निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,
फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार
निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..
खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..
"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..
यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..
* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी
इथल्या प्रतिक्रिया पाहून
इथल्या प्रतिक्रिया पाहून प्राप्तीने यांच्या बद्दल फारच मवाळ शब्द वापरला अस वाटतंय. तिने ह्यांना संबोधलं ते खोडून काढतांना ह्यांनी स्वतःला त्याहूनहि कितीतरी जास्तच प्रूव करून दाखवलंय..अभिनंदन सर्वांचे
कमाल आहे ना एखाद्याला खाली 'पाडायला' झुंडीने असे मागे लागतात कि इतर १०० लोकांच्या नजरेत आपण किती 'पडतो' आहे ह्याचही भान विसरतात.
>> मयी एक न एक शब्दाला अनुमोदन. रिअली झुंडीने येऊन एखाद्यावर तुटुन पडताना शंभर लोकांच्या नजरेतून ही लोक पडत असतील.
स्कोअरः ३ विरुद्ध बाकी सर्व.
स्कोअरः ३ विरुद्ध बाकी सर्व.
मी कोकणस्थ असल्या मुळेच मला
मी कोकणस्थ असल्या मुळेच मला शेपूचीही भाजी आवडते. भाकरीबरोबर छान लागते.
(खर्या कोकणस्थात भाजीबिजीच्या चवीबिवीचे लाड चालत नाहीत, पानात पडलय ते मुकाट गिळायचे असा खाक्या निदान आमच्या लहानपणीच्या काळी असायचा व आमच्या राज्यात असतो).
ती तर्हेतर्हेने करतात. लिंबी तर कधी कधी रसदार पातळ भाजीही करते.
>>>>> माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं <<<<
फक्त आमच्या शेपुमधे कांदा/लसुण नाही घालत. अगदी लिम्बीचा मूड असेल व शेपुची गड्डीच लहान असेल तर पुरवठ्याला सटीसमाशी कांदा घातला तरच. लाल माठाच्या भाजीत मात्र आवर्जुन कांदा व लसुण असते. त्याशिवाय ती टिपिकल चवच येत नाही. कोकणस्थात लाल माठाचि भाजी सोडली तर बाकी कशात कांदा लसुण सहसा वापरत नाहीत. लसणी करता अपवाद ती आंबटचुक्याचि का कोणतीतरी भाजी जीवर लसणीची फोडणी वरुन घेतात.
अर्थात ते देखिल लिम्बीच्या मूडवर की लाल/हिरव्या माठात कांदा घालणार वा नाही. चातुर्मासात तर कांदालसुण वर्ज्यच. सबब निव्वळ परतुन घेतले जाते.
बर्याच पालेभाज्यात मिसळून यायला हरबरा वा मुग डाळ घालतात. छान लागते. हरबरा डाळ टच्च वेगळीच रहाते, तर मूगडाळ भाजीच्या चविसोबत मिसळून जाते. मराठवाडी देशस्थात डाळींऐवजी ज्यात्या भाज्य अकोशिंबिरीत दाण्याचे कुट घालायची पद्धत आहे तर इकडील घाटावरील देशस्थात कांदालसुणमसाला. कोकणस्थांचे जेवण इतरांना अगदीच सपक वा मिळमिळीत गोडांबु वाटले तरी भाजीची मूळ चव राखायचा प्रयत्न दिसतो.
लिंबी बरेचदा मेथीच्या कच्च्या पानांची "पचडी" की कायतरी करते तिखटमीठतेल लावुन. कित्येकदा तेल नाही वापरायचे तर पाण्याने ओलसर करुन वा लिंबु पिळून करते. कच्चीच खातात. अस्सल शेतावरच्या जगण्यात हा प्रकार सर्रास असतो, की बांधावर बसुन भाकरी घेतल्यावर तोंडी लावणे कमी पडल्यास वा निव्वळ चवीकरताही, समोरच्याच शेतातील रानभाजीची कोवळीपाने खुरडुन घेऊन त्यावर मीठ पेरुन चुरडुन ती तोंडी लावण्यास वापरायची. लिंबीला त्याची सवय असल्याने तिला काही विशेष वाटत नाही. माझी परिस्थिती मात्र अवघड होते. असो.
मला शेपुची भाजी आवडते.
लिंबुदा, निबंध?? भुसावळ-
लिंबुदा, निबंध??
भुसावळ- जळगाव साईडला बाजारात मी पालकाच्या जुडीत शेपु जोडीला अस पाहिलय. वेगळी शेपूची जुडी कुठे दिसली नाही. तिकडे शेपूची चटणी करतात लसुण हिरवी मिरची घालुन कुणाला माहिती असेल तर कृती द्या प्लीजच.
टीना विषयांतराबद्दल सॉरी.
स्कोअरः ३ विरुद्ध बाकी
स्कोअरः ३ विरुद्ध बाकी सर्व.
>>
चुकलं !
शंबरांच्या नजरेतून पडलेले ३ विरुद्ध तिघांच्या नजरेतून पडलेले १००
अंबाडीची भाजी त्यावर लसणाची
अंबाडीची भाजी त्यावर लसणाची फोडणी. कोणतीतरी म्हणून असं हिडीस फिडीस नको तिला.

सी, तो पदार्थ ***य आहे का?
सी, तो पदार्थ ***य आहे का? तरच तो लिहायचा, इतरांच्यात करत असले तरी त्याला ***मान्यता मिळेपर्यंत तो "पदार्थ" नाही!
त्या प्राप्तींना झोडपणे
त्या प्राप्तींना झोडपणे थांबवा की आता?
>>>> अंबाडीची भाजी त्यावर
>>>> अंबाडीची भाजी त्यावर लसणाची फोडणी. <<<< येस्स... मला नाव आठवत नव्हते तर अंबाडि ऐवजी आंबट शब्द आठवुन पुढे "चूका" जोडले.... आंबट चूका अळवाच्या भाजीत वापरतात ना?
लिंबूभाऊ, http://www.agrowon.
लिंबूभाऊ,
http://www.agrowon.com/agrowon/20140722/5620285854656511099.htm
रीया, सिमन्तिनी अरे हा बाफ
रीया, सिमन्तिनी
अरे हा बाफ शेपूवरुन पालक, मेथी, मग अम्बाडी आणी मग उरलेल्या भाज्यान्वर येणार वाटते.
या तिघात टीना नाहीये हे आधीच क्लीअर करते. टीनाचे एक आहे, ती प्रान्जळ आहे, लाघवी आहे आणी हातचे राखुन न ठेवणारी आहे.
मयी तुला मी दुपारी सान्गेन. आता जाम धान्दलीत आहे. मोठी पोस्ट लिहु शकणार नाही. ( तोपर्यन्त बाफ जागी असलेला बरा)
मला काय टोटल लागत नाय
मला काय टोटल लागत नाय नंदिनी..... आधीची पाने नाही वाचली... वेळच नाही. मला थोडाक्यात दोन पार्ट्या कोण आहेत ते सांगा बघू. म्हणजे मी ठरवतो की कुठल्या पार्टीच्या बाजुने उतरायचे मैदानात.... !
)
(बहुधा जिकडे कमी तिकडे आम्ही असेच असते, किंवा दुसर्या शब्दात, जिकडे आम्ही तिकडे कमीच कमी असे असते
असं आंबट एका ओळीत आणि
रश्मी, ते टिना ला पण माहीत
रश्मी, ते टिना ला पण माहीत असेल
भूषणदादा, आम्ही टाईमपास करतोय झोडपाझोडपी नाही
>>>>> आणी मग उरलेल्या
>>>>> आणी मग उरलेल्या भाज्यान्वर येणार वाटते. <<<<<<<

रश्मी, मी तो विदर्भअस्मितेवरुन कोकणस्थ/देशस्थ, खानदेशी, मराठवाडी इत्यादी प्रकारांवर आणू पाहिलाय.... काये ना, चर्चा कशी, समग्र व्हायला होवी, नै का?
बेफिकीर, छान उपयोगी लिन्क
बेफिकीर, छान उपयोगी लिन्क आहे... माहितच नव्हते हे "सकाळचे" उपक्रम. धन्यवाद.
टीना, जाऊदे ते सगळं. तू आता
टीना, जाऊदे ते सगळं.

तू आता मस्तं झणझणीत नविन रेसिपी लिही दुसरी.
"खूप लोकांसाठी केली तर शेपूची
"खूप लोकांसाठी केली तर शेपूची भाजी अंगाशी होते" या त्रिकालाबाधित सत्याला मायबोलीवर एक वेगळीच डूब प्राप्त झाली आहे.
(No subject)
आशू डी
(No subject)
"खूप लोकांसाठी केली तर शेपूची
"खूप लोकांसाठी केली तर शेपूची भाजी अंगाशी होते" << या सगळयंनी एकत्र ढेकर द्यायला सुरवात केली तर
ए बाबानो, ती ढेकरं बिकरं जरा
ए बाबानो, ती ढेकरं बिकरं जरा लांब जाउन द्या..इथे वास नको तो.
बाकी आमच्याइथे आम्ही नजरेतुन पडत बिडत नाही. इथे नजरेतुन उतरतात. हे नजरेतुन पडणे विदर्भात होत असावे, नागपुरी हिंदीमधले 'मेरी नजरसे गिरा' चे थेट भाषांतर बहुतेक.
आता विषय निघालाच तर... तो
आता विषय निघालाच तर... तो ढेकर की ती ढेकर
साधना बरोबर चुकीचे शब्द
साधना बरोबर
चुकीचे शब्द तुझ्या नजरेतुन सुटत नाहीत असे दिसते 
थोडेसे विषयांतर - आज डब्ब्यात
थोडेसे विषयांतर - आज डब्ब्यात डाळ घातलेली शेपुची भाजी आणली आहे.
आता मुख्य विषय - मी वैदर्भीय नाही तरीही डाळ घातलेली शेपुची भाजी गेली २४-२५ वर्षे तरी खात आहे (निरंतर नाही
नाहीतर २४-२५ वर्षापासुन पातेल्यत डाळशेपु घेऊन बसलेय आणि खातेय असा समज व्हायचा :खोखो:)
५-६ दिवस झाले रोज इथली चर्चा वाचतेय मज्जा येतेय पण त्यामुळेच शेपुची आठवण आली आणि शेवटी काल घेऊनच आले.
पातेल्यत डाळशेपु घेऊन बसलेय
पातेल्यत डाळशेपु घेऊन बसलेय आणि खातेय
>>>
वॉव! मला आवडेल अशी शेपुची भाजी खायला.
पण शेपुची भाजी म्हणजे सोबत भाकरी हवी. पोळी काही खास नाही
चला निदान राग, चीड, मज्जा,
चला निदान राग, चीड, मज्जा, आठवण, असच म्हणुन कुणीतरी शेपु घेऊन येत आहे आणि भाजी करतय म्हणजे शेपुची विक्रमी विक्री का काय ते होताय...

ब्लेस माय सोल ओ गॉड
लय पुण्य जमा झाल पुण्यात असताना माझ्या खात्यात
पुण्य जमा झाल पुण्यात असताना
पुण्य जमा झाल पुण्यात असताना >>> द्विरुक्ती आहे ह्या वाक्यात.

टिने, कळालं ना आता पुण्यात
टिने, कळालं ना आता पुण्यात असगळे पुण्यवान का आहेत ते
Pages