"एकदम सोप्पी फिरनी" असं टायटल द्यायचं फार मनात होतं. पण याआधीच्या "एकदम सोप्प्या" रेसिपी संवेदनशील विषय बनल्याने ते टायटल दिलं नाही याची कृपया नोंद घ्यावी.
हॉस्टेलमधे असताना रमझान चालू झाला की आम्ही भटकायला निघायचो. हॉस्टेल होतं माझगावला. तिथून मोहम्मद अलि रोडला जायचं. एरव्ही पण मोहम्मद अलि रोड, क्रॉफर्ड मार्केट हे भाग म्हणजे डोळ्यासाठी, जिभेसाठी अगदी भरपूर मेजवानी असायची. ईदिनिमित्त जवळ जवळ अख्ख्या भागाला रोषणाई केलेली असायची. विविध रंगांचे, चमकते स्टॉल्स नटलेले असायचे. आम्ही मैत्रीणीसोबत संध्याकाळी दिवेलागणीला बाहेर पडायचो. पोटभर खादंती करायची. पाया सूप, चिकन कबाब, मटण कबाब, मालपुआ मनसोक्त हादडायचे. रस्त्यावर बार्गेनिंग करत करत शॉपिंग करायची. येताना सुलेमान बेकरीम॑धून नानकटाई घ्यायची. आणि दहाच्या आत हॉस्टेलमधे यायचं असा आमचा महिनाभर दिनक्रम.
भरपूर खाणं झाल्यावर गोड काहीतरी खावंसं वाटलं की नजर भिरभिरायची ती फिरनीसाठी. एवढंसारं मसालेदार खाल्ल्यावर थंडगार फिरनी अगदी ताजंतवानं करून जायची. मातीच्या छोट्याशा पणतीसारख्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी म्हणजे माझ्यादृष्टीने रमझानचं ते सर्व वातावरण पुन्हा एकदा जगल्यासारखंच. कधीतरी एकदा सहज नेटवर रेसिपी पाहिली तर अगदीच सोप्पी रेसिपी. शिवाय पदार्थ पण घरात कायम असनारे. झटपट होणारा हा गोडाचा पदार्थ हल्ली माझ्याकडे महिन्या दोन महिन्यातून एकदा घरात होतोच. मग घरात असलेल्या काही सामानांपासून फिरनीचे काही व्हेरीएशन्स केले.
फिरनी म्हणजे तांदळाची खीर.पण तरी साऊथ इंडियन तांदळाची खीर आणि फिरनीमधला सर्वात मोठा फरक तापमानामधे आहे. तांदळाची खीर गरमगरम खाल्ली जाते. गार झाल्यावर ती खाववत नाही कित्येकदा. त्याउलट फिरनी थंडगार खायची असते. मातीच्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी घट्ट होते आणि गारेगार फिरनी वेगवेगळ्या इसेन्स आणि रंगांमधे प्रयोग करून चवीमधे बदल करता येतो.
माझ्यासारख्या किचनमधल्या बिगारीमधे शिकणार्यासाठी फिरनी हा अगदीच "जमणेबल" प्रकार आहे. करून बघा आणि सांगा बरे.
१. दूध: अर्धा लिटर. निरसे म्हणजे न तापवलेले दूध घ्या.शक्यतो टोन्ड मिल्क नको. फुल क्रीम मिल्क घ्या.
२. बासमती तांदूळ: दोन ते तीन चमचे. (बासमती लॉन्ग ग्रेन घ्या. दिल्ली राईस अथवा डेहराडून बासमती)
३. साखर: दोन वाट्या. (व्हेरीएशननुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त होइल.)
४. ड्रायफ्रूट्स आणि इसेन्स.
१. सर्वात आधी बासमती तांदूळ भिजवून, धुवून निथळून घ्या. थोडेसे कोरडे भाजून घ्या.
२. हे तांदूळ मिक्सरमधे अगदी बारीक करून घ्या. पीठासारखे बारीक झाले पाहिजे. विकतचे पीठ मात्र वापरू नका. फिरनीला बासमती (लाँग ग्रेन) हवाच. तांदूळ मिक्सरमधे फिरवताना थोडे पाणी घालून फिरवा म्हणजे नंतर पेस्ट करत बसायला नको.
३. दूध निरसे घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन त्यामधे तांदळाची पेस्ट घाला. व्यवस्थित कालवून घ्या. अजिबात गुठळ्या नकोत. आता हे मिश्रण गॅसवर ठेवा.
५. साखर घाला. गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीवर असू देत. पण फिरनी फ्रीझमधे सेट होणार असल्याने साखर किंचित जास्तच घाला.
४. सतत हालवत रहा. मिश्रण खाली लागू देऊ नका अथवा गुठळ्या बनू देऊ नका. हीच कृती जरा किचकट आणि वेळखाऊ आहे.
५. घट्ट खिरीसारखे होत आले की गॅसवरून खाली उतरवा.
६. वाफ निवेपर्यंत ढवळत रहा. अन्यथा या स्टेजला येऊन गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाल्याच असतील तर फिरनी गाळून घ्या. फिरनीचे टेक्श्चर अगदी मऊ आणि सिल्की व्हायला हवे.
७. असतील तर मातीच्या पसरट भांड्यामधे सेट करायला घ्या अन्यथा काचेच्या सुबकश्या वाडग्यांमधून काढा आणि फ्रीझमधे दोन ते तीन तास सेट करा.
८. थंडगार फिरनी खायला द्या आणि तुम्हीदेखील मनसोक्त खा. (सजावट करून फिरनी सर्व करा. -- हे वाक्य बर्याचदा मराठी कार्यक्रमांमधे ऐकले आहे. "खायला द्या" असे म्हणायला काय त्रास होतो न कळे) असो.
========================================
ही झाली साधी फिरनी. आता याचे अनंत व्हेरीएशन्स करता येतात. सेट करण्याआधी त्यामधे इसेन्स घालता येतात. सजावटीमधे कलाकुसर करता येते. मी करून पाहिलेली काही व्हेरीएशन्स.
१. केसर फिरनी: थंड दुधात थोडे केशर खलून फिरनीमधे मिक्स करा. वाडग्यामधे काढल्यावर वरती बदाम्-पिस्त्याचे काप घाला. (हे साधेसोपे व्हर्जन. चुकण्याची शक्यता फार कमी. )
२. काजू फिरनी: तांदळासोबत थोडे काजूदेखील भिजत घाला, शिजवताना ही काजूची पेस्ट दुधात घाला. सजावटीसाठी काजू-बदाम्-पिस्ता घाला.
३. मँगो फिरनी: फिरनी शिजत असताना त्यामधे मँगो पल्प घाला. मँगो पल्प गोड असल्यास त्यामानाने साखर कमी घाला. सजावटीसाठी आंब्याच्या फोडी अथवा थोडा मँगो पल्प घाला. (आमच्याकडे हे व्हर्जन भयंकर हिट आहे. आमरस खाऊन खाऊन कंटाळा आला की चेंज म्हणून आंबाफिरनी )
४. चॉकोलेट फिरनी: फिरनी शिजत असताना कोको पावडर घाला. अथवा फिरनी शिजल्यावर त्यामधे चॉकोलेट सिरप घाला. सजावटीसाठी चॉकोलेट किसून घाला. (कोको पावडर अंदाजाने घाला. मी एकदा कडूढाण केलं होतं. तेव्हापासून चॉकोलेट सिरप घालते)
५. स्ट्रॉबेरी फिरनी/अॅपल फिरनी: शिजत असताना त्यामधे स्ट्रॉबेरी सिरप घाला, सजावटीसाठी स्ट्रॉबेरीच्या फोडी वापरा. ( हे व्हर्जन मी केल्यावर पिताश्रींनी "डायजिनसारखं लागतय" अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे जरा जपूनच. अॅपल फिरनीसाठी दिनेशदांची रेसिपी अवश्य बघा)
६. बटरस्कॉच फिरनी: शिजवून झाल्यावर त्यामधे बटरस्कॉच ईसेन्स घाला आणी सजावटीसाठी ड्रायफ्र्रूट्स घाला. अशीच व्हॅनिला फिरनी करता येइल.
७. रोझ फिरनी: फिरनी शिजल्यावर त्यामधे गुलाबजल आणि गुलाब ईसेन्स घाला. सजावटीसाठी गुलाबाची पाकळी आणि किंचित गुलकंद वापरा.
८. कॅरामल फिरनी: वर्षूच्या "साधेसोप्पे पुडिंग"मधल्या रेसिपीने कॅरामल तयार करून घ्या. फिरनी सेट झाल्यावर त्यावर हे कॅरामल हलक्या हाताने पसरा. पुडिंगपेक्षा हे जास्त सोपं पडेल.
९. जास्मिन फिरनी: फ्रीझमधे ठेवताना फिरनीवर एक मोगर्याचे फूल ठेवून द्या, खायला देताना फूल बाजूला ठेवा. ड्रायफ्रूट्स घाला. या फिरनीला अप्रतिम वास येतो.
१०. केवडा: शिजवताना केवडा इसेन्स घाला. नंतर सजावटीसाठी केवडाजल घाला.
११. मोदक फिरनी: फिरनी शिजवताना त्यामधे मोदकाचे सारण घाला. साखर घालू नका. याची चव छान येते. मोदक बिघडल्यावर उरलेल्या सारणाचे काय करावे असा प्रश्न पडल्यास ही फिरनी करून बघा.
केसर फिरनी
अजून सुगरण मायबोलीकरांना काही व्हेरीएशन्स माहित असतील तरी अवश्य सांगा.
मँगो फिरनी कातिल दिसतेय.
मँगो फिरनी कातिल दिसतेय.
मागच्या आठवड्यात ह्या रेसिपी
मागच्या आठवड्यात ह्या रेसिपी ने फिरनी केली. अत्यंत सुरेख चव आली होती.

इतकी सोप्या रेसिपी साठी अनेको धन्यवाद नंदिनी .
दिविजा, मस्त दिसतेय ही फिरनी.
दिविजा, मस्त दिसतेय ही फिरनी.
आणि आला रमादान चा महिना.. मला
आणि आला रमादान चा महिना..
. माझ्याकडे फ्रिज नै नं ..
मला वाटलच तरी कि फिरुन हा धागा वर येईलच..
घनघोर अत्याचार . आता मी काय खावु
टीना मातीच्या पणत्या मिळाल्या
टीना मातीच्या पणत्या मिळाल्या तर त्या वापर. फ्रीझची गरज भासत नाही. मातीच्या भांड्यात फिरनी अशीच मस्त सेट होते.
सेट होईल पण थंडगार फिरनी
सेट होईल पण
बहुतेक..
थंडगार फिरनी खायला द्या आणि तुम्हीदेखील मनसोक्त खा. >> हे तुझ वाक्य वाचुन मग परत माझा जोश ढ्यॅ करुन टाकतो.. लगे ती थंडगार चव कशी लागेल याचे विचार मला छळायला लागतात..
तरी बिना शीतकपाटाने करुन पाहिन
धागा वर आल्यावर लगेच सैरभैर व्हायला झालय मला.. करावीच आता जाउ दे तिकड..
नंदिनी ठांकू…. सर्व
नंदिनी ठांकू….
सर्व प्रतिक्रिया वाचून मगच मी फिरनी करायला घेतलि. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा ह्या म्हणी नुसार माझी फिरनी चुका न होता जमलि.
दिविजानं केलेली फिरनी एवढी
दिविजानं केलेली फिरनी एवढी छान सेट झालीये की ग्लास आडवा झाला तरी सेटच आहे
टीना, मुळात फिरनी ही "थंडगार"
टीना, मुळात फिरनी ही "थंडगार" म्हणजे आईस्क्रीमसार्खी गार करायची नाही. स्टॉलवर विकायलाठेवलेली फिरनी अशीच मातीच्या भांड्यांत बनवलेली असते. करून पहा. वाईट नक्कीच लागणार नाही.
सिंडरेला
सिंडरेला
टिना, गार पाण्यानं ओला केलेला
टिना, गार पाण्यानं ओला केलेला पंचा गुंडाळून फिरनीचं भांडं ठेवलंस तरी गार होईल. पूर्वी फ्रीज नसताना पाण्याचा पिंप वा माठाभोवतीही ओला पंचा गुंडाळून ठेवायचे. पाणी बर्यापैकी गार रहायचं.
भारी दिसतेय हां दिविजाची
भारी दिसतेय हां दिविजाची फिरनी.
शुम्पी तुझ्या आधीच्या
शुम्पी तुझ्या आधीच्या प्रतिसादाच भल मोठ योगदान आहे माझी फिरनी यशस्वी होण्यामागे. कारण मागे एकदा मी तांदळाची खीर करताना अगदी तुझीच चूक केली होती. मात्र पटकन चूक मान्य न केल्यामुळे त्या फुगलेला तांदळाचा गोळ्यात सतत दुध टाकून मी अख्खा सोसायटीत खीर देत येईल एवढी अमाप खीर तयार केली होति.
दिवीजा ची फिरनी छान दिसत आहे
दिवीजा ची फिरनी छान दिसत आहे ..
सिंडरेला,
ही मँगो फिरनी आहे का? की केशरामुळे तसा रंग दिसतो आहे?
केशर घातल्यामुळे तसा रंग
केशर घातल्यामुळे तसा रंग आलाय..:)
भिंतीवर ग्लास आडवा लावायची
भिंतीवर ग्लास आडवा लावायची आयडिया मस्त. आलेल्या पाहुण्यांना एकेक करून चाटायला सांगायचे.
विकु,
विकु,
ट्च ट्च दिविजा, चूक काय आणी
ट्च ट्च दिविजा, चूक काय आणी मान्य काय? कैतरी उगाच. आपला हात खूप देता आहे म्हणून आपण मुद्दामच खूप खीर केली होती..
तुझी फिरनी खरच खूप छान झाली
तुझी फिरनी खरच खूप छान झाली असणार अगदी "आडवा" हात मारलायस ते
काल काजु-पिस्ता फिरनी करुन
काल काजु-पिस्ता फिरनी करुन पाहिली. चवीला मस्त झालीच होती शिवाय टेक्श्चर एकदम सिल्की झालं होतं.
नंदिनी, तुला खूप खूप धन्यवाद.
आज पुन्हा एकदा केली.
आज पुन्हा एकदा केली.
पॉरीज मोडवर इंस्टंट पॉट मध्ये फिरनी झाली. गुठळ्या पण झाल्या, पण हॅड मिक्सर त्यातच घालून घुर्र्र केल्याव्र एकदम स्मूद पण झाली एफर्टलेसली. मला हे चालण्याजोगं आहे जेव्हा सतत ढवळत बसायला वेल नसेल तेव्हा.
गेल्या वेळी मी जास्ती तांदूळ घेतले होते आणी ते फुगून खूप जास्ती दूध सोक इन करून फिरनी अति घट्ट झाली होती म्हणून ह्या वेळी ५ टेबलस्पून घेतले पण अजून थोडी घट्ट चलली असती. पण कदाचित अजून घट्ट होइल ती. सध्या बाहेर आहे, फ्रीज मध्ये ५-६ तास ठेवली की आणखी थोडी घट्ट होइल असा माझा अंदाज. मी आमंड मील आणि सढळ हस्ते केशर घातलं त्यामुळे रंग आणी चव सुरेख आहे आणि पोत एकदम सिल्की स्मूद.
धन्यवाद नंदिनी आणि इं. पॉ.
३५ लोकांसाठी फिरनी करायला
३५ लोकांसाठी फिरनी करायला किती तांदूळ घ्यावा लागेल?
चार लिटर फुल फॅट दूध आणि
चार लिटर फुल फॅट दूध आणि किमान 2 वाट्या बासमती तांदूळ. वाटल्यास थोडी काजूपेस्ट पण घालता येईल. तांदूळ 2 चे अडीच वाट्या झाले तरी फरक पडत नाही. पण कमी करू नका.
थँक्स श्रध्दा. एवढ्या मोठ्या
थँक्स श्रध्दा. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांंदाच करते आहे. काजू पेस्ट पण घालीन.
रोझ फिरनी केली. नंदिनी, तुला
रोझ फिरनी केली. नंदिनी, तुला खूप खूप धन्यवाद.
काय सुंदर सजावट केलीय.बघूनच
काय सुंदर सजावट केलीय.बघूनच मन एकदम निवलं.
हा बेत,प्रसंग आणि ज्याला/जिला दिली ते माणूसही खासच असणार.
फिरणी छान पण ते केळी टाकून
फिरणी छान
काय सुंदर सजावट केलीय.बघूनच
काय सुंदर सजावट केलीय.बघूनच मन एकदम निवलं.>>>>+१.
कातिल दिसतेय फिरनी
कातिल दिसतेय फिरनी
नंदिनी ची रेसिपी सहीच आहे,
नंदिनी ची रेसिपी सहीच आहे, अख्खा धागा वाचून काढला, काय मस्त एकेकीच्या फिरन्या दिसताएत.
Pages