डाळ शेपु

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..

खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेशी आहे
अधिक टिपा: 

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीतर २४-२५ वर्षापासुन पातेल्यत डाळशेपु घेऊन बसलेय आणि खातेय असा समज व्हायचा

Happy Happy

मी काल गेलेले शेपू आणायला. अख्ख्या बाजारात शेपु नाही. अधिक चौकशी करता मायबोली नावाच्या एका अतिजगप्रसिद्ध साईटीवर शेपू लै भारी प्रसिद्ध झाल्याने या आठवड्यात जगभर शेपूला विक्रमी मागणी आलेली आहे आणि त्याचे पर्यवसान व्यापा-यांनी शेपूची साठेबाजी करण्यात झालेले आहे असे गोपनिय सुत्रांनी अधिक गोपनिय सुत्रांचा हवाला देऊन सांगितले.

मी ही केली काल शेपूची भाजी. मूग डाळ नेहेमीच घालते. लसूण घालून किंवा न घालताही आवडते घरी सर्वांना.आलं मात्र नाही घालत. आता एक्दा घालून बघेन. तेवढाच रूचीपालट! Happy

हे सगळं वाचुन काल म्हटले की आज आपण शेपुची जुडी भाजीसाठी घरी आणुयाच पण बाजारात गेल्यावर भाजीवाल्या कडुन कळले की परवा पासुन माबोकर शेपुचं फदफदं करत असल्यामुळे घाबरुन बाजारातील शेपु परत धरणी मातेच्या पोटात जाऊन लपली, मग मी ही परत आलो हात हलवत Wink

कळालं ना आता पुण्यात असगळे पुण्यवान का आहेत ते
>>

करेक्शन, मला वाटत फक्त पुण्यवान लोकंच पुण्यात येऊ शकतात Wink

>>>> परवा पासुन माबोकर शेपुचं फदफदं करत असल्यामुळे >> सहीये हसून हसून गडबडा लोळण <<<<< त्यात इतके हसण्यासारखे काय आहे?
कोकणस्थात तर आयत्या वेळेस पुरवठ्यास पडाव म्हणुन शेपुची ढोपरभर पाणी घालून आमटीही करतील..... फदफद्याच काय घेऊन बसलात?

shepu.png
काल केली छान झाली.
१. मूग डाळ १० मिनिट भिजवली आणि खाऊन बघितली तर कच्ची वाटली. म्हणून मावे मध्ये १५-२० सेकेंद पाणी घालून गरम केली. तुम्ही थोडी जास्त भिजवली का? कशी शिजली?
२. आलं न्हवत. मिरची एकच घातली आणि वऱ्हाडीलोकाना घाबरून एक दीड बारका चमचा तिखट घातलं. तरी चांगली तिखट जाळ झाली भाजी. मूळ कृतीत एक चमचा तिखट आहे ते प्रमाण बरोबर आहे ८ मिरच्या घातल्या तर सकाळी बोंब लागेल.
३. फोडणीला टाकल्यावर शेपू गायब होतो अख्ख्या जुडीची भाजी केली तर डाळीची भाजी वाटावी इतका गायब झाला शेपू. झालेली भाजी एका माणसालाच पुरेशी होते. फोडणीला टाकल्यावर डाळ शिजायला पाणी घातलं. शेवटी कोरडीच भाजी केली, पण पाणी घातलं नसतं तर लागली असती भाजी किंवा लवकर ग्यास बंद करायला लागून कच्ची राहिली असती असा संशय आला.
लहानपणी मी शेपू कध्धी खायचो नाही, पुण्याला राहताना हापिसाच्याजवळ जेवायला जायचो तिकडे खायला लागलो, भारी मिळायची भाजी, आज खूप वर्षांनी इतका वाद झाला म्हणून आणली, खाल्ली आणि आवडली. धन्यवाद टीना तुला आणि वादाला. Happy

शेपुची मुगडाळ घालुन भाजी फार कॉमन आहे सगळिकडे, आमच्या कडे नाशकातही करतात, मुळातच सगळ्याच पालेभाज्या निवडायला ढिगभर आणि खायला वाटिभर होत असल्याने कोरड्या केल्या तर दाणेकुट्,कान्दा,दाळि भिजवौन नाहितर बेसन पेरुन च कराव्या लागतात... वरची भाजी आई नेहमी करते त्यामुळे लहानपणापासुन खाल्लि आहेच, यात तिखट नाहिच घालायचे मिरच्या-आल-लसुण

भुसावळ- जळगाव साईडला बाजारात मी पालकाच्या जुडीत शेपु जोडीला अस पाहिलय.>>> हो हो तिकडे शो-पालकाच(शेपु-पालकाचा अपभ्न्श्)वरण, किन्वा दाण्याचा कूट घालुन एकत्र भाजी असच करतात.
(क्रुती हवि असेल तर विपुत देइल)

अमितव - डाळ कोमट पाण्यात १ तासभर तरी आधी भिजत घाला. नाहीतर सरळ रात्री भिजत घाला सकाळी करायची असेल भाजी तर . सध्या पाण्यात डाळ टाका , डाळीच्या वर पाणी य्यायला पाहिजे , वाटी तशीच फ्रीज मध्ये ठेवा . भाजी करायच्या आधी थोडावेळ बाहेर काढा साध्या पाण्याने धुवून घ्या.
डाळ जर नित भिजली असेल तर डाळीच्या आत शोषल गेलेले पाणी आणि पालेभाजी ला सुटणारे पाणी यातच भाजी नीट शिजते

ही आमची म्हणजे हैद्राबाद -कर्नाटक रिजनमधली डाळशेपू.
डाळ शक्यतो मसूरचीच वापरतात.
डाळीचा रंग लालसर आणि भाजीचा हिरवागारच हवा.
(तरी आमची डाळ जराशी फिकुटलीय)
फोडणीत फक्तं तेल, जीरं आणि मोहरी.
भिजवलेली डाळ घालून मग शेपू घालून परतणे आणि वरून शेपूच्या अर्ध्या वजनाइतक्या तरी मिर्च्यांचा कूट आणि लसणाचा अर्धा गड्डा ठेचून. शेवटी मीठ. (भाजीचं अंग बिंग चोरणं संपल्यावर!)

image_43.jpg

अमितव ,
तुम्ही डाळ जास्त घेतलेली दिसतेय. वर मृणाल १ यांनी सांगितल्याप्रमाणे डाळ भिजत घाला.
साती, मसुराच्या डाळीची कल्पना छान आहे.

अमितव मी पण १०च मिंट ठेवते भिजत.. मुगडाळीला भिजायला इतका वेळ लागत नाही खरतर.. पाणी कधीच टाकत नाही.. तुम्ही डाळ जास्त घेतली असणार अस मला पन वाटतय.. फोटो छान दिसतोय तरीही..
साती मस्तच गं..

साति, छान मस्त!!! ही डाळ आमच्याकडे वापरतच नाही. मसूर मी बाहेरच खाल्लेली आहे. पण मला आवडते.

Pages