निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,
फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार
निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..
खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..
"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..
यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..
* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी
माझ्या आजी-माझी ३ पिढ्यांमधे
माझ्या आजी-माझी ३ पिढ्यांमधे कोणीही विदर्भाकडे फिरकलेलंही नाही >> लॉल.. इतिहास लिहूण ठेवला आहे का कोण कधी आणि कुठे कुठे फिरायला गेले होते मागिल ३ पिढ्यांमधे
लॉल.. इतिहास लिहूण ठेवला आहे
लॉल.. इतिहास लिहूण ठेवला आहे का कोण कधी आणि कुठे कुठे फिरायला गेले होते मागिल ३ पिढ्यांमधे
>>>
माझी पण़जी आजी मी जाणती होईपर्यंत जिवंत होती आणि आमच्याचकडे रहायला होती.
माझी आजी अजुनही आहे आणि आमच्याचकडे रहायला आहे.
आई कधी कुठे गेलीये ते मला माहीत नसण्याचे कारण नाही.
इतिहार लिहून ठेवायची नेहमीच गरज असते का?
ओह आय सी मग ठिक आहे. जर
ओह आय सी
मग ठिक आहे. जर पिढीतील माणसे असतील तर मग इतिहास लिहून ठेवायची गरज नाही.
माझे आजोबा जे मी कधीच पाहिले नाहीत ते पुर्व भारत फिरुन आले होते.
शेपु & डाळ ह्यावर बरीच चर्चा
शेपु & डाळ ह्यावर बरीच चर्चा झालेली दिसतेय
@ tina - अगं % सांगत आहे.. - पूर्वीच्या सगळ्या पोस्टी तेच सांगत होत्या . तू Generalised विधान केल म्हणून तर इतक्या पोस्टी पडल्या ना.
अजूनही भाजीतच डाळ टाकत बसला
अजूनही भाजीतच डाळ टाकत बसला आहात. इकडे ठाणे जिल्ह्यात डाळ-मुंडी मिळते (बकरा आणि मेंढा यांचा मेंदू). जागूताई लिहा कधीतरी याच्यावर.
निधप :- हि पोस्ट विशेष
निधप :- हि पोस्ट विशेष तुमच्यासाठी ... बी आणि टिना तुम्ही मिळून नक्की विदर्भात काय करता हे एकदा ठरवा. आम्ही बरेच दिवस तिखट खाण्याबद्दल वाचतो आहोत. आता हा बी तिखट खात नाहीत म्हणतोय.>>>>>>>>>>. खास या वाक्यासाठी
विदर्भाबद्दल असणारे गैरसमज फार भारी दिसताहेत इथे. एखाद्या भागात जसे तिखट खातात असे प्रचलित असले म्हणजे तिथल्या घराघरात तिखट(च) खातातच असा त्याचा अर्थ होत नाही. पुणे हे कुचकट खवचट पुणेरी पाट्यांसाठी (कु)प्रसिद्ध आहे भारतभर म्हणजे तिथे प्रत्येक घराच्या बाहेर दारावर, रस्त्यावर, भिंतींवर खवचट पाट्या लटकलेल्या असतात का?? आणि इतरांनी तसे समजावे का? ह्याचे उत्तर जसे नाही असे आहे तसेच विदर्भाचेही... आधी थोडी माहिती सांगते. विदर्भ हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठे क्षेत्रफळ असणारा परिसर एकूण जिल्हे ११. एक एक जिल्हा तुलनेने जास्तीत जास्त तालुके असणारा म्हणजे एक अक्खा पुणे एका जिल्ह्यात मावेल इतका मोठा . यातील काहीच भागात दुष्काळ असायचा (सध्या तितकीही वाईट परिस्थिती नाही) म्हणून तिथला कास्तकार (शेतकरी) रोज नवी भाजी आणून खाऊ शकत नसायचा तेव्हा तो लाल तिखट त्यात जरा तेल मीठ घालून एखादा कांदा फोडून ते भाकरी बरोबर खायचा. इथून तिखट खाण्याची पद्धत ग्रामीण भागात वाढली. म्हणजे तिखट घरात असले कि वर्षभर भाजी मिळाली नाहीतरी निदान एखादी भाकर पोटात ढकलता यायची. त्यानंतर शेजारीच अगदी चिकटून असणारया मध्यप्रदेश मधून शाहू, बनोदे, बाणते अशी काही मंडळी मध्यप्रदेशातून इथे विदर्भात येऊन वसली ह्यांचे खाणे म्हणजे रस्सेदार तर्रीवाल्या भाज्या. सावजी सावजी म्हणतात ते सुद्धा छत्तीसगढ मधून आलेले कोष्टी लोकं ह्यांच्या हातचे जेवण अतिशय चविष्ट असते. 'अस्सल' सावजीच्या भाज्या किंवा इतर पदार्थ रस्सेदार लालेलाल दिसत असल्या तरी तो रंग विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या मसाल्याचा असतो निव्वळ तिखटाचा नाही. या भाज्या अजीबात तिखट नसतात पण पुढे झाले असे कि सावजी पदार्थांची चव सगळ्यांना आवडायला लागली. ते नाव प्रसिद्ध होऊ लागले. मुठभर कोष्टी लोकांना मागण्या पुरवणं कठीण झालं मग ह्या नावाचा उपयोग करून कुणीही सोम्या डोम्यांनी हॉटेल उघडलीत पण भाजीला सावजीची चव देणं काही जमलं नाही तरी रंग चढायला मुक्तहस्ते तिखटाचा न तेलाचा वापर केला. आता बाहेरून येणारे सावजी फ़ेमस म्हणून अश्याच कुठल्याश्या सावजी नसणाऱ्या निव्वळ नावाच्या सावाजीकडे जातात आणि तिथून हा-हा करत निघून अक्ख्या गावात बोंबा ठोकतात कि तुम्ही बा लैच तिखट खाता... पण खरच तसे नाहीये. मी मूळ नागपूरची, सासर पुणे आणि सध्या बस्तान आहे मुंबई. वयाची २३ वर्ष नागपुरात होते पण आम्ही कधीही इतकं तिखट (जितकं इथे तुम्ही समजताय) जेवणात पहिले नाही जेवले नाही. शेजारी पाजारी किंवा कुठल्याही नातेवाईक, मित्रमंडळीकडेही पहिले नाही. हो तुलनेने जरा जास्त तिखट खात असतीलही काही लोकं पण ते तुम्ही समजताय तेवढं नसत आणि प्रत्येकजण तसंच खातं असही नसतं.
आणखी एक गैरसमज आहे तो भाषेबद्दल. विदर्भाने मध्यप्रदेश, छतिसगढ इकडे आंध्रप्रदेश अश्या विविध राज्यातील लोकांना स्वतःत सामावून घेतले आहे म्हणून इथे मिश्र संस्कृती नांदते. त्याचा परीणाम भाषेवर असला तरी तो तेवढा वाईट नाही. विदर्भात सगळीकडे 'तुले मले' अशीच भाषा बोलतात असा सगळीकडे गैरसमज आहे. तसे असते तर गैर काही नाहीचेय. कारण बोलीभाषेचा गोडवा आहे तो इकडेही प्रत्येक 10km ला बदलतो. पण जसे आग्री कोळी लोकांच्या मुंबईत अगदी घराघरात 'सकाली सकाली सालेला जातो' किंवा सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे टपोरी भाषा जसे अपुनको, कायको, मंगताय, आरेली क्या अशी भाषा बोलली जात नाही. पुण्यात अगदी सगळेच्या सगळेच अय्या, अग्ग्बाई, इश्श, काहीतरीच हा, आम्ही नाही जा गडे अस बोलत नाही.... अगदी तसंच विदर्भातही घरोघरी तसे बोलले जात नाही. तेव्हा जगात कुठेही गेलोत तरी सगळ्यांना एकाच चष्म्यातून पहायचे नसते. त्यातून आपल्याच तोकड्या अभ्यासाची अंधारी बाजू उघड होते
टीना ज्या भाषेत पाककृती लिहिते ती एक गम्मत म्हणून भाषेचा गोडवा राखावा म्हणून आणि रोजच्या भाषेपेक्षा वाचतांना काहीतरी वेगळे फिलिंग यावे, लिहितांना तिला आलेली मज्जा तिच्या मैत्रिणी म्हणून आपणही फील करावे ह्याच उद्देशाने. त्याचा अर्थ काढून इथे इतका वाद-विवाद, काहीतरी खुसपट काढून जीव मेटाकुटीला येईपर्यंत टोमणे, वैयक्तिक घसरण होणार असेल तर ती तसे लिहिणे बंद करेल त्यातून ना तिचे न आणखी कुणाचे काही साध्य होणार. घरात बोलतांना आपण जसे शब्दाशब्दात खुसपट काढून भांडभांड भांडत नसतो. झालीच चूक तरी समजून घेतो तसे इथेही करता येतेच कि ... एखाद्या शब्दावरून झुंडीने आल्यासारखे तुटून पडण्याची गरज असते का ??
आता विशेष चिनुक्स नावाच्या हार्टलेस आयडी साठी >>>>>>>>>>>> उन्हाळा आणि दारिद्र्य एकत्र जिथे जिथे येतात तिथे तिथे मिरच्या खाण्याचं प्रमाण अधिक आहे.>>>>>>>>>>>. अति असंवेदनशिल्तेचे उदाहरण दिलेत. वैदर्भीय तुम्हाला दरिद्री वाटतात हे बोलून तुम्ही तुमच्या वैचारिक दिवाळखोरीची आणि मनाच्या दरिद्रीपणाची ओळख करून दिली. हे दारिद्र्य तुमच्या नशिबी नको यायला कधी हि एका वैदार्भियाची सदिच्छा आहे हो तुम्ही आम्हाला दरिद्री म्हणालात तरी. आणि मग यापुढे विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच वृत्त वाचून हळहळू नका कधी... गेला एक दरिद्री म्हणून सेलीब्रेटच करा. शुभेच्छा तुम्हाला.
आणि हे वाक्य वाचून एकानेही निषेध केला नाहीच अन त्यांना हे फारच पर्सनल वाटले नाही... त्यांनाही शुभेच्छा.
धन्यवाद ... बाकी चालू द्या तुमचे
प्राप्ती, आपण एकमेकींशी न
प्राप्ती, आपण एकमेकींशी न बोललेलं बरं. तसंही मी टिना आणि बी चेच नाव घेतले होते.ट्तुम्च्याशी बोलायची मला इच्छ नाही. धन्यवाद.
प्राप्ती, छान माहितीवर्धक
प्राप्ती, छान माहितीवर्धक उत्तर लिहिले आहेस. मला दुसरा, तिसरा आणि चौथा - हे तीन उतारे आवडलेत.
नाव कुणाचं घेतलं हा प्रश्न
नाव कुणाचं घेतलं हा प्रश्न नाहीये तुमचे प्रचंड मोठे गैरसमज होते ते दिसले मला म्हणून बोलले. इच्छेचा काय प्रश्न आहे. तसा असता तर मलाही तुमच्या पातळीवर उतरता आले असते. मी सभ्य भाषेत माहिती दिलीय तुम्हाला ते समजून घ्यायचं सोडून अजूनही हेका सोडायचाच नाहीये ...म्हणून तर म्हणलं ना तुमच चालू द्या
तेच मी काहीही असभ्य भाषा
तेच मी काहीही असभ्य भाषा वापरलेली नसतानातुम्ही पात्ळी वगिरे बोलताय, ना मी कुठला हेकाधराय तरी तुम्ही वाट्टेल ते बोलताय म्हणूनच तुमच्याशी बोलण्या मला काहीही इंटरेस्ट नाई.
आणि हे वाक्य वाचून एकानेही
आणि हे वाक्य वाचून एकानेही निषेध केला नाहीच अन त्यांना हे फारच पर्सनल वाटले नाही... त्यांनाही शुभेच्छा>>>>
उन्हाळा आणि दारिद्र्य एकत्र जिथे जिथे येतात तिथे तिथे मिरच्या खाण्याचं प्रमाण अधिक आहे.>>>>>>>>>>>. हे वाक्य मला खटकले होते. .
कधितरी वाचले होते की,
कधितरी वाचले होते की, ज्याप्रकारच्या गरिबीत चिन+समुह देश होते ऐतिहासिक काळात म्हणुन मिळेल ते खाण्याची त्यांना सवया लागली. म्हणुन चे झुरळ, विंचु, साप ई. खातात.
आता यावर अपमानास्पद काय आहे? खातात तर खातात!
उन्हाळा आणि दारिद्र्य एकत्र
उन्हाळा आणि दारिद्र्य एकत्र जिथे जिथे येतात तिथे तिथे मिरच्या खाण्याचं प्रमाण अधिक आहे.>>>>> ह्या वाक्याचा हा पण अर्थ निघु शकतो की भाकरीबरोबर जर खायला भाजी वा कालवण ( आमटी/ डाळ/ वरण) नसेल तर नुसते कान्दा आणी मिर्ची खाऊन दिवस काढले जातात. दुसरे असे की मिर्ची खाऊन तिखट लागल्याने पाणी जास्त प्यायले जाते. यातुनच भूक मारली जाते/ शमवली जाते.
चिनुक्स च्या जागी दुसरा कोणी असता तर म्हणले असते की असेल बुवा हा हार्टलेस. पण चिनुक्स? जो खुद्द विदर्भातला आहे तो? त्याला जाण असणारच ना तिथल्या प्रश्नान्ची? एकटा बी नाहीये विदर्भातला, जो कायम विदर्भाचा ढोल बडवत असतो. बरेच मायबोलीकर वैदर्भीय आहेत. पण ते दुसर्याला समजुन घेतात. ( बी सोडुन )
प्राप्ती तुम्ही उत्तम ( खरच उत्तमच) लिहीले आहे. परन्तु जर तुमचे पुण्याबद्दल इतके गैरसमज आहेत तर मग आमचे का नाही होणार? टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणूनच स्पष्ट बोलले आणी लिहीले तर गैरसमज दूर होतात. आम्ही विदर्भाला समजून घ्यावे ही तुमची अपेक्षा असेल तर आम्हा पुण्या-मुम्बईकराना पण तुम्ही समजून घ्यावे ही आमची अपेक्षा गैर का?
विदर्भावर प्रचन्ड अन्याय झालाय पण तो विषय राजकीय आहे. या पाकृ धाग्यावर मी ते बोलु शकत नाही. माझ्या दोन्ही चुलत बहिणी विदर्भातच दिल्यात.
एकदा तुमचे पण गैरसमज शान्तपणे दूर करा. कोणीही इथे एकमेकान्चे वैरी नाहीत. वाद होतात, भान्डणे होतात. पण नीट समजावुन घेतले तर पुढे ते पण गैरसमज दूर होतात.
टीनाच्या बोलीभाषेवर कोणीही टीका केलेली नाही अथवा तिला नावे पण ठेवलेली नाहीये. पण विदर्भ सोडुन इतर ठिकाणी डाळ वापरलेली दिसली नाही या तिच्या विधानावर सगळ्याना हरकत आहे.
आय होप टीना पण हे समजून घेईल.
हार्टलेस चिनूक्स, चिनूक्सची
हार्टलेस चिनूक्स, चिनूक्सची वैचारीक दिवाळखोरी, मनाची असंवेदनशीलता, दारिद्र्य
याइतकं बेसलेस विनोदी मी याआधी कधीच मायबोलीवर वाचलं नव्हतं. प्राप्ती, सांभाळून लिहीत जा हो.
चिनूक्स हार्टलेस ..
चिनूक्स हार्टलेस
.. असो.
प्राप्ती तुम्ही अन्नं वै प्राणा: ही मायबोलीवरची मालिका वेळ मिळाल्यास वाचा. अजुन पुर्ण झालेली नाही.
प्राप्ती मलाही वर आशूडीने
प्राप्ती मलाही वर आशूडीने उद्ध्रुत केलेले वाक्य नाही आवडले. तू त्याला कितपत ओळखते इतकी वाईट विषेशनं लावायला !!!!
रश्मी - मला काहीही गैरसमज
रश्मी - मला काहीही गैरसमज नाहीत. मी आतापर्यंत जे बोलले ते केवळ अरे ला कारे होते.माझ एकेक उत्तर कुणाच्यातरी बोलण्यावरून झालेल्या वैतागातून आलेलं आहे हवं तर तपासून बघा. पुणे माझ सासर आहे. म्हणून विदर्भासकट पुणे मुंबई सगळ्यांबद्दल आदर आहे. पण इतरांना दिवे दाखवायला जाण्याआधी आपल्या खाली देखील अंधार आहे हे दिव्याने समजून घ्यावे हे सांगण्यासाठीच हि एवढी धडपड होती. एकेका शब्दासाठी भांडू नका हेच तर ओरडून सांगतेय ना केव्हापासून समजून घ्याल तर शपथ.... असोच आणि असोच्च्च
ओके, प्राप्ती तूच आधीपासुन
ओके, प्राप्ती तूच आधीपासुन वाच की तुला कोणी आधी अरे ला कारे केले होते का ते. सुरुवात कुठुन झाली. असो.
आता विशेष चिनुक्स नावाच्या
आता विशेष चिनुक्स नावाच्या हार्टलेस आयडी साठी>>
अशी बेछूट विधानं करण्याअगोदर प्रचंड पसरलेल्या मायबोलीवर थोडा शोध घ्यायचा प्रयत्न करा.
७०-७५ नव्या पोस्टी बघून वाटलं
७०-७५ नव्या पोस्टी बघून वाटलं टीनाच्या पाककृतीमुळे मायबोलीकरांनी जागतिक डाळशेपूदिन साजरा केला की काय! हे भलतंच प्रकरण निघालं!
चिन्मयला, 'झक मारली आणि तेवढं एक माहितीपर वाक्य लिहिलं' असं झालं असेल.
>>झंपी, छान निरिक्षण!!! बाकी काय इथे कमी हेकेखोर आहेत. कंपुतला एक आला की सर्वच येतात. उदा: इथे टिपापा मधील सदस्य एका मागोमाग एक आलेत
बी ह्यांचं टीपापाकंपू ऑब्सेशन अवर्णनीय आहे! कंपू आला की मागोमाग बी येतो.
(शिळी आहे.)
प्राप्ती, बरं हं! हार्टलेस
प्राप्ती, बरं हं!
हार्टलेस चिनूक्स, चिनूक्सची वैचारीक दिवाळखोरी, मनाची असंवेदनशीलता, दारिद्र्य याइतकं बेसलेस विनोदी मी याआधी कधीच मायबोलीवर वाचलं नव्हतं.
>>
+१
मला वाचल्या वाचल्याच हसायला आलेलं. पण मी हसले नाही. मी आशूडी सारखी मुळ पुणेकर नसल्याने मला खवचट हसायचे हक्क मिळत नाही . पण मी पिंचिकर म्हणून थोडासा खवचटपणा चालून जाईल का? म्हणून मी मनात हसले.
मृण्मयी, मस्त फोटो.. शिळी आहे
मृण्मयी,
मस्त फोटो..
शिळी आहे म्हणजे ? भाजी कि पोळी कि फोटो ?
बाजुला ते लाल काय आहे ? मस्त दिसतय..
रश्मी, तुमच्या पोस्ट्स
रश्मी, तुमच्या पोस्ट्स आवडल्या. पण तुम्ही विदर्भी साध्या लोकांशी का भांडताय? पुण्याच्या आहात का?
प्रादेशिक -- अस्मिता---
प्रादेशिक -- अस्मिता--- जोरदार!!!
चालू द्यात!!!
(शिळी आहे.) >>:
(शिळी आहे.) >>::हहगलो:
हो सायो मी पुणेकरच आहे.
हो सायो मी पुणेकरच आहे.
http://www.maayboli.com/node/2802 प्राप्ती ही लिन्क वाच मग तुझी मते बनव.
http://www.maayboli.com/node/33636
http://www.maayboli.com/node/26232
मला शेपू आवडत नाही फारसा. पण
मला शेपू आवडत नाही फारसा. पण ह्या धाग्यावर शेपूच्या भाजीबरोबर बरेच मनोरंजक वाद होत आहेत! चिनूक्सला हार्टलेस म्हणणं म्हणजे कमाल आहे
प्राप्ती, तुमची विदर्भाची माहिती चांगली आहे (हवं तर वेगळा धागा काढून लिहा) पण इतकी वैयक्तिक टीका करण्याआधी आपण त्या व्यक्तीला किती ओळखतो ह्याचा जरा विचार करा! मायबोलीवर सगळे विदर्भाचे दुश्मन असल्याच्या थाटात तुम्ही प्रत्येक पोस्ट लिहित आहात हे काही आवडलं नाही. टीनाने सगळी टीका खिलाडूवृत्तीने घेतली आहे आणि तुम्हीच उगीच वाद वाढवत आहात!
अगदीच नसत ग. आपण कुठेही गेलो
अगदीच नसत ग. आपण कुठेही गेलो तरी दुधात साखरेसारखेच विरघळतो. आपण कधीच ते जाणीवपूर्वक मुद्दाम कुणाला टोचाव म्हणून नसतच लिहिलेलं कधी कधी त्यात मस्करी असते कधी सहज मोकळ्यामनाने शेअर करावं म्हणून तर कधी भावूक होऊन वगैरे लिहितो. पण लिहिणाऱ्याचा उद्देशच विचारात न घेता एखादा शब्द पकडून टोमणे मारल्यासारखे किंवा मग मुद्दाम गटाने एकत्र होऊन तुटून पडतात मग आपल्या मनात नसतं ते काहीच्या काही तर्क लावून आपल्याला धारेवर धरतात. काय मजा येत असेल ह्यांना.असे सारखे डीफेन्सीव का होतात सास-बहु वाल्या सिरिअल बघून ह्याचं अस होत असेल का ?? काळजी वाटते बुवा… असोच (आता इथेही दुध साखर वगैरे घेऊन तुटून पडणार मला माहितीये पण चालू द्यावं सवय थोडच जाणारेय कुणाची Get well Soon म्हणूया)
गाढवापुढे वाचली गीता
कालचा गोंधळ बरा होता
नाव कुणाचं घेतलं हा प्रश्न नाहीये तुमचे प्रचंड मोठे गैरसमज होते ते दिसले मला म्हणून बोलले. इच्छेचा काय प्रश्न आहे. तसा असता तर मलाही तुमच्या पातळीवर उतरता आले असते. मी सभ्य भाषेत माहिती दिलीय तुम्हाला ते समजून घ्यायचं सोडून अजूनही हेका सोडायचाच नाहीये ...म्हणून तर म्हणलं ना तुमच चालू द्या
मला आत्ता कळले की पुण्यामुम्बईच्या पोरी याना का नाकारतात ते.>>>>>>बाबौ.आहात कूठे..रेकोर्ड दाखवा हयांना..वैदर्भी मूली पूण्यामूंबईत सूना म्हणून पहीली पसंती आहे साधी लोकं असतात ती.. वैदर्भीच काय पूण्यातली मूलं सूद्धा पूण्यातल्या मूलींना घाबरतात अन नाकारतात. भांडखोर असतात म्हणे त्या. पूण्यातल्या मीत्राने सांगीतले होते जगातली कूठलीही मूलगी चालेल पण पूण्याची नको म्हणून, मला नव्हता विश्वास आता प्रमाणच मिळालंय. एका शब्दावरून इतका गदारोळ करणार्या मूली एरवी घरात कश्या जगतात की नूसत्या भांडतात ही कल्पनापण आमच्यासाठी भयावह आहे बाबा..भांडत राहा all the best...हीमाशेपो
-------------------------------------------------------
कशाच्या बेसवर हे विधान करताय तुम्ही ?
पुण्यातल्या सगळ्या मुलींना ओळखता का तुम्ही ?
उगाच आपल समोर कॉम्प्युटर आहे म्हणून
उचलली बोट आणि बडवला की बोर्ड
आणि पातळी काय ? बाकीच्यांना गाढव ,भांडखोर ,हार्टलेस म्हणताय
हा का तुमचा सभ्यपणा आणि साधेपणा
आणि इतक जर विदर्भप्रेम ओतू चालल होत तर तिथेच राहायचं होत ......
get well soon
(टीना ह्यातलं काहीही तुला उद्देशून नाही )
अरारा. काय पण तुम्ही बायांनो.
अरारा.
काय पण तुम्ही बायांनो.
आमच्या वैदर्भिय मालकीण बाई शेपूची डाळ घालून भाजी मस्त करतात. :). मला आवडायला लागली.
प्राप्ती, चांगली माहिती
प्राप्ती, चांगली माहिती लिहिलीत. चिनूक्स स्वतः विदर्भाचा आहे आणि त्याला वाटते ती वस्तुस्थिती त्यानी लिहिली. हा विदर्भावर शेरा म्हणून वगैरे मारलेला वाटत नाही.
अशा भाज्या विदर्भात जास्त होतात ह्या क्लेमबाबत खरं उगाच उहापोह झालाय इथे. टीना, ह्या तशा नवीन दिसतात ऑनलाईन लेखन करण्यात. ऑनलाईन लिहायला आलं की वेगवेगळ्या प्रांतातले लोकं हे वाचत असतात आणि अशी जनरल विधानं त्यांना कशी वाटत असतील हे त्यांच्या लक्षात आलं नसावं. जसा वावर वाढेल तसं लक्षात येइल.
Pages