डाळ शेपु

Submitted by टीना on 21 August, 2015 - 05:15
dal shepu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

निवडलेली शेपू - ती धुवुन बारिक चिरुन घ्यावी.
१० मिंट भिजु घातलेली पाववाटी मुंगसोल,

फोडणीसाठी :
तेल- २ चमचे
जिरं - पाव चमचा
मोहरी - पाव चमचा
कांदा - १ बारीक चिरलेला
लसुण - ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक - छोटासा तुकडा किसुन
तिखट - मी एक चमचा घेतलय पण मिरच्या जास्त छान लागतील..नव्हे मिरच्याच घ्या..३ ४ हिरव्या आणि ३ ४ लाल सुकलेल्या..
मिठ - चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार

क्रमवार पाककृती: 

निवडलेली शेपू धुवुन बारीक चिरुन घ्या..मी काड्या घेत नाही..
तेलात फोडणीच साहित्य टाका..
पहिले डाळ आणि मग शेपू घाला..
पाणी असता कामा नये.. हि भाजी कोरडीच छान लागते..
मी बरेच्दा तव्यावर करते..

खाण्याच्या घाईपाइ फोटो जरा हलला..वाईच चालवून घ्या..

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेशी आहे
अधिक टिपा: 

"डाळ आणि डाळ घातलेल्या भाज्या विदर्भात जास्त करतात आणि इकडं कुणीच मला डाळ घातलेल्या भाज्या सहसा करताना दिसल नाहि म्हणुन वैदर्भीय प्रकार लिहिलय..कॄपया कुठलेही गोड गैरसमज करुन घेऊ नये.. >>>>
गोड गैरसमज म्हणजे हेच म्हणायच होत कि मी यात विदर्भाचा हेका धरतेय असा अर्थ काढू नये..
नविन पाकृ लिहिताना प्रादेशिक या पर्यायाखाली मी वैदर्भीय का लिहिलं यासाठी हे एक्स्प्लेनेशन दिलेलं आहे..

यात तिखटापेक्षा हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकाव्या..भाजी जास्त चवदार लागते..माझ्याकडे ऑप्शन नसल्यामुळे जरा लालसर रंग दिसतोय..

* माझ्या रेस्प्यांमधे फोडणीच्या साहित्यात फक्त जिरंमोहरी + तेल + तिखट + मिठ + कांदा + लसुण + अद्रक एवढच असतं आणि यातही ते तसच घ्याव..बाकी स्वतःची कहाणी टाकायची असेल तर आपापल्या मर्जीनुसार टाकावी

माहितीचा स्रोत: 
माझी आई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डाळी तर जगभर कुठेही मिळतात. भारतात तर डाळी सगळीकडे मिळतात.

हल्ली तर पालक पनीर आणि मेथी पनीर हेच जास्त मिळते खायला.

बी, वरच्या लिस्टीतल्या आंबट चुका आणि चाकवत सोडल्यास सगळ्या भाज्या डाळी घालून आमच्या भागात सर्रास केल्या जातात. इनफॅक्ट डाळी घालूनच जास्त केल्या जातात, क्वचीत कधीतरी पीठ पेरून.

अल्पना ,+1000

बी , तुम्ही उल्लेखलेल्या सर्व भाज्या माझ्या घरी , आजोळी होतात. टीनाने ही जी रेसिपी दिली आहे ती भाजी आमच्या कड़े सर्रास होते. पण इथे वाद नको म्हणून मी लिहिले नव्हते. माझ गाव कोकणातल आहे .

तुमच्याकडे तर उठसुठ मेथी नाहीतर पालक.>>>>>>> मज्जानी लाईफ. आमच्या पुण्यामुबईत यायचे, तिकडेच सर्व करायचे.(:डोमा:) आणी करुन सवरुन वर यानाच नावे ठेवायची.:फिदी: मला आत्ता कळले की पुण्यामुम्बईच्या पोरी याना का नाकारतात ते.:खोखो:

बाय द वे, टीना हा वाद जाऊ दे. तू मोठ्या मनाची आहेस. ( हे वाक्य खोचकपणे लिहीलेले नाही ) त्यामुळे तू हा वाद बाजूला ठेवुन आमच्यात मिक्स हो कशी. सीमा म्हणते ते बरोबर आहे. कोल्हापूर साईडला जाऊन बघ. डाळीचा चान्गलाच वापर होतो. डाळ- कोबी, डाळ-वान्गे आणी बरेच काही. पुणे ते कोल्हापूर हा पट्टा खाण्याच्या बाबतीत एकदम चविष्ट. असे जेवण मी कुठे जेवले नाही. हो खानदेशात पण खरोखर लज्जतदार असते. भरीत-खर्डा-भाकरी, बट्ट्या खाव्या तिथेच.

विदर्भात ( तुमच्या) तूर जास्त त्यामुळे तुरीचे विवीध प्रकार तुम्ही करता. पण आमच्याकडे कायम डाळ महोत्सव असतो. डाळीचेच सान्डगे, कैरी घालुन डाळ, दाल फ्राय असले विवीध प्रकार होतात. आणी आमच्या पुण्या मुम्बईच्या लोकान्चे काय, जो येईल त्याला उदार मनाने आम्ही सामावुन घेतो. आमची कोकणी माणस पण तशीच सगळ्याना सामावुन घेणारी. वाद-अस्मिता-स्मिता-परीमीता हे होणारच. त्यामुळे जो बीत गया सो बीत गया.
आम्हा पुणेकराना ( जातीवन्त, बाहेरुन आलेले पुणेकर नव्हे) सवय आहे नावे ठेऊन घेण्याची. कारण नावे ठेवणारे शेवटी पुण्यालाच पसन्त करतात. करुन करुन भागले, सन्साराला लागले. तसे नावे ठेवुन भागले आणी पुण्यात येऊन राहीले.:फिदी: चलता है भाय, सब कुच चलता है.

डाळीचा संबंध कुठल्या विभागाशी आहे की नाही माहित नाही पण आपल्या पूर्वीच्या लोकांनी खूप विचार करुन पाकृ ठरवल्या असाव्या असं वाटतं. शाकाहारी लोकांना प्रथिने (प्रोटीन्स) कमी पडू नयेत या उद्देशानी भाज्यांमधे विविध डाळी, डाळींची पीठं, दाण्याचं कूट वगैरे व्यंजनं वापरली असावीत. अगदी कोकणात देखील दुधी, दोडका यांच्यासाठी ह. डाळ (दुधीला मूग देखील), पडवळाला वालाची डाळ, फरसबीमधे मटकी वापरतात.
शिवाय जिथे जे जास्त पिकतं ते वापरलं जातं हेही खरं आहे. पण ते डाळींपेक्षा इतर धान्य व भाजीपाला बाबतीत खरं आहे. जसं कोकणातले पदार्थ बरेचसे तांदूळाचे, नाचणीचे, देशावरचे जास्त करुन गव्हाचे, ज्वारी-बाजरीचे. कोकणात ओलं खोबरं तर देशावर सुकं. असो. विदर्भात मिरच्या मात्र खूप पिकत असल्या पाहिजेत असं वाटतं. केवढं तिखट खातात ते लोक! त्याला देखील काहीतरी कारण असणार.

चेष्टा नाही.

मिरच्यांमुळे घाम येऊन थंडावा मिळतो. तसंच तिखट जेवणामुळे तोंडीलावणं कमी खाल्लं जातं. चवसुद्धा मिळते कारण इतर मसाल्याचे पदार्थ उपलब्ध नसतात / परवडत नाहीत.
राजस्थान, विदर्भ, तेलंगण या प्रांतांमध्ये मिरच्यांचा असा वापर दिसतो.

उन्हाळा असल्याने भाज्यांच्यात फारशी विविधता नाही. दारिद्र्य असल्याने जेवण इंटरेस्टिंग आणि चविष्ट बनवण्यासाठी लागणारे महागडे पदार्थ उदा विविध, दूध, तूप, सुकामेवा वगैरे सढळपणे वापरता येत नाहीत. मग अशा प्रांतात तिखटावर भर. तिखट पदार्थ (कदाचित) भाकरीला थोडाच लावून काम भागतं. असं काहीतरी कारण असू शकेल.

मिरची ही उष्ण गटात मोडणारी आहे. गरम वातावरणात आणखी गरम पदार्थ खाणे लॉजिकल नाही वाटत. उन्हाळ्यात तसाही घाम येतोच की. मी विदर्भातलाच आहे पण मी खूप तिखटजाळ खाऊच शकत नाही.

मला आत्ता कळले की पुण्यामुम्बईच्या पोरी याना का नाकारतात ते.>>>>>>बाबौ.आहात कूठे..रेकोर्ड दाखवा हयांना..वैदर्भी मूली पूण्यामूंबईत सूना म्हणून पहीली पसंती आहे साधी लोकं असतात ती.. वैदर्भीच काय पूण्यातली मूलं सूद्धा पूण्यातल्या मूलींना घाबरतात अन नाकारतात. भांडखोर असतात म्हणे त्या. पूण्यातल्या मीत्राने सांगीतले होते जगातली कूठलीही मूलगी चालेल पण पूण्याची नको म्हणून, मला नव्हता विश्वास आता प्रमाणच मिळालंय. एका शब्दावरून इतका गदारोळ करणार्या मूली एरवी घरात कश्या जगतात की नूसत्या भांडतात ही कल्पनापण आमच्यासाठी भयावह आहे बाबा..भांडत राहा all the best...हीमाशेपो

अशीच माझी पण कृती आहे, मराठवाड्यातली असूनही Wink कालच केली होती घरातल्या एकाच मेंबरासाठी. शेपू फॅन क्लबात असेल की ही भाजी.

प्राप्ती तुझी पोस्ट शेवटली असली तरी हरकत नाही. पण वरती गाढवापुढे वाचली गीता हे कुठल्या शहरातल्या/ प्रान्तातल्या लोकाना उद्देशुन आहे?

प्राप्ती | 25 August, 2015 - 04:04
हसून हसून गडबडा लोळण हसून हसून गडबडा लोळण

गाढवापुढे वाचली गीता

कालचा गोंधळ बरा होता>>>>>> ही तुझी ती पोस्ट. मग वर वाद घालणार्‍या मुलीनी असले विधान केले आहे का? ( आता त्तुच म्हणतेस आम्ही साध्या आहोत म्हणून) या मुलीनी तुला उदेशुन काही तरी लिहीले होते का? नाही ना? मग साधे शब्द तू का नाही वापरु शकली? आणी पुण्याच्या मुली भान्डखोर असतात,( असे तू आणी तुझा मित्र म्हणतो) असे सरसकट विधान तुच कुठलेही जास्त अनूभव न घेता म्हणते आहेस. वादाला प्रतीवाद करणे भान्डखोरपणा म्हणत असतील तर म्हणा. पण अरे ला कारे असे उत्तर सौम्य पद्धतीने का होईना पण मिळणारच. आणी हो, मी कसले रेकॉर्ड ठेवत नाही. आम्ही पुणेकर सर्वाना सामावुन घेतो, पण उगाच वाटे कोणी जाणार असेल तर उत्तर मिळणारच.

आणी माझी ती पोस्ट ज्या व्यक्तीला उद्देशुन आहे त्याला कळेलच. कारण आतापर्यन्त मदत करुनही कुचके शेरे आणी विचीत्र विपु पहायला मिळाली आहे.

>>एका शब्दावरून इतका गदारोळ करणार्या मूली एरवी घरात कश्या जगतात की नूसत्या भांडतात ही कल्पनापण आमच्यासाठी भयावह आहे बाबा..भांडत राह>>>> हे फारच पर्सनल होत चाललय.

बादवे, नुकतेच पेपर मध्ये वाचले होते की तिखट खाल्ल्याने मेंदुला पोट भरल्याचा संदेश पाठवला जातो. त्यामुळे कमी खाल्ले जाते. अर्थात हा सल्ला वजन कमी करण्याचे उपाय या विषयाशी संबंधीत होता.

चिनुक्स म्हणतात ते कारण जास्त वॅलीड आहे..
उन्ह जास्त असल्यामुळे तिखट जास्त खाल्ल्या जात..दारिद्र्य सुद्धा आहेच त्यामुळे त्यातही शहरापेक्षा खेड्यात जास्त प्रमाण..अंगमेहनत करणारे मजुर वगैरे लोक अजुनच जास्त तिखट खातात.. Happy

मला तरी हे लॉजिक नाही पटत तिखट खाण्याबद्दल. म्हणजे ज्यांच्याकडे गरीबी आहे त्यांच्याकडे मिरच्या खूप प्रमाणात असतात का? मिरच्यांचे भाव इतकेही स्वस्त नाहीत Happy

आणि मला हेही खटकले की विदर्भात लोक तिखट फार खातात. तुम्ही इथे हॉटेलचे उदाहरण दिले. पण हॉटेल मधे तिखट तेल मसाले जरा जास्तच घातले जातात. पण घरगुती स्वैपाक खूप तिखट नसतो.

बी आणि टिना तुम्ही मिळून नक्की विदर्भात काय करता हे एकदा ठरवा. आम्ही बरेच दिवस तिखट खाण्याबद्दल वाचतो आहोत. आता हा बी तिखट खात नाहीत म्हणतोय.
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती? अशी आमची परिस्थिती करून टाकू नका.. Wink

आत्मधून तु मॉरडॉर म्हणतेयस का ?
कारण काही दिवस झाले माझा मुक्काम तिकडच आहे..२र पुस्तक संपत आलय..यिप्पी..
नी, अगं % सांगत आहे.. तु नको कन्फ्युज होऊ Happy

शेपु भाजीवर इतक्या पोस्टी का ते बघायला आले..... Happy

प्रादेशिक पाककृती लिहिताना त्या प्रदेशाबाहेरचे लोकही ती पाकृ वाचु शकतात याचे थोडेसे भान ठेवावे असे मला वाटते. कारण बरेच प्रादेशिक शब्द लिहिले जातात ज्याचे अर्थ त्या प्रदेशाबाहेरच्या लोकांना माहित नसतात. वरच्या पाकृमध्ये मुंगसोल हा शब्द वाचला ज्याचा अर्थ मुगाची डाळ हे फोटो दिलेला असल्याने कळले. फोटो नसता तर कळले नसते. सांभर म्हणजे कोथिंबीर हे माबोवरचेच विदर्भिय पदार्थ वाचुन आधीच कळलेले पण ते पदार्थ लिहिणा-यांनी अर्थही लिहिला होता.

ललित वगैरे लिहिताना मुद्दाम एखाद्या भाषेत लिहिले तर ठिक आहे. पण सगळ्या पाकृही असे प्रादेशिक शब्द वापरुन होऊ लागल्या तर कठिण आहे. निदान सोबत त्याचे अर्थ तरी देत जावे.

आता मी जरी वरची टिप्पणी प्रादेशिक पाकृवर लिहिली तरी वरची पाकृ प्रादेशिक का कसे या वादात मी पडत नाही. कारण मीही ही भाजी अशीच करते आणि मी अजुन विदर्भ पाहिलेला नाही.

आता लेक्चर मोड ऑन केलाच आहे तर अजुन एक लेक्चर - पाकृ लिहिताना ती कोणीही वाचु शकते याचेही भान ठेवावे हेमावैम. एखादी/दा सुगरण जसे वाचेल तसेच सैपाकघरात कालच पदार्पण केलेली व्यक्तीही वाचेल. म्हणुन लिहिताना क्रमवार सगळे साहित्य आणि पदार्थ शिजुन गॅस बंद करेपर्यंत काय काय करावे लागते, प्रत्येक कृतीला किती वेळ लागतो हे सग़ळे लिहिलेले बरे. उदा. काही पदार्थ करताना ते खुपवेळ परतले की जास्त चांगली चव येते. आता हे पाकृ लिहिताना लिहिले गेले नाही तर मग ती कृती वाचुन बनवलेला पदार्थ चांगला कसा होणार?

फोडणीत काय घालावे हे रोज सैपाक करणा-याला माहित असले तरी नविनच या भानगडीत पडलेल्याला तेवढे माहित नसणार. परत पदार्थानुरुप फोडणीचे घटकही बदलतात. म्हणुन पदार्थ करताना जरी तेच ते नेहमीचेच घटक असले तरी ते लिहुन काढलेले बरे. इथे बघुन पहिल्यांदाच कोणी करत असेल तर त्याच्याहातुन चुका व्हायची शक्यता कमी होते.

.

मला थोडा विरोधाभास जाणवला कारण टिनाने मागे जेंव्हा वर्‍हाडी भाषेत कृती लिहिली होती तेंव्हा तिचे कौतुक झाले. कदाचित त्याचमुळे तिने पुढे तिच शैली वापरली. वर साधना लिहिते त्याप्रमाणे प्रादेशिक भाषा सर्वांनाच कळते असे नाही म्हणून एखादी व्यक्ती मधेच ती वाचून सोडून देईन. किंवा, एखाद्याला प्रादेशिक कृती वाचताना, ते ते शब्द परिचित करुन घेताना कृती करुन बघण्याइतकाच आनंद मिळू शकेल. ह्यावर एक उपाय म्हणजे जे शब्द प्रादेशिक आहेत ते तसेच ठेवता येईल पण कंसात मात्र प्रचलित शब्द लिहिता येईल.

साधना छान पोस्ट + २.

म्हणून एखादी व्यक्ती मधेच ती वाचून सोडून देईन
>>
ह्म्म्म! मला नाही कळत दुसर्‍या भागातली भाषा. मी टिनाची पाकृ वाचतच नाही आजकाल (मला करण्यात रस नसल्याने) पण फोटो आणि चर्चा वाचायला वरचे वर डोकावते.

बाकी साधना +१
मला मुंगसोल आणि सांभार दोन्ही कळालं नव्हतं. मी मागे कुठल्याश्या पाकृ वर "यात सांभार बनवून टाकायचा का? आणि का?" असं विचारणार होते पण वेळे अभावी राहून गेलं. सांभार म्हणजे कोथिंबीर हे आत्ताच कळालंय मला. मुंगसोल मी गेस केलं पण माझं चालतंय कारण मला कोणताही पदार्थ बनवून बघायचाच नसतो Wink

कारण मीही ही भाजी अशीच करते आणि मी अजुन विदर्भ पाहिलेला नाही. >>+१
आमच्या घरात बर्‍याच किंवा सगळ्याच पालेभाज्या डाळ घालून करतात. कधी तरी चवीत बदल म्हणून वेगळ्या स्टाईलने केली जाते.माझ्या आजी-माझी ३ पिढ्यांमधे कोणीही विदर्भाकडे फिरकलेलंही नाही Wink

Pages