मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे..जाऊ द्या रे त्या निमीत्ताने त्या कोंबड्या बकर्यांन्नाही जास्तीचे चार दिवस जगु द्या.

निषेध.
विशिष्ट धर्मीयांचे लांगुलचालन काही थांबत नाही. आधीच्या सरकारचा फेवरीट धर्म वेगळा, यांचा वेगळा. एवढाच फरक.
कुठल्याही धर्माला डोक्यावर न घेणारं खर्‍या अर्थानी धर्मनिरपेक्ष सरकार कधी येणार भारतात?

एक मटनविक्री बंद केली तर केवढा थयथयाट! अरे भाई मच्छी खा लो ना ...

बाकी सरकारच्या निषेधाआधी सगळ्यांनी हा निर्णय आधीच्या सरकारांनी घेतलेल्या निर्णयांवर आहे ... हे तपासून पाहिले का?

बेफि महार,मांग हे सध्याच्या काळात मेलेलि जनावरे खातात हे तुम्हि म्हटलेय त्याने फुड पोयझनिग होवु शकते>>>>>

पगारे, असे काही सध्या कुठे होत नाही कारण विशिष्ट धर्मीयांचे लोकं चोरुन खात असल्यामुळे महार, मांग च्या वाट्याला काहिच येत नाहिय.दुसरे म्हणजे या भ्रमात अजुन ही काही लोकं जगतायत हे हस्यास्पद आहे.

ईब्लिस अस होत कधी कधी. नुसत्या पेशन्टलाच मानसीक त्रास होतो असे काही नाही. काही डॉक्टर पण पेशन्ट असतात कधी कधी. विणकामावरील बाफावरुन ते लक्षात आलच होत.:फिदी: बाय द वे, मिर्ची मला नाही तुम्हाला लागलीय, त्यामुळे सहन होत नाही आणी सान्गता येत नाही असे झालेय तुमचे. मग तुम्ही सगळ्याना झोडत सुटता.

तुमचे आधी नाव घेतले नसतानाही तुम्हाला ठसके लागलेत. कारण मी माझे इथे ओरिजिनल नाव लिहीलेले असतानाही तुम्ही माझ्या जुन्या आय डीचे नाव उकरुन काढत बसला आहात. तुमचा तर आयडीच उडाला होता. अ‍ॅडमीननी तम्बी दिल्यानन्तरही तुम्ही कायम वैयक्तीक बोलत असता. काय तुम्हाला कुठे नाचायचे, उडायचे ते उडा.

लोकांचे भ्रम बघितले की हसावे की त्यांच्या बुद्धीवी किव करावे कळत नाही.

अश्या लोकांच्या घरी हे रात्र रात्र मुक्काम करतात म्हणे ते 'हे' सगळ खायला करतात वाटत मुक्काम.
अंघोळ करत नाहित, घाण राहतात, मांस खतात बरेच तारे तोडुन झाले.
अंगावरच्या मळीने गणपती बनवण्या इतके तरी घाणेरडे रहात नसावेत.
.

सकुरा, हे वर ज्यानी म्हणले आहे त्यान्चे नावच डायरेक्टली घेऊन बोला ना. असे आडुन आडुन, अवतरण चिन्ह देऊन का बोलत आहात? आणी गणपतीवर घसरुन स्वतःची पातळी का दाखवताय? मलाही बेफिकीर यान्चा कोण काय खाते हा प्रश्न आवडला नाही, पण त्यानी ते असे का म्हणत आहेत याचे नीट स्पष्टीकरण दिलेले नसल्याने मी त्याची वाट पहात आहे.
आणी गणपती अन्गाच्या मळापासुन बनला ह्या भाकड कथा आहेत. प्रत्यक्षात तुम्ही किन्वा आम्ही पाहीले आहे का की गणपतीचा जन्म कसा ते? आणी प्रत्येक मूल जन्माला यायच्या आधी ते कसल्या अवस्थेत असते ते सान्गायची गरज नाही, नाही का? तेवढे समजायला तुम्ही सुज्ञ असालच हो ना? की नाही? मातेचा विटाळ आणी पितृ रेत असे स्पष्ट काही ग्रन्थात लिहीले आहे. ते मुल जन्माला आल्यावरच स्वच्छ होते, आधी नाही. दुसर्‍याला नावे ठेवता ठेवता तुम्ही पण घसरायला लागल्या आहात.

नेहेमी ब्राह्मण आणी हिन्दु यान्च्यावर घसरण्यार्‍यानी आधी मुम्ब्रा, भिवन्डी, मीरत, मालेगाव अशा सन्वेदनशील ठिकाणी जाऊन तिथे प्रवचने द्यावी, आणी मग वर तोन्ड करुन थयथयाट करावा. पण हे होणार नाही तिथे मात्र शेपुट घालतील.

प्रवचने द्यायला भाषाप्रभु असावे लागते.
प्रत्येक प्रतिसाद हा कोणाच्या तरी प्रतिसादा वरची प्रतिक्रिया असते.

या धाग्यावरच्या १/३ पोष्टी धागाकर्त्यानेच पाडल्या आहेत की. Lol

बाकी चालुद्या!! भाजपा काँग्रेस, हिंदु-मुस्लिम, जात पात, ब्राम्हण, दारु, मोदी-गांधी, ब्रिगेडी वगैरे सगले मुद्दे आलेत याची खात्री करा. डुकरावर बंदी आल्याचे आठवत नाही. आलीच की आणखी एक धागा काढा व धागा धागा अखंड विणुया!!

जिथे मांसविक्रिवर बंदी घातली गेली आहे त्या मीरा-भायंदरमध्ये लोकसंख्येच्या केवळ ५% जैन राहतात. मुंबईच्या सव्वा कोटी जनसंख्येमधे केवळ ३.५ लाख जैन आहेत. तरीदेखिल 'मुंबईत जैन समाज मोठ्या (?) प्रमाणात असल्याने बंदी घालणे योग्य' अस मत भाजपाचे आमदार राज पुरोहीत यांनी व्यक्त केले आहे.
http://epaper.loksatta.com/c/6477807

>>>मलाही बेफिकीर यान्चा कोण काय खाते हा प्रश्न आवडला नाही, पण त्यानी ते असे का म्हणत आहेत याचे नीट स्पष्टीकरण दिलेले नसल्याने मी त्याची वाट पहात आहे.<<<

माफ करा, कोण काय खाते हे मी कुठे विचारले आहे? येथील काहींनी व बा बोधे वा तत्सम मंडळींचे लेखन वाचले असेल तर गावोगावी मेलेली जनावरे खाल्ली जात असत असे उल्लेख आहेत. त्याबाबत काही कायदा झाला असल्यास मला अजिबात माहीत नाही व ते मी प्रत्येक पोस्टमध्ये ('मला इतपत माहीत आहे' अश्या अर्थाचे लिहून) नोंदवलेले आहे.

माझ्या पोस्ट्स शॉकिंग वगैरे वाटल्या ह्याचेच खरे तर मला नवल वाटत आहे. आणि एवढे करून तो धाग्याचा मूळ विषयच नाही. त्या विषयाकडे धागा वळवू पाहणार्‍यांना मी माझ्यापरीने दिलेली उत्तरे होती ती!

धाग्याच्या विषयावर मी जे लिहिले आहे त्यावर कोणीच बोलताना दिसले नाही. (म्हणजे माझ्या प्रतिसादांवर म्हणतोय, तसे भरपूर सुसंगत प्रतिसाद आहेतही). माझ्या प्रतिसादावर बोलावेच असा मुळीच आग्रह नाही पण माझ्या इतर प्रतिसादांवर (जे धागा भरकटू नये ह्या प्रयत्नांत दिलेले होते) टीका करायची असल्यास सर्वच प्रतिसादांबद्दल बोलले जावे अशी अपेक्षा!

चु भु द्या घ्या

बेफिकीर मग बोधे यान्चे नाव तुम्ही आधीच द्यायचे ना. आणी तरीही, पगारे म्हणत आहेत त्याप्रमाणे तसे तुमच्या वाचनात आले तर पगारेना जरुर कळवा. बाकी माझे पगारेन्शी काहीही वैचारीक मतभेद असतील वा आहेत, पण पगारे खरोखर मनापासुन काम करतात. त्यान्ची सामाजीक जाणिव पान्ढरपेशा समाजापेक्षा निश्चीतच चान्गली आहे. आय होप ते अशा लोकाना न्याय देतील.

माझा कधीही राजकारण्यान्वर विश्वास नव्हता आणी नाही, पण बरेच सामाजीक कार्यकर्ते नाव देखील न देता कार्य करतात आणी मोबदल्याची अपेक्षाही ठेवत नाहीत.

>>>> येथील काहींनी व बा बोधे वा तत्सम मंडळींचे लेखन वाचले असेल तर गावोगावी मेलेली जनावरे खाल्ली जात असत असे उल्लेख आहेत. <<<<
ते लेखन मला माहित नाही, पण मेलेल्या जनावरांचे मांस खाण्यावरुन आठवले, जरि संदर्भ देऊ शकत नसलो तरी, की मूळात अहिंसावादी बौद्ध धर्मात मांसाहार वर्ज्य होता, पण अनुयायींच्या आग्रहामुळे, वा मांसाहार चालुच ठेवलेला असण्यामुळे, शेवटी, "अहिंसात्मक रीतीची/तत्वाची पूर्तता करण्याकरता" आणि मिळालेले अनुयायी मांसाहाराच्या प्रश्नावरून गमावले न जाण्यासाठी, शिकार न करता, पण नैसर्गिकरित्या मृत प्राण्यांचे मांस खाण्यास परवानगी दिली गेली.

बाकी गावोगावी मेलेली जनावरे खाल्ली जात असतील तर त्यात काय विशेष?
आमच्या कोकणांत यावा.... उन्हाळ्याच्या सीझनला मासेमारीकरुन ते मेलेले मासे बांबुंच्या तकाटण्यांवर लटकवुन वाळवत ठेवलेले असतात, अन त्यांचा वाळण्याच्या प्रक्रियेत मृत माशांच्या वासाचा घमघमाट सुटलेला असतो. तिकडचे लोकच काय, आख्ख्या देशभर मृत वाळवुन ठेवलेले मासे लोक चवीने खातात, (तर काही जण त्या वासाला "दुर्गंधी" ही म्हणतात) .
पण म्हणून काय आजवर अशी कुवासयुक्त सुकी मासली खाणारे कोणी "स्वतःला दुर्दैवी / वंचीत/ मागास जीव वगैरे" समजत असल्याचे वा तसे बोम्बलत असल्याचे दिसले नाही कधी. Proud माशांबाबत एक न्याय, अन बाकी मृत प्राण्यांच्या मांसाबद्दल दुसरा न्याय असा दुजाभाव का?

या धाग्यावरच्या १/३ पोष्टी धागाकर्त्यानेच पाडल्या आहेत की.
>>>>
काही गल्लत होतेय का? धागाकर्ता मी आहे, ऋन्मेष आणि माझ्या इथे मोजक्याच पोस्टी आहेत, त्यादेखील बहुतांश सुरुवातीच्या एक-दोन पानांवर.

अर्थात, जर माझी एक पोस्ट दस के बराबर असे गणित असेल तर हे कौतुक मी विनम्रपणे स्विकारतो Happy

>>>ऋन्मेऽऽष | 9 September, 2015 - 11:45 नवीन

ऋन्मेष आणि माझ्या इथे मोजक्याच पोस्टी आहेत<<<

तुम्ही हे वाक्य चुकून ऋन्मेष ह्याच आय डी ने लिहिलेलं दिसतंय

धागाकर्ता मी आहे, ऋन्मेष आणि माझ्या इथे मोजक्याच पोस्टी आहेत >>

धागाकर्ता मी आहे - ऋन्मेष ,आणि माझ्या इथे मोजक्याच पोस्टी आहेत. चुभुद्याघ्या. (मी ऋन्मेषचा किंवा तो माझा डुआय नाही)

लिंबु तुमचा काहितरी गैरसमज झालेला दिसतोय बेफि हे मासे ह्या बद्दल बोलत नाहि त्याचा खालील प्रतिसाद निट वाचा

खात आहेत. त्यांना इकडे कोण काय प्रतिसाद देतो ह्यापेक्षा एक मेलेली म्हैस मिळाली ह्याचाच आनंद होत आहे. त्यांना विषबाधा झाल्याचे विशेष ऐकिवात नाही. तसेही, प्राणी मेला की निवांत आठ दहा दिवसांनी त्याचे अवशेष नाही खात ते! प्राणी मेला की गावातले लोक मुद्दाम त्यांना तो घेऊन जायला सांगतात आणि ते तो प्राणी त्वरीत नेतात.

वर

पगारे, माझा गैरसमज नाही झालेला, माशांच्या पोस्ट आधीची माझीच पोस्ट वाचा की...... ! का ती नेहेमीप्रमाणे सोईस्कररित्या डोळ्या आड केलीत?

तुम्ही हे वाक्य चुकून ऋन्मेष ह्याच आय डी ने लिहिलेलं दिसतंय
>>>
भ्रमर यांनी सांगितल्याप्रमाणे स्वल्पविराम चुकलाय.

बाकी माझा याच आयडीने एवढा पसारा आहे की आणखी एखादा आयडी काढून चालवणे म्हणजे मला नोकरी सोडून घरीच बसावे लागेल Happy

गावातले लोक जर जबरदस्तिने मेलेली जनावरे ओढायला भाग पाडत असतिल तर तो मोठा गुन्हा आहे अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल होउ शकतो.बेफि तुम्हाला असे एखादे गाव माहित असल्यास खरच सांगा पुढचे सर्व मि पाहतो.
आजच बर्याच सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला परंतु असे प्रकार घडत नसल्याचे त्यांनि सांगितले.मात्र जरी स्वखुशिने असे कोणी करत असल्याचे तुम्हाला माहित असल्यास ही संपर्क साधा तेथे जाउन प्रबोधन करण्यास कार्यकर्ते तयार आहेत

लिंबु, तुमचा आधिचा प्रतिसाद वाचला होता माझ्या मते बौध्द धर्मात मांसाहार वर्ज्य नाही.आणि बेफिंनी महार आणि मांग हे लोक सध्या मेलेली जनावरे खातात नि गावकरी जनावरे मेलि की त्यांना खायला देतात असे लिहिले आहे ह्या दोन्हि जाती हिंदुधर्मात येतात.

महार आणि मांग हे लोक सध्या मेलेली जनावरे खातात नि गावकरी जनावरे मेलि की त्यांना खायला देतात असे लिहिले आहे ह्या दोन्हि जाती हिंदुधर्मात येतात.>>>>>>

एवढ्या छान छान गोष्ट हिंदू धर्मात आहेत म्हणुन हिंदू धर्माचे पोवाडे मोदीजी जगभरात गात फिरतात.

पगारे,

आज भेटलेल्या लोकांमध्ये असे कोणीही नव्हते. आजवर भेटलेल्या लोकांन हे प्रश्न विचारले नव्हते. आता विचारत जाईन.

पणः

१. तुम्ही धाग्याशी विसंगत चर्चा करत आहात
२. कोणतातरी एकच मुद्दा धरून लिहीत आहात जो धाग्याशी संबंधीत नाही
३. तो मुद्दा तुम्हीच काढलेला आहेत
४. 'अ' धाग्यावर 'ब' मुद्दा काढून 'क' शी 'ड' ह्या विषयावर 'ई' पद्धतीने चर्चा सुरू ठेवत आहात.

ह्यापेक्षा तुम्ही अनंत धागे काढता तसे ह्या विषयावर आणखी एक धागा का काढत नाही आहात?

मुळात मूळ धाग्याबद्दल तुमचे मत काय आहे ते तुम्ही कोठेही लिहिलेले नाहीत. का नाहीत लिहिलेले? विषयावर लिहिण्यात कमीपणा वाटतो का तुम्हाला?

जैन धर्मियांनी पैश्याच्या सामर्थ्यावर तुम्हा-आम्हासारख्या अनेकांची (!) तथाकथित तत्त्वे वेठीला धरलेली आहेत ह्यावर तुमच्याकडून भाष्य अपेक्षित आहे.

ह्यापुढे तुम्ही मूळ धाग्यावर प्रतिसाद दिल्यानंतर त्याच प्रतिसादावर भाष्य करण्यात येईल, इतर अवांतरावर नव्हे.

तुम्ही तुमचे अजेंडे राबवायला इतरांना उद्युक्त करत बसू नका अशी सुचवणी आहे.

Pages