डाळ शेपु

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
dal shepu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..

खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेशी आहे
अधिक टिपा: 

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिना मस्तच! आत्ताच्या ह्या भारतभेटीत मी अमरावतीला होतो आणि माझ्या बहिणीने खास माझ्यसाठी ही भाजी केली होती पण तिने तुरीची डाळ दोन तास भिजवून मग ती भाजीत एकजीव केली होती.

खरे आहे विदर्भात डाळभाज्या जास्त करतात.

आवडती भाजी
आमच्यात पालेभाज्या , फळभाज्या मध्ये डाळी घालून नेहमीच केली जाते . कधी तूर, कधी मुग कधी हरभरा अशी कोणतीही डाळ आलटून पालटून घातली जाते.
न घालता पण केली जाते .
पण जर पालेभाज्या कोरड्या करायच्या असतील तर मुग डाळ जास्त प्रिफर केली जाते कारण शिजण्यास लागणारा वेळ .
ह्याचा विदर्भाशी काही संबंध नसावा

ह्याचा विदर्भाशी काही संबंध नसावा >> मृणाल १ Happy
मी म्हटल ना .. इकडे सहसा दिसत नाही म्हणुन वैदर्भीय लिहिलं..
डाळ न घालता सुद्धा करतात ना..

धन्यवाद सर्वांना Happy

इकडे पण मीठमसाला नाही... डाळभाज्या अळणी खाता काय? Wink

शेपू नाही आवडत मला Sad
पण इकडे (मुंबई-पुणे-कोकण) डाळमेथी, डाळवांगं, डाळपालक, डाळदोडका अश्या भाज्या करतात. अंबाडीच्या भाजीला तुरीची शिजवलेली डाळ हवीच हवी.

गुजराथेत तर डाळढोकळीही करतात Biggrin

इकडे सहसा दिसत नाही म्हणुन वैदर्भीय लिहिलं..<>>> हे लॉजिक समजलं नाही. इकडे म्हणजे पुण्यात दिसलं नाही की तो पदार्थ वैदर्भीय असतो का?

कर्नाटकात (खास करून उत्तर कर्नाटकात) डाळ घालून केलेल्या कोरड्या पालेभाज्या हमखास दिसतात. बाकी, पश्चिम महाराष्ट मराठवाडा इकडे सर्वत्र अशी भाजी केलेली पाहिली आहे. आम्ही कोकणात राहत असूनसुद्धा अशाच पद्धतीनं पालेभाज्या बनवतो (डिस्क्लेमर: ही पालेभाज्या कराय्ची एक पद्धत. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवल्या जातातच. पण त्या पद्धती वैदर्भीयच असणार बहुतेक!!!)

नाही मृणाल पण मी पाहिले आहे तुमच्याकडे पिठ पेरुन भाज्या करतात आमच्याकडे ही पद्दत नाहीच. मला ही पद्दत पुणे मुंबईच्या मित्रांकडूनच समजली. आणि मला फार आवडली.

नंदिनी, हो.
इकडे मस्तं डाळभाज्यांची परंपरा आहे.
पण बर्‍याचदा मसूरची लाल डाळ असते.
लाल डाळ आणि हिरव्या पालेभाज्या फार मस्तं काँबो दिसते.
परफेक्ट केल्या तर डाळ व्यवस्थित शिजूनही डाळीचा लालभडक रंग कमी होत नाही.

रत्नागिरीतपण कांद्याची पात, कोबी, दोडकं, शेपू इ. डाळ वापरून करतात.
पण तुरीची डाळ वापरतात.

केवळ डोळा मारण्यासाठी वेगळी पोस्ट म्हणजे रस्त्यात भेटल्यावर गप्पा मारून झाल्यावर पुढे जाऊन मागे वळून बघून डोळा मारून दाखवल्यासारखं वाटतं. Wink

बर्‍याच भाज्या मूगडाळ ,चणाडाळ घालून केल्या जातात.
टीना
भाजी मस्त दिसतेय.शेपूची भाजीत, लसणाची फोडणी+ हि.मि+ कांदा +मूग डाळ अशी करून पहा.वर ओले खोबरे मस्त लागते.

डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात >>> डोळस प्रेम करावं, आंधळं प्रेम करु नये Wink
प्रत्येक भाजी करण्याच्या दोन-तीन पद्धती असतात त्यातली एक डाळ घालून असतेच. फरक एवढाच वाटला की तुझ्या सगळ्या कृतींत डाळ भिजवून घेऊन कोरडीच परतायची आहे भाज्यांबरोबर तर एरवी पालेभाज्या घोटलेलं वरण घालून केलेल्या जास्त पाहिल्या आहेत ( अगदी संपूर्ण भारतात ). पालेभाजी कोरडी करायची असल्यास पीठ पेरुन करतात ( म्हणजे डाळ आलीच पण वेगळ्या स्वरुपात ) किंवा मग नुसती लसूण-मिरचीवर परततात.
अकुने म्हटल्याप्रमाणे निदान कोकणात तरी अशी भिजवलेली डाळ घालून फळभाज्या करतात, कोबीही करतात ( अनेक पद्धतींपै़की एक पद्धत ). बाकीच्या भागांचे माहीत नाही.

शिवाय विदर्भात फक्त पालेभाजी आणि डाळ ? बाकी भारतभर लसूण, आलं, कढीपत्ता-उडदडाळ, चिंच-गूळ, दाणे, काजूतुकडा ( अळू ), दाण्याचं कूट, सुकं/ओलं खोबरं, खोबर्‍याचे काप ह्यापैकी एक किंवा जास्त पदार्थ काहीतरी घालून इंटरेस्टिंग बनवतात पालेभाजी Wink Light 1

शिवाय विदर्भात फक्त पालेभाजी आणि डाळ ? बाकी भारतभर लसूण, आलं, कढीपत्ता-उडदडाळ, चिंच-गूळ, दाणे, काजूतुकडा ( अळू ), दाण्याचं कूट, सुकं/ओलं खोबरं, खोबर्‍याचे काप ह्यापैकी एक किंवा जास्त पदार्थ काहीतरी घालून इंटरेस्टिंग बनवतात पालेभाजी>>> काहीही!!! मी असे कुठे लिहिले की हे आम्ही वापरत नाही. ही तर लागणारी व्यंजने आहेत. ती हवीच असतात.

माझा उद्देश इतकाच की मी डाळ भाज्यांच्या वेगवेगळ्या कृती जास्त करुन विदर्भातच पाहिल्या आहेत तेही डोळ्यांनी Happy

नंदिनी, तू उत्तर कर्नाटकातली डाळ घालून कोरडी भाजी दिली आहेसच तशी पद्धत सगळ्याच भागात असेल. मला डाळ घालून म्हणजे डाळ घोटून घातलेली दाल-पालक, दाल-मेथी कॅटेगरीतली पार पंजाब, बांगला, गुजराथी, साऊथ इंडियन, मराठी ह्या सगळ्या भागांत वेगवेगळे मसाले घालून केली जाणारी कॉमन पद्धत दिसली म्हणून तसे लिहिले.

टीनाबाय, आमच्याकडे पण बऱ्याच भाज्या डाळ घालून करतात ग. चणाडाळ घालून जास्त. दुधी, पडवळ,कोबी (चणाडाळ घालून), अळूची (डाळ-दाणे) घालून, कोथिंबीर, मेथी पण डाळ-दाणे घालून करतात रस्सा.

घोसाळे, शिराळे, कोथिंबीर, मेथी यांची मुगडाळ आणि कांदा घालून परतलेली पण करतात.

बाकी शेपू नाहीच खात आम्ही. पण वाचायला आवडली भाजी.

मी असे कुठे लिहिले की हे आम्ही वापरत नाही. >>> हे तुला उद्देशून नव्हते. मूळ कृतीत फोडणीव्यतिरिक्त एकही मसाला नाही त्याला उद्देशून आहे. तेही गंमतीत म्हटलं आहे कारण अशी एकाच पद्धतीने विदर्भात भाजी शिजत नसणार ह्याची मला पूर्ण कल्पना आहे.

शेपुची भाजी कोरडी मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कुट + भरपुर लसूण आणि हिरवी मिरची अशीच आवडते आणि केली जाते माझ्या घरी. बहूतांशी सगळ्याच पालेभाज्यांमध्ये आई कोरडी भाजी करताना मुगाची डाळ घालायची. पालेभाज्या चोरट्या असतात, हे डाळी घालायचं कारण असतं. कधी कधी पीठ पेरून किंवा वरण घालून किंवा इतर डाळी घालून पण करते आई या भाज्या.
फळभाज्यांमध्ये मात्र पत्ताकोबी + हरबर्‍याची डाळ, दोडका आणि मुग डाळ, दुधी आणि मुग डाळ आणि डाळ वांग याशिवाय दुसरी भाजी आठवत नाही.

कांद्याची पात मात्र मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ घालून परतून केली जाते.

(आणि हो मी विदर्भातली नाहीये, मराठवाड्यातली आहे.. आणि आईचं माहेर मुंबई... Happy )

आंध्रात पण डाळ घालून भाज्या करतात. पालकाची मुद्दा भाजी मी करते. त्यात तूर डाळ शिजवून.
कोबीच्या भाजीत हरबरा डाळ भिजवून, उडीद डाळ बटाट्या च्या भाजीत.

फूड हॉल वरळीत एक डिल, हलके लसूण घातलेले किलर ग्रीक गॉडेस डिप मिळते. जबरी.
रेसीपी लिहायची स्टाइल रिपिटेटिव्ह होत चालली आहे.

'हल्ली शेपू काही व्यवस्थित मिळत नाही, पूर्वी शेपू खाल्ल्यावर कशा तास दोन तास फ्रेश ढेकरा यायच्या!'
इति आमची शेजारीण!
Happy

का असे करता तुम्ही लोक्स हं..
मी म्हटल मला दिसल नाहि म्हणुन तस लिहिलयं याचा अर्थ आंधळ प्रेम कसं ते एकवारी समजावून सांगा...
उगा अर्थाचा अनर्थ काढताय Sad

परत परत तेच तिखट, मिठ , हळद, तेल वगैरे लिहुन काय करु...ते तर बेसिक आहे ना म्हणुन लिहिलं नै आहे यात..
नै खोबरं..त्यातहि ओल मी कधीच टाकत नै..

मी धरलय यात सगळे सामान.:स्मित: पण प्रत्येक भाजीच्या चवीनुसार फोडणी बदलु शकते ग बायो. मला मात्र शेपू आफाट आवडतो. डाळ-शेपु, बटाटा काचरी-शेपु, ताकातला शेपु, बेसन घालुन परतेला शेपु बर्‍याचे प्रकारे आवडतो.

फोटो मस्त आलाय. एकदा मसुर डाळ +शेपु करुन बघ. मस्त लागतो.

ही भाजीची रेसिपी आहे कि विदर्भ आणि ईतरेतर वाद? Happy
टीना, भाजी मस्त, फोटो मस्त!! आजच करते..:)
माझा उद्देश इतकाच की मी डाळ भाज्यांच्या वेगवेगळ्या कृती जास्त करुन विदर्भातच पाहिल्या आहेत तेही डोळ्यांनी>> +१०

परत परत तेच तिखट, मिठ , हळद, तेल वगैरे लिहुन काय करु...ते तर बेसिक आहे ना म्हणुन लिहिलं नै आहे यात..>>

असं नाही हां टीना!
यात पण फार फरक पडतो.
आता तूच बघ, चिमूटभर हळदीचं एवढं काय? पण आमची आई सगळ्या भाज्यांत टाकते आणि साबा कुठल्याही हिरव्या पालेभाजीत/ फळभाजीत टाकू देत नाहीत. (वरणात डब्बल टाकतात ते सोडा)
मला साबांच्या पद्धतीच्याच भाज्या जास्त आवडतात
दिसायलाही आणि चवीलाही.

यात पण फार फरक पडतो.>>> +१
अगदी तेलात टाकलेली हळद आणि वरून टाकलेली हळद( कच्ची..असे कही लोक्स म्हणतात) यांच्या चवीतही फरक येतो.अपनी अपनी पसंद है!

Pages