दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

<<<< एखद्या कर्मयोग्याप्रमाणे त्यांना आपले काम करतानाच मृत्यू आला.>>>>> +1

RIP Dr. Kalam

फेसबुकवरुन साभार..

“बातमी आहे की अग्निपंख हरवले !!!
पण अग्निपंख नाही हरवले !!!

एका अग्निच्या उपासकाने ते तुम्हां आम्हास पुन्हा देऊ केलेत... समर्थ वाणी प्रमाणे त्यांनी काय केले तर...
...‘वन्ही तो चेतवावा रे चेतविताच चेततो’

तर ते तुमच्याकड़े आमच्याकड़े मुळातच होतेच,
पण कसे वापरायचे ते माहितच नव्हते..
ते त्याने शिकवले...”

ज्यांच्यापुढे आदराने नतमस्तक व्हावे अशा फार थोड्या व्यक्तींपैकी एक व्यक्तिमत्व काळाने कायमचे हिरावले!

ज्यांच्यापुढे आदराने नतमस्तक व्हावे अशा फार थोड्या व्यक्तींपैकी एक व्यक्तिमत्व काळाने कायमचे हिरावले!>>>+१००००००००

डॉ. ए पी जे कलाम याना भावपूर्ण आदरान्जली. ऋषीतुल्य व्यक्तीमत्व हरपले.

RIP Dr. Kalam

मिसाईल मॅन आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भावपूर्ण आदरांजली..

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली.
काल जशी ही बातमी आउट झाली, तसे सगळेच न्यूज च्यानल वाले टपून बसल्यागत (अस्थानी शब्द आहे, पण इलाज नाही वापरण्याखेरीज) त्यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात बिजी झाले. अक्षरक्षः कधी ही बातमी येते आणि आम्ही त्यांची जीवनगाथा दाखवू अश्या घाईत सगळी च्यानलं असल्यागत जाणवलं. कुतुहल वाटतं की न्यूजवाले प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीच्या जीवनपटाच्या 'स्टोरी'ची डेटाबेस मधे 'तरतूद' करुन ठेवतात की काय अश्या संभाव्य 'बातमी' साठी. असणारच म्हणा त्याशिवाय इतक्या पटकन कसं सगळं दाखवणार !
या पूर्वीच २-३ वेळा डॉ.कलाम गेल्याची hoax news फेबु आणि व्हॉअ‍ॅ वर फिरत होती आणि लोकांनी न खात्री करता फिरव फिरव फिरवली ही होती. काल-परवाच कोणीतरी ते जीवंत असताना त्यांच्या तसबीरीला हार देखील घालून झाला! ...
सगळ्यांनाच आजकाल सगळ्याच गोष्टींची वाईट्ट घाई का लागलेली असते !!!
हे सगळं लिहिण्यासाठी...हा धागा बरोबर आहे की नाही हे माहित नाही, पण आज राहवलं नाही Sad

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली.

वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे महान व्यक्तिमत्व काल कायमचे पंचत्वात विलीन झाले.

डॉ. कलाम यांनी कायम विज्ञानाचा प्रसार करण्यात आनंद मानला. समाजात वैज्ञानिक दृष्टी रुजवताना नेहमी धर्माला बडवले पाहीजे असे नाही हे त्यांनी कुठलाही अभिनिवेश न ठेवता प्रत्यक्ष आचरणाने दाखवून दिले. या प्रवासात कुठेही त्यांना वादग्रस्त गोष्टी चिकटल्या नाहीत. ही कला फार कमी जणांना अवगत आहे.

ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात हे सगळ्यांनाच विदीत आहे. इथे कवी संदीप खरे यांच्या "व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची" या काव्यपंक्तींची आठवण आल्यावाचून राहत नाही. डॉ. कलाम म्हणायचे, "भारताला क्षेपणास्त्रांची गरज यासाठी आहे की ताकद ही नेहमी ताकदीचा आदर करते" (We need missiles as strength respects strength).

त्यांची ओळख वैज्ञानिक व मिसाईल मॅन इतकीच नव्हती, तर एक सहृदयी व संवेदनशील बॉस म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आपला बॉस कधी जातो याची इतर लोक वाट बघतात, हे जाऊ लागले की त्यांच्या हाताखालचे लोक व्यथित होत असत. सरकारी बाबू असोत किंवा लष्करी अधिकारी, सगळ्यांशी वागताना कमालीचा संयम व शांतपणे समजावून सांगण्याची त्यांची हातोटी होती. लहान मुले व तरुणांना मार्गदर्शन करणे ह्या त्यांच्या विशेष आवडीच्या गोष्टी होत्या. ज्ञानदानाचा त्यांचा उत्साह आश्चर्यकारक होता. त्यामुळे वयाच्या ८४व्या वर्षी ते निवर्तले असले, तरी ते अकाली गेले असेच आपल्याला वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही. अक्षरशः स्वतःच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते देशहितार्थ विज्ञानाचा प्रसार व मार्गदर्शन करत राहीले.

लोकसत्तातल्या बातमीचे शीर्षक हे 'अग्निपंख विसावले' असे आहे. ते तितकेसे बरोबर नाही. डॉ कलाम यांचे नश्वर शरीर कार्य करेनासे झाले, पण त्यांची चेतवलेला विज्ञानाग्नि आपल्या सर्वामधे कायम तेवत राहून आपल्याला अग्निपंख बहाल करत राहील अशी मला खात्री आहे.

कायम देशहित हाच वैय्यक्तिक स्वार्थ मानणार्‍या अशा या सच्च्या भारतीयाला माझी साश्रू नयनांनी मन:पूर्वक श्रद्धांजली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंजाब मधील गुरुदासपूर येथे झालेल्या पाकिस्तानपुरस्कृत अतिरेकी हल्ल्यात गुरुदासपूरचे शूर पोलीस सुपरिंटेन्डन्ट (Superintendent of Police (Detective) श्री बलजीत सिंग व पाच इतर पोलीस कर्मचारी आणि तीन नागरिक ठार झाले. या सर्वांचा मृत्यूही क्लेषकारक आहे. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

पंजाबातील बलजितसिंह आणि मृतांना श्रद्धांजली. हे युद्धात प्राणार्पण करणारे हुतात्मे आहेत.
-गा.पै.

झगड्या, प्रत्येक प्रमुख वृत्तपत्राकडे वलयांकित व्यक्तींची धारिका (=फाईल) असतेच असते. ही पूर्वापार चालत आलेली पद्धती आहे.
आ.न.,
-गा.पै.

श्री.सृजन पाल सिंग....आय.आय.एम. अहमदाबादचे पदवीधर आणि २७ जुलै २०१५ या दिवशी शिलाँगमध्ये डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यक्रमासमयी त्यांचे सल्लागार म्हणून काम करणारी एक व्यक्ती...जी विमान प्रवासात डॉक्टरांच्यासोबत तसेच व्याख्यानाप्रसंगी उपस्थित होती....त्यानी वाहिलेली श्रद्धांजली वाचण्यात आली. त्यातील एक वाक्य येथील सदस्यांसाठी द्यावे असे वाटत आहे.

सृजनपाल यानी डॉ.कलाम याना विचारले आणि सरांनी दिलेल्या उत्तराने ते प्रभावित झालेच....आपल्याही तसेच वाटेल.....

...."'First you tell me, what will you like to be remembered for? President, Scientist, Writer, Missile man, India 2020, Target 3 billion…. What?' I thought I had made the question easier by giving options, but he sprang on me a surprise. 'Teacher'", he said.

~ जगाचा निरोप घेतानाही ते शिक्षक म्हणूनच प्लॅटफॉर्मवर उभे होते.

वंदन करावे पुन्हा पुन्हा अशा शिक्षकांना.

Pages