मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्य झाल्यास यात भाजपा-काँग्रेस राजकारण आणू नका.. भले ते त्यामागे असले तरीही..

मुळात लांगुलचालन करणे ही एक लोकशाहीला घातक वृत्तीच आहे. ज्यांचे लांगुलचालन होतेय ते देखील अश्या आमिषांना भुलून फसतच असतात, भले त्यांचेही होत नाही..

आधी कुठल्या एका धर्माचे लांगुलचालन होत होते, आज दुसर्‍या एका धर्माचे होतेय, उद्या तुमच्या धर्माचे होण्याची शक्यता आहे म्हणून खूश असाल, तरी परवा आणखी तिसर्‍याच धर्माचे होणार हे नक्की.. एण्ड ऑफ द डे एक सामान्य भारतीय नागरीक म्हणून तुमच्या हातात ठेंगाच मिळणार

म्हणून लोकशाहीच्या रक्षणार्थ सर्वांनी एकत्र येणे गरजेचे. इतरांनी मांसाहार न केल्याने जैन समाजाला काही पुण्य मिळणार नाही ना इतरांनी मांसाहार केल्यास त्यांना पाप लागणार आहे. तर यात त्यांचाही तसा काहीच फायदा नाहीये. बस्स ते लोक सरकारने आपल्या धर्माची एवढी काळजी घेतली या समजात उगाचच खुश होत असतील.

देशासाठी काहीही न करता फक्त हे असले काही करून अनुक्रमे ठराविक लोकांच्या समूहाला खुश करणे आणि अच्छे दिन आल्याचे दावे करणे ही निव्वळ फसवणूक आहे!

शक्य झाल्यास यात भाजपा-काँग्रेस राजकारण आणू नका.. भले ते त्यामागे असले तरीही..>>

images (4)_0.jpg

यांच्या राजकारणापायी सामान्य जैनांना फुकटच्या शिव्या खाव्या लागतायत. बहुतांश जैनांना कत्तलखाने चालू राहिले काय आणि बंद राहिले काय काही फरक पडत नाही..

हा नियम किवा आदेश जुनाच असेल पण, बऱ्याच लोकांना तो माहीत नव्हता हे या धाघ्या वरून कळले,
मला पण आता आताच हे कळले
माला पण हाच प्रश्न पडला की एका धर्मा साठी दुसऱ्या धर्मानी मांसाहार का सोडवा (४ दिवसान करता का होईना ) ??

मला जे खायचे आहे ते मी खाईन, तुम्हाला नाही खायचे तुम्ही नका खाऊ …। एवढे साधे सोपे पाहिजे

टीप - मी स्वतः मांसाहार करत नाही

स्पॉक | 8 September, 2015 - 20:01

मदरशांचे सरसकट अनुदान बंद केल्यामुळे आगाऊंच्या रोजी रोटीवर संक्रांत आलेली दिसते.
म्हणुनच एवढे संदर्भ समजुन न घेता बोलत आहेत.

<<
तुमच्या नि:पक्षपाताची आयडिया कळली. तुमची व प्रसाद. या आयडीची रोजीरोटी कुठून येते, तेही समजले. भाजपा सायबरसेलला शुभेच्छा.

रॉबिनहूड नेमके एक वाक्य तेवढे कोट केलेत आणि उरलेली एवढी मोठी पोस्ट नजरेआड केली.

मला एका साध्या सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या .. कोणीही..'

मला हे जैन पर्युषण काळ म्हणजे काय असते हे देखील माहीत नाही तर मी या काळात मांसाहार का टाळावा?

मी माझ्या धर्माला अनुसरून जो पाळायचा असतो तो श्रावण महिना, जो आमच्या घरात ईतरही सारे पाळतात, तो देखील पाळत नाही. तर मी ईतर धर्मीयांच्या प्रथेनुसार लादली गेलेली मांसाहारबंदी का पाळू?

बाकी,

पनवेलच्या मुसलमानांचा निषेध!

हुशारीचा थांगपत्ता नाही यांच्यात. अशिक्षित म्हणतात ते हेच. अहो, न्यायालयाने सांगितले म्हणून कसेकाय ऐकतात? बिन्धास्त ९ थर लावा, देशव्यापी आंदोलन करून एका कोर्टाचा संथारा आदेश दुसर्‍या कोर्टाला स्टे द्यायला लावा, भोंगेही लावाच लावा. कोणतं कोर्टं काय वाकडं करेल तुमचं?

काय म्हणता? तुमचं कुणी ऐकणार नाही?

मग गप बसा. दुय्यम नागरीक म्हणून हिंदू कसे राहतात पाकिस्तानात? तसे गप बसा Happy

(हो. गल्ली चुकलेली नाही.)

आणि हो,

४च दिवस नॉनव्हेज बंद आहे ना? मग बोंबा कशाला मारताय? अहो शाकाहार हा दैवी आहार आहे. फक्त दानव मांसाहार करतात, असे जैन 'धर्म' सांगतो. तुम्हा हिंदूंनीही त्या पनवेली मुसलमानांसारखं गपचिप आइकून घ्या पाहू 21.gif

**

सेक्युलर = धर्म"निरपेक्ष' राज्य. सेक्युलर म्हणजे राज्यकारभारात धर्माचा हस्तक्षेप नाही. प्रत्येकाने, आपापला धर्म, आपल्या घरात पाळावा, उंबर्‍याबाहेर भारताची राज्यघटना काम करील.

(सेक्युलर=समाजवाद नाही.)

सेक्युलरिझमचा खून करून धर्माधिष्ठित अस्मिता/दुराग्रह पेटवून राज्य बळकावणार्‍यांना, ही दुही पेटवत ठेवणे, तिला पेट्रोल, काडी घालणे हेच करावे लागणार. टुण्टुणने कितीही पाण्याचे फोटो टाकले, तरी मुळची काडी दिसणार नाही अशी सोय करणे कठीण आहे, कारण पाणी ओतण्याचे ढोंग करणार्‍यांनीच काडी टाकलेली आहे.

ऋन्मेष धागा नि शिर्षक याच्याशी सहमत.कुणाच्याहि खाण्यावर बंदी आणता कामा नये मला तर गोवंश हत्या बंदिचाही निर्णय चुकिचा वाटतोय.

ईब्लिस उर्फ दिमा तुम्हाला मी इथे कुठे काडी लावलेली किन्वा ढोन्ग केलेले दिसले? ढोन्ग तर तुमच्या कॉन्गीने गेल्या ६५ वर्षात केले आणी आता भोगतायत त्याची फळे. तुमचा सेक्युलर पणा तुम्हालाच लखलाभ.

रॉबीन्हुड सुद्द्धा गम्मतच करत होते आणी मी पण धागा पेटु नये म्हणून पाणी टाकले, मग तुम्ही कशाला एवढे तान्डव करताय? की सत्ता हातातुन गेली याचे दु:ख अजूनही सलतेय? मला काही घेणे नाही कुठल्याच पक्षाशी. उगाच काहीतरी वाकडे तिकडे खरडायचे.

<<<<<<<<<<मुळात लांगुलचालन करणे ही एक लोकशाहीला घातक वृत्तीच आहे. ज्यांचे लांगुलचालन होतेय ते देखील अश्या आमिषांना भुलून फसतच असतात, भले त्यांचेही होत नाही..

आधी कुठल्या एका धर्माचे लांगुलचालन होत होते, आज दुसर्‍या एका धर्माचे होतेय, उद्या तुमच्या धर्माचे होण्याची शक्यता आहे म्हणून खूश असाल, तरी परवा आणखी तिसर्‍याच धर्माचे होणार हे नक्की.. एण्ड ऑफ द डे एक सामान्य भारतीय नागरीक म्हणून तुमच्या हातात ठेंगाच मिळणार>>>>>> ऋन्मेष तुझ्या या पोस्टसाठी तुला भरपूर अनुमोदन. आमचे सरले आता, चाळिशी आली. पण तुझ्यासारख्या तरुणाना हे कळले यातच महत्व आहे.

टुनटुन,
तुम्हाला मी लिहिलेल्या पोस्टीत तांडव दिसले त्यातच सगळे आले.
विनोदी लिहिले तरीही मिर्ची लागते ती अशी. कारण आजूबाजूची काँटेक्स्ट खरी असते.
आता, जैन धर्मियांच्या पर्युषणात गपचिप सेकंडरी सिटिझनशिप घेऊन तुम्ही हिंदु(त्ववादी) लोक गप बसा पाहू!
21.gif

चिकन नि डाळिचे भाव सेम झालेत.जे परवडायचे त्याच्यावर बंदी.गरिबांनी जगायचे तरी कसे?

रुणम्या,
मांस विकायला बंदी आहे.
मुलाण्याला ४ बकरे गिफ्ट दे. त्याच्याकडून शुभेच्छा म्हणून घरच्याघरी चिरून घे. सागुतीचं वाटं पाडून घरोघर गिफ्ट म्हणून वाटून ये. ते आणून दिलं म्हणून घेणार्‍यांकडून पाया पडून हातात खाऊचे पैसे घे. हाकानाका.
कोर्टाचा आदेशही राहील, अन तुज्या त्वांडाला वशाट लागंल.

भोंगा आणि मांसाहार हे धागे एक करायची वेळ आली आहे हे प्रशासकांना कळवायला हवे. त्यातच परवाचे आरक्षण आणि औरंगजेब हे धागेही मर्ज करा. आणि मग शेवटी आपला कट्टा हे पान आणि ते तिकडचे आमचा अड्डा हे पानही त्याच्यातच घालून मिश्रण ढवळा म्हणाव मंद आचेवर वर्षभर! त्यातून जे द्रव्य निघेल त्यातून एक बाहुला तयार करून तो निवडणूकीला उभा करा. तो बिनविरोध जिंकून येईल आणि जिंकून आल्यावर समंधासारखे कायदे करत सुटेल.

-'बेफिकीर'!

तुमच्या नि:पक्षपाताची आयडिया कळली. तुमची व प्रसाद. या आयडीची रोजीरोटी कुठून येते, तेही समजले. भाजपा सायबरसेलला शुभेच्छा.
>>
दीमा,
आधी एका वाक्याचीही चर्चा न करता सरळ "येडा" वगैरे शब्द वापरुन वयक्तीक प्रतिसाद दिल्यानंतर मलाही, आगाउ सारख्या ची ,
नि:पक्षपाताची आयडिया कळली. तुमची व आगाऊची. या आयडींची रोजीरोटी कुठून येते, तेही समजले. सौदी सायबरसेलला शुभेच्छा!

म्हणुन त्याला असे उत्तर दिले आहे. केवळ तेवढेच वेगळे कोट करुन मीच सुरुवात केली असे भासवु नका.

प्रगतिशिल मुसलमानांचा अपमान करणारे आपण लिहिलेले खालील प्रतिसाद,

पनवेलच्या मुसलमानांचा निषेध!
हुशारीचा थांगपत्ता नाही यांच्यात. अशिक्षित म्हणतात ते हेच. अहो, न्यायालयाने सांगितले म्हणून कसेकाय ऐकतात? बिन्धास्त ९ थर लावा, देशव्यापी आंदोलन करून एका कोर्टाचा संथारा आदेश दुसर्‍या कोर्टाला स्टे द्यायला लावा, भोंगेही लावाच लावा. कोणतं कोर्टं काय वाकडं करेल तुमचं?

अतिशय हिन दर्जाचे आहे त्याचा निषेध आणि कोर्टाच्या आदेशाचा अवमान करनारे आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी.

गावाबाहेर राहणारे लोक मेलेली जनावरे खातात हे माहीत आहे. ते मुद्दाम मारत नाहीत. हे बरोबर आहे का?>>>

यज्ञ हवन असा काही प्रकार असतो का यामागे? की बळी प्रथा वगैरे....

अरे!

हीन काय यात? जे सगळे बहुसंख्यांक व भारी हिंदू, जैन वगैरे लोक करतात तसेच आपणही वागावे असा सल्ला दिलाय त्यांनाही. सिंपल. नैका? त्या तुमच्या धाग्यावरही एकूण ध्वनिप्रदूषण किती इत्यादी चर्चा आहेतच ना? म्हणजे तुम्ही भोंगे बंद करा, आम्ही आमचे चालू ठेवू. याला काय म्हणायचे? सेक्युलर दहशतवाद की हिंदुत्ववाद?

बाकी माझी रोजीरोटी माझ्या तंबूत आलेल्या गिर्‍हाइकांवर चालते. शिवाय तुमच्याप्रमाणे कुणी काय व कुणाचे खातो, याच्या पंचाईती मी करीत नाही. आधी त्यांची रोजीरोटी कुठून चालते ही नीच विधान स्वतः करायचे, नंतर शहाजोगपणाचा आव आणायचा, वरतून पर्सनल लिहिले अशी बोंब ठोकायची, असले फडतूस धंदे मी करीत नाही.

अरेरे! कसे व्हायचे तुमचे!!

मदरशांचे अनुदान बंद केल्याने अगाऊंच्या रोजीरोटीवर गदा आल्याचे तुम्ही लिहिले आहे, स्पॉक. त्यानंतर अशी उलट बोंब ठोकताना अजिबातच लाज नाही वाटत का??

स्वस्त प्रथिनांचा स्त्रोत म्हणून ती जनावरे मारण्यासाठी येणारा खर्च कोणी करायचा पगारे? जनावरे मेलेली असतील तर काही विशिष्ट समाजातील लोक ती ओढत नेऊन आपल्या वस्तीत कापून खातात हे काही ठिकाणी वाचलेलं आहे. मुद्दाम मारण्याचे ठरवले तर त्यामागचे मुख्य कारण 'प्रथिनांचा स्वस्त स्त्रोत' असे असण्यापेक्षा 'फायदेशीर व्यवसाय' हे अधिक असणार ना?

मेलेले जनावर खाऊ नका अशी बंदी आहे का?

स्वस्त प्रथिनांचा स्त्रोत म्हणून ती जनावरे मारण्यासाठी येणारा खर्च कोणी करायचा पगारे? जनावरे मेलेली असतील तर काही विशिष्ट समाजातील लोक ती ओढत नेऊन आपल्या वस्तीत कापून खातात हे काही ठिकाणी वाचलेलं आहे. मुद्दाम मारण्याचे ठरवले तर त्यामागचे मुख्य कारण 'प्रथिनांचा स्वस्त स्त्रोत' असे असण्यापेक्षा 'फायदेशीर व्यवसाय' हे अधिक असणार ना?

मेलेले जनावर खाऊ नका अशी बंदी आहे का?
>>

तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? मेलेले जनावर खा पण मारुन खाऊ नका? तेसुद्धा विशिष्ट जातीच्या लोकांनीच? कोणीच खुशीने मेलेले जनावर (ढोर) खात नाही. असहायता, चांगले मटण खाणे आर्थिक/सामाजिक दृष्ट्या शक्य नसणे, रितींचे मानेवरील जू असे अनेक पदर आहेत या प्रथेमागे. ती अशी लाइटली हवे तसे लिहिण्याची गोष्ट नाही.

Pages