आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रिया जाधव यांचा प्रकाशाला तुझ्या ,शास्त्राधार असलेला मर्मिक शेर
एकदम क्लासिक..

कोकणस्थ भौनी गप्प का आज सारे लिहिले आहे.

ते चरण कालगंगेत बसवता येते.

गालगागा गालगागा आज सारे गप्प का ?

काफिय्र शोधणे कठीण आहे. त्यापेक्षा प्रत्येक ओळीचा शेवट आज सारे गप्प का ? असाच ठेउन चांगली गझल होउ शकेल. आसे करणे गजलेच्या नियमात बसेल का ?

असे केले तर काफिया कुठला व रदीफ कुठला ?

मी रागाला गेल्यावरती तीने चुंबीला गाल
इतक्या कच्च्या वैर्यासाठी इतकी सुंदर ढाल?

वा वा !

पुन्हा धागा वाचताना मजा येतेय . Happy

मी कोण नेमका आहे ,हे सांगत सुटणे सुध्दा
मी कोण नेमका नाही, हे सांगत असते हल्ली..

--सुशांत..

समीरजी, भुईकमळ खुप खुप धन्यवाद !

भुईकमळ हा शेर झाला तेव्हा इतका आनंद झाला होता माझा मलाच पण अजिब्बात रिसपॉन्सच मिळाला नाही याला. मन खट्टू झाल होत. कदाचित तो शास्त्राधार पोहचलेला नसावा Sad

असो !

पुनःश्च धन्यवाद !

-सुप्रिया.

मी कोण नेमका आहे ,हे सांगत सुटणे सुध्दा
मी कोण नेमका नाही, हे सांगत असते हल्ली

व्वा. क्षणभर वाटलं की बेफिकीर ह्यांचा शेर तर नाही ना.

आपल्याला गझल कळत नाही ... पण ह्या धाग्यावारचे प्रतिसाद वाचत गेलो आणि आता शेवटचा प्रतिसाद वाचेपर्यंत मी गझल चा पंखा झालोय ....

.

प्रकाशाला तुझ्या आधार माझा
जरी मी क्षुद्र आहे कण धुळीचा

मी माझ्या मार्गातिल धोंडा
पोचलोच असतो एव्हाना

मी कोण नेमका आहे ,हे सांगत सुटणे सुध्दा
मी कोण नेमका नाही, हे सांगत असते हल्ली..

वाटले होते उगवला चन्द्र हा माझ्याचसाठी
मार्ग आधी आखलेला तो कुणी पांथस्थ होता

<<<

हे सर्व शेर अतिशय आवडले. चुकून आधी काही शेरांना दाद द्यायची राहिली असल्याबद्दल दिलगीरी!

समीरजी शेर ख़ासच ! बेफिजी धन्यवाद !

माझे शेर आठवले

पाहता सारे तसे अलबेल आहे
फ़क्त माझ्याशीच माझे वैर आहे

वाटले कित्येकदा झोकून द्यावे
जाणले प्रत्येकदा हे गैर आहे

सुप्रिया

क्षणोक्षण जिंदगी मरणाजवळ तर जात आहे
कुणी म्हणतो कसा की वेळ नाही जात माझा

किती स्वस्त मिळतात अजुनही गजरे येथे
अजूनही स्वस्तात कुणी दर्वळून येते

--------------------------------------------शाम

वाटले कित्येकदा झोकून द्यावे
जाणले प्रत्येकदा हे गैर आहे

.....

छोड दे सारी दुनिया किसी के लिये
ये मुनासिफ नही आदमी के लिये

वाटले कित्येकदा झोकून द्यावे
जाणले प्रत्येकदा हे गैर आहे<<< मस्तच

क्षणोक्षण जिंदगी मरणाजवळ तर जात आहे
कुणी म्हणतो कसा की वेळ नाही जात माझा<<< सुंदर

किती स्वस्त मिळतात अजुनही गजरे येथे
अजूनही स्वस्तात कुणी दर्वळून येते <<< व्वा व्वा

वा सर्व नवीन शेर मस्त आहेत एकदम ! मजा आली

ईक माझा शेर टाकतो आणि निघतो ..

किती आनंद आहे हा !.. किती आनंद आहे हा !!..
किती आनंद आहे की... तुझ्यासाठी रडावे मी !!!

Pages