डाळ शेपु

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..

खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेशी आहे
अधिक टिपा: 

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस कस्काय म्हणू शकता ... की शेपूच्या भाजीचा ह्येचाशी संबंध नैये? तिच्यावरुणच अस्मिता जागी झालीय (शिरेलीतली नायी)

शेपूची भाजी आता क्रांती घेऊन येणारे ... वेगळ्या विदर्भाची !! Light 1
झेंडा झालाय तयार ... छापायला गेलाय.

अरेरे पाककृतीच्या धाग्यावर पहिल्यांदाच एवढा मोठा प्रांतवाद बघायला मिळाला. Uhoh
शेपूची भाजी खात नाहीत आमच्याकडे आणि कधी खाल्लीही नाही. चणाडाळ काही भाज्यांमध्ये वापरतात उदा. अळू, केळफूल, दोडका, पडवळ. लसूण, आल आमच्या जेवणात नसत. हळदही पालेभाजीमध्ये वापरत नाहीत.

आरती ...

हे सगळ सिरिअसली सुरुय अस वाटत का आपल्याला? फुल मज्जा सुरुये.

स_सा,

तुम्ही लिहा ... त्यात आम्ही अस्मितांची फोडणी टाकायला येतो Lol

अ. वै. धागा वळणावर आणायचा प्रयत्न करते होते. Happy

स_सा, तुमच्या गच्चीतील वांग्याची रेसिपी लिहा. Lol

बर बर ... !

बाकी आज काल आमच्या ऑफिसमध्ये जाण्या येण्याच्या रस्त्यावर शेतकरी शेपू मेथी आणि पालक घेऊन असतात बऱ्याचदा.

कोणास हवे असतील तर खास ऑर्गानिकवाले भेटतील Happy

शेपु म्हणजे पालक घेतला की त्याबरोबर फुकटात एक जाडजुड जुडी जबर्दस्तीने पिशवीत कोंबली जायची.
जर खान्देशातल्या भाजी विकणार्‍यांना हे समजले की शेपुवरुन (हो हो शेपुवरुन) लोकं जवळपास एकमेकांचे शाब्दिक खुन पाडण्यापर्यंत आलेत तर उद्यापासुन शेपुचे भाव त्याच्या आधी विकल्या जाणार्‍या पालकापेक्षा तरारतील.
बाजारात नावाला शेपु रहाणार नाही.
बरं इतका शेपु पालका बरोबर फुकट मिळत असताना त्याला "शेपालक" म्हणणारे त्याची एक कांडी काय पालकाच्या भाजीत पडु देत नाहीत.बनवतील तर मुगाची डाळ टाकुन शेपुची भाजी, बरी लागते ज्वारीच्या किंवा दादरीच्या भाकरी बरोबर. मग करत बसतात मौखीक वायुप्रदुषण.

एकंदरीत १४७ जणांवर केलेल्या प्रयोगातून असे निदर्शनात आले आहे कि शेपू नावाची भाजी मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय घातक आहे. त्याबद्दल निव्वळ वाचाल्यानेही नाती-मैत्री जपण्यासाठी लागणाऱ्या समजदारी नावाच्या हार्मोन्समध्ये बिघाड होऊन महिला आपले मानसिक संतुलन गमावतात....... तेव्हा आजपासून 'शेपू' भाजीवर बहिष्कार घालावयास हवा असे प्रमाणासकट जाहीर करून टाका>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मयी तरीच म्हणलं ह्याचं ठीकेय माझं असं का व्हायला लागलंय. तरीच आता कळाले आमच्या विदर्भात शेपू कमी न डाळी जास्त का खातात ते Rofl

(हि मस्करी आहे हवं तर हसा नाहीतर मिरचीचे झेंडे डोक्यात घालून सुरु व्हा परत Proud )

जेम्स बॉन्ड - किती दिवसानंतर शेपालक आणि दादरा ज्वारीचे उल्लेख वाचलेत. धन्यवाद. आमच्याकडे नेहमी आईबाबा धान्याच्या दुकानात गेलेत की दादरा ज्वारीच मागत. दाणेदार टपोरी असते ही ज्वारी. आणि मला नेहमी वाटायचे की दादरा ज्वारी म्हणजे मुंबईच्य दादरची Happy

दादरला आजकाल कुटं ज्वारी पिकती, दादा! बरं त्यातून पिकली तरी विदर्भवाले थोडीच खाणार पुण्यामुंबईची ज्वारी!!

विदर्भवाले थोडीच खाणार पुण्यामुंबईची ज्वारी!!
>>
विदर्भवाले थोडीच खाणार पुण्यामुंबईची हार्टलेस ज्वारी!!
महत्वाचा शबुद इसरू नगं माये

कहर धागा Lol
पण प्राप्ती कुठे आहेत? धागा सोडून गेलात तर ठीक आहे पण माबो सोडून जाऊ नका! अजुन बरच शीळ अन्न संपवायच आहे Wink

मंजूडी, चिनूक्स असो की अजून कोणी, माझं म्हणणं तेच होतं की. एखादं वाक्य वाचलं आणि त्यात आपला, आपल्या गावाचा अपमान झालाय असं कोणाला वाटलं आणि ती व्यक्ती त्यावर चिडली तर त्यात वावगं नसावं.
बाकी ते अनुल्लेखाबाबत पण कळलं नाही काही. आता ज्यांनी ज्यांनी विनोद केले त्यांना उद्देशूनच लिहिलं होतं मी. तुम्ही नसता केला तर मग तुम्हाला उद्देशून नसलच असतं ना? मग अनुल्लेख केलेलच बरय ना, त्या केस मध्ये? Lol

आशुडी, अजून पोस्ट तितकीशी समजली नाही. जरा रोख कळला नेमका की उत्तर देतो. Happy

बुवा,

सध्या खणाखणी करायला काही विषय उरलेले नाहित. राजकीय धागे कसेही काढले तरी अगदीच घाण होते. म्हणून मग आजकाल लोक पाकृवरच लिहिण्याची हौस फेडून घेताहेत असे दिसते.

तेव्हा हेमा(अजून एक)शेपू(ट)

आता पाककृतीकडे वळू या का ?

चौतीस हिरव्या मिरच्या आणि चौतीस लाल मिरच्या !!! शिवाय आठशे दहा लसूण पाकळ्या !!

( सॉरी टीना... जरा मार्गावर आणायची होती चर्चा म्हणून ! )

हा हा हा......मनोरंजन झाले.......काय मस्त धागा........
असो.... खुप छान आहे रेसिपी.....२ वर्षात आता रिप्लाय दिला परत....पण आता मात्र परत एकदा जाणवले की काही लोक फणा काढुन बसलेले असतात कायम....स्वतःला अती हुषार समजतात....ललक्षात आलेच असेल......हा हाहाहाहा....

कुठल्याही धागा आला कि त्यावर ताशेरे ओढायला चालु करतात...मग सर्व सुर तोच लावतात...आणि मुळ मुद्दा बाजुला राहतो...

शेपूकडे इतके दिवस दुर्लक्ष केले... आता एवढ्या पोस्टी बघून वाटले डाळ-शेपूला कुठला पुरस्कार वैगेरे मिळाला की काय.. इकडे तर धम्माल चालू आहे.

प्रितिक्रिया >> Biggrin

पण आता मात्र परत एकदा जाणवले की काही लोक फणा काढुन बसलेले असतात कायम....स्वतःला अती हुषार समजतात....ललक्षात आलेच असेल......>> +१११११

इथल्या प्रतिक्रिया पाहून प्राप्तीने यांच्या बद्दल फारच मवाळ शब्द वापरला अस वाटतंय. तिने ह्यांना संबोधलं ते खोडून काढतांना ह्यांनी स्वतःला त्याहूनहि कितीतरी जास्तच प्रूव करून दाखवलंय..अभिनंदन सर्वांचे
कमाल आहे ना एखाद्याला खाली 'पाडायला' झुंडीने असे मागे लागतात कि इतर १०० लोकांच्या नजरेत आपण किती 'पडतो' आहे ह्याचही भान विसरतात. Sad

मायबोलीवर आजवर सर्वात जास्त गाजलेली पाककृती आहे ही!!

एवढे जास्त प्रतिसाद ते ही पाकृवर? म्हणून पाकृ वाचायला आलो आणि बघतो तर काय ही धम्माल..

असो मला कुणीतरी डाळ घालून करायच्या वरणाची पाकृ द्याल का? Biggrin

पण आता मात्र परत एकदा जाणवले की काही लोक फणा काढुन बसलेले असतात कायम....स्वतःला अती हुषार समजतात....ललक्षात आलेच असेल>>>>>>>> लक्षात काय यायचंय, इथे माहिती आहे सर्वांना. म्हणून ह्यांच्या हो ला हो करणारे ह्यांच्यासार्खेच लोक आहेत झुंडीतली. इथली चांगली समजदार लोक ह्यांच्या नादी लागत नाहीत.

Pages