डाळ शेपु

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..

खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेशी आहे
अधिक टिपा: 

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झेंड्यावर तेल किंवा तर्री सदृष दिसले पाहिजेच. नाहितर इतर जातीय लोक वैदर्भीय अस्मिता दिसत नाही म्हणून त्रागा करतील.

टिने Happy चिल मार गं.
बर्‍याच जणांनी खरच वाद घालायचं सोडून देऊन आता फक्त एंजॉय करणं सुरू केलंय Happy
(त्यातली मी एक. रश्मी आणि स्पॉक पण Wink )

हं! मंजुडी घ्या आशुडी घ्या (गोविंद घ्या गोपाळ घ्या च्या चालीवर वाचा Proud )
तू मला पण स्पॉक सारखं रागवलीस तर म्हणून तुझं नाव मनात घेतलं Proud

अहो स्पॉक असा हा झेंडा नको. ह्या मिरच्या तिखट नाही. एकदम फिक्या असतात. लवंगी मिरची किंवा चिली पॅडीमधील मिरच्या डकवा चित्रात. आणि आजूबाजूला वेगवेगळ्या भाज्या दाखवा.

तो मुक्तपीठवाला विदर्भवादी बबन आठवला. घोषणा दरवेळी एकच असली तरी कधीतरी मिर्चीमसाला कमीजास्त टाकल्यागत एखादा शब्द बदलायचा. एकदा म्हणे- अखिल सदाशिव पेठेसकट वेगळा विदर्भ झालाच पायजे. केवढं द्र्ष्टेपण.

अरे त्या प्राप्तीला ५ वर्षे झाली असतीलही, पण नसेल मध्ये मायबोलीचा अभ्यास केला आणि काहीच वाचलं नसेल. शिवाय इथं अचानक लिहायला लागल्यावर (किंवा मिळाल्यावर) कसं होतं ते मीही अनुभवलं आहे. उदा. त्याकाळच्या रीतीप्रमाणे मी इथं आल्याआल्या झक्कींना युजलेस / होपलेस / मॅनर्लेस असं काही तरी चिडून म्हणलेलो. इथं हार्टलेस- इतकंच काय ते. Proud

और दिवाळखोरी और दारिद्र्य तो मऽऽन की स्थिती हय. और मन तो चंऽऽचल होता हय. जागो. जागोगे तो पाओगे अपने अतीत का फल. (चालः ओशो)

इथं पो अस लिहाय्ला गेलो कि पोंगल कि पोवाडा कि पोबारा असे गुगलबाबा सारखे सजेशन दिसायला लागतात..बर सजेशन सोडून आम्हीच बरोबर अस सुरु होतय म्हणुन मी सद्ध्या मॉरडॉर निवासी झालीय Wink
तेवढ्या धाग्याला पण त्या रिंग सोबत तिलांजली द्यावी म्हणते Proud

टीना, असुदेत की रेस्पी चांगलीच आहे. इतर अवांतरावरुन जे चाललय त्याचा शेपूच्या भाजीशी काहीही संबंध नाहिये.

Pages