Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अश्विनीच्या वडिलांना भावपूर्ण
अश्विनीच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुला सावरायचे बळ मिळो.
मिनूच्या पुतणीबद्दल वाचून वाईट वाटले.
अश्विनी के सहवेदना . मिनु,
अश्विनी के सहवेदना .
मिनु, विमान अपघात भयानकच ..
अश्विनी के आणि मिनूच्या
अश्विनी के आणि मिनूच्या दु:खात सहभागी. श्रद्धांजली.
आश्विनी के यांच्या वडलांना
आश्विनी के यांच्या वडलांना भावपूर्ण श्रधांजलि ..
आणि मिनुताई यांच्या पूतणीचे वाचून मनाला चटका लागला ..
ईश्वर त्यांना या पर्वतप्राय संकटाशी सामना करण्याचे बळ देवो..
अश्विनी के आणि मिनूच्या
अश्विनी के आणि मिनूच्या दु:खात सहभागी. श्रद्धांजली.
प्रख्यात कन्नड लेखक, विचारवंत
प्रख्यात कन्नड लेखक, विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
डॉ. कलबुर्गी यांनी मूर्तिपूजेविरुद्ध विचार मांडले होते.
कलबुर्गी ह्यान्च्या हत्येची
कलबुर्गी ह्यान्च्या हत्येची बातमी धक्कादायक आहे....
(No subject)
प्राध्यापक कलबुर्गी यांच्या
प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध.

या प्रकरणी माध्यमांकडून बिनपुराव्याचे बेछूट आरोप न होता गुन्हेगार लवकर सापडावेत इतकीच इच्छा !
-गा.पै.
अश्विनी के,मिनू तुमच्या
अश्विनी के,मिनू
तुमच्या दु:खात सहभागी.
या प्रकरणी माध्यमांकडून
या प्रकरणी माध्यमांकडून बिनपुराव्याचे बेछूट आरोप न होता गुन्हेगार लवकर सापडावेत इतकीच इच्छा !
>> हे ह्या बीबी वर पिळकायची काही आवश्यकता होती काय ?
प्राध्यापक महोदयांच्या
प्राध्यापक महोदयांच्या हत्येचा निषेध.
पैलवानाचे चोराच्या मनात चांदणे आहे हे लक्षात घ्या हुडोबा.
चिनूक्स, कलबुर्गी केवळ
चिनूक्स, कलबुर्गी केवळ मूर्तीपूजेविरुद्ध होते असे नाही तर एकंदरच बुद्धीजीवी होते.
लिंगायत धर्माच्या संस्थापकांबद्दल त्यांनी लिहिलेली काही वाक्ये मध्यंतरी इतकी वादंग निर्माण करून गेली की त्यांना महंतांची माफी मागावी लागली.
इतकेच नव्हे तर एका मठात नेऊन त्यांच्या साहित्याची शुद्धी किंवा अगदी तुकारामासरखे साहित्य बुडवून टाकण्यात आले.
यापुढे लिंगायत धर्माची कुठलीच चिकीत्सा काणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती.
मात्र मनातले विचार कुठल्याही बुद्धीजीवीला स्वस्थ बसू देत नाहीत.
हल्लीच हिंदु देवांच्या मूर्ती 'पॉवरफुल' नसतात असे विधान त्यांनी केले.
त्यासाठी अनंतमूर्तींच्या मूर्तींवर मूत्रविसर्जन करूनही देव त्यांचे काही बिघडवू शकले नाहीत या उदाहरणाचा दाखला दिला.
आता बहुतेक लिंगायतांबरोबरच हिंदुही खवळले असावेत.
खर्या बुद्धीजीवीला कुठल्याच धर्माचा आसरा नसतो. कारण कुठल्याही धर्मात थोतांडे मागाहून का होईना भरली गेली आहेतच आणि त्या थोतांडांवर टीका केली की त्या त्या धर्मातील कट्टरपंथीय चिथावले जातात.
यासाठी काही लोक एका धर्माच्या कट्टरपंथीयांआड दडून दुसर्या धर्माव्ह्या कट्टरपंथीयांवर शाब्दिक हल्ला चढवण्याचा सोपा मार्ग पत्करतात. जे हा मार्ग न पकडता केवळ बुद्धीच्याच रस्त्याने जातात त्यांची हत्या अटळ आहे हे आता नक्की.
विचारांचा सामना विचाराने करता येत नसेल तर शस्त्रे उचलली जातात.
स्वतःचे बौद्धिक दौर्बल्य लपवायचा हा जणू राजमार्ग झालाय.
(मेरा नंबर कब आयेगा अशी फक्त वाट पहायची.)
प्राध्यापक कलबुर्गी यांच्या
प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध.
विचारांचा सामना विचाराने करता
विचारांचा सामना विचाराने करता येत नसेल तर शस्त्रे उचलली जातात.
स्वतःचे बौद्धिक दौर्बल्य लपवायचा हा जणू राजमार्ग झालाय.>> खरंय अगदी..
प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध.
कलबुर्गी यांच्या हत्येचा
कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध
,वैचारिक असहिष्णुता ही आपली नवी ओळख बनू नये ..
भारती+१ प्राध्यापक
भारती+१ प्राध्यापक साहेबान्च्या हत्येचा निषेध.
कलबुर्गी यांच्या हत्येचा
कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध, वैचारिक असहिष्णुता ही आपली नवी ओळख बनू नये ..>>>>+१०००
रॉबीनहूड, >> हे ह्या बीबी वर
रॉबीनहूड,
>> हे ह्या बीबी वर पिळकायची काही आवश्यकता होती काय ?
हो. हिंदुत्ववादी विचार मांडणारे लोकं अतिरेकी आहेत असे आरोप सुरूही झालेत.
दीमा बघा लगेच चोराच्या मनात चांदणे असा आरोप करून मोकळेही झालेत. त्यांना प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचं दु:ख झालेलं नाहीये. हिंदुत्ववाद्यावर आरोप होणार याचा आनंद झाला आहे. त्यांना हा आनंद व्यक्त करायला हाच बीबी सापडला का? विचारा ना जाब त्यांना!
आ.न.,
-गा.पै.
सुरुवात कोणी केली आहे. ? दीमा
सुरुवात कोणी केली आहे. ? दीमा ची तुमच्या लिखाणावर प्रतिक्रिया आहे. मागेही ही झकमारी तुम्ही इथे अनेक वेळा केली आहे. बीबीचे तरी भान ठेवा. विचारवंतांच्या हत्येबद्दल तुमच्या अशाच प्रतिक्रिया कशा असतात. अॅडमिन आता पैलवानाला आवराच.....
प्रा. कलबुर्गींच्या हत्येचा
प्रा. कलबुर्गींच्या हत्येचा निषेध. बुद्धीवंत/रॅशनलिस्ट विचारवंतांच्या विरुद्ध होणार्या हल्ल्यांनी देश मध्ययुगात पोचेल यात शंका नाही.
हंगेरी/ऑस्ट्रियाच्या सीमेवर एका ट्रकमध्ये ७० शरणार्थीं/विस्थापितांचे मृतदेह सापडले. हे सर्व इराक/सिरीया/अफगाण या मध्यपुर्वेतील देशांतले शरणार्थी असावेत. तसेच रोज अनेक विस्थापित/शरणार्थी भूमध्य समूद्र रबराच्या साध्या बोटींमधून पार करताना मरत आहेतच.
युरोपात सध्या या देशांतील विस्थापित व शरणार्थींचे लोंढे येऊन थडकत आहेत. अनेक बाल्कन देश यांना थारा देण्यास असमर्थ आहेत. तसेच बहुतेक विस्थापितांना जर्मनी, ऑस्ट्रिया, नेदरलँड ते इंग्लंड अश्या पश्चिम युरोपात जायचे आहे. अमेरिकेने मूर्खपणे केलेल्या इराक हल्ल्याने ना त्यांना काही मिळाले ना मध्यपुर्वेत काही हासिल झाले. अमेरिकेत सैनिकांची जिवीतहानी या पेक्षा अधिक काही झाले नाही पण मधमाश्याचे पोळे उधळून दिल्यामुळे आता युरोपवर मात्र हे बर्डन येणार आहे. युरोपातील जनता असायलम देण्यास फारशी उत्सुक नाहिये.
रॉबीनहूड, >> सुरुवात कोणी
रॉबीनहूड,
>> सुरुवात कोणी केली आहे. ?
तुम्ही सुरुवात केलीये.
'(प्रसार)माध्यमांकडून बिनपुराव्याचे बेछूट आरोप न होता गुन्हेगार लवकर सापडावेत' या वाक्यात काय आक्षेपार्ह आहे ते कृपया समजावून सांगणार का?
आ.न.,
-गा.पै.
श्री कलबुर्गी यांना
श्री कलबुर्गी यांना श्रद्धांजली.
पैलवान तुमची मते आजिबात पटत नसली तरी ती या साईटवर मांडण्याचे तुमचे स्वातंत्र्य मी मान्य करतो. पण निदान या श्रद्धांजलीच्या बीबीवर तरी औचित्यभंग करायला नको होता.
प्राध्यापक कलबुर्गी ह्यांना
प्राध्यापक कलबुर्गी ह्यांना श्रद्धांजली!
आणि मायबोलीवरील वादावादींना श्रद्धांजली द्यायची वेळ येवो अशी प्रार्थना!
आणि मायबोलीवरील वादावादींना
आणि मायबोलीवरील वादावादींना श्रद्धांजली द्यायची वेळ येवो अशी प्रार्थना!>>>>किमान दोन लाख वेळा महामृत्यूंजय जप करावा लागेल, मग कुठे देव जरा लक्ष घालेल
या वाक्यात काय आक्षेपार्ह आहे
या वाक्यात काय आक्षेपार्ह आहे ते कृपया समजावून सांगणार का?
>>>
या वाक्यात आक्षेपार्ह काही नाही फक्त ते टाकण्याची जागा आक्षेपार्ह आहे... इथे इतर चर्चेचा विषय येतोच कुठे. विकु म्हणतात तसे औचित्यभंग आहेच आणि तो तुम्हाला नवा नाही.
साती, " मेरा नंबर कब आयेगा
साती,
" मेरा नंबर कब आयेगा अशी वाट बघायची"
अगदी खरे.
खरोखर, नेटवरून जेव्हा आम्ही सुधारकी आणि रॅशनल विचार प्रसृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हीही हळूहळू हिट-लिस्ट मध्ये जात आहोत हा विचार विषण्ण करतो. म्हणजे मरणाच्या भीतीमुळे नव्हे, तर आमच्या धर्माचे जे विशेष लक्षण आणि आमची वेगळी ओळख असा सहिष्णुता हा गुण कधीकाळी होता, तो नष्टप्राय आहे ह्या दु:खामुळे.
डॉ. कलबुर्गी यांना श्रद्धांजली--विषाद आणि उद्वेगासह.
ता.क. दीमा, साती, मनापासून सांगणे की काळजी घ्या. आजपर्यंत शब्दांचा आणि शेलक्या विशेषणांचा भडिमार सोसलात,कोणी सांगावे, पुढे प्रत्यक्ष हिंसेला सामोरे जावे लागेलही कदाचित.
डॉ. कलबुर्गींना आदरांजली.
डॉ. कलबुर्गींना आदरांजली. परिस्थिती चिंताजनक होत चाललीये.
साती, डॉक्टरांबद्दलच्या अतिरिक्त माहितीसाठी धन्यवाद. त्यांच्या धैर्याला सलाम आहे.
डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा
डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तीव्र निषेध (अजून काय करू शकतो आपण
) एका ७७ वर्षांच्या निःशस्त्र व्यक्तीवर गोळ्या झाडणे हा गुन्हा कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही.
हे इथे अवांतर आहे पण मला कुठेतरी लिहायचे आहे म्हणून लिहितेय नंतर उडवून टाकेन कदाचित..पेपरमध्ये म्हटले आहे की डॉ. कलबुर्गी यांच्या विनंतीवरून १५ दिवसांपूर्वीच पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. असे का केले त्यांनी? नरेंद्र दाभोलकरांनी देखील पोलीस संरक्षण नाकारले होते असे अंधुकसे आठवते आहे. जेव्हा तुम्ही एका विचारधारेचे प्रतिनिधित्व करत असता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची जास्ती काळजी केली पाहिजे. बहुतांश वेळा बलिदानाने/हौतात्म्याने नुकसानच होते त्यापेक्षा माणूस जगला तर विचारधारा प्रबळ राहते. You got to realize value of your own life and take every possible precaution to be safe! सर सलामत तो पगडी पचास!
डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा
डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तीव्र निषेध (अजून काय करू शकतो आपण :() एका ७७ वर्षांच्या निःशस्त्र व्यक्तीवर गोळ्या झाडणे हा गुन्हा कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही.

>>>
+१
मी ही बातमी ऐकल्यापासून अस्वस्थ आहे. काय करावं सुचेना आणि आपण काहीच करू शकत नाही हा गिल्ट मनातून जाईना.
लाज वाटायला हवी मारेकर्यांना. नालायक मेले
Pages