दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश तुमच्या वडीलांच्या निधनाची वार्ता ऐकून खूप वाईट वाटले. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हे दु:ख सावरण्याची शक्ती मिळो.

आदेश ह्यांची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. किती ह्सरे व्यक्तिमत्त्व!!! श्रद्धांजली.

असे समजते की सुप्रसिद्ध मराठी गझलकार प्रदीप निफाडकर ह्यांच्या २७ वर्षीय कन्येचे अपघाती निधन झाले.

श्रद्धांजली Sad Sad

माबोकरांचे मनःपुर्वक आभार !
काळ कोणासाठी थांबत नसतो. आपल्या अगदी जवळ असलेली व्यक्ती आता आपल्याला कधीच दिसणार नाही हे कटू सत्य स्विकारून पुढे जावेच लागते. सद्ध्या तोच प्रयत्न सुरू आहे. Sad

इंग्लंडचा माजी कर्णधार ब्रायन क्लोजचे निधन.
श्रद्धांजली!

मायकेल होल्डींगला ४५ व्या वर्षी खेळतानाचा क्लोजचा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो!
https://www.youtube.com/watch?v=w-f5pfBgpNE

कळविण्यास वाईट वाटते की शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर, २०१५, [श्रावण कृ.चतुर्दशी (मघा) ] रोजी माझे मातोश्रींचे वृद्धापकाळाने रहात्या घरी निधन झाले.
योगायोग असा की, लिंबीच्या आईचेही निधन शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट, २०१५ रोजी मध्यरात्री १.०० चे सुमारास [श्रावण शु. प्रतिपदा] (उजाडती १५/०८/२०१५) झाले होते.
इश्वर या विहिणींच्या आत्म्यांस सद्गती देवो.

लिम्बुभाऊ Sad काळजी घ्या. मायेची पाखर घालणारी माणसे दूर गेली की चटका लागतो.
हा बाफ वर आला की चुटपुट लागते. देव त्या दोघीना शान्ती देवो.

महेश, तुमच्या वडिलान्बद्दल आता वाचले. देव त्याना शान्ती देवो. तुम्ही पण सावरा.

लिंबूभाऊ,

श्रद्धांजली. Sad सावरा. रॉबीनहूड ह्यांच्याशी सहमत!

काळजी घ्यावीत.

एल्टी, तुमच्या दु:खात सहभागी आहे. आईंना मनःपुर्वक श्रद्धांजली.
आई-वडिलांपैकी कुणीही हरपणं आधार हरवण्यासारखंच. मग ते आपल्या कोणत्याही वयात असो.

गेल्या वर्षभरातच कधीतरी तुम्ही त्यांचा मतदान केल्यानंतरचा उत्साही फोटो दाखवला होतात ना?

महेश यांचे वडिलांना व लिंबुच्या आईला श्रध्दांजली !

लिंबूटिंबू, लहान होण्याची एक हक्काची जागा गमावलीत.. तुमच्या दु:खात सहभागी आहे. तुमच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो.

Pages