Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13
गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.
सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परिस्थितीने ढाल टाकली
परिस्थितीने ढाल टाकली केव्हाची पण
तलवारीला चिथावण्याची खोड न मेली
सुपर्ब
वाह...
वाह...
क्या बात समीरजी..
क्या बात समीरजी..
क्या ब्बात समीरजी
क्या ब्बात समीरजी
भूषण, कैलास, सुशांत,
भूषण, कैलास, सुशांत, जयदीप
मनापासून धन्यवाद.
हा धागा तर न संपणारा धागा
हा धागा तर न संपणारा धागा ठरेल...
खूप खूप धन्यवाद डॅाक्टरसाहेब
मी प्रश्न विचारत होतो मी मते
मी प्रश्न विचारत होतो
मी मते मांडली नव्हती!
-जयदीप
नेहमीच्या आपल्या चिंध्या
नेहमीच्या आपल्या चिंध्या बर्या होत्या,
हा तुझा सदरा नवा उसवत किती आहे?
-चित्तरंजन भट
झळाळीने तुझ्या जग आंधळे झाले
तुझा खोटेपणा बावनकशी आहे..
-चित्तरंजन भट
मला अडवून माझी चौकशी
मला अडवून माझी चौकशी झाली
तुझ्या गल्लीत मी येणार नाही जा..
-इंद्रजित
कामी न आली शेवटी रक्तातली माझ्या गझल
आयुष्यभर सांभाळला मी एक मिसरा पोरका
-इंद्रजित
पांगल्या वाटा, जाहले वेगवेगळे
पांगल्या वाटा, जाहले वेगवेगळे गाव
दूर तू कित्येक तरी घेशी अंतरीचा ठाव
- तोफखाना
तोफखाना, ह्या ओळी वृत्तात
तोफखाना,
ह्या ओळी वृत्तात म्हणता आल्या नाहीत, अक्षरछंदात म्हणता आल्या. अक्षरछंदात गझल रचत नाहीत हे आपण जाणत असालच.
कृ गै न
प्रतिसादाबद्दल आभार बेफिकीर
प्रतिसादाबद्दल आभार बेफिकीर जी
सुधारणेला वाव आहे
मनात होत्या त्याच लिहिल्या आहेत, लक्षात आणून दिल्या बद्दल आभारी
वसीम बरेलवींची गझल, जी
वसीम बरेलवींची गझल, जी फेसबूकवर वाचायला मिळाली, सहज इथे देत आहे. ही गझल इथे देणे हा धाग्याच्या नियमांचा भंग आहे ह्याची नम्र जाणीव आहे, पण खूप आवडली म्हणून देत आहे.
मैं इस उम्मीद पे डूबा कि तू बचा लेगा,
अब इस के बाद मेरा इम्तिहान क्या लेगा..
ये एक मेला है वादा किसी से क्या लेगा,
ढलेगा दिन तो हर इक अपना रास्ता लेगा..
मैं बुझ गया तो हमेशा को बुझ ही जाऊँगा,
कोई चराग़ नहीं हूँ कि फिर जला लेगा..
कलेजा चाहिये दुश्मन से दुश्मनी के लिये,
वो बेअमल है वो बदला किसी से क्या लेगा..
मैं उसका हो नहीं सकता बता न देना उसे,
लकीरें हाथ की अपनी वो सब जला लेगा..
हज़ार तोड़ के आ जाऊँ उस से रिश्ता वसीम,
मैं जानता हूँ वो जब चाहेगा बुला लेगा..!!
"वसीम बरेलवी"
हज़ार तोड़ के आ जाऊँ उस से
हज़ार तोड़ के आ जाऊँ उस से रिश्ता वसीम,
मैं जानता हूँ वो जब चाहेगा बुला लेगा..!!
हज़ार तोड़ के आ जाऊँ उस से
हज़ार तोड़ के आ जाऊँ उस से रिश्ता वसीम,
मैं जानता हूँ वो जब चाहेगा बुला लेगा..!!
"वसीम बरेलवी"
Vvaa vvaa क्या बात है..
मृत आहे की जिवंत आहे संभ्रम
मृत आहे की जिवंत आहे संभ्रम नुसता
मरून जगण्यामधला उरला दिनक्रम नुसता
भूक गरीबी दुष्काळातहि तगून असतो
खलास होतो तुझा पाहुनी विभ्रम नुसता
---डॉ.कैलास गायकवाड
भूक गरीबी दुष्काळातही तगून
भूक गरीबी दुष्काळातही तगून असतो
खलास होतो तुझा पाहुनी विभ्रम नुसता <<< मस्त मस्त
दुष्काळातहि असे हवे का?
हो... करेक्ट. दुरुस्ततो.
हो... करेक्ट.
दुरुस्ततो.
तीन शेरः पुढे सरकते म्हणून
तीन शेरः
पुढे सरकते म्हणून केवळ उभा राहिलो आहे
रांग कशासाठी आहे मी विचारलेही नाही
फुले येथली कोणासाठी फुलून आली आता
ह्या बागेवर कोणी पाणी फवारलेही नाही
कधीच त्या पिल्लाला इतका जीव लावला नसता
परक्या घरट्यामधले होते, तपासलेही नाही
-'बेफिकीर'!
पुढे सरकते म्हणून केवळ उभा
पुढे सरकते म्हणून केवळ उभा राहिलो आहे
रांग कशासाठी आहे मी विचारलेही नाही
कधीच त्या पिल्लाला इतका जीव लावला नसता
परक्या घरट्यामधले होते, तपासलेही नाही
वा वा..
फुले येथली कोणासाठी फुलून आली
फुले येथली कोणासाठी फुलून आली आता
ह्या बागेवर कोणी पाणी फवारलेही नाही
व्व्वा. व्व्वा. जमीन मस्त आहे.
तिन्ही शेर आवडले बेफिजी
तिन्ही शेर आवडले बेफिजी
शेर आवडले बेफिजी. रांगेचा
शेर आवडले बेफिजी. रांगेचा सर्वाधिक आवडला.
धन्यवाद सुशांत आणि समीर,
धन्यवाद सुशांत
आणि समीर, जयदीप आणि कैलासराव 
माय टू सेंट्स.... वाट चुकलेली
माय टू सेंट्स....
वाट चुकलेली माहित असुनी चालत होतो
जमेल तसे अंतर रोजच थोडे कापीत होतो
नाही जमले मागे टाकाया मैलांचे ते शुभ्र दगड
धुंद मनावर तुझ्याच आठवणींची अलवार पकड
विचार तुझे येताच हुसकावूनी लावत होतो
सुनी सुनी वाट तुझ्याविना तुडवीत होतो ....
TBC.....
दोन शेरः येत नाही फारसे कोणी
दोन शेरः
येत नाही फारसे कोणी इथे
मन जरा टुमदार केले पाहिजे
==================
रोज काहीतरी होत असते मला
एकदम सर्व होईल तेव्हा बघू
==================
-'बेफिकीर'!
रोज काहीतरी होत असते मला एकदम
रोज काहीतरी होत असते मला
एकदम सर्व होईल तेव्हा बघू
शेर आवडला. आपण कवी लोक अविचार सुध्दा लोकांना आवडतील असे मांडतो.
तीन शेर: वडिलांच्या पेन्शनवर
तीन शेर:
वडिलांच्या पेन्शनवर येते महिन्याचे सामान घरी
त्या रकमेतच सिग्रेटींसाठी करतो अफरातफरी
सुखात आहे दाखवण्याचे कसब तसे शिकलो आहे
तरी पावलागणिक जगाला सापडते ही नस दुखरी
'बेफिकीर' ही सर्व माणसे झाली निद्राधीन पहा
नसेल का रे कुणीच जागे माझ्यासाठी ह्या प्रहरी
-'बेफिकीर'!
वडिलांच्या पेन्शनवर येते
वडिलांच्या पेन्शनवर येते महिन्याचे सामान घरी
त्या रकमेतच सिग्रेटींसाठी करतो अफरातफरी
व्वा व्वा.
बाय दि वे, मी जागा आहे, शेरांसाठी निश्चितच.
धन्यवाद समीर
धन्यवाद समीर
Pages