयएस विरोधी कारवाईसाठी रशियाचे सहाय्य घेणार असाल तर ह्यापुढे इराकला सहाय्य करणे अमेरिकेला जमणार नाही. त्यामुळे अबादी सरकारने आयएसविरोधी संघर्षात रशियाला साथ न देण्याची भूमिका स्वीकारली आहे. पण इराकच्या ह्या निर्णयामुळे अबादी सरकार कोसळण्याची शक्यता बळावल्याचे विश्लेषकांचं म्हणणं आहे.
सुधीर काळे माबोवर लिहीतात की.
सुधीर काळे माबोवर लिहीतात की. त्यान्चे लेख अभ्यासु आणी वाचनीय असतात. जकार्तामध्ये आहेत ना ते?
चीनने भारताला अडथळा आणन्यासाठी सयुक्त राष्ट्र परीषद च्या माजी अध्यक्षाना लाच दिल्याचे आढळलेय. भारताला स्थायी सदस्यत्व मिळु नये म्हणून हे उद्योग केल्याचे कळले. मागे माजी सरक्षण मन्त्री जॉर्ज फर्नान्डीस म्हणाले होते ना की पाकीस्तानपेक्षा आपल्याला चीन कडुन अधिक धोका आहे. त्यावेळी त्यान्च्यावर बरीच टीका झाली होती. दाम्भिक चीनी नेत्यानी नक्राश्रु ढाळले होते. आता काय? ते बोलले तेच खरे होताना दिसत् आहे.
पोलंड मध्ये निवडणूक होऊन नवीन
पोलंड मध्ये निवडणूक होऊन नवीन सरकार आले आहे. हे सरकार उजवे आहे. त्यामुळे पोलंड बहुदा निर्वासितांना घेणार नाही असे दिसते आहे. हंग्री, सर्बिया नंतर पोलंडने हा विचार अंगिकारला आहे.
अजून एक बातमी - रॉबर्ट मुगाबेंना चीन ने शांतता पुरस्कार दिला आहे.
नेपाळने चीनकडून हजार मेट्रिक
नेपाळने चीनकडून हजार मेट्रिक टन इंधन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या नव्या राज्यघटनेवर मधेसी समाजाने नाराज होवून हिंसक आंदोलनं केल्यावर नेपाळला इंधन व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे ट्रक भारतीय सीमेवरच अडकून पडले आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये महिनाभर ह्या गोष्टींची प्रचंड कमतरता आहे.
दरम्यान नेपाळमधील आंदोलने अजून तीव्र झाली असून शनिवारीही अनेक गाड्यांना आगी लावण्यात आल्या.
अफगाणिस्तानात ७.५ स्केलचा
अफगाणिस्तानात ७.५ स्केलचा भूकंप झाल्याच्या बातम्या आहेत. USGS : US जीओलोजीकल सर्वे ने confirm केलंय. २१२.५ किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू आहे.
अधिक शास्त्रीय माहिती मला बहुतेक बुधवारपर्यंत कळेल
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर ह्यांनी इराक युद्ध छेडून घोडचूक केल्याची कबुली दिली आहे. ह्या युद्धामुळेच आयएसचा जन्म झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असली तरी इराकचे तत्कालिन हुकुमशहा सद्दाम हुसेन ह्यांचा बिमोड केल्याबद्दल त्यांना वाईट वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. CNN ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इराककडे रासायनिक शस्त्रे असल्याची चुकीची माहिती आम्हाला मिळाली होती. सद्दामने त्या आधी इराकी लोकांवर रासायनिक शस्त्रांचा वापर केला होता पण आम्ही ज्याची कल्पना केली होती तसे इथे काहीच सापडले नाही असे म्हटले आहे. तसेच सद्दाम राजवट उलथल्यावर इराकमध्ये होणार्या परिणामांचाही पूर्ण विचार केला गेला नव्हता.
म्हणजे ही माहिती देणार्या अमेरिकी गुप्तचर यंत्रणांचा हा मुर्खपणा नाही का?
२०१५ सालात इराकमधल्या आयएसच्या कारवायांची जबाबदारी २००३ साली सद्दामला खाली खेचणार्यांवर टाकू शकता पण इराकमधल्या ह्या परिस्थितीला २०११ साली अरब-आखाती देशांमध्ये सुरु झालेली 'अरबस्प्रिंग' आंदोलने देखिल जबाबदार आहेत असंही ब्लेअर म्हणाले.
आयएसचा अफगाणिस्तानातील वाढता
आयएसचा अफगाणिस्तानातील वाढता धोका लक्षात घेवून तालिबान रशिया आणि सोव्हिएत रशियन देशांशी हातमिळवणी करायची शक्यता असल्याचा 'द डेलि बीस्ट' ह्या अमेरिकेच्या साईटने दावा केला आहे. २५ वर्षांपुर्वी सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानातील माघारीसाठी तालिबान कारणीभूत असलं तरी आता समिकरणे बदलली आहेत. रशियाच्या लढाऊ विमानांनी सिरियात जी कामगिरी केली आहे त्यामुळे रशियाचे सहकार्य घेण्याच्या चर्चा चालू आहेत.
दोन वर्षांपुर्वी रशियन लष्कराचे हेलिकॉप्टर आपत्कालिन परिस्थितीत काबूलजवळ उतरवण्यात आले होते आणि तेव्हा तालिबानी दहशतवाद्यांनी वैमानिकाला ताब्यात घेतले होते. त्याच्या सुटकेसाठी रशियाने तालिबानशी संपर्क साधला होता. एका अफगाणी वरिष्ठ नेत्याने त्या साईटला दिलेल्या माहितीनुसार वैमानिकाच्या सुटकेच्या बदल्यात रशियाने तालिबानला शस्त्रास्त्रे व पैसा पुरवला. तेव्हापासून म्हणजे दोन वर्षं रशिया आणि तालिबानमध्ये संपर्क आहे. रशिया व अफगाणिस्तानमध्ये असलेल्या सोव्हिएत रशियन ताजिकिस्तानबरोबरही तालिबानने छुपे सहकार्य प्रस्थापित केले आहे. गेल्या मे महिन्यात ताजिकिस्तानचे चार सैनिक अफगाण सीमेपल्याड दाखल झाल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या सुटकेसाठीही तालिबानने ताजिक सरकारकडून शस्त्रास्त्रे मिळवली होती..
ह्या शस्त्रास्त्र व्यवहारांमध्ये इन्व्हॉल्व असलेला तालिबानी कमांडर मुल्ल रहमतुल्ला थोड्याच दिवसांत कुंदूझ येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाला. सद्ध्या तालिबानतर्फे ताहिर शमालझी हा नेता चीन व ताजिकिस्तानबरोबर संपर्क साधून आहे आणि त्याने चीनचा दौराही केला. त्यांच्या असल्या प्रत्यत्नांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच सहाय्य असल्याचाही दावा केला जातो.
आयएसने अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागाचा ताबा घेण्यास सुरुवात केल्यावर रशिया व सोव्हिएत रशियन देशांना धोक्याची सूचना आहे. म्हणून स्वतःच्या सीमारेषेच्या सुरक्षेसाठी रशिया आयएसच्या विरोधात तालिबानला सहाय्य करु शकते.
बाप रे! किती ही गुंतागुंत!
बाप रे! किती ही गुंतागुंत!
पाकिस्तानातील दहशतवाद्यांना
पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारत सहकार्य करत असल्याचा आरोप करुन त्याचे सो कॉल्ड पुरावे पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरिफ ह्यांनी अमेरिकेच्या दौर्यात सादर केले होते. पण प्रत्यक्षात भारताच्या गुरुदासपूर येथील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याचे पुरावे त्यांच्या तोंडावर फेकून अमेरिकेने त्यांचीच कोंडी करुन टाकली. ह्या हल्ल्यासाठी वापरल्या गेलेल्या GPS सेटमुळे हल्लेखोर पाकिस्तानातूनच आले असल्याचे स्पष्ट झाले असल्याने ह्या दहशतवादी हल्ल्याशी आपला काही संबंध नाही असे सांगणार्या नवाझ शरिफांना ते तांत्रिक पुरावे नाकारता आले नाहित आणि गप्प बसावे लागले. आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ देखिल अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. ह्या दौर्यात 'लश्कर-ए-तोयबा' सारख्या दहशतवादी संघटनेवर कारवाईच्या मुद्द्याला अग्रक्रम असेल असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या मते अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला पाकिस्तानची गरज असल्याने अमेरिका पाकिस्तानबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु झालंय भलतंच. पाकिस्तानच्याच दहशतवादी धोरणाचा पर्दाफाश करुन टाकून आरसा दाखवला गेलाय.
आता ह्यापुढे पाकिस्तानवरील दडपण वाढेल. अमेरिकेच्या मागणीनुसार दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणे किंवा अमेरिकेची नाराजी ओढवून घेणे ह्यापैकी एक काहितरी करावे लागेल त्यांना.
वर्गात एखादा हूड, मस्तीखोर
वर्गात एखादा हूड, मस्तीखोर मुलगा असतो. कितीही शिक्षा केली, मारले तरी निर्लज्जपणे तो तसाच वागत राहतो.. खोटेपणा करत राहतो. तसं झालय पाकीस्तानचं.
विकिलिक्सच्या ज्युलियन
विकिलिक्सच्या ज्युलियन अस्सांज : सिरिया उजाड करण्याचे कारस्थान आणि युरोपातले निर्वासित
'द प्रेस प्रोजेक्ट' ह्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अस्सांज ह्यांनी युरोपात आदळणार्या निर्वासितांच्या लोंढ्यांमागे सिरिया उजाड करण्याचे कारस्थान असून ह्यामागे सिरियातील अस्साद राजवटीच्या विरोधकांचा हात असल्याचे म्हटले आहे. विकिलिक्सला मिळालेल्या विविध देशांच्या राजनैतिक स्तरावरच्या संवादांच्या आधारे त्यांनी असे म्हटले आहे.
सिरियातून गेल्या ४ वर्षांत ४० लाख नागरिक देश सोडून गेले. बहुतांश नागरिक तुर्की, जॉर्डन, लेबेनॉन, इराक व इजिप्तमध्ये निर्वासित म्हणून वास्तव्य करत आहे आणि अनेकांनी आता युरोपची वाट धरली आहे. सिरियाचे विरोधक असलेल्यांनी कारस्थान करुन मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकांना योजनाबद्ध रितीने देशाबाहेर काढून सिरियाची संघर्ष करण्याची क्षमताच संपवायचे ठरवले आहे. कुठलाही देश/सरकार चालवण्यासाठी लागणारा बुद्धीमान वर्ग सिरियातून मोठ्या प्रमाणावर बाहेर चालला आहे.
इंग्लिशचे ज्ञान, पैसा व थोडी ओळख असलेल्या देश सोडणार्या जनतेत सरकारी कर्मचारी, मॅनेजर्स, इंजिनिअर्स आहेत. जर्मनी आम्ही लाखो निर्वासित घेण्यास तयार असल्याचे सांगते तर तुर्की ३० लाखांहून अधीक निर्वासितांना आश्रय द्यायची तयारी ठेवतो. हे देश सिरियन जनतेला देश सोडून जायला भाग पाडत आहेत असा दावा अस्सांज ह्यांनी केला आहे.
युरोपियन देशांवर एकमेकांची सीमा सील करण्याची वेळ येणे ह्यामागे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स ह्यांचे धोरण आणि त्यांच्या आखाती मित्र देशांचे (कतार, तुर्की, जॉर्डन, इस्रायल व सौदी) वर्तन कारणीभूत आहे.
विकिलिक्सने उघड केलेल्या गोपनीय राजनैतिक संवादांमधून अमेरिका २००६ पासूनच सिरियातील राजवट उलथण्याचे कारस्थान करते आहे असं अस्सांज म्हणतात. अमेरिकी जनतेला ह्यातून काहीच लाभ नाही पण गुप्तचर यंत्रणा 'सीआयए', शस्त्रास्त्र व्यावसायिक्/एजंट्स/काँट्रॅक्टर्स सारख्या गटांचा फायदा होईल. हिजबुल्लाह ही इराणसमर्थक दहशतवादी संघटना कमजोर करणे, इस्रायलला गोलन टेकड्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करुन देणे, इराणचा मित्र असलेल्या सिरियाला संपवणे, रशियाचा आखातातील लष्करी तळ तारतूस नष्ट करणे आणि रशियाचे इंधन वर्चस्व संपवणार्या 'कतार-सौदी अरेबिया-युरोप इंधनवाहिनी'चा मार्ग मोकळा करणे अश्या हेतुंचाही समावेश असू शकतो असा अस्सांज ह्यांचा दावा आहे.
--------------
एकंदर सिरियाला संपवायचा बेत आहे हे आम्ही इथे माबोवरच्या ह्या छोट्याश्या बाफवरही बोलतो आहोत पण त्यामागची कारस्थानं कोणती आणि कुणाची हे कुठे कुठे वाचून नुसतं आ वासून टकामका बघायची वेळ येतेय.
किरु
किरु
जबरदस्त माहिती सिरिया
जबरदस्त माहिती सिरिया युध्द्दाबद्दल. केवढे खोल पाळेमुळे गेली आहेत या संघर्षाची.
एकंदर सिरियाला संपवायचा बेत
एकंदर सिरियाला संपवायचा बेत आहे हे आम्ही इथे माबोवरच्या ह्या छोट्याश्या बाफवरही बोलतो आहोत पण त्यामागची कारस्थानं कोणती आणि कुणाची हे कुठे कुठे वाचून नुसतं आ वासून टकामका बघायची वेळ येतेय
अगदी खरंय!
खुप छान धागा आणि तुम्ही मेन्टेनही छान करत आहेत.
धन्यवाद श्रीराम.
धन्यवाद
श्रीराम.
रशियाच्या हवाई हल्ल्यांमुळे
रशियाच्या हवाई हल्ल्यांमुळे अमेरिकेने सिरियामध्ये ग्राऊंड अॅटॅक (लष्करी कारवाई) सह डायरेक्ट अॅक्शन घ्यायची घोषणा केल्यावर रशियाने कल्पनाही करता येणार नाही इतक्या भयंकर परिणामांची धमकी दिली आहे. ह्यापुढे इराक व सिरियातील आयएसवर डायरेक्ट अॅक्शन करण्यात येईल अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर ह्यांनी केली. रशियाच्या संधीसाधू हल्ल्यांपासून सिरियन बंडखोरांना वाचवण्यासाठी अमेरिका उघडपणे प्रयत्न करेल. ह्यावरुन अमेरिकेचे इराक व सिरियाविषयक धोरण बदलत असल्याचे जाणवते. रशियाच्या हल्ल्यात सिरियातील जनतेलाच जास्त भोगावे लागले आहे असा अमेरिका, युरोपिय देश व सौदी अरेबियाचा आरोप आहे.
सिरियन बंडखोरांना आपल्यावरील हल्ले टाळायचे असल्यास स्वतःच्या आणि आयएसच्या ठिकाणांबद्दल त्यांनी रशियाला माहिती पुरवली पाहिजे अशी रशियाची मागणी होती ती बंडखोरांनी मान्य केली नाही. अश्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची डायरेक्ट अॅक्शन सुरु झाली तर भयंकर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रशियन संसदेच्या परराष्ट्रव्यवहारविषयक समितीचे प्रमुख कोन्स्टांटिन कोसाचेव्ह ह्यांनी दिला.
कोसाचेव्ह ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे...... सिरियन सरकारच्या मागणीनंतरच रशियाने सिरियात हवाई हल्ले केले. पण सिरियाच्या अस्साद सरकारने अमेरिकेला हवाई हल्ल्यांची परवानगी दिलीच नाहिये. त्यामुळे अमेरिकेचे सार्वभौम सिरियातील सर्व हल्ले आंतरराष्ट्रीय नियमांनुसार बेकायदेशीर ठरतील. अमेरिका सिरियातील सापळ्यात सापडेल. सिरियन जनतेचा बळी जात असल्याचा आरोपही त्यांनी धुडकावून लावला आहे. तसे असेल तर सबळ पुरावे सादर करा. सबळ पुरावे मिळाले तर रशिया त्याची चौकशी केल्यावाचून राहणार नाही असे कोसाचेव्ह म्हणाले.
-----------------
लई मोटी जत्रा लागलीया त्या पल्याडल्या माळरानावर. हितून तितून सगळे यून जातायत. तू जातूयस का जत्रंला त्या पल्याडल्या गावी? मी बी येतु म्हन्तो! विमानं भिरभिरवत जाऊ, बैलगाड्या सोडू, नावा बी हाकू...लगे हाथ दोन चार तमाशे पाहून/करुन, थोड्या आगी लावून येवू गड्या. मज्जा! जळाली वस्ती तर जळू दे की! आपल्या बा चं काय जातंय.
-------------------
अरे जावा की आपापल्या घरी सगळ्यांनी परत. सिरियात निवडणुका घ्या आणि अस्सादलाही घरी बसवा. ना रहेगा बास ना रहेगी बासुरी. शिया आणि सुन्नी ह्या एकाच धर्माच्या भिन्नं पंथांतील वैरामुळे ही सुरुवात झाली ती कुठून कुठे पोहोचली. दोघांनाही सामावून घेईल असं सरकार आणा.
Pages