दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...."'First you tell me, what will you like to be remembered for? President, Scientist, Writer, Missile man, India 2020, Target 3 billion…. What?' I thought I had made the question easier by giving options, but he sprang on me a surprise. 'Teacher'", he said.>>
अगदी अगदी. खरच जणु काही त्यांनी शिक्षक होण्यासाठीच जन्म घेतला होता.
एपीजेंना सलाम अन एक कडक सॅल्युट.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

पंजाब मधल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली ...........

दक्षिण आफ्रीकेचा क्रिकेटपटू आणि नॉटींगहॅमशायरचा ऑलराऊंडर क्लाईव्ह राईस याचे दु:खद निधन!
श्रद्धांजली!

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

गेल्या वर्षीच त्यांचे खास आमच्यासाठी आयोजित केलेले भाषण ऐकण्याची संधी मिळाली होती. त्या कार्यक्रमात माझ्या मैत्रिणी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलल्या होत्या.

त्यांची भाषणे प्रचंड inspiring असत.

डॉ. अनंत साठे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या पुणे शाखेचे संस्थापक आणि वयात येणार्‍या मुलामुलींना लैंगिक शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी शाळाशाळांमधून वर्कशॉप्सची संकल्पना अनेको वर्षे राबवणारे एक वंदनीय व्यक्तिमत्व २६ जुलैला कालवश झाले. या विषयावर शास्त्रीय लेखन करणार्‍या अगदी सुरुवातीच्या लोकांमधे ते एक होते. १९८०च्या दशकात स्त्री मासिकात एक नियमित सदरही चालवत असत.

श्रद्धांजली Sad

डाॅ. अब्दुल कलाम यांना विनम्र आदरांजली.
वाईट झाले. जगातल्या फार थोड्या चांगल्या, विद्वान लोकांपैकी ते एक!

सुप्रसिद्ध गायिका व कुमार गंधर्वांच्या पत्नी श्रीमती वसुंधरा कोमकली यांचे आज दुपारी निधन झाले.

हा जुलैचा शेवटचा आठवडा जाम बेक्कार Sad कलामांची बातमी ऐकून इतकं अस्वस्थ वाटत होतं शेवटी रात्री पोटभर रडून घेतलं तेव्हा जरा मोकळं वाटलं!
वसुंधरा कोमकली यांना श्रद्धांजली!

अरेरे Sad

पेंढारकरांना श्रद्धाजली. 'दिगू'चं 'आई तुझी आठवणे येते' हे गाणं पाहताना डोळ्यातून हमखास अश्रु येत.

ओह!!! Sad
भालचंद्र पेंढारकरांना श्रद्धाजली.
>>> 'दिगू'चं 'आई तुझी आठवणे येते' हे गाणं पाहताना डोळ्यातून हमखास अश्रु येत.
भ्रमर, अगदी मनातलं बोललास.

मला एक २२/२३ वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली.
रात्री ११ च्या सुमारास चर्नीरोड स्टेशनवर अंधेरी गाडीची वाट पहात उभा होतो. आपल्याच विचारात होतो. एवढ्यात शेजारी कुणीतरी व्यक्ती उभी राहील्याचे जाणवले. अगदी साधा पेहराव; काळा कोट, धोतर, काळी टोपी आणि पायात कोल्हापूरी वहाणा. पाहीलं आणि माझा विश्वासच बसेना. भालचंद्र पेंढारकर उभे होते. दादरपर्यंत त्यांच्या बरोबर प्रवास करण्याचे भाग्य मिळाले होते. आता या घटनेची प्रकर्षाने आठवण झाली.

Pages