मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि पान ४वर मि धाग्यासंबधीचे माझे मत लिहीले आहे.परंतु तुमचे विधान धक्कादायक असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते.

>>> सचिन पगारे | 8 September, 2015 - 21:22

ऋन्मेष धागा नि शिर्षक याच्याशी सहमत.कुणाच्याहि खाण्यावर बंदी आणता कामा नये मला तर गोवंश हत्या बंदिचाही निर्णय चुकिचा वाटतोय.
<<<

हेच मत ना?

मग 'सहमत' म्हणून शांत राहू शकता की? गोमांस वगैरे विषय धाग्याशी संबंधीत आहेत का पगारे? आणि ते खेचून नेत राहणे हे तर अजिबातच संबंधीत नाही, नाही का?

चर्चा भरकटवण्याची कौशल्ये कमी पडत आहेत तुमची पगारे! जैन लोकांच्या मागणीप्रीत्यर्थ इतर धर्मियांना मांसाहार न पाळायला लावणे ( न पाळायला लावणे म्हणजे मांसविक्री न होऊ देणे) असा हा विषय आहे. इथे गोमांस, तुम्हाला इतर काय चुकीचे वाटते, वगैरे, हे कशासाठी म्हणे?

आपण आपल्या खाद्यावर चार दिवस बंदी आलि तर आकाडतांडव करतो.परंतु ज्यांच्या खाण्यावर कायमची बंदी आलिय त्याबाबत बोलतही नाही.

मुम्बई पालिकेत भाजपचे बहुमत नाही. इतर सर्व पक्षांचा- शिवसेना, मनसे, कोंग्रेस, राकॉ - सर्वांचा म्हणे विरोध आहे. मग अल्पमतातील भाजपने पालिकेत ठराव कसा पास केला??????
काय गड़बड़ आहे कोणी जाणकार सांगू शकेल?

ह्या बंदीचा जाहीर निषेध!!! धर्म चार भिंतींच्या आड ठेवणे गरजेचे आहे. त्याला धर्मनिरपेक्ष सरकार म्हटले जाते. नाहीतर अश्या गोष्टींना अंतच राहणार नाही. देवाला नमस्कार न करणे, दिवसातून देवळात एकदातरी न जाणे हा गुन्हा आहे असे अनेक फतवे निघू शकतील.

जे आज अमेरिकेत किम डेविस ही बाई करते आहे तेच उद्या भारतात सगळे करू लागले तर? http://www.nytimes.com/2015/09/04/us/kim-davis-same-sex-marriage.html?ac...

गोमांसाचा संबंध का नाही ?

हिंदूनी मुस्लिमांवर गोमांसबंदी लादली.

आता जैन हिंदूंवर मांसबंदी लादत आहेत , मग आता तक्रार कशाला ?

हा सगळा मोदीसरकारचा करिष्मा आहे. ते भाजपलाही खुष ठेवणार.. आणि इतरांनाहि! प्रत्येक धर्मात जो जो गाढवपणा आहे, त्याला मधून मधून अशीच सूट/सवलत देणार. हुशार राज्यकर्ते जनतेच्या देवभोळे पणाचा फ़ायदा उचलण्यास कध्धिही चुकत नसतात..
आपणही त्यांना सहाय्यभूत होऊन चातुर्मासात कांदा लसूण वांग विक्रिवर बंदि आणायचि मागणी केलि पाहिजे. नाही का?
(खंरं)सेक्युलर शासन ज्याला खायचय त्याची उपेक्षा करत नसत,ज्याला न खायचय त्याला खाण्याची बळजबरि / आग्रहहि करत नसतं. यात कोणाचिहि गैरसोय होत नाही.
उलट धर्मवादाला बळि पडलेलं अथवा त्याच्या वापराला तयार- असलेलं शासन , हे अशा प्रकारचे "त्या त्या समाजाना बरं वाटणारे" निर्णय घेऊन त्या त्या समाजाचा फ़ायदा उठवायच्या त-यारित नेहमी असतं..
आपण यात कोणाला उचलून धरायचं? हा साधा निर्णय सूज्ञपणे आपल्याला घ्यायचा आहे.
जैनांच्या बाजूनी दिलेल्या निर्णयाचा मी अनेकवार निषेध करतो.. आणि "त्यानाही गटारात लोळू द्या आम्हीही लोळणार !" ह्या टनाटनि मानासिकतेचा धिक्कार!!!

अस्विकार्य टनाटन कैदिक भोंदू मर्म की ......... असो!
आपला(च):- सावरकरि हिंन्दू भारतीय.

अरेच्चा. आज चखन्याला आय मीन जेवायला काय होतं म्हणे? मेलेल्या प्राण्यांचं मास की जिवंत वनस्पती? "त्या"लोकांपैकी कुणी भेटलं की नाही आज?

*

ह्या बंदीचा जाहीर निषेध!!! धर्म चार भिंतींच्या आड ठेवणे गरजेचे आहे. त्याला धर्मनिरपेक्ष सरकार म्हटले जाते. नाहीतर अश्या गोष्टींना अंतच राहणार नाही. देवाला नमस्कार न करणे, दिवसातून देवळात एकदातरी न जाणे हा गुन्हा आहे असे अनेक फतवे निघू शकतील.
<<

या वाक्यांपेक्षा वेगळे काय बोलून राहिलो भौ आम्ही? आम्ही तरी फक्त पहिली दोन वाक्यं बोललो. पुढची तुमचीच आहेत.

*

मेरी याददाश्त उमर के साथ कमजोर होती जा रही हय. स्युडो फेकुलर, निधर्मांध, लांगुलचालक वगैरे म्हणजे काय हो?

हुशार राज्यकर्ते जनतेच्या देवभोळे पणाचा फ़ायदा उचलण्यास कध्धिही चुकत नसतात..
>>>
+७८६
ईंग्रज एकदा चुकलेले आणि १८५७ चा उठाव झालेला.

धर्म चार भिंतींच्या आड ठेवणे गरजेचे आहे. त्याला धर्मनिरपेक्ष सरकार म्हटले जाते. >>> धर्मनिरपेक्षतेची ही व्याख्या मान्य नाही. गेली अनेक वर्षे भारतात अधिकृतरीत्या रूढ असलेली व्याख्याच भारतासाठी योग्य आहे - सरकार सर्व धर्मांचा आदर करेल. सर्व धर्मांच्या लोकांनाच जर धर्म घराबाहेरही पाळायचा असेल (सार्वजनिक गणपती, मिरवणुका, यात्रा ई.) तर त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे सरकार का ठरवणार त्यांनी घरात ठेवावा म्हणून?

आमचे म्हणणे आहे खुशाल धर्म पाळा, घरात, बाहेर. पण दुसर्‍याला त्याचा त्रास होता कामा नये. आणि दुसर्‍याला तुमचा धर्म पाळायची सक्ती करू नका. ज्याला जेव्हा जे खायचे आहे ते खाउदे. हे दोन्ही पाळणे सध्या अवघड झाले आहे हे माहीत आहे, पण लोकांची इच्छा हीच असावी.

फ़ारेण्ड
सेक्युलर शब्दाची व्याख्या तुम्हाला मान्य नाही म्हणून बदलायची का?
अजुन काय काय बदलायचं?

ती ऑलरेडी बदललेली आहे. स्वतंत्र झाल्यापासून. परदेशांमधे ती वेगळी आहे. पण तेथेही प्रत्यक्षात असेच चालते. ख्रिसमस घरात पाळायचा म्हणून बाहेर डेकोरेशनही करायचे नाही असले प्रकार नाहीत.

सरकारने लोकांच्या धर्मात, खाण्यापिण्याच्या सवयित मुळात लुडबुडच का करावी? कायदा-सुव्यवस्था पुरवणं सरकारचं काम आहे, त्यात कोण्याएका धर्माने/नागरिकाने कायदा/नियम मोडला तर कारवाई करावी. सिंपल...

१. वसिष्ठ ऋषी जनक राजाकडे आले असता त्यांच्यासाठी गोमांस शिजवण्यात आले. संदर्भ: उत्तररामचरित.

२. कुठल्या प्रकारचा नैवेद्य पितरांना दिला तर ते किती दिवस संतुष्ट राहतात याचे एक कोष्टक महाभारतात दिलेले आहे, त्यातच बीफचाही उल्लेख आहे. नक्की पर्व आणि अध्याय क्रमांकासाठी प्रचेतस ऊर्फ वल्ली यांना संपर्क करावा लागेल.

हे झाले बीफबद्दल. त्याबद्दल अजूनही बरेच उल्लेख आहेत. नुस्त्या मांसाहाराबद्दल बघायचे तर ढिगाने उल्लेख आहेत. श्राद्धानिमित्त शिजवलेल्या मांसाला नाकारणारा ब्राह्मण हा खरा ब्राह्मणच नव्हे असेही उल्लेख आहेत, बहुधा गृह्यसूत्रांमध्ये.

इतके असून सध्या ब्राह्मण हा वारसा नाकारतात आणि नाके मुरडतात हे अतिरोचक आहे. मांस खाऊन आपल्या धर्माची परंपराच आपण पुढे चालवतो आहोत हे त्या मूर्खांच्या गावीच नसते. अगदी कलियुगातले उदाहरण बघायचे झाले तर बंगालमधील ब्राह्मण परंपरेने चिकन-मटन-मासे सगळेच खातात. ते या अडाण्यांना माहिती तरी असते की नाही कुणास ठाऊक..

......

ब्याटम्यान यांचा वरील प्रतिसाद मिपावरुन क्वापि पेस्ट केला आहे.

......

http://www.misalpav.com/node/32722

ती ऑलरेडी बदललेली आहे. स्वतंत्र झाल्यापासून. परदेशांमधे ती वेगळी आहे. पण तेथेही प्रत्यक्षात असेच चालते. ख्रिसमस घरात पाळायचा म्हणून बाहेर डेकोरेशनही करायचे नाही असले प्रकार नाहीत.
<<
ती ऑलरेडी बदलेली आहे, हे फक्त तुमचे मत आहे.

धर्म घरात ठेवा म्हणजे चोरून मारून पूजाअर्चा, नमाज किंवा मास करा असा अर्थ होत नाही. सेक्युलरिझममधे स्वतःचा धर्म पालन करण्याचे अधिकार दिलेले आहेतच, पण त्यामुळे इतरांना त्रास नको, तसेच सरकारच्या कारभारात धर्म वा धर्मगुरू कोणताही हस्तक्षेप करू शकत नाहीत हेही त्यातच येते.

पण जर आम्ही मूळ व्याख्या अर्थात, राज्यकारभारात धर्माची ढवळाढवळ नको, धर्मामुळे शासनाच्या निर्णयांत बदल नको, असे सेक्युलर सरकार हवे, असे म्हणतो आहोत, तर त्यात चुकीचे काय आहे?

की तुम्हाला धर्मसत्ता हीच राजसत्तेपेक्षा मोठी हवी आहे?

जबरदस्तीने धर्मनिरपेक्षता अर्थात सेक्युलरिझम म्हणजेच 'सर्व-धर्म-समभाव' अशी गुळमुळीत व खोटी भूमिका बनवून त्यानुसारच वागा असे म्हणायचे, अन सगळे समान म्हणून सगळ्यांनाच समान नंगानाच घालू द्या, अशी त्याची करोलरी काढायची, याला काय अर्थ आहे?

या असल्या लॉजिकमुळेच मी तुम्हाला जे म्हणतो, ते म्हणत असतो Wink

धर्म चार भिंतीच्या आतच पाळला पाहिजे ही हुकुमशाही आहे. वरचे प्रतिसाद काहींची सायंकालीन जीवनशैली सिद्ध करतात असे दिसते.

चार भिंतींच्या आत धर्म पाळायचा असेल तर हे सगळे उत्सव चाललेले आहेत त्यांचे काय? हुकुमशाहीच्या विरोधात केलेली बंडे आहेत का ती? Lol

की तुम्हाला धर्मसत्ता हीच राजसत्तेपेक्षा मोठी हवी आहे? >>> हे तुम्ही ज्या धर्मात धर्मसत्ता नावाचा प्रकारच आस्तित्वात नाही त्यांना विचारत आहात. म्हणजे स्वतःला धर्मसत्ता समजणारे आहेत पण त्यांच्या आदेशांचे कोणीही पालन करत नाही, अशांना. त्यात धर्मसत्ता वगैरे तुम्ही म्हणत आहात. मी त्याबद्दल काहीच म्हंटलेलो नाही Happy

आता व्याख्येबद्दल
ती ऑलरेडी बदलेली आहे, हे फक्त तुमचे मत आहे. >>> "धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही धर्माबद्दल दाखवलेली उदासीनता नव्हे, तर सर्व धर्मांबद्दल दाखवलेला समान आदर" हे सरकारप्रणित आकाशवाणी गेली अनेक दशके घोकते आहे. केवळ माझे मत नाही.

जबरदस्तीने धर्मनिरपेक्षता अर्थात सेक्युलरिझम म्हणजेच 'सर्व-धर्म-समभाव' अशी गुळमुळीत व खोटी भूमिका बनवून त्यानुसारच वागा असे म्हणायचे, अन सगळे समान म्हणून सगळ्यांनाच समान नंगानाच घालू द्या, अशी त्याची करोलरी काढायची, याला काय अर्थ आहे? >>> पुन्हा एकदा. हे गेली ७० वर्षे याच अर्थाने वापरले जात आहे. मी एकटा म्हणत नाही.

बाकी नंगानाच वगैरे शब्द तुमचे. मी दुसर्‍याला त्रास नको वगैरे म्हंटले होते.

सेक्युलरिझममधे स्वतःचा धर्म पालन करण्याचे अधिकार दिलेले आहेतच, पण त्यामुळे इतरांना त्रास नको, तसेच सरकारच्या कारभारात धर्म वा धर्मगुरू कोणताही हस्तक्षेप करू शकत नाहीत हेही त्यातच येते. >>> हे योग्यच आहे. पण सरकारतर्फे पंढरपूरला पूजा करावी का? केरळ मधल्या एखाद्या ख्रिश्चन बहुसंख्य गावात ख्रिसमस ट्री मनपातर्फे उभा करावा का? दसर्‍याच्या आदल्या दिवशी सर्कारी ऑफिसात तेथील गोष्टींना फुले ई वाहावीत का? या बाबतीत सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्व धर्मांच्या प्रचलित गोष्टीत सरकारी सहभाग अशाच अर्थाने वापरलेला गेलेला आहे. आणि माझ्या मते ते योग्यच आहे.

फारेण्ड,

ह्या धर्मनिरपेक्षता सारख्या शब्दांची सोयीस्कर अर्थ घेऊन विशिष्ट दिशेने प्रचार करत राहणार्‍या सोंगांशी संवाद साधण्यात अर्थ नाही. ह्यांना अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता अंमलात आणायची झाली तर चार भिंतींच्या बाहेर असलेली सर्व धार्मिक स्थळे आणि कृत्ये प्रथम बंद करायला लागतील, जे ह्यांच्या काकालाही शक्य नाही.

काल एका मराठी वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरेंच्या तोंडून (शेजारी तावडेकाका) ऐकलेले. आज सकाळी आकाशवाणीवरच्या सरकारी वृत्तपत्रांत कन्फर्म झाले. मीरा-भायंदरमध्ये दोनच दिवस खाटिकखाने बंद. नवी मुंबईतली बंदी संपूर्णतया मागे.

आता अजूनही शब्दांची फिरवाफिरवी होऊच शकते म्हणा.

बेफिकिर,
सरळ माझ्याशी बोलायचे गट्स तुमच्यात नाहीत. शिवाय, सायंकालीन जीवनशैली हा कार्यक्रम तुमचा. आमचा नव्हे. तेव्हा फाटा.
*

हे तुम्ही ज्या धर्मात धर्मसत्ता नावाचा प्रकारच आस्तित्वात नाही त्यांना विचारत आहात. म्हणजे स्वतःला धर्मसत्ता समजणारे आहेत पण त्यांच्या आदेशांचे कोणीही पालन करत नाही, अशांना.
<<
सध्या ज्या धाग्यावर चर्चा सुरू आहे, तो बंदी निर्णय कशामुळे झाला म्हणे? सरकारच्या धर्मातील लुडबुडीमुळे की धर्माच्या सरकारातील हस्तक्षेपामुळे? धर्मसत्ता म्हणजे नक्की काय, या टेक्निकॅलिटिवर वाद घालायचा असेल, तर त्याला माझा पास. (तुम्हाला ज्या देशात धर्मसत्ता असे म्हणाय्चे असावे असे गृहित धरतो. अदरवाईज धर्मात धर्मसत्ता नाही? कोणत्या?)

दुसरे, सरकारी आकाशवाणी घोकते म्हणून शब्दांचे अर्थ कसे का बदलू लागलेत ब्वा? पब्लिकला मुर्ख बनवणार्‍या अनेक जाहिरात, मनोगते सरकारी आकाशवाणीवरून प्रसारित होतात. त्या सगळ्याला बरोबर म्हणायचे की काय?

तिसरे, सरकारात असलेल्या माणसांनी धर्मकार्यात भाग घेऊ नये असे नाही, पण त्यासाठी सरकारी स्पॉन्सरशिप कशाला द्यायला हवी? उदा. चर्च्/मंदिरे इ.ना इन्कमटॅक्स माफी. जमीनींचे अनुदान इ. इथे सेक्युलरिझमची वाट लागते. बाय व्हॉट राईट गव्हर्नमेंट शुड डू सच थिंग्ज? सरकार क्ष धर्मासाठी या गोष्टी करते, तेव्हा ते अ ते झ या इतर धर्मांची वाट लावीत असते. याला 'समभाव' कसा म्हणावा?

धर्मनिरपेक्षता सारख्या शब्दांची सोयीस्कर अर्थ घेऊन
<<
अहो भासापरबू,
डिक्शनरी नावाचा प्रकार असतो जगात. सेक्युलर हा शब्द जरा शोधून पहा त्यात, अन दुनियेने काय अर्थ त्या शब्दाला दिलेला आहे ते पहा.
तुम्ही म्हणाल ते शब्दार्थ, वा भाषा नसते.

Pages