आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल कवी घोटाळे भूकंप राजकारण
बोलत बोलत किती दूरवर आलो आपण

--डॉ.कैलास गायकवाड

_____/\_____

बेफिजी , सगळेच शेर आवडले.
अफरातफरी आणि प्रहरी सर्वाधिक. Happy

तीन शेरः

तू इकडे यावेस असे वाटत नाही
मतभेदांची दरी किती मोहक आहे

वाट पाहतो दिवसा पान पलटण्याची
आभाळा मी तुझा एक वाचक आहे

का माझ्यावर जीव तुझा जडतो इतका
गंध तुझ्या विरहाचाही मादक आहे

-'बेफिकीर'!

माझ्याइतके सरळ मनाचे येथे कोणी दिसले नाही
ह्या ओळीच्या आधीचे वा पुढचे काही सुचले नाही

-'बेफिकीर'!

दोन शेर!

ढकलतात संसार वर्षानुवर्षे
कितीजण स्वतःला फसवतात हल्ली

तुझे एकदा दूर जाणे न सोसे
तशी रोज नाती उसवतात हल्ली

-'बेफिकीर'!

माझ्याइतके सरळ मनाचे येथे कोणी दिसले नाही
ह्या ओळीच्या आधीचे वा पुढचे काही सुचले नाही

-'बेफिकीर'!

अप्रतिम शेर

पती पत्नी मुलांवर खर्चती वर्षे उमेदीची
स्वतःसाठी जगू हे स्वप्न उरते शेवटी बाकी

-'बेफिकीर'!

कुणीतरी आले की थोडे मन रमते गप्पांमध्ये
अधेमधे आमच्या घरीही येत रहा की एकांता

-'बेफिकीर'!

व्वाह !!

पती पत्नी मुलांवर खर्चती वर्षे उमेदीची
स्वतःसाठी जगू हे स्वप्न उरते शेवटी बाकी >>>> अ प्र ति म !!

दोन शेर

तू नसण्याचे दुःख तुला सांगायचे आहे
ये दुःखा, बैस ज़रासे बोलायचे आहे

उमजत गेली उत्तरे मला सहजासहजी
कधी न पडल्या प्रश्नांशी भांडायचे आहे

- रोहित कुलकर्णी

'
'नमस्ते' 'हाय' पेक्षा वेगळे बोलू
जरासा मोकळा हो मोकळे बोलू
डॉक्टर तुम्ही दिलेल्या शेरा ला जोडून शेर लिहितआहे अभिप्राय जरूर देणे
तुही संसारात गुंतलेला
अन मी हि असा गुंतलेला
पोरेबाळे.कामधंदा सोडुन
जीवनावर काही बोलू
नको लाचेचा पैसा नको खोटी कमाई
चल मित्रा आज सत्या वर काही बोलू
बंद झाल्या गिरण्या संपवले उद्योग
भिकारी झाला कामगार त्याच्या बद्दल काही बोलू.
नापिकी अन डोक्यावरच कर्ज,जीव देतो शेतकरी
ह्या सर्वाला जबाबदार कोण ह्यावरकाही बोलू.
काळा पैसा आणी स्विस खाती,
परत येणारा पैसा अडकला कुठे ह्यावर काही बोलू
सूर्यकांत चांदोरकर

माझ्याइतके सरळ मनाचे येथे कोणी दिसले नाही
ह्या ओळीच्या आधीचे वा पुढचे काही सुचले नाही
प्रिय बेफिकार नमस्कार
काही शेर लिहिले आहेत बघा जमतात का.

टाकून बसलो होतो मी गळ पाण्यात
पण दिवसभरात एक हि मासा काही फसला नाही
अंधाऱ्या रात्री गच्चीवर वाट पाहून झोपलो
पण पहाटे पर्यंत तिचा मुखचंद्रमा काही दिसला नाही
सूर्यकांत चांदोरकर

>>>>ढकलतात संसार वर्षानुवर्षे
कितीजण स्वतःला फसवतात हल्ली
तुझे एकदा दूर जाणे न सोसे
तशी रोज नाती उसवतात हल्ली
-'बेफिकीर'!<<<<

आ.बेफिकीर जी,
आपले शेर वाचून सुचले ते प्रस्तुत करतो...

...हल्ली!
^^^^^^^^^

लिहायास मजला बसवतात हल्ली,
(जरी वेदनांना उसवतात हल्ली)
तुझी वादळे मज वसवतात हल्ली!

(तुला आठवण का कधी येत होती?
तिला प्रश्न असले पुसवतात हल्ली!)

(कसा प्रश्न ऐकून घायाळ होतो?
अरे,काळजातच घुसवतात हल्ली!)

कसे आठवांचे उखाणे बुजू मी?
तुला आर्जवेही हसवतात हल्ली!

गरज काय आहे कुणा वेगळ्यांची?
मला आपलेही फसवतात हल्ली!

अता सावधानीच मी बाळगावी,
कुणी बोलणेही डसवतात हल्ली!

अता वाटते की तुला मी लिहावे,
मला कल्पनाही प्रसवतात हल्ली!
—सत्यजित

मस्त धागा!
माझेही काही शेर... (ज्ञानेश आणी निशिकांत च्या कविते वरून सुचलेले..)

तुझे नाव येता मनाच्या नभाशी उजळले पहा चांदतारे किती
हजारो दिशांना तुझा भास होतो, तुझ्या आठवांचे पहारे किती..

तुझ्या आलांपांचे जग सारे दीवाने, पण मलाच कळतो सूर तुझा..
भोवती तुझ्या घोळका चाहत्यांचा, सांग ना तुला जाणणारे किती

मी झंकारते तुझातुनी अन माझ्या मनी धून वाजते तुझी
असे हळुवार रेशीमबंध अपुले ,जळतात बघ पाहणारे किती ... Wink

- रसिका

Pages