आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
निरपराधी लोकान्वर पॅरिस मधे
निरपराधी लोकान्वर पॅरिस मधे झालेल्या भ्याड हल्ल्यान्चा निषेध.
पॅरिसवर झालेल्या हल्ल्यांच्या
पॅरिसवर झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेनंतर आयफेल टॉवर अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हल्ल्याच्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की बुरखा न घातलेल्या अगदी तरूण हल्लेखोरांच्या हातात कॅलॅश्निकोव्ह रायफल होत्या आणि ते गर्दीवर अंधाधुंद गोळीबार करत होते.
एका हल्लेखोराच्या मृतदेहाजवळ सापडलेला सिरियन पासपोर्ट ग्रीसमार्गे आलेल्या स्थलांतरिताचा असल्याचे आढळले आहे.
पोलंडने पॅरिसवरच्या हल्ल्यांनंतर स्थलांतरितांना स्वीकारणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
http://m.timesofindia.com/world/europe/Paris-terror-attacks-Eiffel-Tower...
http://m.independent.ie/world-news/europe/paris-terror-attacks/live-pari...
http://www.dnaindia.com/world/report-paris-attacks-witness-says-gunman-w...
----------
मुंबई हल्ल्यांची आठवण होतेय. फ्रान्सने IS विरोधात पाऊल उचलल्यावर काही दिवसांपुर्वीच ISने फ्रान्सला धमकी दिल्याचे वृत्त ह्या धाग्यावर लिहिले होते. आणि नुकतेच अमेरिका आणि युरोपवर हल्ले करु असे उघडपणे ISने सांगितले आहे. कोवळ्या तरुणांची भरती, आधुनिक शस्त्रसाठा व भयानक काही घडवण्याचे नियोजन हे काही अचानक थोड्या अवधीत घडलेले नाही. बराच काळ हे धुमसतं आहे आणि आता धुम्मसची ठिणगी, ठिणगीचा निखारा आणि निखार्याचा वणवा होतोय.
कोणत्याही राष्ट्राचे लष्कर हे सहजासहजी मोडून काढू शकेल असं वाटत नाही. IS म्हणजे काय? माणसांचाच समुह ना? त्यांची मनं इतकी बिथरवणं, तरुणांच्या मेंदूचा ताबा घेतला गेल्यासारखं त्यांचं वागणं ही साधी तरुणाईच्या वेडेपणाची गोष्ट वाटत नाही. भल्याबुर्याची किंचितही जाणीव त्यांना उरल्याचे वाटत नाही. कुठे चार शब्द चांगले कानावर पडले तरी त्यांची श्रुती जागृत नाही.
ह्यांचा प्रतिकार सामान्यांनी कसा करायचा? कोण जाणे, असे हैवान आपल्यातही मिसळून वावरतील. एका क्षणात होत्याचं नव्हतं करतील. सतत सावध राहणं, आजूबाजूच्या/जगभरातल्या घडामोडींकडे उदासिन न राहता पाहणं, होता होतील तितकी सत्कर्मं करुन आपली आंतरीक ताकद वाढवणं, आपत्कालिन व्यवस्थापनाचे जमतील तसे धडे घेणं आणि डोळसपणे प्रसंगावधान राखून ते अंमलात आणणं.....बाकी "जा को राखे साईयाँ, मार सके ना कोई".
नैर्ऋत्य जपानला ७ रिश्टरचा
नैर्ऋत्य जपानला ७ रिश्टरचा भूकंपाचा धक्का बसला असून लहान त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
http://dailycaller.com/2015/11/14/magnitude-7-0-earthquake-rocks-japan-t...
http://www.infowars.com/repor
http://www.infowars.com/report-paris-attacker-was-syrian-refugee-who-arr...
काल एका चॅनेलवर सांगण्यात
काल एका चॅनेलवर सांगण्यात आले की, पहिल्यापासून फ्रान्स इसिसच्या रडारवर आहे . मध्ये कार्टूनचेही निमित्त झाले. त्याने ऐसिसचे लक्ष फ्रान्सवर अधिकच आहे. आपल्याकडे हिंदू मुस्लिम तेढ पोर्र्वीपासून आहे पण १९९१ पूर्वी बॉम्बस्फोट होत नव्हते.रथयात्रा आणि बाबरी प्रकरणाने आंतरराष्त्रीय जिहादी समूहाच्या नकाशावर आपण कारण नसताना आलो. राजकारण्याना त्यात गंमत आणि स्वार्थ वाटत असेल पण हा एक मोठा टर्निन्ग पॉइन्ट आहे. त्यामुळे भारतात अशान्तता माजवण्या च्या पाकच्या प्रयत्नाना आंतरराष्ट्रीय परिमाण मिळाले आणि बॉम्बस्फोटाच्या मालिकाच चालू आहेत. सध्याचे वातावरण देखील असलेच संदेश देनारे होते आहे हे इथल्या वाचाळवीराना कळत नाही त्यामुळे इसिसचे लक्ष भारताकडे जायचा धोका आहे. इसिसवाले पाकड्यांपेक्षा आणि अल कायदा पेक्षाही कडवे आणि हिंसक आहेत हे तर दिसतेच आहे.
http://wap.business-standard.
http://wap.business-standard.com/article/news-ians/paris-attackers-can-t...
पॅरिस हल्लेखोर भारतीय हल्लेखोरांचे प्रतिनिधित्व करत नाहित.
सिरियातील सिव्हिल वॉर संपून
सिरियातील सिव्हिल वॉर संपून तिथे निवडणूका होतील का?
http://www.dnaindia.com/world/report-syria-talks-produce-election-road-m...
फ्रांस मध्ये पुर्ण युरोपच्या
फ्रांस मध्ये पुर्ण युरोपच्या तुलनेने सर्वात जास्त मुस्लिम रहातात,
आताच्या पॅरिस हल्यात लोकल लोकांचा सहभाग होता आणी असे हल्ले स्लिपर सेल्स मुळेच शक्य होत असतात !
फ्रांस, भारता प्रमाणेच गेले कित्येक दशक दशहतवादी कारवायांना बळी पडत आहे पण तो भारतासारखा सॉफ्ट स्टेट नाहीय. ब्रम्हदेशात झालेल्या अत्याचारासाठी भारतातल्या जनतेला वेठीस धरण्याचे काम अतिरेक्याकडुन झाले. असे अनेक हल्ले भारतावर होत आहेत आणी होत रहातील !
धन्यवाद चौकट राजा. या
धन्यवाद चौकट राजा.
या धाग्यावर चांगली माहिती मिळतेय
सिरियावरुन अमेरिका व
सिरियावरुन अमेरिका व रशियामध्ये जुंपली असली तरी त्याचा फायदा दहशतवाद्यांना घेवू देणार नाही अशी घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री केरी ह्यांनी केली. त्याला रशियानेही दुजोरा दिला आहे. सिरियात आयएस विरोधात रशिया आणि अमेरिका समन्वयाने हल्ले चढवतील.
फ्रान्सच्या उत्तर भागात
फ्रान्सच्या उत्तर भागात असलेल्या कॅलाईस बंदराजवळच्या निर्वासितांच्या छावणीला आग लागून ४०+ तंबू बेचिराख झाले. कुणीही दगावले नसले तरी निर्वासितांना देण्यात येणार्या सुविधा व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. ह्या आगीत घातपाताचा प्रकार आहे का हे तपासले जात आहे. परंतु शॉर्टसर्किट किंवा त्या भागात गॅस सिलिंडर्सचा साठा असल्याने त्याचा स्फोट झाल्याचीही शक्यता आहे.
ही छावणी 'जंगल' छावणी म्हणून ओळखली जाते. तिच्यात सिरिया व उत्तर अफ्रिकेतून आलेले जवळजवळ ६००० निर्वासित आहेत. काही दिवसांपुर्वीच कडक सुरक्षा निर्बंधांवरुन निर्वासितांचे गट आणि पोलिसांत जोरात संघर्ष झाला होता व त्यात २७ पोलिस जखमी झाले होते.
केश्विनी, अमेरिका आणि रशिया
केश्विनी, अमेरिका आणि रशिया आता संयुक्तपणे आणि समन्वयाने आएस विरोधी मोहिम राबवतील ही चांगली गोष्ट आहे. पण त्यापाठी फ्रान्समध्ये झालेला दहशतवादी हल्ला हे मुख्य कारण आहे. कारण आता त्यांना जाणीव झाली की आयसचा धोका हा फक्त मध्यपुर्वेपुरता न राहता तो युरोपचे दरवाजे ठोठावत आहे आणि आज ना उद्या अमेरिका आणि रशियासुध्दा त्यांच्या हल्ल्याचे शिकार होऊ शकतात.
ही सुबुध्दी त्यांना आधीच आली असती तर आजपर्यंत आयसची चांगलीच नाकेबंदी झाली असती. असो देर आए दुरूस्त आए हेही नसे थोडके.
नरेश, आयएस जगाला सळो की पळो
नरेश, आयएस जगाला सळो की पळो करुन सोडायच्या मार्गावर असल्याने अमेरिका व रशिया एकत्र येण्याचे आश्चर्य घडेल.
जी-२० परिषदेत भारत व
जी-२० परिषदेत भारत व ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा होवून भारत ऑस्ट्रेलियामधील नागरी अणुकराराची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले. लवकरच हा करार मार्गी लागेल. ऑस्ट्रेलिया हा युरेनियमचा सर्वाधिक पुरवठा करणारा देश आहे.
गेली ३ वर्षे दोन्ही राष्ट्रांमध्ये नागरी अणुकरारावर चर्चा सुरु आहे. परंतु भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सही केल्याशिवाय हा करार होणार नाही अशी ऑस्ट्रेलियाची भूमिका होती. भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वाढते महत्व, अर्थव्यवस्थेची क्षमता ह्याचा दाखला देत ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाने विरोधी पक्षनेत्यांना न जुमानता हा करार करण्याची तयारी दर्शवली आहे. हा करार मार्गी लागल्यास भारताला अणुइंधन मिळवणे सोपे जाईल. आवश्यक तेवढा पुरवठा झाल्यास अर्थव्यवस्था आणि तिची गती बदलू शकते असा दावा केला जात आहे.
पॅरिसनंतर आता वॉशिंग्टनला
पॅरिसनंतर आता वॉशिंग्टनला टारगेट करु अशी आयएसने धमकी दिली आहे. सिरिया आणि इराकमध्ये हल्ले चढवणार्या प्रत्येक देशाला असे घातपात भोगावे लागतील असे आयएसच्या नव्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. इराकमधल्या 'विलायत किरकूक' नावाच्या आयएसशी निगडीत गटाने ह्या फिल्ममध्ये पॅरिसहल्ल्यानंतरची क्षणचित्रे दाखवली. फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्यूअल वॅल्स ह्यांनी युरोपला नव्या हल्ल्यांसाठी तयारीत राहायला सांगितले आहे. ब्रिटननेही देशातील सुरक्षा वाढवली आहे.
--------------
सुरक्षा वाढवून किती वाढवणार? इकडून तिकडे दहा पावलं जाणार्याचंही स्क्रिनिंग करणं केवळ अशक्य आहे. आपल्याकडे गजबजलेल्या झवेरी बाजार सारख्या ठिकाणी किंवा सीएस्टीला कितीही कॅमेरे लावा, कितीही मेटल डिटेक्टर लावा....तरी अंगावर कोण काय स्फोटकं बांधून फिरेल ते कळणारही नाही. मेटल डिटेक्टरच्या बाजूनेच कितीतरी लोक ये जा करत असतात. ही काय मधेच अडगळ...असे भाव गर्दीच्या वेळी असतात.
पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्सने
पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्सने प्रत्युत्तर म्हणून सिरियातील 'राका' शहरातील आयएसच्या मुख्यालयासकट इतर ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलान्दे ह्यांनी आता आयएसची गय केली जाणार नाही असा इशारा दिला आणि आयएस विरोधी संघर्षात फ्रान्स सहभागी झाल्याचे जाहिर केले. (मनात आलं, असे इशारे भारतावरच्या हल्ल्यांनंतर दिले/नाही दिले तरी शत्रूवर चाल करुन जाणे घडणार नाही. नुसतं प्रतिहल्ला करु असे बोलणेही होणार नाही. बोलले तरी आपल्या सहिष्णू प्रतिमेला तडा जाईल ह्या भीतीने अंतर्गत विरोध होईल. अर्थात त्यावेळी जे नेतृत्व असेल त्याचा निर्णय योग्य असेल असं समजून चालू आणि सगळी मतभिन्नता विसरुन एक होवून आपल्या लष्कराला सहकार्य करु. उताविळ आक्रमकता दाखवून चालणार नाहीच. पण मुंबई हल्ल्यांची आठवण होऊन रक्त उसळतं अक्षरशः. असो, आपण खूप सहिष्णू आहोत.....)
रविवारी सुरु झालेल्या ह्या फ्रेंचांच्या कारवाईत १० लढाऊ विमाने होती. त्यात 'मिराज २०००' व 'रफायल' (नाव ओळखीचं वाटतंय
) ह्या प्रगत विमानं होती. UAE आणि जॉर्डन ह्या अरब देशांमधून ह्या विमानांनी आकाशात झेप घेतली व हल्ले चढवले. अमेरिकेने त्यांना सहकार्य केले.
राका शहर ही आयएसने आपली राजधानी म्हणून घोषित केली आहे. फ्रेंच हल्ल्यांमध्ये आयएसचे मुख्यालय, ट्रेनिंग सेंटर, शस्त्रास्त्रांचे गोदाम उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जातो आहे. जीवीतहानी झाली नसली तरी पाणी पुरवठा व वीजपुरवठा करणार्या केंद्रांवर हल्ले झाल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. बिचारे सिरियन लोक... (भारतातूनही कितीतरी तरुण आयएसमध्ये भरती झाल्याचे उघड झाले आहेच. असे कुणी दहशतवादी कुठल्या देशात कुरापती काढून आपल्या शहरात येवून लपून बसले आणि त्यांना बिळाबाहेर काढायला आपल्या शहराच्या डोसक्यावर कुणी बाँब, मिसाईल डागू लागलं तर काय होईल?
)
पॅरिस हल्ल्यात एकून ८ दहशतवादी असल्याचे प्राथमिक माहितीतून उघड झाले आहे. त्यातील ७ मेले आणि एक २६ वर्षांचा सालेह अब्द-इस्लाम नावाचा तरुण फरार आहे. तो मोटारीतून पळाला. त्याचा फोटो प्रसिद्ध करण्यास उशीर झाला आणि तेवढ्यात फ्रेंच पोलिसांनी बेल्जियमच्या सीमेजवळ सालेहची कार अडवून चौकशी करुन सोडून पण दिली. बाकीच्यांपैकी काहींची ओळख पटली असून त्यातील अहमद नावाच्या दहशतवाद्याने सिरियात प्रशिक्षण घेवून तुर्की मार्गे युरोपमध्ये आला. इटलीच्या तटरक्षकदलाने बुडणार्या जहाजातून ज्या स्थलांतरितांची सुटका केली होती त्यात तो होता. नीचपणाचा कळस. आता फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, बल्गेरिया, बेल्जियम व इतर देशांमध्ये संशयितांची धरपकड चालू आहे.
बोलले तरी आपल्या सहिष्णू
बोलले तरी आपल्या सहिष्णू प्रतिमेला तडा जाईल ह्या भीतीने अंतर्गत विरोध होईल >>
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सदस्यांनी व प्रमुख क्रिस्तिन लँगार्ड ह्यांनी चीनच्या युआन ह्या चलनाला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्याची शिफारस केली आहे. सद्ध्या 'स्पेशन ड्रॉईंग राईट्स' (SDR) मध्ये अमेरिकी डॉलर, युरो, ब्रिटीश पौंड व जपानच्या येनचा समावेश आहे. आता महिना अखेरीस ह्या बाबतचा निर्णय जाहिर करणे एवढीच औपचारिकता राहिली आहे असे म्हटले जाते.
मनिष, आपली द्विधा परिस्थिती
मनिष, आपली द्विधा परिस्थिती होतेच की. आपल्याला असं दुसर्या देशावर आक्रमण करण्याचा इतिहास नाहीये. त्यामुळे असे हल्ले झाल्यास परिस्थिती संयम राखूनच हाताळावी लागते. म्हणजे मनातून प्रत्येकाला राग राग येत असतो हल्ले करवणार्या राष्ट्राचा पण आपली तत्वे आपण सोडूही शकत नाही आहोत. हे युरोपियन देश बघ धडामकन हल्ले करुन मोकळे होतात.
हे युरोपियन देश बघ धडामकन
हे युरोपियन देश बघ धडामकन हल्ले करुन मोकळे होतात.>>>>. म्हणूनच ते खम्बीर आहेत. उगाच कुठल्याही आमिषाखाली कोणाचीही गय करणे त्यान्च्या तत्वात बसत नाही. आपल्या देशाचा नागरीक हा कुठल्या जाती-धर्माचा आहे याच्याशी त्याना घेणे-देणे नसते. त्याची सुरक्षा हे आपले प्रथम कर्तव्य अशी त्यान्च्या सरकारची भावना असते.
जास्त न बोललेले बरे.
अश्विनी.. सहिष्णूता किंवा
अश्विनी.. सहिष्णूता किंवा तत्व सोडायचा प्रश्न नाहिये तो.. जेव्हा गरज पडली तेव्हा युद्ध केलेलंच आहे.. अमेरिका, फ्रान्स आणि युरोपीय देशांची सीमा सिरियाला (किंवा इराकला) लागून नाहिये तसंच सिरिया अण्वस्त्रसज्ज सुद्धा नाहिये त्यामुळं त्यांना असल्या कारवाया करायला बाकिचा फारसा विचार करावा लागत नाही. शिवाय त्यांनी असा हल्ला केला तर त्यांच्यावर कोणि आर्थिक, सामरिक बंधने नाही घालत (कारण ते स्वतः बंधने घालणार्या संघटनेत आहेत). आपल्याला हजार गोष्टींचा विचार करावा लागतो.. आंतरराष्ट्रिय राजकारण एवढं सोपं असतं तर काय मग..
आपल्याला हजार गोष्टींचा विचार
आपल्याला हजार गोष्टींचा विचार करावा लागतो.. आंतरराष्ट्रिय राजकारण एवढं सोपं असतं तर काय मग..>>> तेच तर! समोरचा येवून आपल्या आईला मार देवून जातो आणि आपण त्याचे तिथल्या तिथे हात तोडून ठेवू शकत नाही. देश आईच आहे आपली म्हणून अपमानाचे दु:खही तेवढेच आहे. मला माहित आहे की भावूकपणाने वागून चालत नाही. तिथे डिप्लोमसीच लागते. पण आपल्या आपल्यात तो सल बोलायला काय हरकत आहे म्हणून बोलतेय.
आपल्या आपल्यात तो सल बोलायला
आपल्या आपल्यात तो सल बोलायला काय हरकत आहे म्हणून बोलतेय >> त्याच्याबद्दल मला काहीच हरकत नाही अश्विनी.. पण तुम्ही "अंतर्गत विरोध होइल कारण सहिष्णू प्रतिमेला तडा जाइल" हे जे कारण दिलं ते मला पटलं नाही म्हणून ती पोस्ट..
मनीष, अहो जाहो नको हो.
मनीष, अहो जाहो नको हो. सहिष्णू प्रतिमा आहे म्हणून आपण शेजारची चूड आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडू शकतोय. हेल्दी अंतर्गत विरोध हा लोकशाहीचा अविभाज्य पैलू आहे. काही चुकत असेल तर अंतर्गत विरोधाने (पण आपलेपणानेच) दर्शवले जाऊ शकते.
असो, इसिसचे आतापर्यंत दिसलेले रुप हे हिमनगाचे टोक वाटतेय आता. आधीची महायुद्ध राष्ट्रा राष्ट्रांत झाली. हे महायुद्ध काही वेगळंच आहे.
अश्विनी ताई दर वेळी प्रत्यक्ष
अश्विनी ताई दर वेळी प्रत्यक्ष हल्ला करुन उत्तर द्यायला हव असच नाही.
यूरो, पटतंय. तेच तर लिहिलंय.
यूरो, पटतंय. तेच तर लिहिलंय. प्रत्यक्ष हल्ला करणे हे आपल्यासाठी उताविळी ठरेल.
आता सगळ्यांनी अहो जाहो, ताई बिई म्हणणं बंद करा. नाहीतर मी सगळ्यांना दादा म्हणेन.
नाहीतर मी सगळ्यांना दादा
नाहीतर मी सगळ्यांना दादा म्हणेन >> अर्रर्र..
<<<<<<<<<<अंतर्गत विरोध होइल
<<<<<<<<<<अंतर्गत विरोध होइल कारण सहिष्णू प्रतिमेला तडा जाइल >>>>>>>>
हे म्हणण खर करण्यासाठीच मणी शंकर अय्यरने पॅरिसच्या हल्ल्याच्या नंतर लगेच त्याच समर्थन करत प्रतिक्रीया दिलेली आहे की " हा हल्ला अँटी मुस्लिम फोबिया युरोपला झालेला आहे म्हणुनच होत आहे " युरोपच सिरियाच्या निर्वासितांना आश्रय देत आहे हे ते विसरले !!
आता तर पाकिस्तानच्या पेपरला दिलेल्या मुलाखतीत म्हणे " मोदीला सत्ते बाहेर केल्याशिवाय पाकिस्तानशी बोलण करता येणार नाही "
>>फ्रांस, भारता प्रमाणेच गेले
>>फ्रांस, भारता प्रमाणेच गेले कित्येक दशक दशहतवादी कारवायांना बळी पडत आहे पण तो भारतासारखा सॉफ्ट स्टेट नाहीय. ब्रम्हदेशात झालेल्या अत्याचारासाठी भारतातल्या जनतेला वेठीस धरण्याचे काम अतिरेक्याकडुन झाले. असे अनेक हल्ले भारतावर होत आहेत आणी होत रहातील !<<
गजाभाऊ, सहमत. फ्रांस सॉफ्ट्स्टेट नाहि आणि त्यांची घटना रहिवास्यांना धर्माच्या नावाखाली फालतु सवलती देत नाहि ज्या सुरक्षेला बाधा आणतील. दुसरं उदाहरण इस्रेलचं. ठिबक्याएव्हढा देश, शत्रुंनी तिन्ही बाजुने घेरलेला असताना, त्यांच्या नाकावर टिच्चुन तीव्र प्रतिकार करत रहातो. आयसिसने त्यांच्या शेजारी आपलं बस्तान बसवलं आहे पण या वाघाला डिवचायची त्यांची हिम्मत नाहि. टेररिस्टना कसं हँडल करावं याचे धडे सगळ्या देशांनी इस्रेलकडुन घ्यायला हवेत...
पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाईंड
पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या बेल्जियन तरूणाने आज छाप्याचा दरम्यान आत्महत्या केली असावी किंवा तो मारला गेला असावा. He is dead.
http://m.timesofindia.com/world/europe/Paris-attack-mastermind-may-have-...
Pages