मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉलिंग रॉबिनहूड....
कॉलिंग रॉबिनहूड....

पेटती काडी आणि पॉपकॉर्न चे चित्र भाड्याने पाहिजे होतं !

पर्युषण काळात आधीदेखील कारखाने बंद असायचे असे ऐकले … नेमके काय आहे? बाकी पर्युषण श्रावणात येत असत का? मग आपला पण पाठींबा … Wink

मग ईद करता बीफ बंदी पण हटवून टाका … Proud

हा हिंदुस्थान आहे. हिंदूंना "गोवंशाचे" मांस सोडून अन्य मांस/मासे खाण्यास बंदी नाहीये. सबब, गोवंशाची हत्या व त्याचे मांस खाणे यावरील बंदीव्यतिरिक्तच्या कोणत्याही बंदीचा मी निषेध करतो.

हे सगळे अत्ताच सुरु नाही झाले आहे.
फार आधिपासुन काँग्रेसच्या काळातच्य याची सुरुवात झाली आहे. आता फक्त्य ते २ एवजि जास्त दिवसांचे केले गेले आहे.

बदलाचा आणी समानतेचा संदेश देणारी संधी घलावल्याबद्दल स्थानिक प्रशासनाचा निषेध.

भाजपाच्या राज्य सरकारने त्वरीत हस्तक्षेप करुन हा नियम परत पहिल्यासारखा २ दिवस करावा.

कसा आवाज उठवायचा ते ही लिहा, नुसती छाती पिटून काय होणार आहे ?
>>>>>

सोशलसाईटच्या माध्यमातून निषेध करणे हे किमान झाले.
याऊपर शांततेच्या मार्गाने निदर्शने देता येतात.
त्या दिवशी मांस विक्रीला काढू शकता, अथवा ते शक्य नसल्यास जे विकत आहेत त्यांच्याकडून खरेदी करू शकता.
जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तरीही याचा निषेध केलात तर ते जास्त परीणामकारक राहील.
किंबहुना मी तर म्हणतो शाकाहारींनी विरोध कराच. अन्यथा शाकाहारी-मांसाहारी जनतेमध्ये फूट पाडून हे राज्य करतील.

>>>> हिंदुस्थानला फायनान्स जैन / मारवाडी करतात … त्यांना नको मांसाहार तर ऐकायला नको का? <<<<<
यात "मारवाडी" हा शब्द उगाचच आलाय. अस्सल हिंदू मारवाडी स्वधर्माचे पालन करण्याबाबत कट्टर असतो.
तसेच ते "फायनान्स" करतात हा देखिल गैरसमज आहे व म्हणून ऐकायला लागते हा त्याहुन मोठा गैरसमज आहे.
हां, आता मतांच्या राजकारणाकरता ऐकुन घेत असतील तर शक्य आहे.

परत सांगतो, हा हिंदुस्थान आहे. व हिंदू धर्मामधे हिंसेअहिंसेचे घोळ नाहीत व "जीवो जीवस्य जीवनम" असे अत्यंत सु:स्पष्ट असे तत्वज्ञान आहे. हिंदू धर्मातील विशिष्ट जातींना त्यांचे नैमित्तिक कर्माप्रमाणे मांसाहार/तामसी आहार न करण्याचे बंधन सोडले, तर हिंदू धर्मात अन अर्थातच हिंदूस्थानात मांसाहाराबाबत वा एकुणच खाण्याबाबत फाल्तुचे नियम नाहीत. ज्यास जसे कर्म करायचे, तसे त्याने आहारविहार करावेत इतका सरळ हिशोब आहे. अपवाद गोवंशाहत्येबाबत व नागयोनी व काही तत्सम प्राण्यांच्या हत्येबाबत.

त्या दिवशी मांस विक्रीला काढू शकता, अथवा ते शक्य नसल्यास जे विकत आहेत त्यांच्याकडून खरेदी करू शकता.
जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तरीही याचा निषेध केलात तर ते जास्त परीणामकारक राहील.
किंबहुना मी तर म्हणतो शाकाहारींनी विरोध कराच. अन्यथा शाकाहारी-मांसाहारी जनतेमध्ये फूट पाडून हे राज्य करतील.
>>
हे तु स्वतःकर.
व्हेरिफायेबल फोटो टाक इथे.
जग बदलण्याची सुरुवात स्वत:पासुन करावी असेही काही जण म्हणतात.....

सगळ्याच धर्मात काहीनाकाही नियम आहेत खाण्यापिण्याचे. चातुर्मास, लेंट, कोशेर वगैरे. हे असे सर्व धर्मांसाठी करणार आहेत का? मांसविक्रेत्यांच्या आर्थिक नुकसानीचे काय? समान नागरी कायदा हवा. पण मताचे राजकारण करणारे हे होवू देणार नाहित.

एका धर्माच्या व्रताचं पावित्र्य जपण्यासाठी अन्य समाजांनी मांसाहार सोडला तर मग अन्य धर्मियांसाठी शाकाहारी मंड़ळी मांसाहार करणार का?
.... महाराष्ट्र टाइम्स मधे आलेले एक ट्वीट !

एका धर्माच्या व्रताचं पावित्र्य जपण्यासाठी अन्य समाजांनी मांसाहार सोडला तर मग अन्य धर्मियांसाठी शाकाहारी मंड़ळी मांसाहार करणार का?
>>

महाग होईल कोंबडी Wink

मांसविक्रेत्यांच्या आर्थिक नुकसानीचे काय?
>>>
हा विचारही आलेलाच मनात, पण एखाद्याच्या आर्थिक नुकसानीचे विचार न करणे ही फार सामान्या बाब आहे आपल्या देशात, त्यामुळे ती गंभीर समस्या नाही वाटली.

झगड्या,
तिथे आणखीही काही बोचरी ट्विटे आहेत, पण त्यात एक मुंबईकर म्हणून सर्वाधिक खटकले ते हे..
वेलकम टू मुंबई.. ‘बॅनि’ स्तानची राजधानी !

मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. ते जगभरात भारताला रिप्रेझेंट करते. त्याची अशी इमेज होणे नक्कीच चांगले नाही.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
<<
<<

लेखा(?)तले वरिल वाक्य वाचुन,
साक्षात लोकमान्य टिळकांनी या "बंदि" विरोधात केसरीत लेख लिहिलाय का, असा भास झाला. Lol

मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. ते जगभरात भारताला रिप्रेझेंट करते. त्याची अशी इमेज होणे नक्कीच चांगले नाही.
>>

अशी म्हणजे कशी? आधीच बकाल, प्रदूषित, झोपडपट्टीवाली, गर्दी वगैरे बरीच आहे, त्यात एखाद दुसरी भर पडली तर काय फरक पडतो? Light 1

अर्धवट माहीतीच्या आधारे
>>>>
प्रसादजी या दोन लिंक्स-
हेडरमध्येही टाकतो, माहितीसाठी

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

ते मांसाहार विक्री बदलून मांस विक्री कराल का?
मांसाहार म्हणजे उगीचच चपलाहार, राणीहार यांतलं काहीतरी असल्यासारखं वाटतं !

बायदिवे ऋन्मेश, गोवंशबंदीबाबतही तुझा विरोधच असेल ना?

>>

ह्यांचा दारुसच काय तो विरोध आणि बंदी घालायची मागणी Wink

अजून एक लंचटाइम नंतरचा धागा. पहिल्या पानावर राहायची केविलवाणी धडपड.
उगीच काहीही पिडा. चार दिवस व्हेज राहिल्याने काय फऱक पडतो? स्वई व सनील जरा बारीक दिसू लागतील. व फ्रोजन सर्व घरपोच मिळते.non vegetarians are not deprived. only the abattoirs are going to be closed.

दारु बंदी विषयी काय मत आहे?

>>

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने काल विखे पाटलांनी सरकारशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत पवारसाहेबांवर टीका केली Lol

दारू आणि मांस यांची तुलना कशी होऊ शकते?

आज कोणी भरपूर मासे खाऊन आला आणि त्या नशेत फूटपाथवर गाडी चढवत लोकांना चिरडले असे कधी ऐकले आहे का?
मांसमच्छी हा एक आहार आहे, जसे पालेभाज्या हा एक आहार आहे.

आणि हो, मांसाहार बंदी हेच मला तरी योग्य वाटतेय, कारण जनावरांच्या हाडापासून, कातड्यापासून वा मांसापासून बनवलेल्या ईतर शोभेच्या वा उपयुक्त वस्तू किंवा औषधे विकण्यास बंदी नसावी. आहार म्हणूनच मांसविक्रीबर बंदी आली आहे.. तरी चुकत असेल तर सांगा, मग तसे कर्रेक्ट करतो.

हुकुमशाहीचा विजय असो !! >> कृपया हे वाक्य शिर्षकातुन आणि लेखातुन काढावे.
जो काही निर्णय घेतला आहे तो संपुर्णपणे भारतीय घटनेने स्थानिक महानगरपालिंकांना दिलेल्या अधिकारानुसार घेतला आहे.

या वाक्यामुळे चुकीचा आरोप होत आहे.

तसेच, एखाद्या समाजाच्या सणामुळे अशी बंदी ही पहिल्यांदाच आलेली नाही. या आधीही होत होती.
"तेही मुंबईसारख्या शहरात......."
पण तेव्हा ती २च दिवसांची होती.
यावेळेला महानगरपालिकेचे मेयरच स्वतः त्या विशिष्ट समाजाचे आहेत. त्यामुळे २ पेक्षा वाढिव दिवसांचा निर्णय झालेल अस्ण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेव्हा कृपया योग्य ती माहिती घेऊन लेख पाडावेत आणि शिर्षक बदलावेत ही विनंती.
धन्यवाद.

उगीच काहीही पिडा. चार दिवस व्हेज राहिल्याने काय फऱक पडतो?
>>>
एक्झॅक्टली अमा, हाच विचार करू नका. तेच घातक ठरेल.
आज चार दिवस, तर उद्या आठ होतील. परवा अशी वेळ येईल सर्वांना सक्तीने महिनाभर श्रावण पाळावा लागेल.
मुळात आम्ही काय कधी खावे यात हस्तक्षेप करणारे सरकार कोण?
हा प्रश्न मुळात मांसाहार-शाकाहाराचा नसून व्यक्तीस्वातंत्र्याचा आहे असे नाही का वाटत?

स्वई व सनील जरा बारीक दिसू लागतील.
>>>
हे विधान त्यांच्या धाग्यावर टाकाल का, याचे उत्तर द्यायला आवडेल Happy
इथे उत्तर देणे माझ्या तत्वात बसत नाही म्हणून ही विनंती.

हुकुमशाहीचा विजय असो !!

>>

ते भाजपच आहे म्हणून हुकुमशाही … आपच असत तर मोहल्ला सभेनी घेतलेला निर्णय Lol

Pages