आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती तर्‍हेच्या अतर्क्य घटना रटाळ गोष्टी म्हणजे जीवन
अनेक वर्षे रखडवलेला डेली सोप बरा एखादा

अतिशय सुंदर.
जीवनाचे इतके समर्पक वर्णन आता ह्या घडीला पटत आहे.

पाहता सारे तसे अलबेल आहे
फ़क्त माझ्याशीच माझे वैर आहे

वाटले कित्येकदा झोकून द्यावे
जाणले प्रत्येकदा हे गैर आहे

मस्त सुप्रियातै..

क्षणोक्षण जिंदगी मरणाजवळ तर जात आहे
कुणी म्हणतो कसा की वेळ नाही जात माझा ...वा व्वा !

किती आनंद आहे हा !.. किती आनंद आहे हा !!..
किती आनंद आहे की... तुझ्यासाठी रडावे मी !!!
मस्तय. खास रिपिटेटिव्ह. Happy

गप्पांगप्पांमधे तिचे भरले की डोळे
गप्पांगप्पांमधे किती मी वाहत गेलो<<
समीरजी, तुमच्या या शेराची आठवण झाली अचानक.
सुरेख ..सुरेख .

धरतीत पाय दोन्ही गगनात हस्त आहे
आमचे नका विचारू सारेच मस्त आहे

वा. दुसरी ओळ अधिक छान. आमचे ऐवजी अमचे किंवा अमुचे हवे आहे.

१) कुठेतरी पैंजण ते हळूच रुणझुणले
मनात गीताला मी इथेच गुणगुणले ..

२) सोबतीला सावली मी घेउनीया चाललो
सांजवेळी काय झाले का बरे पस्तावलो ..

१) लपवून आज दु:खे मी हिंडणार आहे
माझा नवा मुखवटा मी लावणार आहे ..

२) आम्हास न्याय देवा ना तव अजब उमजतो
सुख धाडसी पळीभर दु:खास पूर असतो ..
.

धन्यवाद भुईकमळ

एक शेर ...
शेर माझा ..होत असलेला ..मला म्हणतोय की
वैभवासाठी जगू की विठ्ठलासाठी जगू

शेर माझा ..होत असलेला ..मला म्हणतोय की
वैभवासाठी जगू की विठ्ठलासाठी जगू

पोझिंग आहे शेरात.
ह्यात अडकू नये असे वाटते.

द्वंद्व हे भासे असे की गाठतो खिंडीत कोणी
प्राण कंठी दाटताना भेटतो दिंडीत कोणी
धावलो मी कैक वेळा शोधण्या त्याच्या रुपाला
भासतो येथे खरा अन वेगळा पिंडीत कोणी

प्राण कंठी दाटताना भेटतो दिंडीत कोणी<<< सुरेख ओळ! शेरही छानच आहे, पण कदाचित अधिक सुलभ करता आला असता असे वाटून गेले. पुन्हा वाचून पाहतो.

आपली वाटणारी मने भेटली
खंगण्याला नवी कारणे भेटली

अरे वा ! क्या बात !!

प्राण कंठी दाटताना भेटतो दिंडीत कोणी<<< सुरेख ओळ! शेरही छानच आहे, पण कदाचित अधिक सुलभ करता आला असता असे वाटून गेले. पुन्हा वाचून पाहतो. .>>>>>>>
बेफिजी, आता वाचुन पहा बरे.

भेटतो दिंडीत कोणी<< ह्या इतक्या भागाचे शेरातील इतर भागाशी अर्थाचे कनेक्शन लक्षात येत नाही आहे पाटिल साहेब

वैवकु | 31 January, 2015 - 11:01भेटतो दिंडीत कोणी<< ह्या इतक्या भागाचे शेरातील इतर भागाशी अर्थाचे कनेक्शन लक्षात येत नाही आहे पाटिल साहेब>>>>>>>>>
वैभवजी थोडक्यात स्पष्ट करतो......
द्वंद्व हे भासे असे की गाठतो खिंडीत कोणी
प्राण कंठी दाटताना भेटतो दिंडीत कोणी
धावलो मी कैक वेळा शोधण्या त्याच्या रुपाला
भासतो येथे खरा अन वेगळा पिंडीत कोणी

यासाठी पहिली ओळ लक्षात घ्यावी लागेल. कवी एक द्वंद्व समोर मांडतो. माणसे कधी खिंडीत गाठून दगा फटका करणारी भेटतात तर कधी प्राण कंठी दाटून अर्थात आयुष्याची बिकटावस्था प्राप्त झाल्यावर पंढरी आठ्वलेल्या एखाद्यास दिंडीत साधुच्या,वारकर्‍याच्या रुपाने कोणी भेटतो व आधार देतो.त्याचा एक शब्द त्या मरणासन्न माणसाला नवसंजीवनी देतो.माणसातील हे द्वंद्व येथे अधोरेखित होते. माणसातील देवत्व आणि पशुत्व हे ते द्वंद्व होय.आपण म्हणाल दगा फटका हा शब्द्प्रयोग तर शेरात नाही,तर मी म्हणेल खिंडीत गाठने चा तोच अर्थ आहे.जरा जास्तच लिहिलं नै !

एक शंका : गझल ही केवळ सामान्य प्रज्ञेच्या रसिकांना सहज समजावी असा गझलेचा निकष आहे का? असेल तर ती बाळ्बोध ठरणार नाही क? ही शंका उत्सुकतेपोटी आहे.

दोनही ओळींचा स्वतंत्रपणे स्पष्ट अर्थ लागत नाही 'द्वंद हे' म्हणजे काय तेही कळत नाही आहे नेमके त्याला पकडून अर्थ लावू पाहिला तर पहिल्या तीन तुकड्यांचा अर्थ लागला असे वाटतानाच शेवटचा तुकडा भरकटवतो

ओळींचा एकसंधपणा
भाषेचा प्रवाहीपणा
अर्थासाठीचा सोपेपणा सहजपणा
आणि दोनही ओळींचा परस्परसंबंध सहजपणे लावता येणे ह्याचा सराव करावा

आपण जी प्रतिमा व प्रतिके रूपके इत्यादी इत्यादी वापराल वगैरे त्यांच्यात विरोधाभास वा परस्परसंबंध शोधून काढता आला पाहिजे जाणवला पाहिजे (हा शेर करण्याचा एक प्रकार आहे साधा )

त्यापेक्षा खालच्या दोन ओळी स्वतंत्र शेर म्हणून लक्षात घेता येत आहेत चांगल्याप्रकारे

धावलो मी कैक वेळा शोधण्या त्याच्या रुपाला
भासतो येथे खरा अन वेगळा पिंडीत कोणी

तरीही आपली परवानगी असेल तर दोनएक सूचना करतो ...धावलो ऐवजी धावतो करा ऑर भासतो ऐवजी भासला करा एकतानता येइल काळाची ....कैकवेळा ऐवजी कुठे कुठे धावलो असे सांगीतले तर सोपे व एकजीव ठरावे आणि खरा ...(प्रयोजन चुकल्यागत वाटते हे ..कारण इथे खरा असे म्हणताना तिथे खोटा असा शब्दप्रयोग आला तर समजायला सोपे जाते ) ... ऐवजी निराळा असे करू शकता त्यामुळे वेगळा असे म्हणण्याला बॅलेन्स चांगला होईल ('अन' काढून टाकता येइल )

आपला त्यावरचा शेर... चर्चेचा मूळ शेर .."कधी असे होते तर कधी तसे" असा बेसिक आशय व्यक्त करू पाहत आहे असे आपल्या स्पष्टीकरणातून वाटत आहे हा आशय भरकटता कामा नये ह्याची काळजी घेतली पाहिजे

तो शेर अधिक तुम्हाला हवा तसा नाही पण जरा आकर्शक करू शकेन मी कदाचित ..असा...

प्राण कंठी दाटण्याच्या भोगल्या मी दोन वेळा
गाठले खिंडीत कोणी , भेटले दिंडीत कोणी !!!!

पण आपल्या हाती लागलेल्या जमीनीच्या शेराची मतल्याची अशी चीरफाड केल्याबद्दल ..ज्याने तो मतला ठरू शकणार नाही आता ...क्षमस्व !! बेसिक आशयही किंचित बदलाला आणि " एकदा असे झाले एकदा तसे झाले " असा झाला त्याबद्दलही दिलगीर आहे मी )

धन्यवाद

दोन नवीन शेर

रांग लागलेली मोठी
ज्यासत्यास घाई मोठी


लागली जिवाला छोट्या
काळजी जगाची मोठी

Pages