आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्नांना पण तुटण्याचा अधिकार’ असावा ,
व्हावा वार ‘एकवार’ पण ‘हळुवार’ असावा ...!”

अलका डी भोसले ( स्वप्न वेडी )

मी गझल रंग ची नियमित श्रोता आहे .आणि सुरेश भटांच्या गझलांची दिवानी ..गझल रंग चे अण्णा ( शाहीर सुरेशकुमार वैराळकर ) हे माझे गझल वेड पाहून प्रतेक कार्यक्रमाची माझी चीअर रिझर्व्ह करून ठेवतात ...गझलांनी अक्षरशः मला वेड लावलं आहे ...अजून मी स्वत : मात्रात बसणारी गझल केली नाही पण ते खूप अवघड असत याची जाणीव आहे मला ...गझल करणाऱ्या व्यक्तीने प्रथम खूप चांगल्या कविता कारण गरजेच आहे त्यामुळे सध्या fb वर कविता करते ...आणि आता मायबोलिकर बनून आपल्यात सामील आहे ...!

मात्रात बसणारी गझल केली नाही पण ते खूप अवघड असत<<<अलकाजी तसं काही नसतं !! आणि हेही खरच की केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे !!! Happy

गझल करणाऱ्या व्यक्तीने प्रथम खूप चांगल्या कविता कारण गरजेच आहे<<< लो़क मानतात पण मला वाटते की हे अपरिहार्य नसेल म्हणून
असो
तुम्हाला आणि तुमच्या गझलेला शुभेच्छा

काही नवे शेर

व्यर्थ घालवू नका संपदा मला जगविण्यासाठी
इच्छा मेल्यावर काहीही उपाय चालत नसतो

कोण जाणे कोणत्या भाषेत मी रेखाटतो
एकदाही जात नाही ह्या मनीचे त्या मनी

सिद्धी आणि प्रसिद्धी मोठ्या कजाग सवती
दोघीही पाहिजेत म्हणजे फरफट निश्चित

प्रयाणाचा दिवस जाहीर कर निश्चिंत हो
तुझ्यादेखत तुझ्या सार्‍या खुणा आम्ही पुसू

आणखी खोदायचे आता तरी सोडून दे तू
जेवढे पाणी हवे त्याहून जास्ती घाम गेला

-विजय दिनकर पाटील
-----------------------------------------------------
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित http://bocharewaare.blogspot.in

कोण जाणे कोणत्या भाषेत मी रेखाटतो
एकदाही जात नाही ह्या मनीचे त्या मनी

सिद्धी आणि प्रसिद्धी मोठ्या कजाग सवती
दोघीही पाहिजेत म्हणजे फरफट निश्चित

प्रयाणाचा दिवस जाहीर कर निश्चिंत हो
तुझ्यादेखत तुझ्या सार्‍या खुणा आम्ही पुसू

आणखी खोदायचे आता तरी सोडून दे तू
जेवढे पाणी हवे त्याहून जास्ती घाम गेला<<<

व्वा व्वा!

अजून येऊदेत!

जयदीप व कैलासराव आभार.

नवा शेर

थांबायचे कोणी कुणासाठी कशाला
आपापला उद्योग प्रत्येकास आहे

-------------------------------------------------------
पूर्वप्रकाशित http://bocharewaare.blogspot.in/2014/04/blog-post_7028.html

वाह..सुंदर धागा..कैलाससर..

थांबव आता डोळ्यामधल्या तरल मिठाला..
संसाराची भाजी अवघी खारट झाली..!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

मस्त शेर समीर

एक नवा शेर

जायचे आहे उभे राहून जर
कोणताही क्लास का चालू नये

विजय दिनकर पाटील

जायचे आहे उभे राहून जर
कोणताही क्लास का चालू नये>>>क्या बात है .....

आयुष्याला असे पाहिले तसे पाहिले
बोलतोस तू आयुष्याने जसे पाहिले

आयुष्याला फुरसत नव्हती नावालाही
आयुष्याने कोणाला फारसे पाहिले

मने गुंतवू ठरावीकश्या मुदतीसाठी
वर्षानंतर व्याजाचा दर बदलत नसतो

-सुप्रिया.

Pages