डाळ शेपु

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..

खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेशी आहे
अधिक टिपा: 

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना, आजचे दोन्ही प्रकार मस्तच आहेत Happy

पण तरीही, दिसायला व्यवस्थित दिसावं म्हणून सगळे जिन्नस क्रमवार लिहून, स्टेप बाय स्टेप कृती लिहिली असली की डोक्यात पक्की होते. धाग्याचा डेकोरमसुद्धा मेंटेन होतो. Happy
Please do not take it otherwise Light 1

हं..
बरोबरे..
खरतर दृष्टी तशी सृष्टी झाल असेल माझं..
मला वाचताना लागणारे जिन्नस ची लिस्ट पाहिली कि उगाच धडकी बसते..अन मग त्यात हे पदार्थ दिसले कि अस वाटत, हे होय..हे तर आहे आपल्याकडं..पण त्याआधी पार टेन्शन ( हो टेन्शनच ) येत मला.. Proud
टाकु का मग लिस्ट ?
फोडणीत काय कस घालाव याची ?

फोटो, रेसिपी छान. शेपू आमच्याकडे येत नाहीच त्यामुळे मेथी, पालक हेच यशस्वी कलाकार घ्यावे लागतील.
डाळ आणि भाज्या फक्त विदर्भातच जास्त होतात हे अजिबात खरं नाही. त्यावर वर चर्चा झालीच आहे त्यामुळे असोच.
भाज्यांमध्ये डाळीच्या रूपात प्रोटीनची जोड देणं हे ही एक कारण असू शकेल.
मागे बस्केकडून डाळ आणि पालकाची रेसिपी मिळालेली. ती ही अफाट होते.

साती, आमच्यात मसूर = मटण असल्यानं बहुतेकदा मुगाचीच डाळ असते.

आमच्यात बहुतेक भाज्या डाळ घालून करतातच. पण आम्ही नक्की कुठले हेच क्लीअर नसल्यानं तसं काही लिहिता येत नाहीय. Happy

हो मसुर् मास = मटण असल्याने बर्‍याच ठिकाणी वर्ज्य आहे. याचा नक्की अर्थ माहीत नाही. सप्तशतीत पण वाचलेय.

शेपुची भाजी कोरडी मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कुट + भरपुर लसूण आणि हिरवी मिरची अशीच आवडते आणि केली जाते >>> +१

शेपू फ्यान क्लबात लिंक द्यावाचं करा की.

टीना, पाक ऑक्युपाइड कश्मिरनंतर विदर्भ हाच एक अती संवेदनशील विषय आहे तेव्हा तू निळे चेहरे टाकू नकोस Wink

इथ मला तसच वाटायला लागलयं सिंडी Wink ..
बाकी चुकुन वेगळा विदर्भ बद्दल काय मत आहे अस जर मुलाखतीत विचारल तर काय बोलाव हे अजुनही ठरवु शकली नाहिए मी Lol

मी अजिब्बात शेपूप्रेमी नै बर का मित्रमैत्रीणींनो..
मेरेकु उसका वासीच नै खपता..
पण नेमकी बाहेरुन आली आणि भाजीवाला शेपू घेऊन चाल्ला होता..मुड आला म्हणुन म्हटल चला आज करुच..नुसती शेपूची भाजी पण करते मी पण डाळीमूळे जरा जास्त आवडते ही..
शेपू आंगवणीने आणून करुन खाण्याबाबत बहोतही उदासिन आहे मी ..
पण मुड .. AddEmoticons0424.gif

सोलापूर भागातही पालेभाज्यांमधे -पातळभाजीत - डाळ हवीच. कोरड्या पालेभाज्या डाळीचं पीठ, दाण्याचं कूट घालून करतात. शेपूसारख्या काही भाज्या भिजवलेली मूगाची डाळ घालून करतात.
माझी आज्जी फार छान करायची. शेपूची भाजी, भाकरी, कोथिंबीरीची झणझणीत चटणी. एकदम झकास बेत.

मी म्हटल मला दिसल नाहि म्हणुन तस लिहिलयं याचा अर्थ आंधळ प्रेम कसं ते एकवारी समजावून सांगा...>>> तू विदर्भावर प्रेम करतेस ते तुझ्या प्रत्येक लिखाणात दिसतं ( त्याचं इथे सगळ्यांना कौतुकच आहे ) आणि रेसिपीखाली डाळ घातलेल्या भाज्या विदर्भातच जास्त करतात असं लिहिलंस.
पण जवळजवळ प्रत्येक प्रतिसादात डाळ घातलेली पालेभाजी सगळीकडे सर्रास होते असं लिहिलंय त्यावरुन आणि अधिक टिपेतल्या तू लिहिलेल्या पहिल्या दोन वाक्यांना धरुन थोडी शाब्दिक गंमत/ कोटी केली एवढंच. दिसलं नाही म्हणून आंधळं प्रेम !!
ह्यापुढे रेसिपी ( आवडली तरच ) प्रतिसाद देईन. इतर काहीतरी हलकंफुलकं अवांतर लिहायला जाणार नाही.

पाहिलंत इथल्या (काही) लोकांना 'प्रांतवादी' असलेलं अज्जिबात आवडत नाही. कारण त्यांना निव्वळ वादावादी करत राहिलेलं आवडते. Proud Lol आपले विदर्भीय याही बाबतीत मागासलेलेच रायले बाप्पा.

या सगळ्यांमुळे तुझ्यात निराशा येउन तू तुझ्या शैलीतले लिहिणे थांबवू नकोस हा टीना. मस्त लिहितेस तू . लिहित राहा

टीना- झक्कास ग.आईला खूप आवडायची शेपू पण मी एवढी वर्ष हि भाजी अजिबात खाल्ली नव्हती मुंबईला एका मैत्रिणीने ऑफिसला तिच्या डब्यात आग्रहाने जेवायला लावले त्यात ओलं खोबरं घातलेलं होतं. मग आमच्या कामवाल्या मावशींनी तूरडाळ घालून करायची पद्धत सांगितली. दोन्हींची चव मस्त होती आता मला शेपू भाजी प्रचंड आवडते. आता आई खुश असते माझ्याकडे आली कि मी तिला तिच्या आवडीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने करून देत असते. तुझ्या पद्धतीने करून बघेन एकदा.

माझ्या मनात नसताना चुकीन कुणी ते दुसर्‍या अर्थान घेतल असेल म्हणून लिहिलयं मी ते अगो ..

प्राप्ती,
मला सुद्धा इथं प्रांतवादात रस नै गं.. कुणीच आपला हेका सोडत नै तर मग वादविवादातुन काय मिळणार.. उगाच..
जाउ देत...

अगदीच नसत ग. आपण कुठेही गेलो तरी दुधात साखरेसारखेच विरघळतो. आपण कधीच ते जाणीवपूर्वक मुद्दाम कुणाला टोचाव म्हणून नसतच लिहिलेलं कधी कधी त्यात मस्करी असते कधी सहज मोकळ्यामनाने शेअर करावं म्हणून तर कधी भावूक होऊन वगैरे लिहितो. पण लिहिणाऱ्याचा उद्देशच विचारात न घेता एखादा शब्द पकडून टोमणे मारल्यासारखे किंवा मग मुद्दाम गटाने एकत्र होऊन तुटून पडतात मग आपल्या मनात नसतं ते काहीच्या काही तर्क लावून आपल्याला धारेवर धरतात. काय मजा येत असेल ह्यांना.असे सारखे डीफेन्सीव का होतात सास-बहु वाल्या सिरिअल बघून ह्याचं अस होत असेल का ?? काळजी वाटते बुवा… असोच (आता इथेही दुध साखर वगैरे घेऊन तुटून पडणार मला माहितीये पण चालू द्यावं सवय थोडच जाणारेय कुणाची Get well Soon म्हणूया)

>>
डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये..
<<

टीना, माझं एक निरीक्षण नोंदवू का? विदर्भाबद्दलचं प्रेम वगैरे ठीक आहे, पण ते प्रेम उदा. ललित लेखनात दिसलं तर खपतं. इतर ठिकाणी, विशेषतः जे बाफ माहितीसाठी वाचले जातात (यात पाककृतीही आल्या) त्या बाफांवर अशी अपुर्‍या माहितीतून आलेली जनरलाइज्ड विधानं ठोकत जाऊ नका. त्यामुळे होतं काय, की मूळ विषय (उदा. पाककृती किती छान आहे) बाजूलाच पडतो आणि त्या तसल्या मुळातच अनावश्यक विधानांभोवती बाफ फिरत राहतो. असंच होत राहिलं तर तुम्ही साखरेसारख्या विरघळणार कशा?

स्वाती+११
प्राप्ती अन टीना, अशी जनरलाइज्ड विधानं केलीत तर लोक बोलणारच. मग तुम्ही म्हणणार अर्थाचा अनर्थ ? वादावादीची सवय ?
याला दुधात साखर नाही हो म्हणत Happy

टिना, अगं छान रेसीपी आहे.
पण आता इतक सांगूनही कि आमच्याकडे अशी रेसीपी अस्ते तर तु वरची पोस्ट एडीट करून का टाकत नाहीस? विदर्भ वगैरे काढून टाक ना.

डाळ घालुन रेसीपीज सगळीकडेच केल्या जातात. माझं अस निरिक्षण आहे कि खेडेगावात जास्त केल्या जातात. घरची डाळ असते. भाजीपाल्यामध्ये व्हरायटी फार असत नाही एकाचवेळी (शेतात वांगी लावली असली तर वांगीच,ढ्ब्बु लावली असेल तर ढब्बूच इत्यादी) , आठवड्ञातून एकदाच भरणारा बाजार आणि बरेचदा भाजी सगळ्यांना पुरावी म्हणुन डाळ घालून वाढविली जाते.
माझं चुकीच पण असेल निरिक्षण.
वरती कुणीतरी लिहिलय कि पातीच्या कांद्याची डाळ घालून भाजी. नेहमी असते आमच्याकडे.
तसच लग्नाला, वास्तुशांतीला वगैरे जो गारवा देतात त्यात तुरीची कोरडी उसळ, कोरड पीठल यांचा मान मोठा असतो.

स्वाती, मैत्रेयी, सीमा..
प्रश्न एडीट करण्याचा नाहीए खरच..
जिथ मी ही भाजी विदर्भातच बनते असा हेका धरलेलाच नाहीए तर एडीट केल्यान काय होणार..
तुम्ही कुणी जर मी लिहिलेल व्यवस्थित वाचल नसेल तर परत एकदा लिहिते..

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय>> तुम्हाला दिसलं नाही म्हणजे करतच नाही का? तुम्ही इतर सर्व प्रांतातल्या लोकांच्या घरी जाऊन जेवणात रोज काय काय बनवतात याचा डीटेल्ड स्टडी केलेला आहे का? इथं महाराष्ट्र आणि इतर प्रांतामध्ये अशा भाज्या करतात असं किती जणांनी लिहिलंय तरी तुम्ही "मला दिसलं नाही" इतकाच ठेका लावून ठेवलाय.

मुळात पाककृती केवळ वैदर्भीय नसताना त्याचं डॉक्युमेण्टेशन चुकीच्या पद्धतीनं करायचा अट्टहास कशाला? भाजी करायची रेसिपी केवळ विदर्भापुरतीच मर्यादित असती तर त्याला नक्कीच वैदर्भीय कृती म्हणणं योग्य झालं असतं पण तसं नसताना केवळ "मला दिसलं नाही" म्हणून ती वैदर्भीय हे लॉजिक अफाट आहे.

एकंदरीत, विदर्भाच्या प्रादेशिक अस्मिता फारच जोरदार आहेत.

वैदर्भियांच्या अस्मिता मोठया आणि इतरांचा ( इतर जातीयांचा) ईगो मोठा असेच दिसतेय.

काय ते तूटून पडणं आणि आग्रह की तू काढूनच टाक तो उल्लेख. जर समजा, टिना हेकेखोर आहे तर असेच कर तसेच कर सांगणारे काय कमी हेकेखोर आहेत?

आणि जनराईज विधाने लिहू नये म्हणणारे कधी अशी विधाने करत नाहीत का?

टीना,
तुम्ही "फक्त वैदर्भीय लोकच भाजीत डाळ घालतात" अशी माहिती पुणे ते मुंबई विमानप्रवासात पुण्याच्या हवाईसुंदरीने सांगितला असे लिहा , नाहितर मुंबई ते पुणे परत येताना विमानचालकाशी गप्पा मारताना त्याने कळवले असे लिहा म्हणजे तुम्हाला दोष कोणी देणार नाही.

(त्यावरून, तुम्ही एशियाड, टॅक्सी न घेता फक्त विमानानेच प्रवास करता असेही लोकं अनुमान काढून लोकं वैतागतील. का ते त्यांनाच माहीती. )

Proud

---------------------------------------------------------------------

वैदर्भीय डाळ-भाजी, सीकेपी मसूर, नागपूरी वडी... ब्राम्हणी बटाटा.... मालवणी कोंबडी.

महाराष्ट्रीयांमध्येच फूट असे मथळे वाचायला येणार. जातीयवाद वाढलाय मायबोलीवर. Proud छ्या! . Wink

झंपी, छान निरिक्षण!!! बाकी काय इथे कमी हेकेखोर आहेत. कंपुतला एक आला की सर्वच येतात. उदा: इथे टिपापा मधील सदस्य एका मागोमाग एक आलेत Happy

मी जग फिरलो आहे .. पाहिले आणि अनुभवले आहे. माझे हेच मत आहे की विदर्भात डाळ भाज्या जास्त करतात!!!! उदा: चाकवत, करडई, चंदन बटवा, शेपू, पालक, आंबट चुका, चिवळ, मेथी, घोळ - ह्या सगळ्या भाज्या आम्ही डाळीतच करतो. तुमच्याकडे तर उठसुठ मेथी नाहीतर पालक.

जिथे जे पिकते त्याचा वापर होत असावा.
युपी बिहार बटाटा.
कोकण केरळ ओले खोबरे.
मराठवाडा कर्नाटक शेंगदाणे.
विदर्भात डाळी पिकतात का?

Pages