आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेने शहाणपण दाखवावं आणि रशियाचं आवाहन मानावं. जगाच्या भल्याकरता असेल ते.
अमेरिकेत याच्या उलटच ऐकू येते. रशिया जास्त प्रमाणात आयसिस वर हल्ले न करता आसाद विरोधकांवर करत आहे. त्यातल्या बर्‍याच जणांना अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा आहे. असे ऐकू येते. त्यामुळे एकंदरीतच अमेरिका नाखूष आहे. त्यातून काय पुढे होईल देव जाणे.

जगात भारताची प्रतिमा बदलते आहे, स्नेकचार्मर्सचा देश आता माउसच्या कळीवर जगाला नाचवतो आहे +१००
त्यातून युरोप व इंग्लंडचे वर्चस्व कमी होत आहे, त्यामुळे भारताची जमेल तितकी बदनामी करण्याचे चालू आहेत असे मा़झे मत आहे.
मंगलायन, अ‍ॅस्ट्रोसॅट यांच्याबद्दलच्या बातम्या जास्त दिसत नाहीत, मुसलमानाला मारले की ती बातमी येते.
(आणि अश्या वेळी त्यांना मुसलमानांचा पुळका येतो, कारण हिंदूंचा जास्त राग)
अमेरिकेत काळे गोरे मेक्सिकन इतर यांच्याबाबतीत काय गोंधळ चालू आहेत, किती खून पडतात किती मास किलिंग होतात याच्या बातम्या व त्यावरील रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचे उमेदवार याचे मत ऐकले तर इथेहि काही कमी गोंधळ नाही.

भारताच्या दूतावासाने इथे भारताच्या चांगल्या गोष्टींचा जोरदार प्रचार केला पाहिजे, जाहिराती केल्या पाहिजेत. कारण सर्वसाधारण जनतेला त्याची इथे अजिबात कल्पना नाही. मग या वाईट गोष्टींकडे लक्ष जाणार नाही.

या गोष्टीची व्याप्ती प्रचंड आहे. तुम्हा आमच्या विरुद्ध युद्ध केली म्हणुन आम्ही आता तुमच्या बरोबर युद्ध पुकारले आहे हा त्याचा पाया किंवा गोल नाही. त्याचे उद्दिष्ट संपूर्ण्पणे वेगळे आहे.

कोणत्याही देशाने कितीही अलिप्त राहाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या देशाला याचा धोका होणार नाही हा आशावाद भाबडा वाटतो.

अनुमोदन! भाबडाच नाही तर धोकादायकहि.
आपण अलिप्त आहोत, आपण व चिनी भाई भाई असे म्हणून स्वस्थ बसल्याने मोठे नुकसान झाले. पाकीस्तानने १९४७ नंतर लगेच आपल्या देशात सामील झालेल्या काश्मीरवर हल्ला केला, त्यांना परत पळवून लावण्या ऐवजी प्रश्न युनोत नेला! असल्या गोष्टींचे फार वाईट परिणाम झाले.

भारताने या बंदुका बंदुकाच बनवून सीमेवर तैनात केल्या पाहिजेत का?
भारताने स्वतःच या बंदुका बनवणे शक्य असले तरी त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, त्यापेक्षा भारताला सध्या जेव्हढे बाहेर विकत मिळेल तेव्हढे विकत घ्यावे, मग स्वस्थ पणे अभ्यास करून हळू हळू आपल्या गोष्टी आपणच भारतातच बनवायच्या असे धोरण बरे होईल.
उदा. काँप्युटर. स्वतः काहीहि शोध न लावता, विकत घेऊन त्याच्या जोरावर उद्योगधंदे वाढवून देशात पैसा आणला.
औषधे स्वतः संशोधन करून बनवण्यापूर्वी जागतिक पेटंट कायदा मान्य न करता, तशीच औषधे भारतात बनवून स्वस्त केल्याने कित्येक जीव वाचले असतील.

Lol

झक्की Happy

सिरियात आयएसने तिसर्‍या महायुद्धाची फित कापली आहे का? रशिया-अमेरिका हे पारंपारिक शत्रू समोरासमोर पण एकाच उद्दिष्टासाठी सिरियात आले आहेत पण त्यांच्यातच जुंपेल अशी परिस्थिती आहे. रशिया सिरियन बंडखोरांना जास्त टारगेट करतंय आणि ह्यामुळे सिरियातील बंडखोरांच्या (फ्री सिरियन आर्मी) मोहिमेला फटका बसतो आहे असं वाटून सौदी अरेबिया सिरियन बंडखोरांना रणगाडाभेदी आणि विमानभेदी क्षेपणास्त्रे पुरवण्याची धमकी देतोय. ही लष्करी मदत सिरियातील अस्साद लष्कराविरोधात तसेच अस्साद राजवटीला सहाय्य करणार्‍या रशिया, इराण आणि हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या विरोधात असेल. तुर्कीच्या हवाई हद्दीत रशियन विमानांनी घुसखोरी केल्याने आधी त्यावरुन बजावूनही तसेच चालू राहिल्याने तुर्कीच्या एफ-१६ लढाऊ विमानांनी रशियाचे मिग-२९ पाडून टाकलंय. रशियन विमानं घुसखोरी करतात म्हणून इस्रायलनेही गोलन टेकड्यांमध्ये आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. रशियन विमानं कुणाला जुमानत नाहियेत.

गेल्या काही तासांत रशियाने ६०हून अधिक ठिकाणांवर हल्ले चढवले आणि दोन कमांडरसह ३००हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहिर केले. ह्या हल्ल्यांमुळे सिरियात गृहयुद्ध भडकेल असे अमेरिकेने बजावले आहे. ह्या हल्ल्यांचा सिरियन बंडखोरांना जास्त फटका बसतो आहे. रशियाची लढाऊ विमाने 'कॅब-५००' ह्या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहेत. अलेप्पो येथील दहशतवाद्यांचे शस्त्रास्त्रांचे कोठारही उद्ध्वस्त केले गेले आह आणि अलेप्पो शहराच्या उत्तरेकडील ताबा घेतलेल्या दहशतवाद्यांची पळता भुई थोडी झाली आहे असा दावा रशियन संरक्षण मंत्रालय म्हणतं आहे.

अमेरिकेने टीका करताना म्हटलं आहे की रशियाचे हवाई हल्ले मुख्य उद्दिष्टांपासून भरकटून आयएस विरोधी गटांवरच हल्ले करत आहेत. हे गट जर उद्या आयएसलाच सामिल झाले तर सिरियात गृहयुद्ध भडकेल. त्याची झळ रशियालाही बसेल. आता रशियाच्या हल्ल्यांनंतर पेंटॅगॉनने सिरियन बंडखोरांना प्रशिक्षण देण्याची ५० कोटी डॉलर्सची योजना पुढे ढकलली आहे.

रशिया जास्त अग्रेसिव्ह झाल्यावर रशिया व इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍यांची चर्चा पार पडली पण त्यातून फारसे काही न निघाल्याने इस्रायलने गोलन टेकड्यांमध्ये लष्कर वाढवलं. ह्या चर्चेमध्ये सिरियात हल्ले चढवणार्‍या रशियाने गोलन सीमेजवळ हल्ले चढवू नयेत असा प्रस्ताव इस्रायलने दिला होता. आणि समजा रशियाची विमाने गोलन सीमेपर्यंत पोहोचलीच तर त्याची अधिकृत माहिती इस्रायली लष्कराला द्यावी असेही आवाहन होते. पण रशियाने हे सगळं नाकारल्याचं इस्रायलच्या Debkafile ह्या साईटवर म्हटलं आहे.

http://www.debka.com/article/24942/Israel-is-braced-for-Russian-aerial-i...

गेल्या आठवड्यात रशियाच्या 'सू-३०' आणि 'सू-२४' ह्या लढाऊ विमानांनी सिरियातील 'हताय' भागात हल्ले चढवताना तुर्कीच्या मध्ये घुसखोरी केली होती. रशियाने खेदही व्यक्त केला होता. पण इस्रायलच्या दाव्यानुसार रशियाने जाणूनबुजून तुर्कीमध्ये घुसखोरी केली आणि गोलन टेकड्यांमध्येही तसेच करतील. रशियन लष्करी अधिकारी जनरल बोगानोस्की ह्यांनी इस्रायलच्या गोलन टेकड्यांजवळ दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांवर हल्ल्याचे संकेत दिले होते. बुधवारी रशियन विमानांनी हमा जवळ हल्ले चढवल्यावर लगेच सिरियन लष्कर आणि हिजबुल्लाहने आयएसवर हल्ले चढवण्याचे ठरवले. त्यात हमा भागातील कारवाईबरोबर गोलन सीमारेषेवरील कुनित्रा क्रॉसिंगजवळ सिरियन लष्कर हल्ले चढवणार होतं आणि रशियन विमानं त्यात मदत करणार होती. पण सिरियन लष्कराला ते जमलेच नाही. पण जर रशियन विमानांनी गोलन मध्ये हल्ले चढवले तर सिरियन लष्कर व हिजबुल्लाहचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ते गोलन टेकड्यांमध्ये हल्ले चढवतील. हे सगळं असं आहे त्यामुळे इस्रायल लष्करही तयारीत आहे.

तुर्कीची राजधानी अंकारा इथे तुर्की व कुर्द बंडखोरांच्या संघर्षाच्या विरोधात निदर्शने चालू असताना दहशतवाद्यांनी बॉंबस्फोट घडवून आणला व त्यात ९५ जण बळी गेले आहेत.

http://m.firstpost.com/world/protesters-gather-at-scene-of-ankara-bombin...

http://indianexpress.com/article/world/middle-east-africa/ankara-twin-bl...

अमेरिकन लोक वर वर तरी मानवी हक्कांचे रक्षण, लोकशाहीची स्थापना, निर्वासित लोकांबद्दल सहानुभूति, वगरे म्हणतात. पण अर्थातच त्या सगळ्या भागावर आपले वर्चस्व असावे, निदान अमेरिकन लोकांवर ठिकठिकाणी होणारे अतिरेकी हल्ले थांबवावे, खुद्द अमेरिकेच्या भूमीवर हल्ला होण्याची शक्यता नाहिशी करणे या कारणाने सिरियात गुंतली आहे. अमेरिकेचे संरक्षण सर्वात महत्वाचे असल्याने आय एस वर हल्ले त्यांना महत्वाचे वाटतात. मानवी हक्क वगैरे बोंबाबोंब केली तेंव्हा आसादला घालवणेहि त्या दृष्टीने जरूरी.

पण गंमत बघा - आसाद च्या विरुद्ध आयसिस, म्हणजे अमेरिकेला दोघांशीहि लढणे आवश्यक. पण इराक अफगाणिस्तान मधे ट्रिलियन डॉलर्स नि हज्जारो माणसे मारली नि लक्षावधि माणसे अपंग केली, आता तिथे मोठे युद्ध करणे जड जाते आहे.

रशियाला आसाद पाहिजे आहे कारण तो अमेरिकेला नको. शिवाय तोहि आयसिस विरुद्ध. बरे अफगाणिस्थान नंतर बरीच वर्षे मोठे युद्ध नाही, युक्रेनमधे अमेरिकेचे काही चालले नाही, म्हणून त्यांच्या लष्कराला ही सोन्याची संधि. त्यांना काही मानवी हक्क वगैरेची पडली नाही.

म्हणून आता अमेरिकेत असे म्हणतात की आसादला मागून पाहून घेऊ, आय एस गेलेले बरे नि तेहि रशियाने केले तर फारच बरे.

चौकट राजा | 9 October, 2015 - 21:32
रावी, त्या बातमीची लिंक देता का? > आता ती बातमी दिसत नाहीये ; पण इ-सकाळच्या शोधा मधे "अणू शास्त्रज्ञांचा " टाकलं की ती बातमी असणारी लिंक दिसत्येय; पण त्यावर क्लिक केल्यावर दिसत नाहीये ! Uhoh

सिरियामध्ये आता रशियाच्या बरोबरीने चायनाही उतरतो आहे अशी बातमी आहे. चायनाच्या विनाशिका तिथे आधीच दाखल झाल्या आहेत.

एडनमध्ये असलेली सौदीची विनाशिका हौथी बंडखोरांनी उद्ध्वस्त केली आहे. ही दुसरी विनाशिका नष्ट केली गेली आहे. गेले काही दिवस ह्या विनाशिकांमधून येमेनच्या ताईझ प्रांतात रॉकेट हल्ले होत आहेत. हे वृत्त इराणच्या एका चॅनेलने दिले आहे पण सौदीने त्यास पुष्टी दिली नाहिये. पण काही तासांतच सौदी आणि अरब मित्रदेशांचे येमेनवरचे हल्ले तीव्र झाले आहेत. त्यात एका जेलवर झालेल्या हल्ल्यात शेकडो कैदी फरार झाले म्हणे Uhoh
--------------

मध्यमवर्गीय विचार Wink -- एक एक विनाशिका विकत घ्यायला किती खर्च येत असेल ना? एक विनाशिका उद्ध्वस्त झाल्यावर किती तोटा? आणि पुन्हा तिची रिप्लेसमेंटही तितकी सोपी नाही. आपल्याकडे किती आहेत कुणास ठाऊक. नुकतीच टोर्पेडो लाँच करणारी पहिली भारतीय बनावटीची आयएनएस अस्त्रधारिणी आपल्या ताफ्यात आली आहे. नाव लई आवडलं मला. महिषासुरमर्दिनीसारखं वाटतं Happy

किरु, सिरियातील संघर्षाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता आणि चीनची इंधनसुरक्षाही धोक्यात आली होती. त्यामुळे सिरियात चीनचेही हितसंबंध आहेतच. आणि ह्याचमुळे अमेरिकेच्या नाराजीची फिकिर न करता चीन आयएस विरोधी युद्धात सामिल झाला आहे. अमेरिका-चीन तणाव वाढणार पण रशियाला मोठा सामरिक लाभ होईल.

सिरियातील संघर्षाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता आणि चीनची इंधनसुरक्षाही धोक्यात आली होती.>> Can you explain this. Syria is not oil rich country. In fact they don't have any oil reserves at least to support Chinese economy. as per Wiki Syrian oil production is 33,000 bbl/day. This is peanuts. So Chinese may have other reason but not energy security.

चीन, रशिया आणि इराणच्या क्रेडिट लाईन्स होत्या. सिरियावर तेलासंबंधी निर्बंध होते. अजून अस्साद राजवट आणि ह्या तीन देशांचे हितसंबंध ह्याबद्दल इथे माहिती आहे.

http://www.cfr.org/syria/syrias-crisis-global-response/p28402

गामा या बद्द्ल जास्त लिहू शकतिल.
>>
छे छे त्यांचा इथल्या 'संघटनां'बद्दल जास्त अभ्यास आहे.

आश्विनी तै ,

भारतातल्या विनाशीका क्लास नौका :
अ. राजपुत क्लास विनाशीका
ब. कोलकता क्लास
क. दिल्ली क्लास
ड. विशाखापट्ट्णम क्लास

एकुण सर्विस मध्ये असलेल्या विनाशीका १० : ५ भारतीय बनावटीच्या
५ सोव्हीएट बनावटीच्या

निनाद, २००३ मधे माझ्या कॉलेज मधील काही विद्यार्थ्यांनी पुण्याच्या ए आर डी ई मधे प्रोजेक्ट केला होता ज्यात त्यांनी अशा स्वयंचलित बंदुकांसाठी लागणारा स्टँड / पाया तयार केला होता. त्यांच्या प्रोजेकट्चे प्रेझेंटेशन बघून आम्ही खूप प्रभावित झालो होतो आणि लवकरच त्या बंदुका वापरात येतील अशी तेव्हा चर्चा झाली होती.
नंतर काय झाले देवाला माहिती पण आता २०१५ वर्ष अखेरीपर्यंत त्या येतील अशी बातमी आहे (मयेकरांनी दिलेल्या दुव्यामधे).
१२ वर्षे झाली तरीही अजून ह्या बंदुका येतच आहेत हे अतिशय खेदजनक आहे!

अश्विनी ताई - अवांतराबद्दल क्षमस्व.

चौकट राजा, अहो असे होणारच. अमेरिकेत शस्त्रात्रे बनवणार्‍या खाजगी कंपन्या अनेक. उघडपणे वा लबाडीने जगभरात शस्त्रे विकून प्रचंड श्रीमंत झालेले. ते स्वतःचा पैसा घालून अशी नवी नवी शस्त्रे बनवतात नि मग अमेरिकेला व इतरांना भरमसाट भावाने विकतात. विकत घेणारे सरकारीच, ते जनतेचा पैसा वाचवायला भाव करतील का? नाही. मग आनंदी आनंद गडे.
नुकतेच ऐकले की अंबानी च्या बायकोने ४४ कोटी रुपयांची एक साडी घेतली. तेव्हढ्या पैशात तुमचे संशोधन पूर्ण झाले असते, पण तसे झाले नाही. वर्ल्ड कप चे संघ घेण्यात करोडो रु. खर्च होतात, ते संशोधनासाठी का नाहीत. याला कारणे असतील पण मला समजत नाहीत.,

पण तशी जर वस्तुस्थिती असेल तर अशी शस्त्रे बाहेरूनच विकत घ्यावी, कारण देशाचे संरक्षण महत्वाचे व तातडीचे.

चौकट राजा फार आवांतर नसावे! Happy
अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्या असे देशी प्रकल्प साकार होऊ नयेत म्हणून प्रचंड प्रयत्न करतात. बहुतेकवेळा त्या त्या सरकारांची त्याला साथ असते. त्यामुळे सेंट्री गन्स विकणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी यात खोडा घातला असेल तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण नाहीतर त्यांचे युद्ध साहित्य कोण विकत घेईल?
त्यामुळे बाबुगिरीवर खापर फोडले जात असले तरी त्यामागे अनेकदा भलतेच लागेबांधे असू शकतात.

चौकट राजा, निनाद, आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अनुषंगाने थोडीफार चर्चा होणारच. तेवढ्याने धागा भरकटणार नाही किंवा वेगळा रंगही लागणार नाही Happy

अमेरिकेने हवाईदलाच्या सी-१७ ह्या विमानातून सुमारे ५० टन अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सिरियन बंडखोरांपर्यंत पोहोचवली आहेत. आता सिरियन बंडखोरांवर रशियाचे हवाई हल्ले झाल्यास ते परतवले जायची चिन्हे आहेत. बंडखोरांचा प्रभाव असलेल्या सिरियाच्या उत्तरेकडील 'हसाकाह' प्रांतात ही शस्त्रास्त्रे उतरवली गेली.

ह्या आधी ओबामांच्या आदेशानंतर पेंटॅगॉनने सिरियातील बंडखोरांचे सैनिकी प्रशिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला होता कारण अमेरिकेकडून शस्त्रे मिळूनही हे बंडखोर आयएस विरोधी संघर्षात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे त्या बंडखोरांना वगळून आयएस विरोधी यशस्वी कामगिरी करणार्‍या कुर्द व अरब बंडखोरांना शस्त्रे पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सिरियन बंडखोरांनी रणगाडाभेदी टोऊ ह्या क्षेपणास्त्राचा वापर सिरियन लष्कराविरोधात सुरु केला आणि त्यात लष्कराला नुकसान सोसावे लागत आहे. लष्कर माघार घेत असल्याने बंडखोर 'लताकिया' शहरापर्यंत धडकतील. लताकिया आणि तिथून जवळ असलेल्या तारतूस इथे रशियन नौदलाचा मोठा तळ आहे. त्यामुळे रशिया आणि सिरियन बंडखोरांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिरियाच्या जमिनीवर अमेरिका/रशिया शीतयुद्ध पेटल्याचा दावा चीनचे वृत्तपत्र 'द पिपल्स डेलि' करत आहे. म्हणजे सिरियातला संघर्ष मिटायचे नावच नाही, उलट हे दोन्ही देश सिरियाचा वापर करणार. ह्या आधी पाश्चिमात्य मिडियात सिरियामध्ये शीतयुद्ध सुरु असल्याचा दावा केला जात होता पण अमेरिकेने हा दावा नाकारला.

कोणतीही GPS प्रणाली सहज हॅक होऊ शकते म्हणून अमेरिकेने नौदल सैनिकांना ग्रह तारे पाहून मार्ग कसा शोधावा याचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. १९९० नंतर उपग्रह सोडून GPS प्रणाली विकसित केली गेली आहे. पण त्यात अनेक घोटाळे होत असल्याने जुनाच मार्ग चोखाळायचे ठरवले आहे.

ह्म्म्म.... माणसाने गेल्या एका शतकात जेवढे शोध लावले त्यातल्या प्रत्येक शोधाचा गैर वापर माणसानेच केला आहे. हे शोध लावल्यामुळे आयुष्य सुकर झाले असे वाटत असतानाच त्या शोधाच्या गैरवापराची उदाहरणे समोर येतात आणि मग हे शोध लागले नसते तर आयुष्य आधीसारखेच साधे राहिले असते असे वाटायला लागते. माणुस इतका विध्वंसक का आहे/होतोय्/झालाय??? ज्या बुद्धीचा आपण इतका अभिमान बाळागतो, तिचा उदो उदो करतो तीचा वापर आपण सुखाने राहण्यासाठी करायचा आहे की प्रत्येक मनात भिती निर्माण करायचा आहे?? कठीण आहे सगळॅ. मी हल्ली कुठल्याही बातम्या वाचायचे बंद केले. भयानक भिती दाटुन येते मनात.

मी हल्ली कुठल्याही बातम्या वाचायचे बंद केले. भयानक भिती दाटुन येते मनात. हल्ली बातम्या पण खर्या कुठे असतात? मरडॉ़क/फॉक्सला जे आवडेल ते तुम्हाला पाहावे अणि वाचावे लागते. आणि पर्याय म्हणून अल जझिरा असले तरी ते फक्त एकाच रंगाच्या बातम्या देतात...

सिरियामध्ये कडबोळं झालं आहे आणि जनतेचं वाट्टोळं Sad

आतापर्यंतच्या सिरियातल्या उलथापालथी आपण फॉलो करतच होतो, पण आता सगळ्यांचे पायात पाय आले आहेत.

- सिरियाच्या अलेप्पो शहरातील संघर्षात सिरियाच्या लष्कराच्या बाजूने इराणने सैन्य धाडल्याचे ब्रिटनच्या टेलिग्राफने म्हटलं आहे. म्हणजे इराण उतरला युद्धात.

- सिरियाच्या अस्साद राजवाटीविरोधात 'जिहाद' पुकारण्याची घोषणा सौदीच्या धर्मगुरुंनी केली आहे आणि सौदीच्या मित्रदेशांतील जनतेलाही ह्या युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे (म्हणजे त्या मित्रदेशांतील जनतेलाही फुकटच्याफाकट युद्धात ओढणार). म्हणजे सौदी उतरला.

- सौदीने सिरियन बंडखोरांवर हल्ले करणार्‍या रशियाला बंडखोरांना सहाय्य करु अशी धमकी दिल्याने सौदी विरुद्ध रशिया.

- काल आयएसने रशिया व अमेरिका असं दोन्ही देशांच्या विरोधात धर्मयुद्ध (?) पुकारण्याची घोषणा केली आणि आता ह्यापुढे आयएस रशिया व अमेरिकेत घुसून प्रत्युत्तर देईल अशी उलट धमकी दिली.

- हा संघर्ष फक्त दोन देश किंवा गटांमधला न उरता ह्याला अनेक बाजू निर्माण होवू लागल्या आहेत. आयएसच्या विरोधात लढणार्‍या सिरियन कुर्दांना अमेरिका शस्त्र पुरवणार. पण सिरिया, इराक व तुर्की ह्या देशांमधे एकवटलेल्या कुर्दांना शस्त्रसज्ज केले गेलेच तर तुर्की ते चालू देणार नाही असे तुर्की अधिकार्‍यांनी बजावले. कारण इथले कुर्द स्वतंत्र देशाची मागणी करत असून इराकमधल्या कुर्दबाहुल्य भागात त्यांनी स्वायत्त सरकारही स्थापन केले होते. तुर्की सरकार बंडखोर कुर्दांवर कडक कारवाई करतंय. असे असताना कुर्दांना शस्त्रं मिळाली तर तुर्कीला महागात पडेल.

नक्की कोण कुणाशी आणि का लढतंय तेच कळेनासं झालंय. वेड लागलंय सगळ्यांना. आखातातील राजकारण आणि आखाताबाहेरचे देश ह्यांचा ह्या संघर्षात गुंता झालाय आणि हो दिवसागणीक वाढतच जातोय Uhoh

सिरियाच्या आकाशात अशी सगळ्याच देशांची विमानं घोंघावायला लागली आणि चुकून एखाद्या देशाचं विमान गैरसमजातून पाडलं गेलं तर आयएस राहिल बाजूला आणि तिसरं महायुद्द भडकेल. उरल्या सुरल्याची आयएस वाट लावत बसेल.

-

Pages