दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना आणि माझ्या बाकी सर्व मायबोलीकर मित्र-मैत्रिणींचे आभार. मनःस्थिती पुर्ववत होण्यात मायबोलीचाही हातभार असेलच.

अश्विनी, बाबांना श्रद्धांजली...खूप मोठे दु:ख आहे पण तुला सावरायचे बळ मिळो Sad

अश्विनी, ज्या धीराने तु परिस्थितिला सामोरी गेलिस, ते पाहुन, एक मुलगी म्हणुन तर आपली कर्तव्ये पार पाडलीसच पण एक माणुस म्हणुन कितितरि आदराला पात्र झालिस. एक मानाचा मुजरा.
बाबांना आदरांजली.

आजचा दिवस फार फार वाईट उगवला. माबोकर मिनल गोडबोले (मिनु) यांच्या पुतणीचे, एका भिषण अपघातानंतर, काल रात्री निधन.
अवघ्या १९ व्या वर्षी, जवळजवळ १५ ते २० दिवस तिची मृत्युशी चालु असलेली झुंज अखेर थांबली

अरेरे!! फारच वाईट बातमी. Sad
ईश्वर तिच्या आत्म्यास सद्गती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.

लोकहो,

जिथे मी राहायला असतो त्या ब्रायटनजवळ शोअरम (Shoreham) नावाचं छोटंसं नगर आहे. गेल्या शनिवारी तिथे हवाई कसरती चालत असतांना विमान रस्त्यावर पडून अपघात झाला. एकून ११ मृतदेह सापडले. हे सगळे अजाण प्रेक्षक होते. Sad

ताशी ५०० किमी वेगाने मृत्यूने त्यांच्यावर क्षणार्धात झडप घातली. तत्पूर्वी घेतलेलं एक दूरदृश्य :

http://i.dailymail.co.uk/i/pix/2015/08/24/09/2B9E75AD00000578-3208413-im...

2B9E75AD00000578-3208413-image-a-2_1440405335650[1].jpg

विमानाच्या समोर जी गर्दी दिसते आहे, तिच्यापैकी कोणी वाचलं असण्याची शक्यता नाहीच. Sad ताशी चारपाचशे किमी चा आघात आणि नंतरचा आगडोंब यांतून काय वाचणार म्हणा! आज चार दिवस झाले तरी अवघ्या ४ मृतांची ओळख पटली आहे. मृतांची संख्या २० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वैमानिक गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

ज्या रस्त्यावर विमान आदळलं तो चिरपरिचित रस्ता आहे. बाजूला लान्सिंग कॉलेजची लक्षवेधक टुमदार इमारत आहे. ओळखीचे बरेच लोकं दररोज यावरून प्रवास करतात. प्रत्येकाच्या तोंडात विमनस्क वाक्य आहे की life is so fraggile.

मृतांना शांती लाभो. आपण कितीही म्हंटलं तरी आयुष्य काचमण्यासारखं आहे. कधीही फुटून जाईल. माणसाच्या जन्माला येऊन जे काही हित करून घ्यायचंय ते ताबडतोब करून घ्यायला हवं. इंग्लंड कितीही प्रगतबिगत देश असला तरी काळासमोर कुणाचंही काहीही चालत नाही. बस, एव्हढं सांगण्यासाठीच हा संदेशप्रपंच. Sad

-गा.पै.

मीनु यांच्या पुतणीबद्दल वाचून वाईट वाटलं. एवढं लहान वय. १५-२० दिवस हॉस्पिटलमध्ये होती म्हणजे तिच्या आई-वडिलांना आशा लागून राहिली असेल Sad श्रद्धांजली!

Sad

Sad

Sad

मीनु च्या पुतणीबद्दल वाचुन वाईट वाटले.:अरेरे: अपघात आणी त्या बातम्या पण वाचवत नाहीत.:अरेरे: देव तिला शान्ती देवो.

मीनु यांच्या पुतणीबद्दल ऐकून खूप वेदना झाल्या.
त्यांना आणि पोटचा गोळा गमावलेल्या त्या माता-पित्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो!
श्रद्धांजली!

अश्विनीचे वडील, मिनू ची पुतणी, विमान दुर्घटना खुप वाईट बातम्या आहेत.

श्रद्धांजली.

आपण कितीही म्हंटलं तरी आयुष्य काचमण्यासारखं आहे. कधीही फुटून जाईल. माणसाच्या जन्माला येऊन जे काही हित करून घ्यायचंय ते ताबडतोब करून घ्यायला हवं.

गामाजी, अनुमोदन! आज नको, उद्या करू म्हणेस्तोवर आयुष्य संपून जातं!

अरेरे, किती कोवळं वय.. Sad

पोरीच्या आई बाबांना आणी इतर कुटुंबियांना हा आघात सहन करण्यास शक्ती मिळो..

काय बातमी आहे ही.
तिच्या आई वडिलांना आणि इतर जिवलगाना हे डोंगराएवढे दु:ख पचविण्याची ताकद ईश्वर देवो हीच प्रार्थना .

दोन्ही घटना भयानक! मिनुच्या कुटुंबियांना या जबर धक्क्यातून सावरायचे बळ मिळो.
(नुसतं असं लिहिणं किती सोपं असतं.. ज्यांच्यावर प्रसंग तेच जाणत काय आभाळ कोसळलंय ते..)

अपघातातल्या मृतांना श्रद्धांजली!

अश्विनी के आणि मिनूच्या दु:खात सहभागी आहे.
अपघातातील मृतांना श्रद्धांजली

मिनू यांच्या पुतणीस शांती मिळो. मिनू व त्यांचे आप्तेष्ट या दु:खातून लवकर सावरोत. Sad

-गा.पै.

Pages