आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीरजींचे नवे दोनही शेर आवडले बेफीजींचा हझलेचा शेरही मस्तच सुप्रियाताईंचाही शेर छान

क्रम बदलला की एकदम वेगळेच वाटू लागते.<< हो हो ! आणि अनेकदा शेराची मजाही वाढून बसते असेही मी पाहिले आहे

एक माझा नवा शेर अजूनतरी सुटाच आहे हा..

पदर हा तुझा की जणू एक योगी
क्षणार्धात 'नि:संग' शिकवून जातो

पदर हा तुझा की जणू एक योगी
क्षणार्धात 'नि:संग' शिकवून जातो

वा वा. मूडमध्ये दिसताय!

वा वा. मूडमध्ये दिसताय! <<< हाहाहा समीरजी
धन्स

कुण्णाला सांगू नकात बरका Wink

कसे वाटेल कोणी ऐकले तर
"अशी" इच्छा कशी व्हावी कळेना

पदर हा तुझा की जणू एक योगी
क्षणार्धात 'नि:संग' शिकवून जातो

वा वैवकु..

इथे एक संदर्भ निःसंग करतो
कसे पाठ केलेस तू बारकावे ?<<<

व्वा

(इथे ह्या साध्यासुध्या शब्दात केवढी मजा असू शकते हे दाखवणारा समर्थ शेर)

पदर हा तुझा की जणू एक योगी
क्षणार्धात 'नि:संग' शिकवून जातो<<<

व्वा

मूडमध्ये दिसताय<<< Lol

उठतात पापण्याही दचकून मध्यरात्री
येऊ नका सुखांनो फसवून मध्यरात्री ..!

इतकीच चांदण्यांनो बड़दास्त चोख ठेवा,
माझी व्यथा दिसावी उजळून मध्यरात्री...!

~ अनिल आठलेकर..

एकांताच्या उंबरठ्यावर विनोद झाला
कुणीतरी गर्दीस म्हणाले .......'माणुसघाणी' !! >> व्वा !

माझी व्यथा दिसावी उजळून मध्यरात्री...!>> क्या बात.

एका ओळीमधे वेदना मावत नाही
तरी मनाला लिहिल्यावाचुन र्‍हावत नाही.

--डॉ.कैलास गायकवाड

अफलातून मेजवानी धागा.....

जियो डोक्टर......

डॉक, एक मेहेफिल अब नेरूळ मे ड्यु है..... !

काल बोलला नदीवरचा पूल तो
नाही अजून गेला खेटून पावसाळा

हा चुकीचा शेर आहे. मला वाटतं खात्री असेल तरच शेर द्यावेत. माझा एक शेर तुझ्यासाठी न इथले
असाच चुकीच्या पध्दतीने कोट करण्यात आला आहे.

समीर

एक शेरः


परिस्थितीने ढाल टाकली केव्हाची पण
तलवारीला चिथावण्याची खोड न मेली

समीर चव्हाण

Pages