डाळ शेपु

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
dal shepu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..

खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेशी आहे
अधिक टिपा: 

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डाळ शेपु धागा इज ऑन फायर.. Biggrin Proud
बस करा यार..खुप झाल आता..
आता काही दिवसांनी नविन पाकृ टाकते..त्यात एकही चुक सापडणार नै असा Wink ..
चला सगळे डाळ शेपु वर या बरं आता..शेपु फॅन क्लबात मी नै पण आहे कुठे तो क्लब .. वाचायला आवडेल.

हा घे. http://www.maayboli.com/node/12381

चला सगळे डाळ शेपु वर या बरं आता.>>>>> सगळे जण दाटीवाटीने बसलेत असे दृष्य डोळ्यासमोर आले.:खोखो:

चला सगळे डाळ शेपु वर या बरं आता.>>>>> सगळे जण दाटीवाटीने बसलेत असे दृष्य डोळ्यासमोर आले.

Lol हो ना. आणि विदर्भवाले डाळ डाळ शोधून खातायत आणि बाकीच्या भागातले आम्हाला पण डाळ हवीये म्हणून ओरडाआरडा करतायत. मधल्यामध्ये त्या शेपूकडे कोणी बघतच नाहीये.

सगळे जण दाटीवाटीने बसलेत असे दृष्य डोळ्यासमोर आले.खो खो>> तेही शेपूने बनलेल्या गालिच्यावर :p
मामी, भारीच!! आम्ही एक पीजे आठवेपर्यंत तुमचे चार असतात Happy

अन्नं वै प्राणा: तर खुप मोठ्ठा ऐतिहासिक दास्तावेज आहे.

आरामात वाचायला लागेल अनमोल खजानाच आहे.

प्राप्ती ताई, तुम्ही छान लिहिता. हार्टलेस लोकं काय हो वाट्टेल ते बोलतात, खरं असलं म्हणून काय झालं! कुठे काय बोलावं काही कळत नाहे. विदर्भ्यान्नी विदर्भ्यांची पार्टी नको का घ्यायला भांडणात! तुम्ही म्हणताय ना तिखट खाऊन गरम वाटतं, पण घाम नाही येत आणि त्याने आणखी गरम होतं पण तरी पण घाम नाही येत तर तसंच असणार. आणि मिरची डाळीहून स्वस्त असेल पण आपल्या त्या ह्याच्याहून आहे का. तुम्ही लक्ष देऊ नका. असं शेपो करून जाऊ नक्का ना!!! असंच छान छान मनोरंजक लिहित रहा, आम्ही वाचतोय.

आणि हो अजून एक, चिनूक्सवर चिडून केलेल्या कॉमेंट वर पण विनोद करण्याचे प्रयोजन सुद्धा समजले नाही. एखाद्या आयडीचे एखादे वाक्य नाही पटले नाही हे सांगायला काय आधी त्या आयडीचे सगळे लेखन (मग ते कितीही ज्ञानवर्धक का असेना) वाचलेले आणि त्या आयडीचे सगळे विचार आपल्याला माहित हवे असं काही थोडीच आहे?
इथे येऊन बरीच वर्ष झाली तरी शेवटी कुठलीही व्यक्ती आपापल्या आवडीनुसार इथले लेख वाचेल किंवा नाही वाचणार. प्राप्तींना चिनूक्सचे ओवरॉल विचार कसे आहेत, त्यानी आत्ता पर्यंत काय, किती आणि कशाकशावर लेखन केलय हे माहितीच नसेल किंवा असलं तरी त्यांना त्याच्याशी काहीच घेणं नसेल असंही असू शकतं.
त्यामुळे हे "अरे तुमको क्या मालूम चिनूक्स क्या चीज हय" छापचे विनोद टोटली अनकॉल्ड फॉर आहेत.

कोणाला तरी देऊन टाकलं असेल चिनूक्सनं हृदय! म्हणून हार्टलेस फिरत असेल.>>>> मामीची जोरदार बॅटिंग चालली आहे Lol सॉलिड कोटी !!

आता विशेष चिनुक्स नावाच्या हार्टलेस आयडी साठी >>>>>>>>>>>> उन्हाळा आणि दारिद्र्य एकत्र जिथे जिथे येतात तिथे तिथे मिरच्या खाण्याचं प्रमाण अधिक आहे.>>>>>>>>>>>. अति असंवेदनशिल्तेचे उदाहरण दिलेत. वैदर्भीय तुम्हाला दरिद्री वाटतात हे बोलून तुम्ही तुमच्या वैचारिक दिवाळखोरीची आणि मनाच्या दरिद्रीपणाची ओळख करून दिली.

वैद्यबुवा
प्राप्तींना चिनुक्स ओव्हर ऑल कसे आहेत हे माहित नसताना त्यांचे एखादे वाक्य नाही पटले तर फक्त 'असहमत आहे किंवा पटले नाही ' एवढच म्हणायला हव होत

वरची विधान करण्याची काहीच आवश्यकता नव्हती

चिनूक्स ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत! (दारिद्र्य, तिखट खाऊन घाम येतो, थंडावा मिळतो, तोंडीलावणे कमी खाल्ले जाते ह्या भागाशी! उन्हाळा हे कारण नवीन वाटले आणि समजलेही नाही).

प्राप्ती - तुमची मोठी पोस्ट खरंच सुंदर पोस्ट आहे. पण त्यावर केलेल्या हार्टलेस टॉपिंगमुळे बिनसतंय!

शेपू आणि अस्मिता हे दोन शब्द एकत्र येऊ शकतात हे आज समजले.

बाकी प्राप्ती, एक शुद्ध पुणेकर म्हणून मी इतके नक्की सांगू शकतो की विनोद करायला पुणे केवळ ह्याचसाठी उत्तम निवड ठरते कारण इतक्या दुर्दैवी काळातही इथे तसे फारसे काही उणे नाही. 'पुणेपणा' तेवढा घटला आहे. त्यामुळे माणसे (खरी पुणेकर माणसे) आपले पुणेकरत्व जपून वागू शकतात. 'इथल्याच' मुली अश्या असतात / असतील वगैरे सगळा भ्रम आहे. Happy

बेफि, अहो उन्हाळ्यात घाम आला की त्याचे बाष्पिभवन होण्यासाठी शरीरातील उर्जा वापरली जाते, परिणामी शरीराचे तापमान कमी होते आणि आल्हाददायक वाटते. आठवा शास्त्रीय करणे द्या. Happy

अरे देवा! ईतक्या सुंदर भाजीची पार चटणी झाली. असो, टिनाने वैदर्भीय लिहावयास नको होते. पुणे, मुंबई, विदर्भ वाद तर अगदीच अनावश्यक. खरं सांगते, इतर प्रतिक्रियांचे काही नवल नाही वाटले पण चिनुक्स यांनी टाकलेले वाक्य खटकले. Wrong timing, wrong place असे काहीसे झाले असावे.

शेपूच्या भाजीवर १३८ पोस्टी पाहून धागा उघडला, अन स्मिता-अस्मिता पाहून स्तिमित झालो.

चिनुक्स कोण, हे प्राप्ती यांना आपोआप ठाऊक असण्याचे प्रयोजन नाही.

प्राप्ती, आतापर्यंत तुम्हाला ठाऊक झाले नसेल, तर तुमच्या माहितीसाठी, चिनुक्स हे मायबोलीचे भारतात राहणारे 'अ‍ॅडमिन' आहेत असे समजा. अर्थात चिनुक्स या आयडिने लिहितात तेव्हा ते मायबोलीच्या नियंत्रकमंडळाचे सदस्य म्हणून लिहित नसून, एक सामान्य सदस्य म्हणूनच लिहीत असतात. (अशा वेळी त्यांच्याशी वाद घालायला परमिशन असते. Wink स्वानुभव :दिवे: )

चिनुक्स यांचा प्रतिसाद अध्यहृत संदर्भांशिवाय वाचल्यास, माझ्या गावच्यांना/माहेराला गरीब म्हटले, गरीबीतून मिरची खावी लागते, असे म्हटले, असे "वाटल्याने" प्राप्ती यांना राग येणे सहाजिक आहे. व त्या दृष्टीकोनातून त्यांची पोस्ट परफेक्टली समर्थनीय आहे.

त्यांच्या या रागाला उत्तर म्हणून अनेकानेक गमतीदार, वळणदार, समजूतदार पोस्टी टाकत बसण्यापेक्षा, त्यांना स्पष्ट शब्दात चिनुक्स यांच्या नुसत्या पदाची नव्हे, तर त्यांच्या चौफेर ज्ञान व "अन्न" या विषया(च्याही) सखोल अभ्यासाची कल्पना सरळ शब्दांत द्यायला हवी होती. (अमुक पुस्तक/धागा वाच वगैरे नाही. लोकांना त्या क्षणी वाचणे जमत नसू शकते.) १.३८ पोस्टीत विषय आपटला असता. (आटपणे व आपटणे यातील फरक शब्दार्थांच्या धाग्यावर विचारावा)

चिनुक्स यांनी याबद्दल इथे स्वतः स्पष्टीकरण न देणे अ‍ॅबसोल्यूटली योग्य आहे. पण कुण्या जुन्या जाणत्या माबोकराने ही ओळख करवून देणे गरजेचे होते, व आहे.

नव्या मुली आहेत. उत्साही आहेत. काही वेगळ्या विषयाची भर माबोवर घालताहेत. आपली नेहेमीची निबर भांडणं करायला आपले नेहेमीचे भूमीगत धागे आहेतच की!

तेव्हा या धाग्यावर हे मा शे पू (ट) Wink

दिमा,
अगदी अगदी पटलेच. हेच लिहिणार होते. (चिनूक्स हे मायबोलीवरचे रजनीकांत टाईप हिरो आहेत असे हे कसे कळणार कोणाला.(म्हणजे आहेत खरे हिरो) . Happy

(तुमच्या आजकाल बर्‍याच पोस्टी पटतात, घाबरायला होतं न..) Happy

धमाल धागा Lol ...

बाकी धाग्यावरून वाटतेय ... वेगळा विदर्भ व्हायला पायजे Lol

वेगळा विदर्भ व्हायला पायजे >>
वेगळ्या विदर्भाचा झेंडा : मधे सगळ्या डाळी आणि त्यावर मिरचीच्या पाकळ्या अशी डीझाईन.

दिमा, तुमची पोस्ट चान्गली आहे हो. पण प्राप्ती नवीन असल्या तरी पहिल्याच फटक्यात, प्रतीसाद देणार्‍या मन्डळीना गाढव सम्बोधणे हे काय आहे? ( सन्दर्भः गाढवापुढे वाचली गीता...) तिथे तर चिनुक्स आला पण नव्हता. चिनुक्सची पोस्ट बरीच नन्तरची आहे. मग नवीन येणार्‍या बाई/ माणसाने सगळ्याना गाढव म्हणावे हे योग्य वाटले नाही.

टीना नवीनच आहे, पण तिला उलट आधी बरेच चान्गले प्रतीसाद आलेत आणी तिचे कौतुक पण झालेय. ( ती त्याला पात्र आहेच, नो डाउट) त्यामुळे उगीच कुणी कोणाच्या खोड्या काढल्यात असे नाहीये.

पण असो, तुमच्या बर्‍याचश्या पोस्ट पटेबलच असतात. पण ह्यात थोडा फरक दिसल्याने मी मध्ये उडी मारली एवढेच. मात्र हेमाशेपो/ पू नाही.:डोमा:

Rashme, ti mhan hoti g.. Ti kai lokana gadhav mhanaleli nhi.
Ugach punrkaranch Nav anakhi kharab karun nakos bar

एकंदरीत १४७ जणांवर केलेल्या प्रयोगातून असे निदर्शनात आले आहे कि शेपू नावाची भाजी मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय घातक आहे. त्याबद्दल निव्वळ वाचाल्यानेही नाती-मैत्री जपण्यासाठी लागणाऱ्या समजदारी नावाच्या हार्मोन्समध्ये बिघाड होऊन महिला आपले मानसिक संतुलन गमावतात....... तेव्हा आजपासून 'शेपू' भाजीवर बहिष्कार घालावयास हवा असे प्रमाणासकट जाहीर करून टाका. Proud Proud Biggrin

वेगळ्या विदर्भाचा झेंडा : मधे सगळ्या डाळी आणि त्यावर मिरचीच्या पाकळ्या अशी डीझाईन.

>>

येस्स्स ... जय विदर्भ जयहरी मिर्ची डाळमिर्ची ...

वैद्यबुवा, दीड मायबोलीकर, ते अनकॉल्ड फॉर बद्दल नाही पटल्या पोस्टस. गेली पाच पानं ज्यांना दुसर्याचं म्हणणं समजूनच घ्यायचं नाहीये वर गाढवापुढे वाचली गीता वगैरे म्हणायचं आहे त्यांच्यापुढे गीतासार वाचायची काय गरज? एखाद्या माणसाबद्दल वैयक्तिक शेरे करताना काळजी लिहीणार्याने घ्यायची असते. अपुर्या माहितीच्या आधारावर तारे तोडले की परिणाम नको तोच होणार. आणि 'जुनेजाणते' तुम्ही म्हणताय म्हणून, पण इथे तर जुनेजाणतेच कसे वाईट, किती भांडतात वगैरे झालेलंय. शिवाय आगापिछा नसलेल्या कमेंट्स त्यांच्याचबद्दल आलेल्या असताना त्यांनीच हे 'द्न्यानामृत' देणे अजिबात 'गरजेचे' वगैरे वाटत नाही.

चिनूक्सच्सा पदाची ओळख करून द्यायचेही प्रयोजन कळले नाही. तो त्या पदावर नसता तरी याच प्रतिक्रीया आल्या असत्या आणि तो त्या पदावर आहे म्हणून काही वेगळी 'कारवाई' केली जाईल या शेरेबाजीबद्दल असेही नाही.

वर कुणीतरी 'म्हणूनच पुण्यामुंबईच्या मुली यांना नाकारतात' असं काहीतरी लिहीलेलंही अतिशय वाईट पातळीवरचं आहे.

Pages