डाळ शेपु

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..

खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेशी आहे
अधिक टिपा: 

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर कुणीतरी 'म्हणूनच पुण्यामुंबईच्या मुली यांना नाकारतात' असं काहीतरी लिहीलेलंही अतिशय वाईट पातळीवरचं आहे.>> धन्यवाद आशूडी!!! मी वाटच बघत होतो की कुणाला तरी हे वाक्य दिसेल, कळेल!!! इथेच माबोवर पुण्यामुंबईच्या मुली आहेत ज्यांचे जोडीदार विदर्भीयन आहेत.

म्हणूनच पुण्यामुंबईच्या मुली यांना नाकारतात
>>

हायला हो? खरय की काय ?

बी असेल ही ... माझे कैक मित्र वैदर्भीय पोरींशी लग्न करून आहेत Lol त्यांना म्हणे ते डस्टबीन वगैरे फ्याड इकडे येऊनच कळले ... Lol

>>>चिनूक्सच्सा पदाची ओळख करून द्यायचेही प्रयोजन कळले नाही. तो त्या पदावर नसता तरी याच प्रतिक्रीया आल्या असत्या आणि तो त्या पदावर आहे म्हणून काही वेगळी 'कारवाई' केली जाईल या शेरेबाजीबद्दल असेही नाही.<<<

+ १

पण बेसिकली तो (चिनूक्सच्या पदाची ओळख करून देणे) सर्कॅझम आहे हे लक्षात घ्यायला हवे. हे कालच लिहिणार होतो, पण उगाच पेटले असते.

आता हा विषय कृपया पुरे.

प्राप्ती,
पोस्ट लिहिताना विदर्भाचा अपमान वगैरे डोक्यातही नव्हतं. मी विदर्भातला आहे किंवा नाही हा भाग वेगळा, पण ती केवळ माहिती होती. ती तशीच वाचली जावी, अशी अपेक्षा आहे. Happy

बापरे !!
इतक्या पोस्ट बघून आले. एवढी पॉप्युलॅरिटी शेपूला तर फॅनक्लबवर मिळाली नसेल.

वैदर्भीय तुम्हाला दरिद्री वाटतात >> प्राप्ती, दारिद्र्य आणि दरिद्री यातला फरक लक्षात न आल्याने घोळ झालाय का?
दरिद्री मध्ये हेटाळणीचा सूर असतो. उन्हाळा आणि दारिद्र्य ऐवजी उन्हाळा आणि गरिबी वाचून बघा.

टिना, आता एखादी मस्तपैकी नविन पाकृ लिही बर..

आशुडी ते मीच लिहीले होते. कारण हे आमच्या बाबतीतच घडले आहे. माझी चुलतबहीण, जी इन्टीरीअर डिझाईनर आहे. तिला नागपूरच्याच एका स्थळाने नोकरी का करत नाही? व्यवसाय का असे विचारले. तिने मी व्यव्सायात सुखी आहे, नोकरी आवडत नाही असे उत्तर दिल्यावर आम्हाला एवढ्या लाम्बचे स्थळ नको म्हणून त्यानी नाकारले. शेवटी तिने पण विदर्भातलीच स्थळे नाकारली.

जवळच्या नात्यातले स्थळ सुचवले म्हणून माझ्या काकान्च्या मेव्हणीने, पुण्याची नको बाई. याना नोकरी आवडते, एकत्र रहाणार नाही असे नाक मुरडले. आज तीच मुलगी एकत्र कुटुम्बात मुम्बईला रहाते. दुसरी बाजू पहायची नाही, उठसुठ पुणेकर कसे वाईट, पुण्याच्या पोरी कशा उद्धट हे अती झाले. हे असले घरचे अनूभव असल्यावर कशाला असली स्थळे मुली तरी स्वीकारतील?

ही उदाहरणे देणार नव्हते, पण माझीही बाजू क्लीअर झालीच पाहीजे. जिथे आपण खातो, रहातो, लोकान्वर भरवसा ठेऊन मदत मागतो. त्यान्च्यावरच टीका करुन उलटणे हे पण कृतघ्नपणाचेच लक्षण आहे. बाकी वैदर्भीय मायबोलीकर ( बी सोडुन ) दुखावले असतील तर मी त्याना सॉरी म्हणेन, पण बी ला नाही. प्रत्येक वेळा ऐकुन घेणार नाही. अती झाले आणी हसू आले अशी पण आता परीस्थिती नाही.

मला आजिबात शेपू आवडत नाही, डाळीत घाला, कांद्यात घाला किंवा अन्य कशीही बनवा

सगळ्यात नको वाटते ते म्हणजे शेपू खाल्ल्या नंतर येणारा ढेकर

रश्मी, मी तुला मागेच बजावले होते विपु करुन की माझे नाव काढायचे नाही. मी तुझ्याशी बोललो का? नाही ना? माझी कडक शब्दातली विपु कळली नाही का? कळत नाही का सरळ शब्दात सांगितलेले? मी वारंवार तुला टोटली अवॉईड करण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात येत नाही का? दोन तीन दिवसांपासून मी बघत आहे तू उठसुठ माझ्याशी निगडीत पोस्ट लिहित आहे. कशाला हा भांडकुदळपणा करत आहेस? परत तिच विपु मी लिहित नाही पण तुला परत तोच मेसेज पाठवला म्हणून समज. आणि येथून पुढे माझे नाव घ्यायची गरज नाही. मी पुण्याच्या मुलीबद्दल, पुण्याच्या लोकांबद्दल, पुण्याबद्दल कुठेही अवाक्षर काढलेले नाही.

बाळ बी मी तुला कुठलिही विपु लिहीलेली नाही. उलट तुझीच बाळबोध विपु मी डिलीट केली होती. आणी हो, तसली विपु करण्या आधी ज्या खाजगी मेल मला ( माझ्या पूर्वीच्या टुनटुन आय डीच्या मेलवर) पाठवत होतास त्याचीही आठवण ठेव. तुझी कडक भाषा सगळ्याना माहीत आहे. त्या मेलमधील मजकूर मी इथे टाकु शकते, पण ते करणार नाही. कारण माझ्याजवळ थोडी तरी माणुसकी शिल्लक आहे. ओके?

आणी पुणेकर मुलीन्बाबत तू काय बोलतोस हे मी सगळीकडे वाचलेय. वाहत्या धाग्यावर पण लिहीले होतेस, आठव जरा. तुझ्याबाबतीत माझी ही शेवटची पोस्ट.

त्यामुळे हे "अरे तुमको क्या मालूम चिनूक्स क्या चीज हय" छापचे विनोद टोटली अनकॉल्ड फॉर आहेत.>>> वैद्यबुवा, चिनूक्सवर चिडून केलेल्या कॉमेंटवर आक्षेप घेणार्‍यांमध्ये मी पण आहे म्हणून लिहितेय, नाहीतर तुमच्या ह्या पोस्टीचा पूर्णपणे अनुल्लेख केला असता.
चिनूक्स कोण आहे, तो काय करतो, त्याने काय केलं आहे, काय लिहिलं आहे हे प्राप्ती ह्या इथे नवीन असल्याने त्यांना माहिती असण्याची शक्यता नाहीच. पण मग आपल्याला ज्याच्याबद्दल माहिती नाही त्याचं एक वाक्य वाचून त्याच्याबद्दल हार्टलेस, वैचारीक दिवाळखोरी, असंवेदनशीलता असे शब्द वापरणं योग्य ठरतं का?
आक्षेप ह्याला आहे, 'चिनूक्स'बद्दल असं लिहिलंय म्हणून आक्षेप घेतला असं मत बनवू नका कृपया.

रश्मी, मी तुला मागेच बजावले होते विपु करुन की माझे नाव काढायचे नाही.>>> हे नीट वाच!!! मी तुला विपु केली होती असे लिहिले आहे. तू मला विपु केली असे लिहिलेले नाही.

तु अख्खी मायबोली उपसून काढ आणि दाखवून दे की मी इथे पुण्याच्या मुलींबद्दल वा लोकांबद्दल कधी वाईट बोललेलो असेल तर!!!

आणि हे फार मोठे उपकार होतील जर तुझी ही शेवटची पोस्ट माझ्यासाठी असेल तर. डोक्याला फार मोठी शांतता लाभेल माझ्या.

शेपू आवडतेच. आम्हीही डाळ घालुनच करतो.
बाकी डाळ शेपू वाचुन मला भाजी सरबरीत (डाळमेथीसारखी) असेल अस वाटलं होतं Happy

टीना, नविन पाककृतीसाठी शुभेच्छा.

पण मग आपल्याला ज्याच्याबद्दल माहिती नाही त्याचं एक वाक्य वाचून त्याच्याबद्दल हार्टलेस, वैचारीक दिवाळखोरी, असंवेदनशीलता असे शब्द वापरणं योग्य ठरतं का? >>
त्यांनी केवळ एक वाक्य नुसते वाचुन प्रितिक्रिया दिलेली नाही.
ते वाक्य त्यांच्या गावाच्या बाबतीत अपमानास्पद लिहिलेले आहे (त्यांच्या मताप्रमाणे) - हे बघुन त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्राप्ती इथे नवीन आहेत आणि त्यामुळे त्यांना चिनूक्स कोण आणि काय ते माहिती नाही या अ‍ॅझम्प्शनवर सगळ्यांचे एकमत आहे हे फारच मनोरंजक वाटले!

हा बघा. ड्राफ्ट म्हणुन बनवला आहे. वेगळे झाले की फाईन ट्युन करणेत येईल.
मानधनाची रक्कम १,००,००० रुपये फक्त खात्यात जमा करावे.

Pages