मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या ज्या धाग्यावर चर्चा सुरू आहे, तो बंदी निर्णय कशामुळे झाला म्हणे? सरकारच्या धर्मातील लुडबुडीमुळे की धर्माच्या सरकारातील हस्तक्षेपामुळे? >>> त्या (मांस बंदी ई) निर्णयाला तुमच्याइतकाच माझाही विरोध आहे. तुमचा पॉइंट समजला नाही. एका धर्मातील/पंथातील गोष्टींचे पालन दुसर्‍यांना करायला लावण्याविरोधात मीही लिहीलेच आहे की.

पब्लिकला मुर्ख बनवणार्‍या अनेक जाहिरात, मनोगते सरकारी आकाशवाणीवरून प्रसारित होतात. त्या सगळ्याला बरोबर म्हणायचे की काय? >>> हे मी कोणाच्या खाजगी उत्पादनाच्या जाहितातीबद्दल बोलत नाहीये. अगदी स्वायत्तता वगैरेच्या कितीतरी आधीपासून सरकारच्या माध्यमातील निवेदक हे सांगत आहेत. हे वाक्य सरकारच्या वतीने प्रसृत केले जात होते. कदाचित अजूनही असेल.

बाय व्हॉट राईट गव्हर्नमेंट शुड डू सच थिंग्ज? >>> Because it represents those people. सरकार ज्या लोकांचे प्रतिनिधीत्व करते ते बहुसंख्येने धार्मिक असतील तर सरकार निधर्मी असून कसे चालेल? अनेक सरकारांनी हा प्रयत्न केलेला आहे पण प्रॅक्टिकली ते होत नाही. जर साहित्य संमेलनाला सरकार अनुदान देत असेल तर धार्मिक उत्सवाला का नको? लोक एकत्र येउन जो सांस्कृतिक उत्सव करत आहेत तो केवळ धर्माशी संबंधित असल्याने सरकारने त्यापासून फटकून राहणे पटत नाही.

अहो भासापरबू, >>> :D. ओ साहेब ते डिक्शनरीत काय आहे मला माहीत आहे. मी प्रॅक्टिकली जगात जे झाले आहे त्याबद्दल बोलतोय. वरच्या माझ्या पोस्टही पाहा - मी प्रचलित अर्थानेच म्हणतोय.

हे माझ्याकरता नव्हते हे लक्षात आले. इग्नोर करा.

आपले नांव गाव सर्वांसमक्ष सांगायची हिम्मत नाही आणि दुसर्‍याचे गट्स काढतायत. तुम्ही जे कोण असाल ते, तुमच्याशी संवाद न करणे हे मी माझा चॉईस म्हणून करत आहे. बाकी सगळी धार्मिक स्थळे आणि कृत्ये बंद करू शकणारे धर्मनिरपेक्ष सरकार कधी आणताय ते बोला. चुरुचुरु बोलून पळपुटे युक्तिवाद कोणीही कितीही करू शकते.

बेफि, तुमच्या पॉइंट बद्दल
ह्या धर्मनिरपेक्षता सारख्या शब्दांची सोयीस्कर अर्थ घेऊन >>> धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलर म्हणत असाल तर त्याचा लेखी अर्थ निधर्मीसारखाच आहे. मी प्रचलित अर्थाबद्दल म्हणत होतो. प्रॅक्टिकली साधारण तसेच होते असे पाहिले आहे. इथे अमेरिकेतही सरकार (निदान डेमोक्रॅट्स तरी) सेक्युलरच आहे. पण सिटी तर्फे ख्रिसमस ट्री सिटी च्या मालकीच्या पार्क मधे लावणे, तो लावण्याचा मोठा समारंभ करणे (काही ठिकाणी तर दिवाळी निमित्त उत्सवही) हे होतच असते. मला ते योग्यच वाटते.

बाकी सगळी धार्मिक स्थळे आणि कृत्ये बंद करू शकणारे धर्मनिरपेक्ष सरकार कधी आणताय ते बोला. >> मग आता ३१% जनतेने आणलंय ते सरकार निरपेक्ष कां काय ते नाहीये होय. Sad

याप्रमाणे गणेशोत्सव काळात सरकारने मोठ्या शहरांत आणि सलग्न उपनगरात संपुर्ण दारुबंदी जाहीर करावी. >> अनुमोदन. पण मग संध्याकाळी गझला पाडता कशा येणार स्_सा भौ? Wink

मला ते योग्यच वाटते. >> +१

तसेही आषाढी पुजा, इफ्तार पार्टी हे सरकारी खर्चाने होतेच. त्यामुळे पुस्तकातील व्याख्या कितीही चांगली असली तरी ती अस्तित्वात नाही हे अमोल म्हणतोय. अमोल चुकीचे म्हणतो आहे असे म्हणणेच चुकीचे आहे.

BTW मला आषाढीला सरकारी पुजा करणे अन सरकारी खर्चाने इफ्तार पार्टी देणे ह्यात चूकीचे वाटत नाही, हे अध्याऋत आहे. म्हणलेच आहे ना, "लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही" त्यात हे बसावे.

अतृप्त : हे मोदी सरकारने फतवा काढून केलेले नाही. ६० च्या दशकात ह्यात दोन्ही नगरपालीकांमध्ये मोदी नसावेत असे वाटते. पण माझे चुकीचेही असू शकते.

तस्मात धर्म चार भिंतीआड मोदी येण्यापूर्वी नव्हता, पुढेही नसणार.

तसेही ही खान्यावर बंदी नाही तर त्या दिवशी प्राण्यांना मारण्यावर बंदी आहे. दोन्हीत फरक आहे. कोल्ड कटस मिळतीलच.

प्रश्न राहिला विशिष्ट दिवशी बंदीचा माझे सर्वधर्मसमभावी मित्र देखील २ ऑक्टोबरची तयारी म्हणून १ लाच "तयारी" करून ठेवत असत.

६० च्या दशकापासून असलेल्या ह्या गोष्टीवर आज अचानक २०१५ मध्ये जाग येऊन त्यावर इतकी सारी चर्चा आजच कशी होतेय? धागाकर्त्याचे शब्द हुकूमशाही. तर ही तेंव्हापासून का चालू आहे. Wink अर्थात आजच ह्यावर चर्चा होऊ नये हे बरोबर नाही, चर्चा व्हावी व कुठल्याही खान्यापिन्यावरच्या गोष्टींवरची बंदी त्वरीत उठवावी.

कोणाच्या खान्यापिण्यावर* बंदी घालने अनाकलनिय आहे. (अर्थात चरस, गांजा अन तत्सम "हाय" पदार्थ सोडून) त्या नगरपालिकांचा हा निर्णय चुकीचा आहे. ( नगरपालिका, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार नाही. )

*दारू पिण्यावरही. ह्या बंद्या घालून काही साध्य होत नाही. १५ ऑगस्ट, २ आक्टो, २६ जाने, ही पूर्वीपासून अन आता कित्येक वर्षांपासून गुजराथ वगैरे टिपिकल उदाहरणं.

सगळी धार्मिक स्थळे आणि कृत्ये बंद करू शकणारे धर्मनिरपेक्ष सरकार कधी आणताय ते बोला.

आँ !

धार्मिक स्थळे व कृत्ये सरकारने का बंद करायची ?

धागाकर्त्याचे शब्द हुकूमशाही. तर ही तेंव्हापासून का चालू आहे. डोळा मारा अर्थात आजच ह्यावर चर्चा होऊ नये हे बरोबर नाही, >> यावर्षी चर्चा झाली कारण मुंबईत भाजपाचे आमदार महापालिका आयुक्तांना जैन समुदायाच्या वतीने भेटले. तसेच मीरा-भायंदर मध्ये भाजपानेच हा प्रस्ताव मांडला. तिथे तर जैन 'मोठ्ठ्या' संख्येत राहतात असे भाजपाच्या महापौर शांती जैन यांचे म्हणणे होते. म्हणजे किती तर ५% ! अर्थात मीरा-भायंदर मध्ये केवळ २ दिवस मांस-विक्रीला बंदी असेल असे काल जाहिर झाले आहे.

काँग्रेसने केलेल्या अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनावर टीका करणारी भाजपा तसेच करत आहे हे पाहुन ऋन्मेषना दु:ख झाले असावे आणि त्यांच्या लेखी आनंद-दुं:ख व्यक्त करण्याचा एकच मार्ग - धागा काढणे, तोच त्यांनी अनुसरला असावा. Wink

त्यांच्या लेखी आनंद-दुं:ख व्यक्त करण्याचा एकच मार्ग - धागा काढणे, तोच त्यांनी अनुसरला असावा. >> Proud मग आता ऋन्मेश गेल्या कित्येक वर्षापासून विशिष्ट दिवशी / विशिष्ट राज्यात दारू विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !! असा धागा कधी काढणार आहे?

की तो माँसाहारी आहे म्हणून लगेच माँसाहार विक्री बंदीवरच (टायटल चूकीचे आहे) काढला.

सर्व खानपिनसमान ( चाल सर्वधर्मसमभाव) का नको? असा शब्द आहे काय? त्याची व्याख्या काय आहे? कोण लिंक देईल काय?

(दारू न पिणारा शाकाहारी केदार)

कोणाच्या खान्यापिण्यावर* बंदी घालने अनाकलनिय आहे. (अर्थात चरस, गांजा अन तत्सम "हाय" पदार्थ सोडून) >>> केदार, त्यावर पण बंदी कशाला? ओढूदेत की ज्यांना ओढायचाय त्यांना चरस गांजा. त्यावर बंदी आणून हुकूमशाही कशाला? नर्वस सिस्टिमवर परिणाम करणारी दारु चालते तर चरस गांजा का नको? चरस गांजावाले तर तो अंमली पदार्थ चढलेला असताना गाडी पण चालवू शकत नसतील. निपचित पडून राहत असतील. लोक दारु पिवून नको त्या कॉन्फिडन्समध्ये गाडी चालवतात. कुणाला ठोकली तरच पकडले जातात पण त्या दारु पिवून गाडी चालवण्याच्या कृत्यापासून धोका तर असतोच असतो....त्यांना मान्य असो वा नसो. तसेच त्या चरस गांजासाठी लागणार्‍या पैश्यांपायी चरसी गांजेकस कुणाचा खून पाडतील तर पकडले जातीलच. समान उदार धोरण पाहिजे भाऊ! Wink

बाकी नॉनव्हेज खाण्या/न खाण्यावर सरकारी बंदी नसावीच. जी काही बंदी करायची असेल / नसेल ती प्रत्येकाने आपापल्या घरातल्या वातावरणाप्रमाणे घरापुरती करावी. नॉनव्हेज खाण्याने माणसाचा मेंदू दारु, चरस गांजासारखा बधीर होत नाही. दारु, चरस गांजासारखे त्याचे शरिरावर वाईट परिणामही नाहीत. जो पर्यंत माणूस दुसर्‍या माणसाला मारुन खात नाही तोपर्यंत बंदी नसावी.

- दारु, चरस गांजा न पिणारी शाकाहारी अश्विनी Proud

नर्वस सिस्टिमवर परिणाम करणारी दारु चालते तर चरस गांजा का नको? >>

खूप फरक आहे. प्रत्येक दारू पिणारा व्यसनी असतोच असे नाही, पण प्रत्येक चरसी व्यसनी असतो. मॉडरेट अमाउंट मध्ये दारू अपायकारक नसते.

लगेच जामोप्या अन सकुरा आता सीतेनेपण दारू पिल्याचे दाखले देतील. Proud

थोड्या प्रमाणात अपायकारक नसेलच. पण नर्वस सिस्टिमवर किती सेवन केलंय त्या प्रमाणात थोडा परिणाम काही काळापुरता होतच असेल. काही लोक पिवून गाडी चालवतात ते तर त्यांच्या स्वतःसाठी व इतरांसाठी धोकादायक आहेच. अश्या लोकांच्या बाबतीत म्हणतेय मी. जे ही काळजी घेतात त्यांच्या बाबतीत इतरांना बोलायचं कारणच नाही.

आता सीतेनेपण दारू पिल्याचे दाखले देतील >>> अगदी! Sad

थोड्या प्रमाणात अपायकारक नसेलच. पण नर्वस सिस्टिमवर किती सेवन केलंय त्या प्रमाणात थोडा परिणाम काही काळापुरता होतच असेल. काही लोक पिवून गाडी चालवतात ते तर त्यांच्या स्वतःसाठी व इतरांसाठी धोकादायक आहेच. अश्या लोकांच्या बाबतीत म्हणतेय मी. जे ही काळजी घेतात त्यांच्या बाबतीत इतरांना बोलायचं कारणच नाही.

पण प्रत्येक चरसी व्यसनी असतो.>>> असे ना का! त्याचं तो बघेल!! व्यक्ती स्वातंत्र्य, आहार/विहार/आचार/विचार स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवंय ना? Wink

आता सीतेनेपण दारू पिल्याचे दाखले देतील >>> अगदी! Sad मागे एका महाभाग आयडीने त्या पत्कींच्या की कुणाच्या तरी गुरुपौणिमेनिमित्त काढलेल्या धाग्यावर दारुची बाटली (बहुतेक टीचर्स की काहीतरी नाव होतं दारुचं) डकवली होती.

मयेकर पाँइट आहे. पण मग तत्कालिन घोडेस्वारीचे पुरावे * मिळतीलच. त्यातच सीतेने दारू पिऊन घोडा चालवला अन तिच्या हातून चुकीने भाला सुटून एखादा मेला. ( तो त्या धोब्याच्या मेहूना होता) अन त्यामुळे मग पुढचे रामायण !

* इथे विकु एन्ट्री मारतील. त्यांचा मुद्दा घोडा हा मुळी भारतीय नाहीच. Proud

ते मांसाहरही करत होते नां >> अर्थातच. तसेही हिंदू देवता ह्या ९९ टक्के क्षत्रिय आहेत तर माँस भक्षण आणि मदिरा सेवन केले तर काय फरक पडतो. रादर कोणीही केले तर काय फरक पडतो? आणि का पडायला पाहिजे?

काँग्रेसने केलेल्या अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनावर टीका करणारी भाजपा तसेच करत आहे हे पाहुन ऋन्मेषना दु:ख झाले असावे आणि त्यांच्या लेखी आनंद-दुं:ख व्यक्त करण्याचा एकच मार्ग - धागा काढणे, तोच त्यांनी अनुसरला असावा. >>>>>:हहगलो:

मै निकला धागा लेके, रस्तेमे ओ सडकपे
एक मोड आया, मै धागा उत्थे छोड आया
अ‍ॅडमीन जाने ना जाने, मुझे खुशी हो या चाहे दुख हो
मै माचिस ले आया, मै धागा उत्थे छोड आयाsssssssssssssssssssSardar-dancing_240.gif

पण मग ते हेसुद्धा येतील आणि सांगतील की रामायणकालात विमानविद्या अवगत होती तशी मोटारविद्याही होतीच होती. ती तर इतकी प्रगत होती की दारू पिऊन आलेल्या व्यक्तीला ड्रायव्हरच्या सीटवर बसूच द्यायची नाही.

मै माचिस ले आया, >>>> ऑ! माचिस तर रॉहू आणतात. मग तो नाचणारा सरदार बाहुला कोण आहे? की तूच आहेस ती? Rofl

अग नाही ग. माचिस आणणारा ऋन्मेषच आहे. काडी टाकुन पळुन गेलाय. हे धुमश्चक्री पेटलीय.:खोखो:

त्यातच सीतेने दारू पिऊन घोडा चालवला >>> नहीऽऽ!!! :दोन्ही कानांवर पंजे ठेवून आकाशाकडे बघून किंचाळणारी बाहुली:. आता घोड्याने दारू प्यायली तर माहित नाही.

केदार, बरोबर आहे तुझी पोस्ट.
आपल्याकडे काये ना, गल्लीत्/इमारतीत्/चाळीत कुणाच्या घरी कुणी गचकले, तरी त्याला पोचवुन यायच्या दिवसापर्यंत त्या गल्लीत/इमारतीत्/चाळीत जाहिररित्या सणसमारंभउत्सव साजरे केले जात नाहीत. ।हिंदू धर्मा प्रमाणे सूतक फक्त गचकलेल्याच्या नातेवाईकांनाच असते, पण सुतक स्वरुपात नव्हे तर सहवेदना म्हणुन बाकी गल्लितील/इमारतीतील्/चाळीतील लोक प्रसंग काय, अन वागावे काय याचे तारतम्य पाळतात.
जे पाळत नाहीत त्यांना "बाकिचे लोक" पाळायला लावतात... अर्थातच त्यास "सक्ति" असे म्हणतात.

हिंदू धर्मीय मांसाहार न खाणेबाबत श्रावणमहिनाही पाळतात.

वर्षी चर्चा झाली कारण मुंबईत भाजपाचे आमदार महापालिका आयुक्तांना जैन समुदायाच्या वतीने भेटले.

१.निर्णय कोण घेतं? नगरसेवक की आयुक्त? नागरसेवकांना काही पॉवर नाहीत का? कारण मुंबईत भाजपकडे इतकं संख्याबल नाही की इतर पक्षांच्या विरोधाला न जुमानता निर्णय घेऊ शकेल.

२. कॉंग्रेसने २ दिवस घातलेली बंदी आता ८ दिवस झाली म्हणून कॉंग्रेसी इतकी आदळआपट करत आहेत का? तुम्हाला २ दिवस बंदी मान्य आहे का मुळात लाडक्या कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून घातलेली?

३. हा पुन्हा एक सर्वपक्षीय डाव असू शकेल का मिडियाला हाताशी धरून आपापल्या वोट banks मजबूत करण्याचा आणि लोकांचं लक्ष दुष्काळ, पाणी, महागाई या मूलभूत प्रश्नांवरून दूर करण्याचा?कारण इथे पुन्हा भावनिक राजकारण सुरु आहे.

Pages