मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठ दिवसांची बंदी मुंबईत नव्हे, मीरा भाइंदरमध्ये झाली होती. तिथे महापौर कोण आहेत? शिवसेनेच्या नीलम गोर्‍हेंच्या म्हणण्यानुसार कार्यक्रमपत्रिकेवर नसताना अन्य पक्षीयांना अंधारात ठेवून हा ठराव पास केला गेला.
मुंबईत दोनाचे चार दिवस झाले.

दोन दिवस खाटकाचं दुकान बंद असणं आणि सलग आठ दिवस बंद असणं यात काहीच फरक नाही का?

मुळात मूलभूत प्रश्न कोणते याची व्याख्या पक्षानुरुप बदलते. भाजपसाठी आपल्या संस्कृतीच्या मुळाशी पोचून तिची पुनर्स्थापना करणे हा मूलभूत प्रश्न असू शकतो असे दिसते आहे.

खोल-खोल मुळाशी पोंहचून आपल्या उगमस्थानाचा,जन्मस्थानाचा,पुर्वजांचा शोध घेऊन तिकडेच परतणे जास्त श्रेयस्कर राहिल नाही का?

परतोनि पाहे ........

६० च्या दशकापासून असलेल्या ह्या गोष्टीवर आज अचानक २०१५ मध्ये जाग येऊन त्यावर इतकी सारी चर्चा आजच कशी होतेय? >> आता होत आहे कारण हे महाराष्ट्रातलं सरकार आणि त्यांचे इतर ठिकाणचे लोकप्रतिनिधी बाकी काही विशेष न करता बंद्याच जास्त घालतायत.. आणि बाकिच्यांना इतकी वर्षं थांबवलं होतं का कोणि चर्चा करायला?

तुझ्याकडून असल्या मुद्यांची अपेक्षा नाही केदार.

सध्या जेटली भाऊ ईकॉनॉमीमधे फारसं काही करत नाहीत. त्यामुळे त्यावर लिहिण्यासारखं काही नाहीच्चे. मग काय करावे बरे???

पण मनिष त्यापुढे मी काय लिहिलं आहे?

आणि ते मी का लिहिले तर मोदींनी ही बंदी घातली असे काही प्रतिसादात आहे. मोदीही बंद्या घालत आहेत, ज्या चूकीच्या आहेत, ( बीफ बंदीच ) पण त्यातली ही बंदी नाही असे लिहिलेल. तर त्यात चूक काय आहे. सगळ्या गोष्टीचं खापर मोदींवरच फोडणे बरोबर आहे का? आय मिन व्हेअर इज अवर कॉमनसेन्स. ह्या बंदीत मोदींचा काय हात आहे? लोकल बॉडीचा निर्णय आहे तो.

मुळात अश्या कुठल्याही बंद्याच चूकीच्या आहेत असे लिहिलेले वाचले नाहीस का?

कप्रतिनिधी बाकी काही विशेष न करता बंद्याच जास्त घालतायत >> कोणकोणत्या बंद्या घातल्या आहेत त्याची यादी देशील का?

केदार कडूनच अशा मुद्द्यांची अपेक्षा आहे. >> Proud उत्तर देता येईल. पण असो.

पण मनिष त्यापुढे मी काय लिहिलं आहे? >> तू त्यापुढं काहीही लिहिलंस तरी हा मुद्दा मांडलासच ना? पुढच्या सगळ्यावर आधीच पाणी फिरवलंस..

मोदींवर कोण कुठं खापर फोडलंय? आणि जर प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट भक्त लोक मोदींनाच देत असतील तर या गोष्टींच तिकीटही त्यांच्याच नावावर फाडलं जाणार.. तू कधी म्हणालास का की या या गोष्टींमधे मोदींचा हात नाही म्हणून?

कोणकोणत्या बंद्या घातल्या आहेत त्याची यादी देशील का? >> बीफबॅन घातलाय, मधे पॉर्न बॅन आणला होता. आता तर सर्क्युलर काढून सत्ताधारी राजकारण्यांवर टीका करण्यावर पण बॅन आणलाय.

त्यात हे मुंबई आणि मीरा-भाइंदर मधे पर्युषणावेळी मांसाहारावर ८ दिवस बॅन.. काहीही चालू आहे.. सामान्य जैनाला काहीही फरक पडत नाही बाकिच्या लोकांनी मांसाहार केला काय आणि नाही केला काय..

दोन दिवस खाटकाचं दुकान बंद असणं आणि सलग आठ दिवस बंद असणं यात काहीच फरक नाही का?

अय्या खरंच की..म्हणजे तत्वतः तुम्हाला बंदी मान्य आहे फक्त ती कॉंग्रेसने ठरवल्याप्रमाणे २ दिवसच असावी ४ दिवस नको- असंच ना? दोन दिवसांच्या बंदीने निधर्मीपणा, सर्वधर्मसमभाव वगैरेला खतरा होत नाही पण ४ दिवस झाले की सग्गळं बदलतं नै!

कांग्रेसच्या राज्यात एवढे दशकं बंदी होती तेव्हा निधर्मीपणा, सर्वधर्मसमभाव वगैरेला खतरा होत नाही पण भाजपाने तेच केले की सग्गळं बदलतं नै!

१)मिरे-भाइंदर : १९६० साली काशी-मिरें हे चेणे खाडीवर (वसई खाडीचा समुद्रापासून दूरचा भाग) वसलेले एक टुमदार गाव होते. मिरें/मिर्‍यें म्हणजे पाणथळ जागेतला उंच भाग. सगळी वस्ती आगरी/कोळी /सोमवंशी क्षत्रिय पाठारेंची होती. तिथे मांसबंदी असणे शक्यच नाही. कारण या लोकांच्या (आणि इतरही कित्येकांच्या) गौरी सणाला मटनाचा नैवेद्य असतो. मिरे-भाईंदर नगरपालिका गेल्या दहा-पंधरा वर्षांत अस्तित्वात आली आहे. त्यामुळे १९६० साली ही नगरपालिका कसलीच बंदी घालणे शक्य नाही.
२)श्रावण किंवा कोणत्याही महिन्यात मांसाहार न करणे हे सामान्य हिंदूला बंधनकारक नाही. किंबहुना कोणत्याही वारी मांसाहार न करणे हे सामान्य हिंदूला बंधनकारक नाही.
३)इ.स.५००-७०० (कालनिश्चिती थोडी अनिश्चित आहे पण त्यामुळे आर्ग्युमेंटचे मेरिट कमी होत नाही.)पूर्वींचे आपले सर्व धर्मग्रंथ, काव्यनाटकादि साहित्यापैकी ९९% साहित्य हे मांसाहारी लोकांकडून लिहिले गेले आहे. व्याकरणकार पाणिनीही त्यात यावा. नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय किंवा भारतीय वंशाचे लोक यात बहुसंख्येने मिश्राहारी आहेत.
४) कत्तलखान्यात किंवा छोट्या पक्ष्यांची घरातल्या घरात हत्या झाली तर इतर कोणाच्याही भावना दुखावण्याचे कारण नाही. हे धार्मिक भावनेसंदर्भात आहे. भूतदयेचे आर्ग्युमेंट वेगळे.
५)गतकाळात एक किंवा दोन दिवसांसाठी बंदी घातली गेली ती मोरारजीसदृश अहिंसक आणि जैन अहिंसेप्रति सहानुभूति आणि झुकता कल असणार्‍या गांधीवाद्यांच्या आग्रहाखातर घातली गेली. तेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमे नव्हती आणि लोकही अशिक्षित होते त्यामुळे घनघोर चर्चायुद्ध झाले नसावे बहुतेक. तसेही काँग्रेस राज्यात निर्बंध हे कागदावरच असत. आणि अशा मारून मुटकून लादाव्या लागलेल्या लोकमतविरोधी निर्बंधांची अंमलबजावणी होतच नसे किंवा अतिशिथिलतेने होत असे. लोकांना जे हवे ते बिनबोभाट मिळू शके. लोकही खुश आणि निर्बंधकही खुश.

मोदींवर कोण कुठं खापर फोडलंय? >>. म्हणजे चर्चा न वाचताच तू माझ्या मुद्द्यावर घसरत आहे. ओके !

ह्यातला फक्त बीफ बॅन चूकीचा आहे तो मोदी सरकारने आणला. मी लिहिले आहे. कुठलेही बॅन खान्यापिन्यावर नसायला हवेत. त्यामुळे माझा स्टॅन्ड कळाला असेल.

पोर्न बॅन मध्ये फक्त काही साईट होत्या. बाकी नव्हत्या. हा मुद्दाच होऊ शकत नाही. हवे तर साईटसचे नाव देतो. त्या सगळ्या चालू होत्या. Wink परत एकदा मिस मॅनेजमेंट !

यात हे मुंबई आणि मीरा-भाइंदर मधे पर्युषणावेळी मांसाहारावर ८ दिवस बॅन.. का >> परत ह्याचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही. पण आव असा आणला जातोय. (अगदी तुझ्या पोस्ट मध्येही) ही मोदी सरकार आणि राज्य सरकार हे घडवत आहेत. प्रॉब्लेम तो आहे मित्रा.

आणि म्हणूनच जर ४० वर्षे हे चालू आहे तर अचानक आज त्यावर लोकं, भाजपा म्हणजे जुन्या कालखंडाकडे नेत आहेत , सगळीकडे बंदी टाकत आहेत अश्या पोस्टीना, "अहो हे तुमच्या काळातच सुरू झाले" हे दाखवून देणे काय वाईट आहे हे कळले नाही.

वर मयेकर देखील म्हणतात की, "दोन दिवस खाटकाचं दुकान बंद असणं आणि सलग आठ दिवस बंद असणं यात काहीच फरक नाही का?"

पण मी म्हणतोय, बंदच का करावे? धर्माच्या नावावर एकही दिवस का? ही सारवासारव नकोय. जे चूक ते चूक. ह्यावर तुझे काय म्हणणे आहे?

होप माझा मुद्दा क्लिअर झाला असेल. नसेल तर वी अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री, झाला असेल तर, हो अ‍ॅगी असे लिहू शकतोस. Happy

भाजपाचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांना हे हॅन्डल करता येत नाहीये. वर आगाऊने लिहिले आहे ते एक वाक्य अगदी चपखल आहे. त्यातून फालतू तेच बदनाम होत आहेत. भाजपा गो फिगर. ब्रिंग सम ब्रेन. !

सामान्य जैनाला काहीही फरक पडत नाही बाकिच्या लोकांनी मांसाहार केला काय आणि नाही केला काय.. >>> मग हे कोणी मुद्दामहून करत आहे का? म्हणजे असं सुचित होतंय. कोण करतंय हे सर्व?

वर कोणीतरी लिहिलंय की जैन पुढारी आहे म्हणून. त्याला काय गरज आहे उचापती करायची. पर्यूषन तुझ्या घरात कर की. लोकांना का सांगतोस?

परत ह्याचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही. पण आव असा आणला जातोय. (अगदी तुझ्या पोस्ट मध्येही) >> तू पण माझी पोस्ट नीट वाचलीच नाहीस मग Happy माझ्या ओरिजिनल पोस्टमधे केंद्र सरकार मोदी कोणिही नाही..

पण मी म्हणतोय, बंदच का करावे? धर्माच्या नावावर एकही दिवस का? ही सारवासारव नकोय. जे चूक ते चूक. ह्यावर तुझे काय म्हणणे आहे? >> मी कधी म्हणालो की बंद करावे म्हणून? सारवासारव नाहीच.. एक शाकाहारी आणि एक जैन असून सुद्धा मी हेच म्हणतोय की बाकिच्यांनी काय खावं यानं जैनांना काही फरक पडू नये आणि बहुतांश जैनांना (अ‍ॅट लीस्ट माझ्या ओळखितल्या तरी )फरक पडतही नाही.. आणि जैनांनी बाकिच्यांना फोर्स करू नये.

जे चूक ते चूक. ह्यावर तुझे काय म्हणणे आहे? >> माझेही तेच म्हणणे आहे

वर कोणीतरी लिहिलंय की जैन पुढारी आहे म्हणून. त्याला काय गरज आहे उचापती करायची. पर्यूषन तुझ्या घरात कर की. लोकांना का सांगतोस? >> एक्झाक्टली.. असल्या माणसाला मी तरी आमचा पुढारी नाही म्हणणार.. Happy याच्या असल्या उचापत्यांमुळं सामान्य जैन माणसाला आणि जैन धर्माला बदनाम व्हावं लागतंय..

मग हे कोणी मुद्दामहून करत आहे का? म्हणजे असं सुचित होतंय. कोण करतंय हे सर्व? >> केदारजी, भाजपाचे आमदार जेव्हा जैन समाजासाठी आयुक्तांकडे शब्द टाकतात, तेव्हा हे कोण मुद्दामहून करत असेल याचा अंदाज नक्कीच यावा.

ओरिजनल नाही, तू मला रिप्लाय दिलेल्या पोस्ट मध्ये बीफ बॅन / पोर्न बॅन वगैरे पोस्ट. त्यावरचे हे प्रत्युत्तर.

ज्या गोष्टी पूर्वापार मान्य आहेत त्या आज चिघळविण्यात काय हशील आहे?

एक शाकाहारी आणि एक जैन असून >>. बघ च्यायला, इथे तू शाकाहारी, मी शाकाहारी, वाद घालतोय बंदी नसू नये म्हणून !

आणि म्हणूनच चेन्ने एक्सप्रेस मध्ये ऋन्मेशचे शाहरूख म्हणून गेले आहेत , " डोन्ट अन्डर एस्टिमेट द पावर ऑफ कॉमन मॅन"

भाजपाचे आमदार जेव्हा जैन समाजासाठी आयुक्तांकडे शब्द टाकतात, >>.

विठ्ठलजी, अहो भाजपाच्या किंवा कोणत्याही पक्षाच्या आमदार / खासदाराला गाईडंस मिळत असतो का? मग आपले ते दिग्गी अन आपले आवडते मणिशंकर अन तिवारी अन आपले ते हे काय वरून ऑर्डर घेऊन काम करतात का? म्हणजे ह्या टाईपच्या लोकांना ऑर्डर देणे हेच रा गा आणि सो गा करतात का? वरच्यांना तेवढेच काम आहे का?

अहो प्रॉब्लेम भाजपाचा नसून त्या माणसाचा आहे ही बाजू असू शकते की नाही? असो.

भाजपाचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांना हे हॅन्डल करता येत नाहीये. वर आगाऊने लिहिले आहे ते एक वाक्य अगदी चपखल आहे. त्यातून फालतू तेच बदनाम होत आहेत. भाजपा गो फिगर. ब्रिंग सम ब्रेन. ! >> त्यांना हे हॅंडल करता येत नाहिये की हे असंच हँडल करायचं आहे हे कळेल २-३ वर्षात Happy

अहो प्रॉब्लेम भाजपाचा नसून त्या माणसाचा आहे ही बाजू असू शकते की नाही? > नक्कीच! पण तो माणूस सत्तेवर आल्यावर त्याची ही बाजू दिसली म्हणुन मग जनतेला तो प्रॉब्लेम वाटतो. असो. जेवायला जातो. सुरमय तळली आहे.

फ्रस्ट्रेटेड विरोधकांना सापडलेला एक इश्यू ह्यापलीकडे ह्यात आता काही दम वाटत नाहीये.

काही दिवसांनी रा गा येऊन जातील आणि म्हणून जातील

"जिसको जो खाना है, वो वो खाये! मै छुट्टीसे वापस आकर देखुंगा के सबको सब मिल रहा है या नही।!"

वाद घालतोय बंदी नसू नये म्हणून ! >> तुझ्या बंदी असू नये या मुद्यावर वर मला वाद घालायचाच नव्हता केदार.. वाद आताच का या तुझ्या मुद्यावर मला आक्षेप होता.... Happy

एनीवेज...

फ्रस्ट्रेटेड विरोधक समजू शकतो पण सत्ताधार्‍यांचे फ्रस्ट्रेटेड समर्थक पहिल्यांदाच बघतोय Happy

धागा आता सफल झाला... राहिलेले नाव पण आणले आहे चर्चा भरकटवण्यासाठी Happy

६० च्या दशकापासून असलेल्या ह्या गोष्टीवर आज अचानक २०१५ मध्ये जाग येऊन त्यावर इतकी सारी चर्चा आजच कशी होतेय? >>> केदार तुझ्या या प्रश्नात तथ्य आहे. पण डझण्ट मॅटर. बंदी तेव्हाही चुकीची होती, आत्ताही आहे.

लिंबू - काय राव सहवेदना वगैरे. आमचा उपास आहे तर तुम्ही पण कांदे खाउ नका असला प्रकार सपे मधल्या वाड्यातही होत नाही Happy

काहीच्या काही अवांतर-
पुर्वी गावा मधे शिवरात्र, अषाढी अश्या उपास असणार्‍या सणांना गावातील कोणीच मांसाहार करायचा नाही. ग्रामदैवताची जत्रा असेल तेंव्हा ही हे पाळले जायचे. मोजकी मुस्लिम कुटुंबे असली तरिही रमजान रोजाचे नियम गाव ही पाळायचे.
पुर्वी=साधारण २५-३० वर्षां पुर्वी.
'मनापासुन करावेसे वाटणे'.. ते... 'केलेच पाहिजे हा नियम करणे' हा प्रवास गतीने खरतर अधोगतीने होतोय.
अवांतर समाप्त.

बाकी विषयास धरुन जे चालु आहे ते चालुदे.

पण मनिष मी विचारले होते, " ज्या गोष्टी पूर्वापार मान्य आहेत त्या आज चिघळविण्यात काय हशील आहे? तो माझा मुद्दा आहे ज्याचे उत्तर अजून तू दिले नाहीस. Happy

समर्थक असणे म्हणजे जान नोछ्यावर करणे असे आहे का? ज्या गोष्टी त्या सरकारच्या चूक त्या चूकच की ! उगाच त्याला बरोबर म्हणत इतर लोकांसारखे धृतराष्ट्र व्हावे का? Happy की इतर लोकांसारखेच तू ही सर्मथक म्हणजे आंधळेच अशी व्याख्या करत आहेस?

ज्या गोष्टी पूर्वापार मान्य आहेत त्या आज चिघळविण्यात काय हशील आहे? >> काहीही हशील नाही Happy

समर्थक असणे म्हणजे जान नोछ्यावर करणे असे आहे का >> ते तुझ्यासाठी नव्हतं रे...

६० च्या दशकापासून असलेल्या ह्या गोष्टीवर आज अचानक २०१५ मध्ये जाग येऊन त्यावर इतकी सारी चर्चा आजच कशी होतेय? >>> केदार तुझ्या या प्रश्नात तथ्य आहे. पण डझण्ट मॅटर. बंदी तेव्हाही चुकीची होती, आत्ताही आहे.

इथे बरेचसे सोकॉल्ड भाजप समर्थक / right leaning लोक दोन दिवसच काय दोन सेकंदसुध्दा बंदी नको असं म्हणत आहेत, भाजपच्या निर्णयाचा विरोध करत आहेत याउलट कोंग्रेस समर्थक म्हणतात की दोन दिवस बंदी योग्य पण चार दिवस नको- हा विनोद झाला! Their double standards and lack of principles stand miserably exposed as always!

बंदी तेव्हाही चुकीची होती, आत्ताही आहे. >> तेव्हा "खतरेंमे" चा नारा दिला होता की नाही हा मुद्दा आहे. चुकीचे तेव्हाही होते की नव्हते हा नाही....

Pages