मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे! ६०+ प्रतिसाद

धाग्याने फास्टेस्ट ५० गाठलेली आहे! तडाखेबंद फलंदाजीबद्दल ऋन्मेऽऽष ह्यांचे अभिनंदन! धाग्यास द्विशतकी शुभेच्छा!

काँग्रेसने जेव्हा केले (तेही चुकीचेच होते) ते लांगुलचालन, मात्र आता समाजाच्या भावनांचा आदर होतोय ऋन्मेष!!

मुसलमानांना बिफ खायला कुणी बंदि केलेय? त्यांनी खावे की, फक्त जिथे मिळते तिथे जाऊन.
>>>>>>>

थोडक्यात आम्ही मांसाहार करणार्‍या मुंबईकरांनी देखील आपली जन्मभूमी सोडून चार-आठ दिवस बाहेर जाऊन राहावे आणि खावे.. चांगला आहे न्याय आणि कायदा !

>>>जर शासन एखाद्या समाजाप्रती झुकत कायदे बनवत असेल तर याला लोकशाहीचा अंत म्हणू नये तर आणखी काय<<<

हे विधान ह्या देशातील आजवरच्या प्रत्येक केंद्र सरकारला लागू होते. आत्ता सोशल मिडिया स्ट्राँग आहे म्हणून कोणाचं बाळ उभं राहिलं तरी ती बातमी व्हायरल होते हे सोडून द्या. तसेही ही बाब भारतभर झाली आहे का?

अर्रे! ६०+ प्रतिसाद >>> हल्ली कथा-कविता-गझलांना पण ईतके प्रतिसाद मिळत नाहीत. Wink

कांग्रेसने मतांवर डोळा ठेवून केले होते हे ऐकले हो काका! जैन लोकांच्या मतांवर डोळा ठेवून निवडणूक जिंकता येईल का?

काय पण !

Proud

अर्रे! ६०+ प्रतिसाद >>> हल्ली कथा-कविता-गझलांना पण ईतके प्रतिसाद मिळत नाहीत.
>>

येस्स !!! बात मे दम है !!! आणि फास्टेस्ट फिफ्टी सुद्धा Happy
पण कथा-कविता-गझलांमध्ये लोकसहभाग असतो का?

चर्चाविषय है तो चर्चा तर होणारच!

स्वाती२, मी कुठेही या बंदीचे समर्थन केलेले नाही.
माझा या अशा सर्व प्रकारच्या बंदींना विरोधच आहे. कोणत्याही पक्षाच्या सरकारने केला तरी.

पण,
इथे ही बाब जाणुन बुजुन दुर्लक्षिण्यात येत आहे की, ही अशी बंदी फार आधीपासुन होत आहे.
ईथे जर २ च्या एवजी वाढिव ४ आणि ८ दिवसांच्या बंदीला विरोध होत असता तर मी समर्थनच केले असते.
परंतु, जणु काही नव्या आलेल्या भाजप सरकारने मुस्लिमांविरुद्ध कट करुन सरसकट मांस बंदी केली आहे असा प्रचार करुन त्या काल्पनीक गोष्टीचा विरोध केला जातो आहे,
म्हणुन माझा या धाग्याला विरोध आहे.
जर तुम्हाला मांसबंदीला विरोध करायचाच होता तर एवढे वर्ष जी २ दिवसांची विक्री बंदी केली जात असे तेव्हा का नाही आवाज ऊठवलात? ईथे शंका घ्यायला पुरेपुर वाव आहे.
आणि जर तुम्हाला आत्ताच आवाज फुटला आहे तर जे काही "जास्तीचे" घुसडण्यात अलेले आहे त्याचा करा ना?
सगळ्याचाच करायचा असेल तरा आधीचं सरकारही हुकुमशाही होते असा उल्लेख करुन करा?

>>स्वाती२, मी कुठेही या बंदीचे समर्थन केलेले नाही.>>
तुम्ही समर्थन करीत आहात असे मी देखील म्हटले नाहीये. मी फक्त तुमची दोन वाक्ये भावनेचा आदर आणि मेयर कनेक्शन यातला फरक दाखवण्यासाठी वापरलीत. तरीही तुमचा आक्षेप असेल तर तसे सांगा मी माझी पोस्ट संपादित करेन.

ऑ.... कुठल्या बंद्या पाळता म्हणे ?

रस्त्यावर कुठेही थुंकण्याचं, कुठेही कचरा टाकण्याचं, रेल्वेच्या टपावर चढण्याचं, भ्रष्टाचार करण्याचं. तो करु देण्याचं, प्लॅस्टीक पिशव्यावरील बंदी ना जुमानण्याचं, वाहतुकीचे नियम न पाळण्याचं, पाण्याची नासाडी करण्याचं, पर्यावरणाची नासाडी करण्याचं, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचं, ध्वनिप्रदूषण करण्याचं, हेल्मेट सक्ती नाकारण्याचं, मतदानाच्या दिवशी सहलीला जाण्याचं, आपल्याच देशात स्त्रीयाना असुरक्षित ठेवण्याचं... आहेच कि स्वातंत्र्य.. सर्वांनी स्वतःच्या मनाला वाट्टेल तसे वागायचं...

शिवाय मायबोलीवर हवा त्या विषयावर धागा काढून तो पेटवण्याचं आणि त्यात तेल घालत राहण्याचही.. !!!

हिच कि लोकशाही !!!!

ओके … ऑन अ सिरिअस नोट, नेमकी हुकुमशाही कोणाची?>>>> ऋन्मेषची! एवढे सतराशेसाठ धागे काढुन वरती हुकुम करतोय स्वप्नील आणी सईला आपले म्हणा.:दिवा:

तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे Proud

मी शाकाहारी असूनही ह्या बंदीचा निषेध.
<<म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो>> +१००

ऑ! कोणाची विप? कोण मला विपु करतय्?:फिदी:

ओके! खरे तर २ दिवसा करता जैनान्करता/ हिन्दुन्करता कशाला? अख्खा श्रावण महिनाच बन्दी पाहीजे यावर. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात अग्नी ( पचनशक्ती) मन्द होतो, त्यामुळे पचायला जड पदार्थ खाऊ नये असे म्हणतात. भजी खाऊन बघा पावसानन्तर ( शेजारच्याची झोप उडणार हे नक्की). मटण पचायला जडच असते, मासे सुद्धा जड पडतात.( मी शाकाहारी आहे, पण आमचे मालक मान्साहारी असल्याने हे मला माहीत आहे)

आमच्याकडे सोमवार-शनीवार नॉनव्हेज आणत नाहीत. श्रावणात आणी गणपती होईस्तो नाहीच नाही. नवरा आधी सोमवारी उरलेले खायचा, पण त्याच्या कानी-कपाळी ओरडुन मी ते बन्द करायला लावले.

बाकी उद्या.

इथे ही बाब जाणुन बुजुन दुर्लक्षिण्यात येत आहे की, ही अशी बंदी फार आधीपासुन होत आहे.>>> अगदी बरोबर अश्या गोष्टी करुन, त्या पचवून वर ढेकरही न देण्याचे राजकीय चातुर्य भाजपकडे नाही. मदरश्यांना अनुदान देणार नाही हा ही असाच एक फुकाचा ढोल, त्यांना तर काँग्रेसवालेही अनुदान देतच नव्हते पण बोंबलतही नव्हते.
हे मात्र सगळीकडे नको त्या फालतू गोष्टींचे ढोल पिटतात आणि शिव्या खातात, येडे!

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात अग्नी ( पचनशक्ती) मन्द होतो, त्यामुळे पचायला जड पदार्थ खाऊ नये असे म्हणतात. भजी खाऊन बघा पावसानन्तर ( शेजारच्याची झोप उडणार हे नक्की). मटण पचायला जडच असते, मासे सुद्धा जड पडतात

>> मुस्लिम, ख्रिस्ती बांधवाना यापैकी कश्शाचा म्हणून त्रास होत नाही बघा. त्यांची पचन संस्था वेगळी आहे का हिंदूंपेक्शा? Happy

मदरशांचे सरसकट अनुदान बंद केल्यामुळे आगाऊंच्या रोजी रोटीवर संक्रांत आलेली दिसते.
म्हणुनच एवढे संदर्भ समजुन न घेता बोलत आहेत.

मिर्चीताई, तो निर्णय महानगरपालिकेचा आहे. त्यात मोदिंचा काय संबंध? मेट्रो उदघाटनाला न बोलावुन लायकी दाखवुन दिली म्हणून काहिही संबंध जोडू नका.

मदरशांचे सरसकट अनुदान बंद केल्यामुळे आगाऊंच्या रोजी रोटीवर संक्रांत आलेली दिसते.
म्हणुनच एवढे संदर्भ समजुन न घेता बोलत आहेत.
<<

अगदि, अगदि आजकाल भारतीय जनता पार्टी बद्दल कुठुनही काहीही बातमी मिळाली, की त्याचा दुसर्‍या कुठल्याही गोष्टीशी बादनारायण संदर्भ जोडुन, फक्त भाजपवर गरळ ओकायची एवढीच सवयच लागलेय, आजकाल काहीजणांना.

<<मिर्चीताई, तो निर्णय महानगरपालिकेचा आहे. त्यात मोदिंचा काय संबंध? मेट्रो उदघाटनाला न बोलावुन लायकी दाखवुन दिली म्हणून काहिही संबंध जोडू नका.>>

कोणाची? स्वतःची ना? अगदी बरोबर. 'जळकुकडा' किंवा मग 'Insecure' म्हणतात अशा लोकांना. Lol
असो. हा धाग्याचा विषय नाही.

अरे बाबांनो, अशा बंदि अ‍ॅक्च्युली विन-विन सिच्युएशन क्रिएट करतात. बंदि जाहिर केली म्हणुन जैन खुश, आणि बंदितहि खाणार्‍याला मांस मिळते, खटपट केल्यास - जशी ड्राय्डेला बीअर मिळते... Proud

Pages